अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://timesofindia.indiatimes.com/videos/news/Exclusive-Fresh-sting-of-...

केजरीवाल खुप दुखावलेले दिसत आहेत. 'दुसरे पार्टी मे होते तो लाथ मारके.... ' भाषा अशोभनिय आहे.

योगेन्द्र यादव आणि प्रशान्त भुषण यान्ची प्रेस कॉनफरन्स बघितली, ते पण खुप दुरावले आहेत... पण समोरासमोर
चर्चा का करत नाहीत. .? २८ मार्च बैठक महत्वाची आहे.

फोनच्या संभाषणात अरविंद केजरीवाल यांनी म्हटल्याप्रमाणे 'लात मारकर बाहर निकालना चाहीये' त्याप्रमाणे आज लाथा घालून बाहेर हाकलून दिलेय 'योगेंद्र यादव आणि त्यांच्या समर्थकांना' असे प्रशांत भुषण सांगतायत.

आपमधुन योगेंद्र यादव आणि प्रशांत भुषण यांची हाकालपट्टी.-मटा ब्रेकिंग न्युज.

हे पण वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Yogendra-Yadav-sits-on-dha...

पक्षांतर्गत विरोधकांचा विरोध मोडून काढण्याचा हा एकदम गंभीर प्रकार आहे.

http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-national-council-meet-...

लोकपालचा आग्रह धरणार्‍या आणि प्रसन्गी त्या कारणासाठीच ४९ दिवसान्नी सत्ता सोडलेल्या पक्षाने आज आपल्या अन्तर्गत लोकपाला बैठकीला गैरहजर Sad रहाण्यासाठी फर्मावले.

प्रचन्ड गोन्धळ दिसतो आहे.... काहीन्ना अशी दरी पडल्याने आनन्द होत असेलही पण कोट्यावधी सामान्य भारतीयान्ना हा आणि असा खेळ खचितच अपेक्षित नाही. वौयक्तिक अहन्कारापुढे सामान्यजन अपयशी ठरतो आहे.

केजरीवालांच्या स्टिंगचा शिव्या बीप न केलेला ऑडिओ इथे ऐकता येईल. ('कमीना शब्द बीप केला तर शत्रुघ्न सिन्हांचं चित्रपटसृष्टीतील बरंचसं कर्तृत्व मातीमोल होईल.:डोमा:)

त्यातील मजकूर-
"उमेश - लेकिन ये है सर कि आप बाहर रहेंगे तो चीजें कैसे होंगी, आप खुद ही बताइए

केजरीवाल- हां तो बताओ…क्या करना चाहिए तुम्हारे हिसाब से

उमेश- अब तो सर चीजें कहां तक पहुंची हैं ये तो कुछ आइडिया नहीं लग पा रहा है लेकिन ये है कि मैं एक चीज बस जानता हूं कि आपमें वो कैपेबिलिटी है कि आप अगला बड़ा काम कर सकते हो और ये भी देख रहा था कि कुछ लोगों की महती भूमिका आपके साथ हो सकती है. वो योगेंद्र, प्रशांत, आनंद सारे लोगों की.. और सब लोग आपको नेता मानते हैं इसमें भी मैंने कभी कोई दो राय नहीं पाया है.
दूसरी टीम मैं मानता हूं कि उन लोगों की तुलना में उतनी काबिल नहीं दिख रही है.
अब लीडर का मतलब है कि वो विभिन्न धारा के लोगों को खींचकर आकर्षित करके एक साथ लेकर चलें
अगर ये चीज डेवलप है और आपने कर ली तो मैं दावे के साथ कह सकता हूं कि इस देश में वैक्यूम है.
मोदी के बस की चीज नहीं है उसे आपने दिल्ली में हराके दिखा दिया. आप उससे बड़े नेता बनकर उभर सकते हो. जहां तक चुनाव या संगठन विस्तार की बात है.. ये सब चीजें जिस राज्य में जब चुनाव घोषित हो तब तय की जाए.
आप भरोसा रखो.. मैं उनलोगों से भी मिलता हूं..कभी भी उन्होंने ये नहीं सोचा होगा कि अरविंद को हटाकर हमें लीडर बनना है.
अरविंद को आगे करके वो सपोर्ट करना चाहते हैं और कुछ चीजों में मैं ये मानता हूं कि प्रशांतजी की जिद रहती है कि भाई ये चीजें हैं तो ऐसे चलनी चाहिए… लेकिन ये भी मैं जानता हूं कि आप इस लोकसभा चुनाव के पहले तक प्रशांतजी को कैसे मैनेज कर लेते रहे हैं

