अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबीर, तुमच्या प्रतिसादांचा दर्जा खालावत चालला आहे. स्वतःला आवरा. दुसर्‍यंणा गाढवं आणि हाणलीत, मारलीत वगैरे शब्दं वापरण्यापेक्षा स्व्तः काहीतरी मुद्दे मांडत जा.
<<
<<
स्वत:चे मुद्दे मांडण्यासाठी थोडेच येतात ते इथे, वरिल शब्द वापरण्यासाठी अड्डा गँगने त्यांची खास नेमणुक केलेय मायबोलीवर.

आआप ने पार निराशा केलीय, ह्या दल बदलू लोकांची,

आता केजरीवालच्यांच शब्दात ह्यां लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलल पाहीजे.

काय फालतूपणा लावलाय ह्या आप च्या लोकांनी काय कळत नाही, ते योगेंद्र यादव म्हणतायत 'हमको भगा-भगाकर मारा बांउसरोने और आप के गुंडोने' तिकडे संजय सिंग म्हणतोय 'ओ लोग झुठ बोल रहे है' कोण खरे बोलतोय तेच कळत नाही. मुर्ख लेकाचे, सत्तेची मस्ती दुसरे काय?

मिर्ची तै,

++++प्रशांत भूषण (कश्मिर रेफरेंडम) आणि योगेंद्र यादव (सलीम नावाचा वापर) हे तुमच्यासाठी कधीच गुडबुक्समध्ये नव्हते. ते दोघे आपमध्ये आहेत म्हणून एवढे दिवस तुम्ही आप ला आणि अकेंना टार्गेट करत होता हे विसरू नका आणि आता त्या दोघांना बाहेर काढलं म्हणून आप ला आणि अकेंना टार्गेट करायचा दुटप्पीपणा करू नका. ++++

योयो आणी प्रशांत भुषण यांना केजरीवालनी कोणत्या कारणामुळे बाहेर काढलय हे तुम्हाला चांगलच माहीत असेल, मग केजींनी त्यांना बाहेर काढल हा भाजपावर उपकारच केला असा तुमचा स्वर का आहे ? ह्या लोकांना चुकीच्या मार्गांनी बाहेर काढलय हे ही तुम्हाला मान्य नाहीये ?

तुम्ही वर अस लिहीताहात की केजीनी आमच ऐकुनच ह्या दोघांना बाहेर काढलय !!

आप पक्षामध्ये जे काही होत आहे ते वेदनादायक आहे . भाजप आणि काँग्रेस सारख्या भ्रष्ट आणि जाती -धर्माचे क्षुद्र राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांपेक्षा आप वेगळा आहे अस माझ्यासारख्या आप समर्थकांना वाटत होत . आम्ही चुकीचे होतो यावर आज शिक्कोमार्तब झाले . चार लोक एका छताखाली आली की राजकारणाच गजकरण होत हे एकूणच भारतीय समाजजीवनाच प्राक्तन असाव . आता यापुढे प्रामाणिकपणे कुणी नवीन पर्याय देण्याचा दिला तरी त्याकडे सगळे संशयानेच बघणार . केजरीवाल तुम्ही वेगळे असाल अस खरच वाटलं होत .

आता केजरीवालच्यांच शब्दात ह्यां लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलल पाहीजे.
>>
>>
हाकल पाहीजे? हाकलेय की, तरीही कोडग्याप्रमाणे म्हणतायत की आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत राहु.

निराश होऊ नका लोक्स. थोडा धीर धरा. गॅंग्रिन पसरून मृत्यू होऊ नये म्हणून कधीकधी स्वतःच्याच शरीराची बोटं/हात/पाय कापावे लागतात. प्रकरण कितीही वेदनादायक असलं तरी ह्यातून नक्कीच चांगलं निष्पन्न होईल.
ह्या १-२ दिवसांत शक्य होईल तसतसं योयांनी केलेल्या प्रकारांबद्दल मला जेवढी माहिती हाती लागली आहे ते लिहिते. वाचल्यावर कदाचित तुम्हालाही वाटेल की जे घडलं ते योग्य घडलं.

