अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोनवरिल पर्सनल बोलने मिडिया पर्यंन्त पोहजवणार्‍याला कमिना शिवाय कुठला शब्द वापरावा?
xxxxx,xxxxxxx,xxxxxxx,xxxx.

अरे ये सब लोग गद्दार है, इनका सबका स्टींग कर लो, मेरा करोगे तो तुम कमिने !!

:G:

:G:

:G:

बाकी निवडणूकीत ७२ पैकी ६७ जागा अके नी फक्त स्वतःच्या बळावर आणल्या आणि ते सुद्धा योया आणि प्र भु च्या
पक्ष हरण्यासाठी चाललेल्या करवाया सुरु असताना ?

निवडणुकीच्या वेळेला,

१. काँग्रेस और बीजेपी लो गोंको पैसा बांट रही है ! अगर आप को पैसे दिये तो ले लेना, मना मत करना , पर व्होट
सिर्फ मुझे करना !

२. मत मोजणीच्या वेळेला,
ये लोगोंपे मुझे भरोसा नही, ये लोग मशिन के साथ खिलवाड कर सकते है !

स्टिंग कराच. माझ्या मते तर इथून पुढे सगळ्या मिटींग्जसुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड करायला हव्यात. केजरीवालांचं स्टिंग का केलं ह्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही.
तिन्ही स्टिंग्जनंतर माझ्यासारख्या अनेक लोकांना अकेच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि समर्थ नेतृत्वाबद्दल आणखी खात्री पटली.
१. मुत्सद्देगिरी.
(त्यात कुठेही पैसा/पद ह्यासंबंधी शब्द जरी असता तर ते इतर राजकारण्यांमध्ये जमा झाले असते.)
२. जात-धर्म ह्यापासून पूर्ण बाजूला असणं.
(३०० लोकांच्या सभेत बोललेल्या जाहीर गोष्टींना स्टिंग म्हणायचं का हा वेगळाच मुद्दा. )
३. सहनशक्तीचा अंत झाल्यानंतरच्या उद्रेकातही 'हम में सौ कमियां हो सकती है, लेकिन हमारा दिल साफ है' हे बाहेर बोलत असलेलंच वाक्य. लोकसभेनंतर गाळात गेलेला पक्ष पुन्हा उभा करून गैरमार्ग न वापरता ऐतिहासिक विजय मिळवून दाखवला. आणि अशा विजयानंतरही आप सोडून देऊन पुन्हा नव्याने मोर्चेबांधणी करायची तयारी.

इन फॅक्ट, कालचं 'स्टिंग' जाहीर करून योया गटाने फार मोठी चूक केली. इतके दिवस आमच्यासारख्यांच्या मनात शंका होती की खरंच अकेभोवतीच्या 'चांडाळचौकडी'नेच तर हे खोटं पसरवलं नसेल ना (आप ला हरवायचे प्रयत्न झाले म्हणून)
केजरीवालांबद्दल वाटतो तितका विश्वास सिसोदिया, खेतान, आशुतोष, संजय सिंग, दिलीप पांडे ह्यांच्याबद्दल वाटत नव्हता. पण काल अकेच्या तोंडून सगळं ऐकल्यावर सगळ्यांचंच शंकानिरसन झालं.

आश्चर्य ह्याचंच वाटतं की जंग जंग पछाडूनही खोकला, मफलर आणि साला/कमिना ह्या शिव्यांच्या व्यतिरिक्त एवढ्या मातब्बर विरोधकांच्या हाती दुसरं काहीही लागत नाहीये ! आय अ‍ॅम प्राऊड ऑफ हिम. भक्ती म्हणा किंवा कल्ट म्हणा. आय डोण्ट केअर.

