अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<एक - एक पान गळणे (प्रत्येक प्रकरणात तुम्ही पाच योग्य कारणे द्याल... आणि जनता थोडा काळ हे सर्व मान्य करेलही) आप साठी आणि पर्यायाने देशाच्या भविष्यासाठी चान्गले नाही.>>

एकेक पान गळणं दुर्दैवी आहे ह्यात शंकाच नाही. पण म्हणून निराश होण्याची गरज नाही. १० गेले तर उद्या १०० येतील. कडू, गोड कसंही वाटलं तरी हेसत्य आहे.

रच्याकने, आत्तापर्यंत अकेपासून/आपमधून 'स्वराज नाही, अंतर्गत लोकशाही नाही' ह्या कारणांवरून गळलेली जवळ-जवळ सगळी पानं भाजपाच्या झाडाला जाऊन चिकटली ह्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
१. व्ही के सिंग
२. किरण बेदी
३. विनोद बिन्नी
४. शाझिया इल्मी
५. अश्विनी उपाध्याय
तेव्हा समजा आपमधून कोणी बाहेर पडलंच तर ६ महिने-वर्षभर वाट पहायची. खरे रंग फार काळ लपून रहात नाहीत.

१. व्ही के सिंग
२. किरण बेदी
३. विनोद बिन्नी
४. शाझिया इल्मी
५. अश्विनी उपाध्याय >>> या सगळ्यांना यो या शी कंपेअर करत असाल तर खरच मुर्खपणा आहे.

व्ही के सिंग, किरण बेदी जनलोकपाल मुव्हमेंट मध्ये असतानाच प्रो भाजपा होते. त्या काळात भाजपाने सुद्धा आंदोलनाला पाठिंबाच दिला होता.
विनोद बिन्नी, शाझिया इल्मी ऑप्युर्चनिस्ट होते/आहेत. अजूनही असे बरेच जण आहे आपमध्ये. आपमध्ये हवशे, गवशेम नवशे सगळ्याच प्रकारचे लोक आलेत. सगळ्याच नव्या पक्षात असे लोक येत असतात.

<<या सगळ्यांना यो या शी कंपेअर करत असाल तर खरच मुर्खपणा आहे.>>

अल्पना,असं का वाटतंय? योयांचा कल्ट? ते चूक असूच शकत नाहीत असं ठाम मत?
तुमच्याकडून भाषेचा तोल गेल्याचं पाहून आश्चर्य वाटलं.

http://acbmaharashtra.gov.in/news.asp महाराष्ट्र ऍण्टिकरप्शन ब्यूरोची ऑफिशीयल साईट. वीकली अपडेट्स आहेत. महाराष्ट्रातपण चालू आहे का ह्याची official नोंद शोधायला गेले तर हे मिळालं. पेपरमध्ये सगळं येतं की नाही ते माहित नाही.

अल्पना,असं का वाटतंय? योयांचा कल्ट? ते चूक असूच शकत नाहीत असं ठाम मत?>>> फक्त तेच चुकीचे आहेत असं नक्कीच वाटत नाही. चुका दोन्ही बाजूंनी झाल्या आहेत. यो यां ना वैयक्तिकरित्या ओळखते त्यामूळे किती चूक किंवा कितपत चूक होवू शकेल त्यांच्याकडून याबद्दल थोडेफार अंदाज आहेत.

१. व्ही के सिंग
२. किरण बेदी
३. विनोद बिन्नी
४. शाझिया इल्मी
५. अश्विनी उपाध्याय >>> या सगळ्यांना यो या शी कंपेअर करत असाल तर खरच मुर्खपणा आहे.
--------
बिन्नी, इल्मी, सिन्ग हे वार्‍याची दिशा बघुन निर्णय घेतात... या सर्वापेक्षा मला योगेन्द्र यादव वेगळे वाटतात.

बेदी यान्च्या बद्दल मोठा आदर (अजुनही) आहे...

हो अश्विनी. ही साइट माहीत आहे. लाचखोरांचे फोटो फेसबुकवर टाकण्याची त्यांची स्कीमपण आवडली होती. माबोवर चर्चाही झाली आहे त्याबद्दल.
पण....त्यांच्या नाकाखाली सिंचन घोटाळ्यासारखे मोठमोठे घोटाळे घडले हेही खरंय. त्यांच्या फेबु पेजवरचे फोटो पाहून वाटतंय की फक्त लहान मासे गळाला लावण्याचं काम चालू आहे.
अशावेळी मला हरसिमरत कौर हटकून आठवतात -"आप हम नेताओं को ही ग्यान क्यों देते हो? जनरल पब्लिक को भी अपना ग्यान बाटिए ना, पहले उन्हें भी तो पकडिए" असं त्या इंडिया टुडे कन्क्लेवमध्ये अकेंना म्हणाल्या होत्या. Uhoh
तरी एसीबी जेवढं काही करतंय तेही वाईट नाही. चालू ठेवावंच. आणखी सशक्तपणे काम करावं ही अपेक्षा आणि सदिच्छा.