यादवांमधे अडवाणी आणि मुरली जोशी दिसत आहे Wink फक्त त्यांना काढले नाही जबरदस्तीने उचलुन बाहेर बसवले इतकेच Lol

तरीही कोडग्याप्रमाणे म्हणतायत की आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत राहु.
<<
<<
मला नाही वाटत ह्यात कोडगेपणा आहे म्हणुन, ह्या निर्णया वरुन त्यांची त्यांच्या पक्षावरची निष्ठा दिसून येत आहे. शिवाय योयो हे मुरलेल्या राजकारण्यांन प्रमाणे बोलतायत टिव्हीवर.

पार्टियां टूटती हैं तो उनके नाम होते हैं - कांग्रेस (ई) जनतादल (यू ) जनतादल (एस)
आप टूटेगी तो उसके नाम होंगे - आप (साले), आप (कमीने).....

यादव अनेकदा खोटं बोलले आहेत. खोटं बोलणं हा उत्तम राजकारण्याचा आवश्यक गुण आहे असं नंदिनीतैंनी मागेच सांगितलं आहे. पण मी ह्या गोष्टीशी तेव्हाही सहमत नव्हते आणि आत्ताही सहमत नाही.
वेगळं राजकारण करण्यासाठी आपचा जन्म झाला असेल तर खोटं बोलणारे राजकारणी आपमध्ये नसणंच योग्य आहे. त्यांची व्यक्तिगत उंची कितीही असली तरी.

ह्या सगळ्यात मिडियाची मात्र दिवाळी सुरू आहे. खरं-खोटं काय वाट्टेल ते छापायला मागे-पुढे बघत नाहीयेत. Lol
ही बघा एक गंमत.

इतके होवूनही जर ह्यातुने खूप काही चांगले निघेल असे वाटत असेल तर कठीण आहे. चालू द्यात. जनता फार मूर्ख आहे असे का वाटते लोकांना? पर्याय जरा बरा वाटला तरच लोक मत देतात नाहीतर अडवाणी कंपू केंव्हाच निवडून आला असता. आताही मोदीहा त्यातल्या त्यात बरा पर्याय होता म्हणूनच आला. पुढील वेळी येईलच ह्याची काही खात्री नाही. हे असले आप सारखे प्रयोग आधी पण झालेत आणि अजून काही वर्षांनी पुन्हा होणार. आप वेगळा आहे ह्यावर कधीच विश्वास नव्हता फक्त इतक्या झटक्यात हे असले होईल असे वाटले नव्हते. बौन्सर्स आणले म्हणजे भलतेच पोचलेले आहेत. बाकीच्या पक्षांची एकदम उत्तम कॉपी मारली आहे.

केजरीवालांचं ट्रॅक रेकॉर्ड पाहीलं तर एकेकाळी ते " मै अण्णाजी का हनुमान हुं " असं म्हणत होते. तोपर्यंत टीम अण्णा असाच शब्दप्रयोग वापरात होता. केजरीवालांना जर कुणी ओळखत असेल तर परीवर्तन, इंडीया अगेन्स्ट रिझर्वेशन इ. संघटनांचे आणि संघाचे कार्यकर्ते. आंदोलनाच्या आधी संघाच्या ईमेल पब्लिसिटीतूनच हू इज अण्णा, हू इज केजरीवाल असे मेल्स फॉर्वर्ड झाले होते. एके ब्रिगेड मधे आयटी सांभाळणारे कार्यकर्ते आणि नमोभक्त हे कॉमनच होते. आंदोलनाने पब्लिसिटी मिळाल्यानंतर एकेंनी राजकारणाचं सूतोवाच केलं. त्यासाठी आता त्यांना अण्णांचं मत विचारात घेण्याची गरज वाटली नाही. अण्णांनी नापसंती दर्शवल्यानंतर अण्णांनाच फेकून देण्यात आलं. उक्ती पेक्षा कृती जास्त बोलकी असते. म्हणूनच भाषेचा पोत जरी सांभाळला गेला असला तरी अण्णांचा वापर यूझ अ‍ॅण्ड थ्रो सारखा करण्यात आला असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

योगेन्द्र यादव हा टीव्हीवरचा अतिशय आश्वासक आणि प्रामाणिक चेहरा आप ला हवाच होता. निवडणुकीच्या विश्लेषणाबद्दल योयांचं ज्ञान आपच्या कामीच आलं असणार. त्यांच्या मुळे आपला विश्वासार्हता मिळाली.. किंवा त्यात वाढ झाली असं म्हणूयात. जेव्हां योयांचा यापुढे काही उपयोग नाही असं वाटलं तेव्हां ते डोईजड होऊ नयेत असं वाटून अण्णांप्रमाणे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. प्रशांत भूषण हे नाट्यातले एक प्यादे आहे. फक्त योयांवर कारवाई झाली तर जो मेसेज जाईल तो एकेंना परवडणारा नाही. प्रभू यांना पुढच्या काळात पुन्हा आपमधे प्रवेश देण्यात आला, मनोमिलन झाले तर नवल वाटणार नाही.