<<बाकी निवडणूकीत ७२ पैकी ६७ जागा अके नी फक्त स्वतःच्या बळावर आणल्या आणि ते सुद्धा योया आणि प्रभु च्या पक्ष हरण्यासाठी चाललेल्या करवाया सुरु असताना ?>>

शंकाच नाही. मजबूत संघटन केलं आहे दिल्लीमध्ये. बुथ लेवलपासून कार्यकर्त्यांना जबाबदार्‍या वाटून दिल्या होत्या. अविश्रांत मेहनत घेतली आहे सगळ्यांनी. फक्त १८ कोटीमध्ये ७० जागा ! भाजपाने शेकडो कोटी खर्च केले आहेत. नुसत्या पेप्रातल्या पानभरून जाहिरातीचाच खर्च किती झाला असेल त्यांचा.
योया कंपनीने हे प्रताप केले नसते तर त्या उरलेल्या ३ जागाही आपलाच मिळाल्या असत्या Wink

<< २. मत मोजणीच्या वेळेला,
ये लोगोंपे मुझे भरोसा नही, ये लोग मशिन के साथ खिलवाड कर सकते है !>>

इव्हीएम मशिन्स ठेवलेल्या प्रत्येक खोलीबाहेर आपचे कार्यकर्ते ८-८ च्या गटांत शिफ्ट ड्युटीने पहारा करत होते. अशी वेळ येणं खरंतर लाजिरवाणं आहे. पण ह्यावेळी कुठलीही रिस्क घेतली नाही म्हणून हे घवघवीत यश मिळालं आहे. नाहीतर आहेच मेधाताईंसारखं. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या विधानसभेत एव्हीएम मशिनसोबत छेडछाड झाली होती. मशिनवरचा टॅग रस्त्यावर मिळाला होता.

मिर्ची, तुम्ही खरंच दिल्लीमध्ये नाही आहात? विश्वास बसत नाही... देशाबाहेर असलेल्या केवळ एका आप समर्थकाला एका पक्षाबद्दल इतकी खोलवर आणि नक्की काय चालू आहे याची आतल्या गोटामधली माहिती असणं हा खरंच चमत्कार म्हणायला हवा.

नुकतंच एका दिल्लीमध्ये असलेल्या मित्राशी बोलले. तो आप समर्थकांपैकीच आहे, दिल्ली निवडणुकीत तर नोकरीवर रजा टाकून प्रचारकार्याला गेला होता. त्यालादेखील सध्या नक्की काय चालू आहे ते माहित नाही. तोसुद्धा कन्फ्युजन्मध्ये आहे.

आय अ‍ॅम प्राऊड ऑफ हिम. भक्ती म्हणा किंवा कल्ट म्हणा. आय डोण्ट केअर.<< मग तुमच्यात आणि राहुलसमर्थक, नमोभक्त आणि इतरांमध्ये काय फरक राहिला? ज्यावेळी तुम्ही हा बीबी चालू केला तेव्हा तुम्ही "आप" समर्थक म्हणून लिहत होता. तुमह्च्या बॅलन्स्ड पोस्टींच कौतुक देखील केलं होतं.
सध्याच्या तुमच्या काही पोस्ट्स या केवळ "केजरीवाल्भक्त" इतक्याच आहेत. कल्टच म्हणायला हरकत नाही. उगाच आता नमोभक्तांचा आणि राहुलभक्तांचा उद्धार करू नका- ते आणि तुम्ही एकाच लाईनमध्ये. आपला तो बाब्या या उक्तीनं. आप आणि त्याचे कार्यकर्ते इतर राजकारणापासून वेगळे नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

पुन्हा एकदा आपने फार निराशा केली/ पहिल्या बीबीवरच्या पहिया वीस-पंचवीस पोस्टमध्येच मी आप हे भारतीय राजकारणाला लागललं वाईट वळण आहे असं लिहिलंय ते दुर्दैवीरीत्या खरंच ठरतंय.

नंदिनी +100000
मिर्ची , तुमच्या मेधा पाटकरांविषयीच्या पोस्ट्सने पार निराशा केली. अके हे पाटकरांपेक्षा मोठे नाहीत. मेधाताईनि केलेल कार्य खूप मोठ आहे. तुम्ची ती पोस्ट म्हणजे टिपिकल कल्ट पोस्ट आहे.आता तुम्ही स्वतलाच अकेभक्त म्हणवुन घेत आहात तर ठीक आहे.