केजरीवाल- हूं

उमेश सिंह- तो कहीं मुझे कोई प्रॉब्लम दिख नहीं रही है बहुत अच्छा है
लेकिन ये है कि बस अब आपको अलग रखे हैं शायद मुझे लग रहा है इसी लिए दिक्कत हो रही हैआप अपने को इनवॉल्व कीजिए प्लीज
और मैंने कई बार आपसे कहा

केजरीवाल- मैं इस लड़ाई-झगड़े के लिए नहीं आया था. मेरा कोई इंट्रेस्ट नहीं है इसमें आप प्रशांत भूषण और योगेंद्र यादव के साथ मिलकर काम कीजिए.. आपको मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं.. मैं इस लड़ाई-झगड़े के लिए नहीं आया था
अगर जरूरत पड़ी तो मैं आम आदमी छोड़कर अलग पार्टी बनाने की सोच रहा हूं.. आप लोग संभालिए आम आदमी पार्टी.. बहुत अच्छी टीम है प्रोफेसर आनंद कुमार..

पिछले चार दिन में प्रोफेसर आनंद कुमार और अजीत झा ने जो कमीनपंथी करी है… मतलब इतना कमीना. उन्होंने कहा कि आरटीआई लागू करो…हमने कहा ठीक है तैयार हैं बातचीत चल रही है अभी दोनों गुटों मेंउन्होंने कहा वॉलिंटियर्स पार्टी में…सारी बातें उनकी मान ली. अब कल वो कहते हैं ये तो हम बारगेनिंग कर रहे थे हमारा इन चीजों में तो इंट्रेस्ट ही..

इतने कमीने हो तुमलोग क्या बारगेनिंग कर रहे हो तुमलोग, इतने घटिया किस्म के इंसान हो तुमलोग, जो कम कैपिबिलिटी वाली हमारी टीम कह रहे हो ना तुम लोग ये प्योर आदमी हैं हमारे,.हमारे में क्षमता कम हो सकती है लेकिन हम दिल के काले नहीं हैं
ये लोग दिल के काले और ये लोग एक नंबर के कमीने लोग हैं तो आपको शुभकामनाएं उमेश

उमेश- सर.. ऐसा मत समझिए
केजरीवाल- नहीं-नहीं सुनिए
मेरे को इसके ऊपर अभी कोई और चर्चा नहीं करनी है इसलिए मैंने अलग कर रखा है, अब ये देख लेते हैं क्या करना है नहीं तो मैं 67 एमएलए लेकर अलग हो जाऊंगा..आप लोग चलाइए आम आदमी पार्टी.. मेरे को कोई लेना-देना नहीं है आम आदमी पार्टी से.

उमेश- बात ये मेरी-आपकी नहीं है सर, बात इस देश की है…

केजरीवाल- ये क्या तमाशा है आपका कि सारे मिलकर चलो
उनसे जाकर बात करो ना..उन सालों ने हराने में.. तुम्हारी अच्छी टीम जो कह रहे हो.. उन्होंने हराने में हमें कोई कसर नहीं छोड़ी दिल्ली चुनाव के अंदर.. उनको साथ लेकर चलें.. किसी और पार्टी में होते उनके पीछे लात मारकर पार्टी से बाहर निकाल देते सालों को..
कमीने लोग हैं वो एक नंबर के.. पता नहीं है तुम्हे वो लोग क्या हैं..

उमेश- सर इतना नजदीक से तो मैं नहीं देख पा रहा हूं..