<<फक्त तेच चुकीचे आहेत असं नक्कीच वाटत नाही. चुका दोन्ही बाजूंनी झाल्या आहेत.>>

हे मलाही मान्य आहे. कोणाची चूक कुठल्या प्रकारची आहे त्यावर आता पुढचं सगळं ठरायला हवं.

मिर्ची ताई,

हा काय प्रकार आहे? :
Election Commission Notice to 6 Parties on Poll Expenditure

आमादमीपक्ष भ्रष्टाचारविरहित आहे अशी आमची समजूत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचे हिशेब का सादर झले नाहीत आजून?

आ.न.,
-गा.पै.

<<आमादमीपक्ष भ्रष्टाचारविरहित आहे अशी आमची समजूत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचे हिशेब का सादर झले नाहीत आजून?>>

हिशेब सादर व्हायला हवे होते.
१३ महिन्यांत ३ मोठ्या निवडणूका आणि पुरेशा पैशाभावी कमी असलेलं मनुष्यबळ ह्या कारणांवरून मी त्यांना सॉफ्ट कॉर्नर द्यायला तयार आहे.
तुम्ही द्यावाच असं नाही. बारीक लक्ष ठेवा. (हे तिरकस वाक्य नाही.)

मॅच संपली तरी मिडियाला टीआरपीची चिंता करायला नको. आपचे महान लोक भरपूर खाद्य पुरवत आहेत. ट्वीटरवर तर आरोप-प्रत्यारोपांचा धुमाकूळ चालू आहे. मेलं काय ते एकदा सोक्षमोक्ष लावून टाका आता.

केजरीवाल रजेवरुन परत आल्या नन्तर (समोरासमोर) प्रत्यक्ष भेट का झाली नाही ? सर्व जगासमोर कशाला मतभेद मान्डत फिरायचे.

योया यान्ची national executive मधुन पण गच्छन्ती होणार असेल तर खुप दुर्दैवी Sad आहे... पद्धतशिरपणे त्यान्चे खच्चीकरण सुरु आहे.

शिकलेली, स्वच्छ आणि प्रामाणिक माणसे एकत्र काम करु शकतच नाही का? वादात असलेल्या प्रत्येकानेच आपापला अहन्कार (ego), अहमगन्ड दुर ठेवला आणि निव्वळ जनतेच्या कामावर लक्ष केन्द्रीत केले नाही तर आआपचे भवितव्य धोक्यात आहे.

मिर्ची,

>> १३ महिन्यांत ३ मोठ्या निवडणूका आणि पुरेशा पैशाभावी कमी असलेलं मनुष्यबळ ह्या कारणांवरून मी त्यांना सॉफ्ट
>> कॉर्नर द्यायला तयार आहे.

निर्वाचन आयोगाने ८ एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. तोवर बघूया काय होतंय.

आ.न.,
-गा.पै.

>>आपचे महान लोक भरपूर खाद्य पुरवत आहेत. ट्वीटरवर तर आरोप-प्रत्यारोपांचा धुमाकूळ चालू आहे. मेलं काय ते एकदा सोक्षमोक्ष लावून टाका आता.<<

एव्हढ्यात श्रद्धेचे बुरुज ढासळु देउ नका. ये तो शुरुवात है... Happy

मिर्ची , आपवाल्यांची अवस्था 'दैवं देतं आणी कर्म नेतं' अशी झाली आहे.
कमीतकमी यांच्या अंतर्गत भांडणात दिल्लीतील सरकारतरी स्थिर राहूदे ही अपेक्षा.

<<मिर्ची , आपवाल्यांची अवस्था 'दैवं देतं आणी कर्म नेतं' अशी झाली आहे.
कमीतकमी यांच्या अंतर्गत भांडणात दिल्लीतील सरकारतरी स्थिर राहूदे ही अपेक्षा.>>

दुर्दैवी आहे सगळं. पण सरकार स्थिर राहील आणि कामंही होतील असा विश्वास वाटतोय.

शांती भूषणनी जुलै २०१४ मध्ये अकेंना लिहिलेलं पत्र. काय भाषा आहे !मोदींना काय दोष द्यायचा? घरातले लोकच "दिल्लीसारख्या छोट्याशा बेटापुरती सीमित असणारी दृष्टी ठेवणारा नेता" असं लेबल लावत आहेत.
देशभर निवडणूका लढवण्याच्या निर्णयासाठी (जो निर्णय त्यांचा नव्हताच!) केजरीवालांना मूर्खात काढणारे किती लोक त्यांच्या ५ वर्षे दिल्लीत सीमित राहण्याच्या हट्टाचं कौतुक करतात हे पहाण्याची उत्सुकता आहे.