मला सुद्धा आप बद्दल बराच सॉफ्ट कॉर्नर होता. हो होताच म्हणावं लागेल... कारण जे घडताना दिसतंय ते खूप दुर्दैवी आहे.
यावेळच्या निवडणूकीच्या वेळी आपचा अ‍ॅक्टीव्ह प्रचार करत असलेल्या बर्‍याच जणांना मी रोज भेटत होते. काही जण आमच्या स्टाफपैकी होते, काहीजण जवळच्या नातेवाईकांचे मित्र होते. मी मागे पण लिहिलं होतं, दिल्लीबाहेरून बर्‍याच ठिकाणहून कार्यकर्ते पदरचे पैसे खर्च करून प्रचारासाठी आले होते. मी स्वतः किमान १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी बोलले होते आणि त्यापैकी ८०% लोक यो या, मयंक गांधी या लोकांनी बोलावलं म्हणून प्रचाराला आले होते. यो या ना सुद्धा प्रचाराच्या काळात भेटले होते एकदा. ते सुद्धा प्रचारात बाकी नेत्यांइतकेच बिझी दिसत होते. त्यांच्या काही नुक्कड मिटींग्जना माझ्या ओळखीचे लोक गेले होते... महाराष्ट्रातले १-२ आप चे कार्यकर्ते (की नेते ) इथे यो या च्या सांगण्यावरून अनेक इंटल्क्चुअल्स ना, निवृत्त न्यायाधिशांना आप ला सपोर्ट करा म्हणून भेटत होते. ( या कार्यकर्त्यानी त्यांच्या एका दिवसातल्या भेटींचा गोषवारा घरी चर्चेत सांगितला होता. )...
हे सगळं माहित असताना यो या आपला दिल्लीत हरवण्यासाठी काम करत होते यावर माझा तरी विश्वास बसूच शकत नाही.

अल्पना एक वेगळा आणि पारदर्षक मुद्दा पुढे आला... योया यान्चे बोलणे प्रामाणिक, अत्यन्त पोटतिडकीचे आणि सामोपचाराने प्रश्न मिटवण्याकडे आहे असे वाटते (पुन्हा मी त्यान्चाही समर्थक नाही, चुका होणे सहाजिक आहे). ६७ जागा मिळवणे म्हणजे विनोद नाही आणि त्या मिळवण्यात योया प्रभुतीन्चा काहीच सहभाग नव्हता हे टोकाची दिशाभुल करणारे विधान आहे.

येथे योगेन्द्र यादव, प्रशान्त भुषण, केजरीवाल आणि आआप या पेक्षाही अनेक सामान्यान्च्या "आशा" पणाला लागल्या आहेत वा होत्या. ७९ मधे जनता पक्ष अन्तर्गत लाथाळ्यान्नी रसातळाला गेल्याचे स्मरते...

दोष कुणाला द्यावा?

मला सुद्धा आप बद्दल बराच सॉफ्ट कॉर्नर होता. हो होताच म्हणावं लागेल...
------- मला कुणा बद्दलही सॉफ्ट कॉर्नर राहिलेला नाही आहे. एकेकाळी असायचा पण अनेकान्नी मला चुकीचे ठरवल्याने आता पाणी पिताना (दुध, ताक राहिले दुर) पण खुप विचार करुन पितो. Happy

आआपला अपयश यावे असेही वाटत नाही. शेवटी आजही तो पक्ष इतरान्च्या तुलनेने स्वच्छ आहे (काही कामच केले नाही म्हणुन पाटी कोरी आहे असेही म्हणा...)...

येथे योगेन्द्र यादव, प्रशान्त भुषण, केजरीवाल आणि आआप या पेक्षाही अनेक सामान्यान्च्या "आशा" पणाला लागल्या आहेत वा होत्या. >>> अगदी अगदी. मी प्रचाराच्या काळातच किंवा जिंकल्यानंतर हेच म्हटलं होतं. जर आप चा प्रयोग (अ‍ॅक्टिव्हिस्ट्स नी एकत्र येवून राजकिय पक्ष काढणे, सर्वसामान्य नागरिकांनी कार्यकर्ता म्हणून काम करणे, पारदर्शक पक्ष, वेगळे राजकारण करणारा पक्ष ) यदाकदाचीत चूकूनही फसला तर ही अतिशय दुर्दैवी घटना असेल. इट इज /वॉज लाइक अ लास्ट होप फॉर मेनी पिपल.

