अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<दिल्ली सरकार मधे ४०-५० हजार तरी नोकर असतील. त्यातले हजारो भ्रष्ट असणार ( माझ्या कडे विदा नाही ). रोज १०० तरी निलंबीत करणे शक्य नाही का?
आधीच्या ३ सरकार मधल्या मंत्र्यांवर रोज एक ह्या गतीने खटले तरी दाखल करता येणार नाहीत का?>>

निलंबनं चालू आहेत. लिंका हव्या आहेत का? माझ्या वाचण्यात वरचेवर येत आहेत अशा गोष्टी. लिंका दिल्या की इथे काहींना त्रास होतो. घाबरावं लागतं हल्ली.

<<पार्टी विथ डिफरंस, का काय म्हणतात ते हेच असावे.>>

आंग्रेभौ, 'पार्टी विथ डिफरन्स' हे भाजपाचे घोषवाक्य आहे.

आजची ताजी निलंबने--खास टोचाभौंसाठी.

दिल्ली सरकारने ई-रेशन कार्ड सुविधा जाहीर केली आहे. एक आठवड्यात चालू होणार. अशी सुविधा चालू करणारं दिल्ली हे देशातील पहिलं राज्य असणार.
ज्या लोकांना इंटरनेट सुविधा नाही किंवा वापरता येत नाही ते आपल्या विभागातील आमदारकचेरीत जाऊन ई-रेशनकार्डसाठी अर्ज भरू शकतात.

दिल्लीकरांना कुठलीही समस्या असेल तर ह्या सरकारी पोर्टलवर नोंदवता येईल. त्याचं निराकरण कुठवर आलं आहे ते ट्रॅक करता येईल.
अजून एक भन्नाट योजना. मला एकदम आवडली. वर उल्लेख केलेली PGMS (Public Grievance Monitoring System) ही योजना यशस्वी करण्यासाठी तिला एका सॉफ्टवेअरने मुख्यमंत्री ऑफिससोबत जोडले गेले आहे. ठराविक काळामध्ये संबंधित अधिकार्‍याने तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली नाही तर ती तक्रार लॉक होणार, त्याची सूचना पीजीएमएसला जाणार आणि पीजीएमएसच्या मदतीशिवाय ती उघडता येणार नाही. म्हणजे त्या अधिकार्‍याला आपोआपच 'कारणे द्या' ला सामोरं जावं लागणार.
(हे ह्याआधी अजून कुठल्या सरकारी ऑफिसात होत असेल तर मला माहीत नाही.)

दिल्लीत पाणी-माफिया जोरात चालू असतो हे ऐकून आहे. आता ह्यापुढे पाण्याचे टँकर्स कुठल्या विभागात कधी येणार आहेत हे ऑनलाइन कळवले जाईल. ह्यामुळे त्या विभागातील कार्यकर्त्यांना आधीच माहिती मिळून रहिवाशांपर्यंत पोहोचवता येईल.

खर्‍या अर्थाने पारदर्शी सरकार बनवण्याच्या ध्येयाकडे जाणारी पावले. Happy

धन्यवाद मिर्ची तै,

" भम " ना मिटर रिडींग मध्ये घफला करतात हेच मुळी मान्य नव्हत तेंव्हा हातात पुरावा दिल्याबद्दल धन्यवाद !

'पार्टी विथ डिफरन्स' हे भाजपाचे घोषवाक्य आहे.

ह्या वरच्या तुमच्या वाक्यावरही तुमच्याकडे अधिकृत पुरावा असेलच !! तो दिला तर आम्हालाही कळेल,
अन्यथा तुम्ही बर्याच गोष्टी भाजपावर ढकलत असता असा, आमचा समज होईल.

>>'पार्टी विथ डिफरन्स' हे भाजपाचे घोषवाक्य आहे.<<
"डिफरंसेस विदिन पार्टी" हे आपचं घोषवाक्य असावं... Wink

BJP-PartyWithDifference.jpg

भाजपाच्या खंद्या पाठिराख्यांना साईटवर काय आहे तेही माहिती नाही असं दिसतंय Happy

रमाकांत,
घोषवाक्याचा अधिकृत पुरावा मिळाला का?
आता तुम्ही ह्या वाक्याचा पुरावा/संदर्भ द्या - " भम " ना मिटर रिडींग मध्ये घफला करतात हेच मुळी मान्य नव्हत".

<<"डिफरंसेस विदिन पार्टी" हे आपचं घोषवाक्य असावं...>>

डेमोक्रसी यु नो. Happy

:G:

मिर्ची तै,

ते "भम" नाच विचारा की !! कारण ते लिहीतात ते आडून आडुन वहाता धाग्यावरच !!

Lol
<<मिर्चीताई,
राहवलं नाही म्हणून डकवतोय. ... राग मानू नये.>>
राग कशाला? गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द वापरले नसतील तर मला असे कॅप्शन केलेले फोटो पहायला आवडतं. भारी कल्पकता असते.