अकेंविरूद्ध अजून एक स्टिंग येणार आहे म्हणे. :पॉपकॉर्न:

पॉपकॉर्न ?? मिर्ची ताई तुम्ही सुद्धा ?

अस भरोसा सोडून कस चालेल ?

"आम आदमी पार्टी चाललीच पाहीजे " कारण तो एकमेव शेवटचा दिलासा / विश्वास आहे जनतेचा !!

तो एकमेव शेवटचा दिलासा / विश्वास आहे जनतेचा !! >> अगदी अगदी कोंढाजी. मोदींनी केलेल्या भ्रमनिरासानंतर लोकांनाच तसंच वाटु लागलंय हे खरंय. Wink

यात काय चुकीच आहे, दोनदा दिल्लीच्या लोकांनी विश्वास टाकलाय आम आदमी पार्टीवर,

बाकी बिजेपी तरी पाच वर्षे आहेच केंद्र सरकार मध्ये,

पण काँग्रेसच काय होणार त्याच्यासाठी पॉपकॉर्न चे डब्बे पुरणार नाहीत फॅक्टरी लागेल.

१५ वर्ष दिल्लीत आणि १० वर्ष केंद्रात भाज्प्यांना शेकडो फॅक्टरी लागलेल्या होत्या ना Biggrin
त्याआधी ६५ वर्ष काय केले देवालाच माहीती
आता बोंबलु नकाच ६५ वर्षाचा पॉपकॉर्नाचा हिशोब द्यावा लागेल Wink

माने

धन्यवाद !

खुद्द योयों नीच कबुल केलय की आआप वेगळी पार्टी नाहीय, असेही ईथे ते अगोदरच माहीती झाल होत.

मिर्चीताई - जे होते आहे ते चांगल्या साठीच. आत्ताच योया वगैरे लोक गेली तर बरे होइल. नाहीतर ही लोक आतुन खाउन टाकतील आपला.
अतिलोकशाहीकरण चांगले नसतेच कधी. कोणीतरी एकच सांगणारा आणि बाकीचे गपचुप कामे करणारे असतील तरच कामे होतात.
फक्त तात्विक मुद्दे काढुन आणि फाटे फोडुन काहीच काम होऊ न देणारी लोक बाहेरच जाऊं देत.

मला माहीती आहे तुम्हाला योयांबद्दल आदर आहे, पण मला तो नुस्ता शब्दबंबाळ माणुस वाटतो. हरीयाना ची जबाबदारी त्याच्या वर होती. केजरीवाल सारखे कष्ट घेतले असते तर हरीयानात पण आपचे सरकार आले असते.

एकेक पान गळणं दुर्दैवी आहे ह्यात शंकाच नाही. पण म्हणून निराश होण्याची गरज नाही. १० गेले तर उद्या १०० येतील. कडू, गोड कसंही वाटलं तरी हेसत्य आहे. ....

मिर्चीताई, जे गेले त्यातिल काही नेते होते, काही जण सुरवातिच्या काळापासुन होते. मागिल १ वर्षात कोण नवीन नेता उदयाला आले आहेत ? अशी भुमिका राहिली तर पक्ष फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिल.

पक्ष मजबु करण्यासाठी आप नी BJP सारखी शिस्त आणली पाहिजे. जनता पार्टी १९७७ सारखे वागले तर ७+ नेते बाहेर पडुन ७ पार्टी बनवतील, तसे झाले तर एखद्या दुस्र्या राज्यात निवडुन येतिल पण देशभरात निवडुन नाही येउ शकत.

पक्ष मजबु करण्यासाठी आप नी BJP सारखी शिस्त आणली पाहिजे >> Uhoh म्हणजे नक्की काय?? बीजेपी मध्ये मोदींच्या म्हणण्यानुसारच सगळे होते. तशी शिस्त अभिप्रेत असेल तर त्याचाच योया आणि प्रभू विरोध करत आहेत.

मोदी १ वर्ष झाले मी १९८४ ते २०१४ चा बाबत बोलत आहे. ह्या काळात किती जण पक्ष सोडुन गेले? (टक्केवारी मधे बघितले तर BJP मधुन खुप कमी नेते पक्ष सोडुन जातात ) मोदी आल्यावर पण कोणता प्रमुख नेता पक्ष सोडुन गेले. (एखादा अपवाद असेल) बरेच नेते काही काळासाठी नाराज झाले, पण पक्ष सोडुन नाही गेले.

ह्या प्रतिसादात शिस्त म्हणजे गळती कमी ठेवणे.

Pages