या सगळ्या झमेलाचा फायदा कोणाला होणार असेल तर तो बीजेपीला. माझ्यासकट, बर्याच लोकांना हे आवडणार नाहि पण हि वस्तुस्थिती आहे. टफ रोड अहेड फाॅर आआपा.

अके यांनी त्यांच्या समर्थकांचा प्रचंड भ्रमनिरास केलेला आहे. अब आगे, जनता किसीभी अरविंद केजरीवालपर भरोसा नहि करेगी...

महाराष्ट्रात जे समाजवादी होते त्यांच्यात असंतोष आहे. दमानिया बाई या संघाच्या असूनदेखील महाराष्ट्रातील एकंदर परिस्थिती पाहून त्यांनीही योगेंद्र यादव यांना पाठिंबा देणें सध्या तरी पसंत केले आहे. या बाई कधी पलटी मारतील त्याची खात्री नाही. समाजवाद्यांची गच्छंती अटळ आहे. केजरीवाल यांना ते नकोच आहेत. दिल्ली विधानसभा संघाच्या डावपेचानुसार त्यांच्या बी टीम ला मिळाली आहे. आता भाजप आणि आप या ए आणि बी टीम ची वाटचाल सुरू झालेली आहे. आम आदमी पक्ष हे संघाचं लाँग टर्म प्लानिंग आहे. राज्यसभेत जे आपचे खासदार दिल्ली विधानसभेतून जातील ते नक्कीच मोदींच्या काही धोरणांना सपोर्ट करतील. पण जाहीरात कशाची केली जाईल ? तर लुटूपुटीच्या धोरणांना विरोध केल्याची. हे भाकीत आज लोकांना पटणारे नाही. पण आंदोलनाच्या वेळी अण्णांचा वापर होतोय हे भाकीत खरं ठरलं, या लोकांना जनलोकपालशी काहीही घेणं देणं नाही हे ही भाकीत खरंच ठरलं.

घटना घडून गेल्यानंतर विश्वास ठेवण्याऐवजी शक्यतांचा विचार केलेला काय वाईट ? भ्रष्टाचारमुक्त भारत हे ठीक आहे. पण हा भ्रष्टाचार फक्त तळाचा आहे. वरच्या लेव्हलचा भ्रष्टाचार बंद होणार नाही हे रामलीलावरच्या भाषणांमधून सूचित झालेलं होतंच. जनतेला चिरीमिरीपासून मुक्तता मिळेल. या समाधानावर एकेंना आणखी एक चान्स नक्की मिळेल. तसंच टायमिंग साधून लोकप्रिय घोषणा केल्या जातील. ते पुढचं पुढे..

याच बाफवर विचारलेल प्रश्न असा होता की पाणी फुकट देणार हे ठीक. पण पाण्याची निर्मिती कशी करणार ? आवक कुठून करणार ? आता शेजारच्या भाजपच्या राज्यावर खापर फोडणे म्हणजे पुन्हा ४९ दिवसांची आठवण करून देण्यासारखं आहे. जमलं तर आमच्यामुळे, नाही जमलं तर कारस्थान ! यमुना नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी काही नियोजन नाही. दिल्लीला पाणीपुवरठ्यासाठी ठोस योजना नाही.

दिल्लीसाठी स्वतःची वीजनिर्मिती नाही. राजधानीचं शहर असल्याने ग्रीडमधून वीज खेचली जाते. हे नियोजन आहे का ?

आपकडे कुठल्या ठोस योजना आहेत या प्रश्नाला योग्य उत्तर न मिळाल्याने पाठपुरावा केला नव्हता.
अण्णांबद्दलच्या प्रश्नांचाही पाठपुरावा सोडून देण्यात येत आहे. उत्तरे नाहीत पटली. क्षमस्व !

कदाचित या धाग्यावर किंवा अन्यत्र ते आठवत नाही पण वाराणसी मधे केजरीवालांच्या उमेदवारीने मोदींना काय फायदा झाला हे पाहूयात.

२००९ च्या निवडणुकीतलं या मतदारसंघाचं बलाबल असं होतं.
http://en.wikipedia.org/wiki/Varanasi_%28Lok_Sabha_constituency%29#Gener...