ऑन अ सिरीयस नोट, चित्रातील परिस्थिती येत्या पावसाळ्यात उद्भवू नये म्हणून दिल्लीत आमदारांनी नाल्यांची सफाई जोरात चालू केली आहे. काही नाले तर अनेक वर्षांपासून उपसले गेले नव्हते म्हणे.

<<आआप ५ नविन तळे तयार करणार आहे अशी न्युज आहे>>

येस्स. मी पण वाचली बातमी. अजूनही काही प्रोजेक्टस चालू आहेत.
हरियाणाने पाणी द्यायला नकार दिला आहे. उत्तरप्रदेश दिल्लीला पाणी द्यायला कबूल झालं आहे. त्याबदल्यात अखिलेशबुवा काही राजकीय अपेक्षा मनात ठेवून असतील तर त्यांची निराशा होणार.

रमाकांत, वाक्य भमंनी लिहिलं नव्हतं. तुम्ही लिहिलंत. मग संदर्भ तुम्ही पुरवा. स्क्रीनशॉट ठेवला नाहीत का ह्यावेळी?

स्क्रीनशॉट ठेवला नाहीत का ह्यावेळी?
>>
किती भाबडा प्रश्नं विचारताय मिर्चीतै,
स्क्रीनशॉट मॉर्फ करून टाकला नाहीत का यावेळी , असे विचारा.
Happy

दुसर्याची वाक्य स्वतःचा अर्थ लावुन स्वतःच्या वहात्या धाग्यावर लिहायची आणि त्याच्यां कुचाळक्या करायच्या आव मात्र असा आणायचा की आम्ही नाही बा तसले !!

५ मार्च २०१४ ला केजरीवाल गुजरात म ध्ये विकास किती झाला हे तपासायला जातात

Kejriwal on Gujarat Tour.jpgआणि १४ नोव्हेंबर २०१४ ला

Kejriwal and Modi.jpg

राग कशाला? गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द वापरले नसतील तर मला असे कॅप्शन केलेले फोटो पहायला आवडतं. भारी कल्पकता असते. >>>>

धन्यवाद राग न आल्याबद्दल. पण गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द मी कधी वापरले बुवा या धाग्यावर ? Uhoh
त्यासाठी रमाकांत कोंढा, गामा पैलवान, अनिरुद्ध वैद्य, मनमौजी, डी विनिता, अप्पा काका, शांताराम कागाळे, स्पार्टाकस, ऋता पटवर्धन, मंदार जोशी अशी निकाळजेंच्या गोटातली न संपणारी यादी आहेच की.. त्यांचं फार बिल झालं तर मग त्यांच्या छावणीत जाऊन त्यांना समजेल अशा भाषेत वाटाघाटी कराव्या लागतात हो. शेवटी आपण इथं मतं मांडण्यासाठी, विरोध करण्यासाठी येतो हे पन्नास पन्नास आयडी काढून सर्वत्र वातावरण दूषित करणा-यांना समजेल का ?

<<पण गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द मी कधी वापरले बुवा या धाग्यावर ? >>

ते एक जनरल विधान होतं. तुम्हाला उद्देशून नव्हतं.

अरे वा! इथेपण आमच्या नावाचा उद्धार? का बुवा? मी असे काय गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द तुम्हास वापरले? आजच काय तो आपल्याशी वाद का काय तो झाला, मी फक्त तुम्हास उलट विचारले म्हणून तर तुम्ही लगोलग मी गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द वापरले असे इतरत्र लिहित सुटलात?

अनिरुद्ध वैद्य
तुम्ही रमाकांत कोंढा या अभद्र आयडीसोबत एकत्रच कमेण्ट्स देत असता, म्हणून त्या गोटातील असे म्हटले आहे. तुम्हाला त्या अद्याप खटकलेल्या नाहीत, तशी अपेक्षासुद्धा नाही.

बाळू पॅराजंपे,

ज्याअर्थी माझा आयडी शाबूत आहे त्याअर्थी मी गलिच्छ आणि अब्युसिव्ह शब्द वापरत नसतो. त्यातूनही पुरावा असल्यास दाखवून द्यावा.

आ.न.,
-गा.पै.

खरंच का गामा ?
बेफीने सांगितलं म्हणून एडीट केलेला प्रतिसाद पुन्हा लिहाल का ?
तुम्ही मला उद्देशून हातभट्टी पिऊन आलात का, भांग पिऊन आलात का हे प्रतिसाद अनेकदा दिलेले आहेत. सुरूवात सुद्ध तुम्हीच केलेली. तुम्हाला अशी भाषा न वापरण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं. त्याचे पुरावे राष्ट्रपित्याच्या धाग्यावर देऊनही तुम्ही पुन्हा निलाज-यासारखे पुरावे मागताय म्हणजे तुम्हाला आपण काय लिहीलं हे लक्षात राहत नाही की लिहीताना तुम्ही शुद्धीत नसता की तुमच्या मते हीच सभ्य भाषा आहे हे कळेना आता. तुम्ही आता जो काही क्लेम केलाय तो पाहील्यावर तुम्हाला तुमच्या माफीनाम्याची आठवण करून द्याविशी वाटते. तुमचा आयडी का गेला होता हे आठवून बघा. तुमची आणि इतरांची मतं सभ्यतेबद्दल वेगवेगळी असावीत. त्यातूनही तुम्हाला पुरावे प्रत्येक धाग्यावर हवेच असतील तर एकाच ठिकाणी म्हणजे अ‍ॅडमिनच्या विपूत दिले म्हणजे तुम्हाला सेंट्रली ते उपलब्ध होतील. कसे म्हणताय ? उगाच तुमच्या गोटातल्या प्रत्येक आयडीने येऊन धागा कसा भरकटला जाईल याच्या खेळ्या करण्यापेक्षा यापेक्षा हे बरं राहील.

