अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केजरीवाल मतदाराचा धर्म पाहून धोरण ठरवतात काय? अरेरे! फारच वाईट!!! त्यांच्या मतदारांना आवडते असे? त्यांची धार्मिक विभागणी करून धोरण ठरवलेले??? बिच्चारे!!!

आम आदमी पार्टी की महाभारत का सच
गेले काही दिवसांपासून दोन्ही गटांतील वेगवेगळ्या लोकांची मतं वाचते आहे. त्यावरून माझं जे मत बनत चाललं आहे त्याच्या जवळपास जाणारा हा लेख.

"AAP leader Arvind Kejriwal may have inflicted a massive defeat on BJP in Delhi Assembly polls last month, but months earlier Prime Minister Narendra Modi saw him as a "small single city leader" not even worth "my time to ignore".

देशाची राजधानी हे एक छोटुसं शहर आणि जेमतेम २ वर्षांत ४ खासदार आणि ६७ आमदार गाठीशी बांधणारा नेता अनुल्लेख करण्याइतकासुद्धा महत्वाचा नाही ! बरं.
ह्याच अहंकारामुळे भाजपाची शूर्पणखा झाली आहे. आता सगळा देश जरी जिंकला तरी उपयोग नाही. नाक निसटलं हातातून ! Lol

राजेश गर्ग 'आप'मधून निलंबित

"ही टेप मी नाही तर, 'आप'चे नेते कुमार विश्वास यांनी जाहीर केल्याचा संशय गर्ग यांनी व्यक्त केला होता. विश्वास यांनी हे आरोप धुडकावून लावत गर्ग यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप लावला होता. त्यानंतर गर्ग यांनी विश्वास यांना कायदेशीर नोटीस बजावली. या नोटिशीनंतर पक्षाने त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली."

खरे खोटे कोणाला ठाऊक आहे का?

किमान या धाग्यावर तरी बाळासाहेबांना क्लेश होतील अशा पद्धतीनं भांडू नका.

<<ह्याच अहंकारामुळे भाजपाची शूर्पणखा झाली आहे. आता सगळा देश जरी जिंकला तरी उपयोग नाही. नाक निसटलं हातातून ! हाहा >>
------ निवडणुकात हार जित होत रहाणारच... पक्ष निवडणुकात जिन्कल्यावर अरेरावी पणा, उर्मटपणा येण्याची शक्यता असते आणि अशा अहन्काराबद्दल, फाजिल आत्मविश्वास दाखवल्याबद्दल भाजपाला शिक्षा दिल्ली निवडणुकात मिळालीच आहे. धोरणात, वर्तनात त्वरित सुधारणा झाली नाही तर भविष्यातही मिळत रहाणार...

खुप मोठे यश किव्वा मोठे अपयश पचवण्यासाठी लागणारी प्रगल्भता सर्वान्कडेच नसते. Happy

राजेश गर्गला निलंबित केलं असेल तर ते योग्य आहे असं माझं मत.
बाळु, बाळासाहेबांना क्लेश का? काही कळलं नाही.
उदय, सहमत.

वायफायच्या प्रकल्पावर दिल्ली डायलॉग समितीचं काम चालू आहे. ह्या क्षेत्रात रस असलेल्यांसाठी -

"We are working with IT experts + tech giants for WiFi across Delhi, but we'd like your suggestions on 10 questions.

Q 1. How do you define public wifi? Kindly suggest case studies on public wifi from other parts of the world.

Q 2. What should be the ideal level of access to public wifi? Can it be made available right upto your doorstep?
If yes, what are the feasibility and technological challenges? Or shud it be available at well-defined public spaces in neighbourhoods?

Q 3. What is the infrastructure and technology required to create the public WiFi network?

Q 4. What should be the essential services that a government should aim at providing through public WiFi?

Q 5. What is the capex and opex required to create and operate public WiFi?

Q 6. What could be a model that makes public WiFi viable, sustainable and scalable in terms of usage, technology and financials?

Q 7. Can public WiFi network be made financially self-sustainable if viewed from the welfare service perspective alone?

Q 8. Should there be multiple operators or an exclusive operator in a well-defined zone of the city?

Q 9. What could be the operating architecture that brings all the stake holders together?

Q 10. What are the advantages and disadvantages of a private enterprise model vis a vis a PSU model?"