मुरलीमनोहर जोशी यांना दोन लाख मतं मिळाली तरी मुख्तार अन्सारी या बसपच्या उमेदवाराला एक लाख शहाएंशी हजार मतं मिळाली. हा उमेदवार तुरुंगातून निवडणूक लढवीत होता हे विशेष. शिवाय सपाच्या उमेदवारालाही तब्बल सव्वा लाख मतं मिळालीत.

हा मतदारसंघ मोदींनी कशाच्या जोरावर निवडला ?
तर बसपच्या उमेदवाराला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवल्याने मुख्तार अन्सारी + बसप + सप + काँग्रेस अशी भाजपविरोधी मतांची फाटाफूट व्हावी असे प्रयत्न चालू होते. पण अचानक एकच उमेदवार देण्याचे ठरू लागले तसं भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरू लागलं. नेमक्या त्याच काळात अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी जाहीर केल्याने मोदी गोटाला हायसं वाटलं. कारण वाराणसीतली ब्राह्मणांची अडीच लाख मतं एकसंध राहतील यावर त्यांचा विश्वास होता. विरोधी गोटात केजरीवाल यांच्यामुळे चांगलीच फाटाफूट झाली. त्यामुळं एकच उमेदवार देण्यात काही अर्थ उरला नाही. या सर्वांचा परिणाम खाली दिलेला आहे. मात्र मोदींचं मताधिक्य आणि वाराणसीतल्या मतदार याद्यांमधले फेरफार हा संशोधनाचा धरण्याचा विषय आहे हे मात्र खरं. मुख्तार अन्सारी यांना अमित शहा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी राजी केले होते. मुख्तार अन्सारी यांना मुस्लिमांचा सपोर्ट होताच. मग केजरीवाल काय करणार होते नेमकं ? सेक्युलर व्होट्स मधे फाटाफूटच ना ?
ऐनवेळी मुख्तार अन्सारी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने त्यांची मतं केजरीवाल यांना मिळून त्यांनी दोन लाखाचा आकडा गाठला. जर अन्सारींनी उमेदवारी मागे घेतली नसती तर ?

http://en.wikipedia.org/wiki/Varanasi_%28Lok_Sabha_constituency%29#Gener...

नंदिनी +100000

मिर्ची , तुमच्या मेधा पाटकरांविषयीच्या पोस्ट्सने पार निराशा केली

मेधातईएने केलेल कार्य खूप मोठ आहे

मेधा पाटकरांविषयी कुठली पोस्ट लोकांना आवडली नाही?

<<वेळी कुठलीही रिस्क घेतली नाही म्हणून हे घवघवीत यश मिळालं आहे. नाहीतर आहेच मेधाताईंसारखं. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या विधानसभेत एव्हीएम मशिनसोबत छेडछाड झाली होती. मशिनवरचा टॅग रस्त्यावर>>
ही का?

पण हिच्यात मेधा पाटकरांच्या विरुद्ध काय आहे?
अपोझिशनवाल्यांनी इवीएम मशीनबरोबर छेडछाड केली म्हणून त्या विनाकारण हरल्या असे त्यांच्या बाजूनेच लिहिलेय.

मेधा पाटकरांसारखंच आणखी कोणाकोणाला जायचं आहे त्यांनी आत्ताच बाजूला व्हावं. <<<<

मेधा पाटकरांसारखंच आणखी कोणाकोणाला जायचं आहे त्यांनी आत्ताच बाजूला व्हावं.

बाळू प्याराजम्प्ये,

>> आता भाजप आणि आप या ए आणि बी टीम ची वाटचाल सुरू झालेली आहे. आम आदमी पक्ष हे संघाचं लाँग टर्म
>> प्लानिंग आहे.

शंभर टक्के सहमत. केजरीवाल हा टीम बी च्या लायकीचा माणूस आहे. तो टीम ए कधीच संघटित करू शकणार नाहीये. संघ आणि आआप यांच्या साटेलोटे असल्याचा संशय इथे बोलून दाखवला होता : http://jagatapahara.blogspot.in/2015/02/blog-post_15.html#c8130678240052...

आ.न.,
-गा.पै.

केजरीवाल यांच्यासोबत जो नाही तो गद्दार. अरुणा रॉय यांच्याबाबतीत त्या वेळी झालेलं आरोपसत्र.

http://www.thehindu.com/news/national/aruna-roy-takes-exception-to-kejri...