योयांना काढून केजरीवालनी चूक केली . आता आप मध्ये अके अंक चालू होणार
अकेच हुकुमशहात रूपांतर झालेल दिसतय
त्या वीडियोतही आक्षेपार्ह भाषा वापरली आहे

आता एबीपी न्युजवर 'आप' बद्दल फारच गमतीशीर बातम्या सुरु आहेत. त्या मध्ये निवेदक म्हणतोय.

"आज योगेंद्र यादव और प्रशांत भुषण को रा.का. से निकाला गया, लेकीन जैसे वो (योगेंद्र यादव) केह रहे है की लात मारके निकाला गया, इसपे सस्पेंस बना हुवा है."

Lol

<< प्रशांत भूषण हे नाट्यातले एक प्यादे आहे. फक्त योयांवर कारवाई झाली तर जो मेसेज जाईल तो एकेंना परवडणारा नाही. प्रभू यांना पुढच्या काळात पुन्हा आपमधे प्रवेश देण्यात आला, मनोमिलन झाले तर नवल वाटणार नाही.>>

प्रभु एक उत्तम वकील आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अ‍ॅक्टिविस्ट आहेत. ह्यात अजिबात शंका नाही. मला योयांपेक्षा जास्त आदर त्यांच्याबद्दल होता. त्यांच्या वरील कामाबाबत अजूनही आदर आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणात त्यांचा दुसरा चेहरा दिसला जो अजिबात आवडला नाही.

१. महाराष्ट्र, हरयाणा आणि काश्मिरच्या निवडणूका लढवायच्या नाहीत, लढवणार असाल तर मी प्रचारासाठी येणार नाही असा पवित्रा घेतल्यावर "अरविंद तानाशाह है" चं पालुपद त्यांनी चालवलं आहे.
जेव्हा अरविंदच्या मनाविरूद्ध पीएसीच्या निर्णयाचा मान राखून देशभरात निवडणूका लढवल्या, आणि नंतर होणारा अपमान एकट्याने झेलला तेव्हा अरविंद तानाशाह नव्हता का????
तेव्हा एकदातरी प्रभू किंवा योयांनी एकातरी मुलाखतीमध्ये त्या निर्णयाची जबाबदारी घेतली का? म्हणाले का की अरविंदची इच्छा नव्हती, पण बहुमताचा निर्णय मान्य करून त्याने ऐकलं??
तुमचं ऐकलं तर लोकशाही आणि तुमचं नाही ऐकलं तर तानाशाही??

२. त्यांनी सगळ्या प्रकाराला 'मुद्दों की लडाई' चा रंग दिला आहे. अकेंना हटवून योयांना संयोजक बनवायचं आहे म्हणून एक व्यक्ती/कुटुंब-एक पद चा आधार घेत आहेत. मग पक्ष स्थापन झाल्यापासून शांति भूषण, प्रशांत भूषण आणि त्यांची बहिण शालिनी भूषण तिघेही जण पदं सांभाळून का बसले आहेत??? (हा प्रश्न आधीच्या धाग्यावर मयेकरांनी विचारला होता. तेव्हा एक कुटुंब-एक पद ही गोष्ट बहुतेक निवडणूकीच्या तिकीटाबद्दल असेल असं मी लिहिल्याचं आठवतंय)
शालिनी भूषणचं नाव तर मला माहीतही नव्हतं. ह्या गदारोळात कळलं की त्याही एक पद सांभाळून आहेत.

३. ऐन निवडणूकीत जेव्हा जमिनीवर कार्यकर्ते दिवसरात्र काम करत आहेत, तेव्हा तुम्ही म्हणता 'आप हरायला पाहिजे, भाजपा जिंकायला पाहिजे'. हा कसला आदर्शवाद? पुढची पाच वर्षे काय करायला हवं होतं सगळ्यांनी? भाजपाविरुद्ध फक्त आंदोलनं? सत्ता हातात आल्याशिवाय कसे बदल घडवून आणणार?