वरील प्रश्नांची उत्तरे, आपली मते ddc.delhi@gov.in ह्या पत्त्यावर मेल करायची आहेत.
एक उदाहरण इथे दिसलं.
AAP Government invites suggestions on Public WiFi Network for Delhi - My submission

दिल्ली डायलॉग समितीमध्ये जॉबसाठी हेपण बघा.

ह्या सगळ्या प्रकल्पाच्या यशस्वी होण्याबद्दल मला जाम उत्सुकता आहे. सरकारची धोरणे ठरवण्यात आणि राबवण्यात समाजातील बौद्धिक वर्गाचा सक्रिय सहभाग असावा, ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं असं आधीपासून वाटायचं. दिल्लीत ते होताना दिसतंय. म्हणून इथे हे शेअर केलं आहे. माबोच्या नियमात बसत नसेल तर उडवून टाकीन.
(अन्यत्रही हे होत असेल तर मला कल्पना नाही. माझ्यासाठी हे नवीन आहे.)

यादव, भूषणना ‘आप’लेसे करा!

अंतर्गत कलह मार्गी लावण्यासाठी अके पुढे सरसावले आहेत.

हे अंतर्गत कलह लवकर मिटवून एकजुटीने कामे करावीत ही अपेक्षा.

बाळु, बाळासाहेबांना क्लेश का? काही कळलं नाही. >>> मिर्चीतै, तुमच्याकडून तरी अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. अहो, बाळू मोठा झाल्यावर त्याला काय म्हणाल ? Wink

वाय फ़ाय साठी दिली सरकार स्वत:ची टेलीकॉम कंपनी का चालु करत नाही? स्वस्त वीजे साठी सरकार स्वत: विज निर्मिती करण्याच्या विचारत आहे असे वाचले.

भारती एअरटेलचे राष्ट्रीयकरण करा नाहीतर.

अरे देवा, नेमक्या काय काय अपेक्षा आहेत लोकांच्या माझ्याकडून.
"मिर्चीतै, तुमच्याकडून तरी अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती." बर्‍याचदा वाचलंय हे वाक्य Blush Uhoh

यूरो, वरच्या मेल आयडीवर तुमच्या वरील सूचनांचं मेल टाकून द्या Wink

आता हे अतिच अति होतंय.
मिडियाला कामंधामं नाहीयेत का? कुणी कुणाला काय मेसेज पाठवला ह्याचेसुद्धा अपडेटस ? Uhoh

अकेने १० दिवसांच्या उपचारांचा खर्च (१,७०,००० रूपये) स्वतःच्या खिशातून केल्याने मिडियाची आपबॅशिंगची एक सुवर्णसंधी हुकली Lol

>>"We are working with IT experts + tech giants for WiFi across Delhi, but we'd like your suggestions on 10 questions. <<

सिरियस्ली? वर्किंग विथ द टेक एक्स्पर्ट्स अँड यु एक्क्स्पेक्टींग आन्सर्स टु दिज बेसिक क्वेश्चन्स फ्रॉम जनरल पब्लिक? वॉट हॅपन्ड टु योर सो कॉल्ड टेक एक्स्पर्ट्स वाय-फाय विजन, मल्टाय-यिअर रोड्मॅप अँड एक्झिक्युशन प्लॅन?

लास्ट आय हर्ड, सम बिग शॉट फ्रॉम गुगल वाज सपोज्ड टु ड्राइव धिस शीट; नाउ इट केम डाउन टु क्राउडसोर्सिंग???

जनतेच्या अपेक्षा विचारात घेतल्या जातील राजभौ, तंत्रज्ञानासाठी एक्स्पर्टस. Happy जनतेला जे मिळणार त्यात त्यांच्या अपेक्षा विचारात घेतल्या तर काय चूक आहे? ईथ महाराष्ट्रात शेतकर्‍यांना न विचारता गोवंश हत्याबंदी केली!

>>>> जनतेच्या अपेक्षा विचारात घेतल्या जातील राजभौ, तंत्रज्ञानासाठी एक्स्पर्टस. <<<
भारी आहे सगळे....
म्हण्जे तेव्हा निवडणू़की आधी घोषणा करताना जन्तेच्या अपेक्षा अन तंत्रज्ञांची मते विचारात घेतली नव्हती का ?