संघाचा आंदोलनातील रोल, अण्णांचा रोल इत्यादींवरचा एक तटस्थ रिपोर्ट.

http://www.hardnewsmedia.com/2011/11/4199?page=show

बेदी, इल्मी हे सगळे भाजपतच का जातात ? आप आणि भाजपत काय साम्य आहे ? बेदी त्या ही वेळी मोदींची भलावण करतच होत्या. मोदींचं सरकार येऊन एक वर्ष झालं. अद्याप लोकपाल ची नेमणूक झालेली नाही. ते आंदोलन एव्हढं गरजेचं होतं तर आता सगळे शांत का ? की लोकपाल हा मुद्दाच नव्हता ? असं असेल तर आम आदमी पक्षाच्या हेतूंवरच शंका निर्माण होतात. अण्णा,केजरीवाल नेमकं कुणाचं काम करत होते ?

आंदोलनाचं एक अ‍ॅनालिसीस
http://www.countercurrents.org/meghwanshi050911.htm

अण्णांच्या (?) आंदोलनात श्री श्री यांचं हजर असणं, रामदेवबाबांचा वाढता सहभाग, स्टेजवर राष्ट्रीय स्वयंस्वेक संघाच्या कल्पनेतील भारतमातेचं चित्र (पाकिस्तानसह) हे बरंच काही सूचित करत होतं. पुढे मोहन भागवतांनी संघाचा सहभाग स्पष्ट केला हे बरं झालं. या संस्थळांवर आंदोलनकाळात केजरीवाल यांच्या आरएसएस कनेक्शनबद्दल लिंका दिल्या गेलेल्या आहेत यापूर्वी. ते आर्टिकल अरुणा रॉय याम्च्या एका सहका-याने लिहीलेलं होतं. शोधलं तर सापडतं. पुन्हा देण्याची गरज वाटत नाही.

अल्पना, तुझी पोस्ट पटली. दिल्लीत तू ग्राउंड लेव्हल वर काम केले आहेस त्यामुळे तुझ्या पोस्टिला अधिक महत्व आहे.

उदय, मलाही 79चीच आठवण होतेय

http://www.loksatta.com/mumbai-news/social-activist-medha-patkar-resigns...

पुढच्या भागामधे कदाचित केजरीवाल विरोधक (भाजप्ये सोडून) क्वचितच सहभाग नोंदवतील असं वाटतंय. असो.
पण मिर्ची यांच्याबद्दल आदर आहे तो तसाच राहील. आम आदमी पक्षाला या फुटीने काहीही नुकसान होणार नाही हे निश्चित आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या खेळात समाजवाद्यांचा प्रभाव राहीलेला नाही. त्यांना आपची गरज होती, तशीच आपला समाजवाद्यांची. समाजवाद्यांना पुन्हा मागच्या पानावरून वाटचाल करायची आहे.

सर्वसामान्य लोक आजही अण्णांना मानतात आणि केजरीवाल यांनाही मान देतात. त्यातले बरेच जण मोदींनाही मानतात. मीडीयाच्या राक्षसी प्रचार शक्तीपुढे लाखा लाखाचे मोर्चे, आंदोलनं यांची ताकद अनुल्लेखामुळे फुकट जातेय. हे नवीन तंत्र आहे ज्याचा अनुभव येत आहे.

प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि केजरीवाल हे एक डेडली कॉम्बिनेशन होतं. मी हे आधीही लिहिलं आहे. ते तुटल्याचं दु:ख मलाही झालं आहे. पण....
ज्यांना योयाच बरोबर आहेत, केजरीवाल चूक अशी खात्री वाटत आहे त्यांच्यासाठी एक प्रश्न -
"वैकल्पिक राजनीती आणि भ्रष्टाचारमुक्त भारत" ह्या ध्येयासाठी आपची स्थापना होण्याआधी योगेंद्र यादव ह्यांनी केलेली ५ कामे सांगा.
१.
२.
३.
४.
५.