केजरीवाल - तो फिर मत बोलिए अगर नहीं देख पा रहे हैं तो

उमेश - ठीक है..सॉरी सर अगर मेरी बात से...

कितीही चिडले तरी माझी धाव 'काय मूर्खपणा/बावळटपणा/यडचापपणा/नालायकगिरी आहे' ह्या शब्दांपर्यंतच जाते. (इंग्रजीतून राग आला तर 'स्टुपिडिटी' पर्यंत) त्यामुळे अकेंच्या शिव्या नक्कीच आवडलेल्या नाहीत. पण त्यांच्यासारखी व्यक्ती सहनशक्तीचा अंत झाल्याशिवाय इतकी चिरडीला येणार नाही. शिव्या सोडून बाकीचा भाग जो आहे त्यासाठी मी त्यांची समर्थक आहे आणि केवळ शिव्यांमुळे मी माझं समर्थन काढून घेणार नाही.

दरम्यान, "ह्यॅ, केजरीवालने आमचं नाक कापलं, इतकं चिडूनही खाजगी संभाषणात साला, कमीना ह्याच्यापुढे जाऊ शकले नाहीत' अशी तक्रार माझ्या आपविरोधक इंजीनियर दोस्तांनी केली आहे ! Proud

आपमधुन योगेंद्र यादव आणि प्रशांत भुषण यांची हाकालपट्टी.-मटा ब्रेकिंग न्युज.
------- वाईट बातमी आहे Sad

अहन्कार मनुष्याला अन्धळा बनवतो...

फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीमधून बाहेर काढलंय की पक्षामधून? पक्षामधून काढलं नसेल तर पुन्हा एकदा चूक होते आहे.

अब ये देख लेते हैं क्या करना है नहीं तो मैं 67 एमएलए लेकर अलग हो जाऊंगा..आप लोग चलाइए आम आदमी पार्टी.. मेरे को कोई लेना-देना नहीं है आम आदमी पार्टी से.
<<
<<
सत्तेची हाव म्हणावी का याला?

<<सत्तेची हाव म्हणावी का याला?>>
हो म्हणावी ना. मुख्यंत्रीपद सोडलं की मूर्खपणा म्हणावा किंवा पंप्र पदाची हाव म्हणावं.

जे चाललाय ते वाईट चाललाय Sad हे तिघे एकत्र बसून बोलू नाही शकत काय?

नवी दिल्ली येथे शनिवारी आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा गदारोळ पहायला मिळाला. यावेळी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-leaves-aap-nati...

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली
------- removed from the national executive not from the party....

anyway sad affair....

<<जे चाललाय ते वाईट चाललाय. हे तिघे एकत्र बसून बोलू नाही शकत काय?>>

गोष्टी त्यापलीकडे गेल्या आहेत.

फक्त नॅशनल एक्झिक्युटिव्हमधून काढणं अजिबात आवडलेलं नाही. एकदाच सोक्षमोक्ष लावून टाकायला हवा होता. किंवा आता प्रशांत भूषण आणि योयांनी तरी स्वतःहून पक्षातून बाहेर पडावं.
I am convinced that they are indulging in anti-party activities. अशापद्धतीने एकत्र राहण्यापेक्षा सरळ बाहेर पडून केजरीवालांचे विरोधक म्हणून उभं रहावं आणि त्यांच्यावर अंकुश ठेवावा. झालं तेवढं महाभारत पुरे झालं.

केजरीवालने संयोजकपद स्वतःहुन सोडुन द्यावे आणि मुख्यमंत्री म्हणुन सर्वोत्तम काम करुन दाखवावे. अश्याने पार्टीमधे त्यांचा दबदबा राहिलच. आणि जसे पार्टीला करायचे ते करु द्यावे

<<लोकपालचा आग्रह धरणार्‍या आणि प्रसन्गी त्या कारणासाठीच ४९ दिवसान्नी सत्ता सोडलेल्या पक्षाने आज आपल्या अन्तर्गत लोकपाला बैठकीला गैरहजर रहाण्यासाठी फर्मावले.>>

लोकपाल नॅशनल कौन्सिलचे सदस्य नाहीत.