४. त्यांचं म्हणणं ' ये क्या लगा रख्खा है ५ साल केजरीवाल?'
काय चूक होतं त्यात? मुख्यमंत्री म्हणून केजरीवालचा चेहरा होता तर प्रचारात काय शांती भूषणचा चेहरा वापरणार? त्यांना किरण बेदी आणि अजय माकन जिंकावे असं वाटत होतं आणि तसं त्यांनी ऐन प्रचारात जाहीर बोलून दाखवलं हे का सहन करायचं? प्रेस कॉन्फरन्स करण्याच्या धमक्या देणं सोडून दुसरं काय केलं शांभूंनी पक्षासाठी? मला आधी वाटलं होतं की धमक्या देत आहेत म्हणजे अके गटाकडे काही लपवण्यासारखं असेल. पण कसलं काय. ते तीनही स्टिंग्ज पाणचट. आत्ता दिल्ली जिंकल्यानंतर इतकं काही वाटत नाही. पण आज झालेला तमाशा निवडणूकीच्या आधी झाला असता तर लोक वैतागले नसते? का मतं दिली असती आप ला?

५. यंदाच्या प्रचारासाठी ३० कोटीचं बजेट होतं. फक्त १८ कोटी जमा झाले. शालिनी भूषण आप ग्लोबल ग्रुपच्या कोऑर्डिनेटर होत्या. त्यांनी सदस्यांना मेल्स पाठवून 'आप ला देणग्या देणं बंद करा' असं सांगितलं. कशासाठी? हा कसला अहंकार? 'माय वे ऑर हायवे' हे अकेंच्या वागण्याला म्हणतात तर भूषण कुटुंबाचं वागणं कुठल्या सदरात मोडतं? देशभक्ती? आदर्शवाद? पक्षाला हरवण्यासाठी हजारो-लाखो निष्पाप कार्यकर्त्यांची फसवणूक करणारा हा कसला आदर्शवाद? की एक कोटी सीडफंड दिल्याचा अहंकार? वर्षाला ११४ कोटी कमवणार्‍या व्यक्तीने दिलेले १ कोटी आणि वर्षाला १० लाख कमवणार्‍या व्यक्तीने दिलेले ५-१० हजार ह्यात कोणाचं योगदान मोठं हे कोण आणि कसं ठरवणार?

६. शांती भूषण आधी छुप्या पद्धतीने आणि आता जाहीरपणे अवामला पाठिंबा देत आहेत.
हे अवामच्या संस्थळावरचं - "Our senior most leader, single biggest donor, architect of AAP Constitution and Jan Lokpal Bill, Mr. Shanti Bhushan fully ENDORSED idea of AVAM, appreciated style of work and suggested ‪#‎AVAM‬ to be implemented across Nation."
अवाम आपविरोधी आहे हे सिद्ध करायची गरजच नाही असे प्रताप केले आहेत त्यांनी. शांभू अवामचंच नेतेपद का घेत नाहीत सरळ? ही दुहेरी खेळी कशासाठी? अवामचे भाजपाशी असलेले धागेदोरे पाहिले तर त्यांना पैसा कुठून येतो हे समजणं अवघड नाही. अवाम, भाजपा ज्याला पाठिंबा द्यायचा त्यांना उघडपणे द्या ना यार. हा काय पाणचटपणा आहे?

दिल्लीमध्ये आप जिंकली नसती तर आप संपली असती. पटतंय का?
आदर्शवादाच्या नावाखाली आप संपवून टाकणं हाच उद्देश होता का भूषण कुटुंबाचा?

<<आंदोलनाने पब्लिसिटी मिळाल्यानंतर एकेंनी राजकारणाचं सूतोवाच केलं. त्यासाठी आता त्यांना अण्णांचं मत विचारात घेण्याची गरज वाटली नाही. अण्णांनी नापसंती दर्शवल्यानंतर अण्णांनाच फेकून देण्यात आलं.>>

कैच्याकै. अण्णा लहान मूल आहेत का? अकेंनी राजकारणात जाणार असं सांगितल्यावर 'राजकारण चिखल आहे, मी त्यात पडणार नाही' हा निर्णय अण्णांचा होता की अकेंनी त्यांच्यावर लादला होता???
अण्णांच्या निर्णयाने काय बदललं? तेव्हा काँग्रेसविरुद्ध आंदोलन करत होते, आता भाजपाविरुद्ध करत आहेत. बिग डील. काहीही बदललं नाही. अण्णा इज बॅक टु स्क्वेअर वन.