साती +१
मेधा पाटकरांच्या कामाविषयी मला आदर आहे आणि राहील. एकच प्रश्न घेऊन त्यासाठी उभं आयुष्य वेचणं सोप्पी गोष्ट नाही. पण त्या ज्या मार्गाने लढा देत आहेत तो पुरेसा आहे का????
नर्मदा प्रश्नासाठी मेधाताईंनी इतकं आंदोलन केलं, मोदींनी सत्तेत येऊन एका स्वाक्षरीने सगळं पाण्यात बुडवलं. आपल्या हाती काय लागलं??

मेधाताईंनी आप सोडला ह्याचं वाईट वाटलं. पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे त्या जशा वाईट ठरत नाहीत तसे केजरीवालही वाईट ठरत नाहीत.
"हम ना लेफ्ट के है, ना राईट के. हमें जनता की समस्याओं का समाधान जिस मार्ग में मिलेगा वहां से हम ले लेंगे" हा केजरीवालांचा अप्रोच मला जास्त व्यावहारिक वाटतो.

कालपासून खूप जास्त प्रतिसाद आले आहेत. सगळ्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देणं वेळेअभावी अवघड आहे. सिलेक्टिव मुद्दे निवडण्यामागे दुसरा काही हेतू नाही. बाकी नंतर लिहिते.

योयांबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे.

<<मिर्ची, तुम्ही खरंच दिल्लीमध्ये नाही आहात? विश्वास बसत नाही... देशाबाहेर असलेल्या केवळ एका आप समर्थकाला एका पक्षाबद्दल इतकी खोलवर आणि नक्की काय चालू आहे याची आतल्या गोटामधली माहिती असणं हा खरंच चमत्कार म्हणायला हवा.>>

डोंबलाचा चमत्कार. मनात आणलं तर तुमच्या घरी सकाळच्या नाश्त्याला काय बनवलं होतं हे फोटोसहित मी दाखवू शकते किंवा vice versa.
अश्मयुग संपलं केव्हाच. Wink

पॅराजंपे, तुमच्या सगळ्या पॅरांवरून मी जंप मारली आहे म्हणजे तुमचा मुद्दाम अनुल्लेख केला आहे असा गैरसमज करून घेऊ नका. आपमध्ये भाजपाचे बरेच मोल्स होते हे आत्तापर्यंत सिद्ध झालंच आहे. अजूनही काही असतील. पण केजरीवाल रास्वसंचं प्यादं आहे ह्यावर माझा अ जि बा त विश्वास नाही. तुमचा असू शकतो.
केजरीवाल रास्वसंचं प्यादं असतील तर आशिष खेतानला वार्‍यालाही उभं केलं नसतं त्यांनी. पण उलट दिल्ली विजयात खेतानचा सिंहाचा वाटा आहे. दिल्ली डायलॉग हे त्यांचं ब्रेनचाइल्ड आहे. अतिशय निडर व्यक्ती.

ओके मिर्ची , तुमच्या पोस्टवरुन अस कळतय की अके इज ओनली ट्रू man . काय सोलुशन असतील ती त्यांच्याकडेच . अगदी मेधाताई, योयो पण फिकेच .

ही पोस्ट मिर्ची ताई साठी आहे . बाकीचानि लोड घेऊ नये. धन्यवाद . कृपया

"वैकल्पिक राजनीती आणि भ्रष्टाचारमुक्त भारत" ह्या ध्येयासाठी आपची स्थापना होण्याआधी योगेंद्र यादव ह्यांनी केलेली ५ कामे सांगा.
१.
२.
३.
४.
५.

या प्रश्नाचं उत्तर केजरीवाल देउ शकतील. त्यांनी का घेतलं ब्वॉ यादवांना आप मधे ? म्हणजे आप मधे बिनकामाच्या लोकांनाही महत्वाच्या जबाबदा-या देत होते का ? ते तर म्हणत होते की आम्ही माणसं तपासून घेतो...

मिर्चीताई
मी तुमच्या विचारधारेशी सध्या असहमत असा आहे, पण तुमच्या संयमाचं, भाषेचं, चिकाटीचं मनापासून कौतुक आहे. तुमच्या प्रतिवादाच्या कौशल्याचंही कौतुक आहे. असो. हे मुद्दे २०१२ च्या सोळा ऑगस्टपासून अनुत्तरीत तरी आहेत किंवा वेड्यात काढले गेलेले आहेत.

Pages