अरेरे,

आआपच्या अश्या कंडीशनमुळे वाईट वाटतय, की,

आत्तापर्यंत काँग्रेसच्या पतनानंतर हळुच आआपच्या विजयरथच्या चाकाच्या नाळेवर बसुन भाजपावर आडुन आडुन वार करणार्या मर्कटांच काय होणार ?

<<केजरीवालने संयोजकपद स्वतःहुन सोडुन द्यावे आणि मुख्यमंत्री म्हणुन सर्वोत्तम काम करुन दाखवावे. अश्याने पार्टीमधे त्यांचा दबदबा राहिलच. आणि जसे पार्टीला करायचे ते करु द्यावे>>

आधी मलाही वाटत होतं की अकेंनी संयोजकपद सोडावे. त्यांनी दोनदा राजीनामा दिलाही होता. पण आता वाटतंय की मुळीच सोडू नये. नाहीतर आप दिल्लीपुरतीच सीमित राहील. योया कंपनी जागोजागी निवडणूका लढवत बसणार आणि हरणार. सत्य हेच आहे की अजून दिल्लीबाहेर आपला भविष्य नाही.

रमाकांत आणि समविचारींसाठी एक सूचना.
प्रशांत भूषण (कश्मिर रेफरेंडम) आणि योगेंद्र यादव (सलीम नावाचा वापर) हे तुमच्यासाठी कधीच गुडबुक्समध्ये नव्हते. ते दोघे आपमध्ये आहेत म्हणून एवढे दिवस तुम्ही आप ला आणि अकेंना टार्गेट करत होता हे विसरू नका आणि आता त्या दोघांना बाहेर काढलं म्हणून आप ला आणि अकेंना टार्गेट करायचा दुटप्पीपणा करू नका.
शब्दांशी प्रामाणिक रहा.

कबीर, तुमच्या प्रतिसादांचा दर्जा खालावत चालला आहे. स्वतःला आवरा. दुसर्‍यंणा गाढवं आणि हाणलीत, मारलीत वगैरे शब्दं वापरण्यापेक्षा स्व्तः काहीतरी मुद्दे मांडत जा.

आपची आता "ब्रेकिंग न्युज" पाहिली. मी अकेसमर्थक कधीच नाही, पण आआपमधले जी व्यक्तीमत्त्वं मला महत्त्वाची आणि "काम करणारी" वाटतात त्यापैकी एक योगेंद्र यादव. त्या व्यक्तीनं आता मीडीयासमोर बोलताना सर्व आपसमर्थक आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली- जे काही घडतंय ते नक्कीच चांगलं नाही. प्रशांत भूषण आणि योगेंद्आयादव यांना बाऊन्सर्स बोलावून जर मीटींगबाहेर काढलं असेल तर ते केवळ आश्चर्यजनकच नाही तर दु:खददेखील आहे. केजरीवाल आणि कंपनीचा इगो अख्ख्या पार्टीला घेऊन बुडणार आहे.

आता यावरून भीजेपी आणि काँग्रेस किती नालायक आहेत हे सांगू नका, इतर पक्ष अत्यंत हरामखोर, भष्ट्राचारी नालायक आणि मेलेल्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत हे सर्वांनाच माहित आहे. प्रश्न आहे, आम आदमी म्हणून उदयास आलेल्या पार्टीमध्ये चाललेल्या या पब्लिक तमाशाचा.

पार निराशा केली या लोकांनी!!! Sad

कबीर, तुमच्या प्रतिसादांचा दर्जा खालावत चालला आहे. स्वतःला आवरा. दुसर्‍यंणा गाढवं आणि हाणलीत, मारलीत वगैरे शब्दं वापरण्यापेक्षा स्व्तः काहीतरी मुद्दे मांडत जा. >> जसे लोक तसाच प्रतिसाद द्यावा. काहींना विशिष्ट भाषाच समजते.

Pages