लिंबुकाका, एलबीटी/टोल रद्द करणार ह्या घोषणा जनतेच्या अपेक्षा ऐकुन केल्या होत्या फडणवीस/खडसे/तावडेनी. लोणचं घालायाला ठेवल्यात काय?? आपचं बघायच वाकुन, आणि भाजप्यांच कुरवाळुन??

ते वाकून वगैरे नंतर, आत्ता समोरासमोर दिस्तय ते बघु...
आता ही प्रश्नावली फिरवली जाइल, मग त्या "सर्व्हे" ची "हवितशी नकारात्मक" चाचणी/चाचपणी करून लोकांनाच फ्री वायफाय दिल्लीकरता नको आहे असा "कौल" जन्तेनेच दिला आहे असे जाहीर नाही झाले म्हणजे मिळवली.... Proud मला तरी हा उपद्व्याप त्याकरताच असावा असे भासते आहे. Wink

"We Indians don't feel happy that there's a new hope of a clean person/party.
We try everything to prove that he is not different. Why? Because we feel offended that someone is claiming we're not perfect. We don't think of improving ourselves.
We feel better only if he's also proved to be like us."

काण्ट अ‍ॅग्री मोअर Happy
वरची वाक्ये खास करून यूरो, राज, लिंबूभौ आणि समविचारींकरता.

आपचं सरकार काम करत आहे की नाही ह्याची एक साधी चाचणी सांगू का? कुठल्याही मिडियाने अजून दिल्लीसरकारच्या कामाबाबत अवाक्षरही काढलेलं दिसलं नाही ! Lol
मिडियाला अजून काही सापडेना म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवरून पण शंका घेऊन झाली आहे ना?
हे बघा. ग्रेटर कैलाश - सौरभ भारद्वाज

हं, आता व्हा सुरू. १५ लाखपैकी आत्ताशी फक्त ८ च?? बाकीच्या विधानसभांमध्ये काय?? Proud

"Govt is now online on twitter and setting up new benchmarks. AAP Govt is performing better than expected"
पत्रकाराने तीन बेवारशी मुलांबद्दल ट्वीट करणं, अलका लांबाने (माझ्या आवडत्या आप आमदारांपैकी एक :)) लक्ष घालणं आणि दिल्ली पोलिसांनी त्वरित शोध घेऊन कारवाई होणं हे सगळं योगायोगाने तेव्हाच ट्वीटरवर लॉगिन असल्याने मी स्वतः अनुभवलं आहे.
दोन तासांपूर्वी संबंधित पोलिस अधिकार्‍याने मुलं पालकांना सोपवल्याचं ट्वीट केलं. शाब्बास.

हास्यास्पद बातमी. असू शकेल ब्वॉ.

<>

त्यांच्या स्वच्छ असण्या बद्द्ल कधी वाईट लिहील?

ते स्वच्छ आहेत म्हणुन ते करतील ते कस सगळच छान अस काही मला म्हणता येणार नाही.

लोकांच्या अपेक्षा विचारल्या इथपर्यंत समजु शकतो. वर विचारलेले प्रश्न त्यात नक्कीच मोडत नाहीत. सरकारने लोकांच्या अपेक्षा लक्षात घेवुन निर्णय घेणे अपेक्षित आहे काय निर्णय घेवु हे विचारणे हे चुकीचेच आहे.

भारती एअर टेल ची कोंबडी चांगली गुबगुबीत झाली आहे प्रॉफ़ीट मिळवुन थोडी पीस उपटुन टोपीत खोचली ए के नी तर कुठे बिघडल?बसतय की विचारसरणीत

थोडक्यात काय आता आआप चा कल्ट होवु घातलेला दिसतो आहे.

मिर्ची,

>> We don't think of improving ourselves.
>> We feel better only if he's also proved to be like us

रघुराम यांचं वरचं वक्तव्य पाहून मौज वाटली. राजेश गर्गांची हकालपट्टी करून फार मोठ्या सुधारणेचे संकेत केजरीवालांनी दिलेत नाहीका? इतरांची स्टिंग ऑपरेशने करत फिरणारे केजरीवाल स्वत:चं स्टिंग ऑपरेशन झाल्यावर कसे किंकाळू लागलेत गर्गबुवांच्या नावाने!

आ.न.,
-गा.पै.

Pages