त्याउलट अकेंनी राजकारणाच्या चिखलात पडून, अगदी घाणेरड्या प्रकारचे अपमान, निंदा, हेटाळणी शांतपणे सहन करून निदान एका राज्यापुरती तरी स्वच्छ विधानसभा दिली. आज त्यांच्या हातात भ्रष्टाचारमुक्त राज्याचा प्रयोग करून दाखवण्यासाठी लॅब तरी आहे. अण्णांकडे काय आहे?

तिन्ही भूषणना पदं का दिली हा प्रश्न टाईमफ्रेम मधे योग्यच होता. आंदोलन चालू होतं तेव्हांच सिव्हील सोसायटी मधे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकाच घरातले दोन मेंबर्स का हा २०१२ सालचा प्रश्न अनुत्तरीत आहेच. सिव्हील सोसायटी ही तमाम भारतियांचं प्रतिनिधित्व करते याबद्दल शंका असणा-यांचा हा प्रश्न. मूठभर लोकांनी आंदोलन पेटवलं तेव्हां ते केंद्र सरकारविरुद्ध पेटवलं गेलं. या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला हे दिसून आलं.

आता जनलोकपाल बद्दल अण्णाही बोलत नाहीत आणि केजरीवालही. दिल्ली राज्यातलं जनलोकपाल हे हास्यास्पद प्रकरण आहे. आता राजकारणात पडल्यामुळे केंद्राविरुद्ध लोकपाल न नेमण्यामुळे केजरीवाल यांना आंदोलन करण्याचा नैतिक हक्क उरलेला नाही. जनलोकपाल हा इश्श्यू संपला असं समजायचं का ?

त्या वेळी सुद्धा गुजरात मधे नऊ वर्षे लोकायुक्त नव्हता, पण अण्णांच्या हिटलिस्ट मधे गुजरात हे राज्य नव्हतं, ते का याचं लॉजिकल उत्तर कधीही मिळालेलं नाही. या ही धाग्यावर काही उत्तरं ही मिळत नाहीत.

प्रशांत भूषण, शांती भूषण आणि अन्य भूषण हे पूर्वीपासून सिव्हील सोसायटीचे सदस्य असतील तर आताच्या नाट्यातली त्यांची भूमिका ही कालांतराने उघड होईल. आपच्या बाबतीत वेट अ‍ॅण्ड वॉच धोरण अवलंबलं तर प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण नेमक्या वेळेला प्रश्न विचारणारे वेड्यात निघतात. हे धोरण कुठल्या तरी अन्य एका संघटनेसारखं आहे.

मै अण्णाजी का हनुमान हुं

याचा अर्थ काय होऊ शकतो ?
हनुमानाने रामाला साईडिंगला टाकून स्वतःच राज्य केल्याचं उदाहरण मला तरी ज्ञात नाही.

अण्णांकडे काय आहे?

हा प्रश्न आज का पडावा ? रामलीला वरच्या ग्रॅण्ड नाटक मंडळीच्या वेळी का बरं पडू नये ?

मेधा पाटकर आहत !! आम आदमी पार्टी छोड दी ! पार्टी सदस्यतासे ईस्तीफा दे दिया !!

साभारः आजतक न्युज !

<<या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला हे दिसून आलं.>>

शंकाच नाही. मी तर म्हणते की हे आंदोलनच भाजपाने स्पॉन्सर केलेलं होतं. काँग्रेसला सत्तेतून खाली खेचणे ह्या एका हेतूने केलं गेलं होतं. IAC=India against Congress हा एकच हेतू होता. तो साध्य झाला की आंदोलन गुंडाळायचं.
पण IAC=India against corruption ह्या हेतूने त्यात सामील झालेले अके आणि कंपनी काँग्रेस पडलं तरी बधले नाहीत. आणि इथेच शत्रुत्वाला सुरूवात झाली.
तुम्ही म्हणालात तसं गुजरात अण्णांच्या हिटलिस्ट्मध्ये का नव्हतं ह्याचं उत्तरही मिळतंय.
आता अण्णांनी मोदींविरूद्ध आंदोलन सुरू केलं आहे ह्यावरून दुसरी शक्यता वाटते ती म्हणजे अण्णा भोळे आहेत. असोत.