तुमच्या गोटाचे आधुनिक गांधी वारंवार तुम्हाला कुणाच्याही बाफला भरकटू न देण्याची विनंती करत आहेत ती तुम्ही मनावर का घेत नाही ? की तुम्हालाही त्यांच्या आवाहनाला नैतिक अधिष्ठान नाही असं वाटू लागलंय ?

मिर्ची ताई
तुमचं चालू द्यात.

बाळू पॅराजंपे,

माझ्या मते भांगेचा आणि हातभट्टीचा उल्लेख (फक्त उल्लेखच बरंका) गलिच्छ आणि अब्युसिव्ह नाहीये. तुमचं मत वेगळं असू शकतं! तुम्हाला नुसत्या उल्लेखानेही चढू शकते. Proud

आ.न.,
-गा.पै.

मिर्चीताई - निलंबनाच्या लिंक बद्दल धन्यवाद. मला देत जा असल्या लिंक. ह्या चोरांना शिक्षा झालेली वाचुन मला समाधान मिळते.

टोचा Happy
मग हे आवडेल तुम्हाला. प्रत्यक्ष कामं झालेली नसताना कागदोपत्री दाखवून बोगस बिलं बनवणार्‍या अधिकार्‍यांना काल निलंबित केलंय.

नौटंकी, ड्रामा काय वाट्टेल ती विशेषणं लावलीत तरी हरकत नाही. पण हा व्हिडिओ पाहून छान वाटलं हे खरंय.
कुठेशी वाचण्यात आलं होतं - "AAP is the movement about achieving what BhagatSingh wanted to through the path that Gandhi used !" Happy

नौटंकी, ड्रामा काय वाट्टेल ती विशेषणं लावलीत तरी हरकत नाही. पण हा व्हिडिओ पाहून छान वाटलं हे खरंय
------ व्हिडिओ नाटक नाही वाटला, आवडला.

सर्वान्चे डोळे आपच्या २८ मार्चला होणार्‍या बैठकी कडे लागले आहेत... योया यान्ना अजुन त्रास देण्यात अर्थ नाही. अनुभव, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द यान्चा उपयोग करा... पक्षामधिल सर्वान्ना सोबत घेता आले नाही तर तुम्ही कसले नेते?

एक - एक पान गळणे (प्रत्येक प्रकरणात तुम्ही पाच योग्य कारणे द्याल... आणि जनता थोडा काळ हे सर्व मान्य करेलही) आप साठी आणि पर्यायाने देशाच्या भविष्यासाठी चान्गले नाही.

<<सर्वान्चे डोळे आपच्या २८ मार्चला होणार्‍या बैठकी कडे लागले आहेत... योया यान्ना अजुन त्रास देण्यात अर्थ नाही. अनुभव, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द यान्चा उपयोग करा... पक्षामधिल सर्वान्ना सोबत घेता आले नाही तर तुम्ही कसले नेते?>>

उदय, आपल्याला दिसतंय तेवढंच पडद्याआड घडत नसावं असं वाटतंय. सध्या जे वाटतंय त्यावर विश्वास ठेवायचा तर योया आणि शांभू आपला मूळापासून उखडून टाकण्याच्या कारस्थानात सक्रिय आहेत हा अतिशय कटु निष्कर्ष निघतोय. तो खरा असेल तर योयांना आपमध्ये का ठेवावं??
प्रशांत भुषण उगीचच ह्या सगळ्यात अडकले गेले असावेत असं वाटतंय. ही इज नॉट अ पॉलिटिकल पर्सन.

माझ्या अपेक्षा दोनच आहेत -
१. योयांना बाहेर काढलंच तर कसलाही चांगुलपणा न दाखवता त्यांच्याविरुद्धचे सगळे पुरावे पब्लिक डोमेनमध्ये टाकावेत.
२. ह्याउल्ट योया निर्दोष असतील तर त्यांनी पुढे येऊन त्यांच्यावरचे सर्व आरोप खोडून टाकणारे पुरावे द्यावेत.
वरील कृतीत कोणीच कोणावर दया दाखवू नये. योयांनी अकेंवर किंवा अकेने योयांवर.

(ट्विटरवर अवामचे लोक योयांसाठी फिल्डींग करत आहेत. ते पाहिलं की जाम डोकं फिरतंय.)

Pages