जनलोकपालबद्दल केजरीवाल सध्या बोलत नाहीत. कारण त्यांनाही माहीत असेल की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. मोदींनी गुजरातमध्ये साधा लोकायुक्त नीट नेमला नाही तर ते जनलोकपालाला कसा सपोर्ट करतील?
पण ह्याचा अर्थ केजरीवालांनी भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबलेली नाही. परवाच दिल्ली असेंब्लीने दिल्ली असीबीचे पूर्वीचे अधिकार परत मिळावेत ह्यासाठी ठराव संमत केला आहे. ई-रेशन कार्डची योजना कालपासून चालू झाली.
ध्येय तेच ठेवलं आहे, मार्ग वेगवेगळे अवलंबत आहेत.

<<मै अण्णाजी का हनुमान हुं
याचा अर्थ काय होऊ शकतो ?
हनुमानाने रामाला साईडिंगला टाकून स्वतःच राज्य केल्याचं उदाहरण मला तरी ज्ञात नाही.>>

पुन्हा तेच. साइडला टाकलं म्हणजे काय? अण्णांच्या इच्छेविरूद्ध हाताला धरून राजकारणात खेचून न्यायला हवं होतं का? अजूनही अकेंनी अण्णांना वाईट बोलल्याचं एकतरी उदाहरण दाखवा. मतं वेगळी आहेत. तुम्ही तुमच्या रस्त्याने चाला , मी माझ्या रस्त्याने जातो. ह्यात काय वाईट आहे मला खरंच कळलेलं नाही.
असो. अण्णा ह्या विषयाला माझ्याकडून फुलस्टॉप. Happy

<<आम आदमी पक्षातून आता समाजवादी लोक बाहेर पडतील. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक राहतील.>>

अके? रा.स्व.सं चा माणूस ?? नाही पटत.

<<फोनवरिल पर्सनल बोलने मिडिया पर्यंन्त पोहजवणार्‍याला कमिना शिवाय कुठला शब्द वापरावा?
xxxxx,xxxxxxx,xxxxxxx,xxxx.>>

यु सेड इट मेनका. नवरोबाने तर अकेंपेक्षा चढते शब्द वापरले Lol

मेधा पाटकरांसारखंच आणखी कोणाकोणाला जायचं आहे त्यांनी आत्ताच बाजूला व्हावं. ठराविक काळाने एकेक गळण्यापेक्षा एकदाच होऊन जाऊ दे.

फोनवरिल पर्सनल बोलने मिडिया पर्यंन्त पोहजवणार्‍याला कमिना शिवाय कुठला शब्द वापरावा?
xxxxx,xxxxxxx,xxxxxxx,xxxx.
------ हे सर्व आआप ने सुचवलेले आणि वापरलेले तन्त्र होते. स्टिन्ग करा, कोण काय बोलतो आहे ते टेप करा... त्यान्चे खरे स्वरुप जनतेसमोर उघडे करा. पण असे करताना पर्सनल कम्युनिकेशन वगळण्यात यावे असा नियम रहात नाही. तेथे समोरच्याला 'अडकवणे' हेच अभिप्रेत आहे.

आता त्याच तन्त्राचा वापर करुन त्यान्ना अडचणित आणायचा प्रयत्न करणारे कमिने कसे ? पक्षात येणारा प्रत्येक व्यक्ती स्वच्छ उद्देशाने आलेला आहे असे मानणे निव्वळ भाबडेपणा आहे.

दोन्ही स्टिन्ग मधे केजरीवाल यान्च्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत... पहिल्यामधे थोडी मखलाशी करता येते पण दुसर्‍या मधिल भाषा खुप खालच्या पातळीवरची आणि द्वेषाने ठसठसलेली आहे.

अण्णा हे भोळेसाम्ब आहेत असे वाटते. व्यक्ती प्रामाणिक आहे, आदर आहे पण दुरदृष्टी चा अभाव आहे... आणि खुप धर-सोड वृत्ती आहे Sad त्याने विश्वासार्हता कमी होते.

Pages