Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्सल मालवणी घरगुती सुकं मटण
अस्सल मालवणी घरगुती सुकं मटण / चिकन तसेच मटण /चिकन ग्रेव्हीची पाककृती हवी आहे.
बोराचं लोणचं कसं करायचं, कोणी
बोराचं लोणचं कसं करायचं, कोणी सांगु शकेल का ? अजून काय करता येइल बोरांचं ?
बोरं वाळवून बोरकूट.
बोरं वाळवून बोरकूट.
असं वाटतंय इथे कोणाकडेच मला
असं वाटतंय इथे कोणाकडेच मला हव्या असलेल्या पाककृती नाहीयेत.
http://marathifoodfunda.blogs
http://marathifoodfunda.blogspot.in/2014/09/malwani-dry-mutton-curry.html अशिता इथे बघ, या ब्लॉगवर.
धन्यवाद रश्मी!
धन्यवाद रश्मी!
या मुलीचा ब्लॉग सोल्लिडे.
या मुलीचा ब्लॉग सोल्लिडे. बर्याच मस्त टिप्स आहेत.
Olya kajuchi bhaji /usal kahi
Olya kajuchi bhaji /usal kahi karaychi
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21649?page=1 - ओल्या काजूंची उसळ
इथे नवलकोलच्या भाजी ची रेसिपि
इथे नवलकोलच्या भाजी ची रेसिपि शोधूनही मिळाली नाहि, कोणी सांगाल का वेगवेगळे प्रकार. आणी त्याच्यावरचा पाला पण भाजीत घालायचा का?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103716.html?1144165528 - नवलकोलाची जुन्या माबो वरची रेसेपी
माझे सासरे नवलकोलाचे तुकडे सरसोच्या तेलात तळून घेतात. नंतर कांदा-लसूण-अद्रक-टॉमॅटोच्या मटण मसाला घातलेल्या मसाल्यामध्ये तळलेले तुकडे घालतात. वरून कोथिंबीर घालून एक वाफ आणतात. काश्मिरी पद्धत आहे म्हणे ही.
फार पूर्वी मी ही भाजी लिहिली
फार पूर्वी मी ही भाजी लिहिली होती. अजूनही मी याच पद्धतीने करते :), नारळाचे दूध आवडत असेल तर ही भाजी आवडेल. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103716.html?1144165528
अल्पना, नवलकोल फार छान मिळतात इथे, तुझ्या रेसिपीने करून बघेन :).
मी साधारण अशी करते. नवलकोल
मी साधारण अशी करते. नवलकोल धुऊन, देठ काढुन किसुन घ्यावा. सकाळीच २ टेबलस्पून मुग डाळ भिजवावी. नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात ही मुग डाळ परतुन मग किसलेला नवलकोल घालावा, परतुन झाकण ठेऊन एक वाफ आणावी. मग चवीनुसार मीठ, साखर व तिखट घालुन परतुन परत एक वाफ द्यावी. कोरड वाटल्यास पाण्याचा शिपका द्यावा. मग कोथिम्बीर घालुन भाजी उतरवावी. वाटल्यास नारळ खवुन भाजी शिजतानाच घालावा. याची उग्र चव मग सौम्य होते.
टिफिनच्या भाज्यांमध्ये मी या
टिफिनच्या भाज्यांमध्ये मी या अगोदर कधी न खाल्लेल्या दोन भाज्यांचा शोध लागला. मुळा किसून त्याची फोडणीत मोहरी, हळद, तिखट, हिमि ठेचा व भिजवलेली मूगडाळ घालून परतून केलेली भाजी आणि गाजर किसून त्याची फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, भिजवलेली मूगडाळ, हिरवी मिरची घालून परतून केलेली भाजी. दोन्ही भाज्या घरी करून पाहिल्या. अतिशय पटकन होतात व रुचकर लागतात. डब्यात द्यायलाही सोयीच्या आहेत.
मुळ्याची भाजी डब्यात... डबा
मुळ्याची भाजी डब्यात... डबा उघडल्यावर आजूबाजूचे कामाने बेशुद्ध पडलेले कलिग आपोआप शुद्धीवर येत असतील.
मुळ्याची भाजी डब्यात... डबा
मुळ्याची भाजी डब्यात... डबा उघडल्यावर आजूबाजूचे कामाने बेशुद्ध पडलेले कलिग आपोआप शुद्धीवर येत असतील.>>>>
खरंय... मी कधी कधी डब्यात कच्च्या मुळ्याची दह्यातली कोशिंबिर घेऊन जाते, तेव्हा डबा उघडल्यावर अगदी घमघमाट सुटतो.
गाजराची भाजी छान लागते. पण
गाजराची भाजी छान लागते. पण मला ती फक्त लाल गाजराची आवडते. म्हणजे फक्त हिवाळ्यात मिळणार्या गाजरांची.
मंजूडी, डबा हलकेच उघडायचा!
मंजूडी, डबा हलकेच उघडायचा!
जोक्स अपार्ट, टिफिनचे झाकण उघडल्यावर मुळ्याचा थोडा वास तर येतोच या भाजीला, पण उग्र दर्प मला तरी जाणवला नाही.
असाच मुळ्याचा ठेचा ही करतात.
असाच मुळ्याचा ठेचा ही करतात. अजिबात उग्र दर्प नाही येत. रेस्पी हवी असल्यास विपूत देतो...
नका हो नका, मुळ्याच्या
नका हो नका, मुळ्याच्या भाज्या, कोशिंबिरी डब्यात नेऊन सहकर्मचार्यांच्या नाकांवर अन्याय करू नका.
प्रत्येक ऑफिसात एक फ्यूम हूड बसवणं कंपल्सरी करायला हवं. मुळा, पानकोबीवाले डबे यात ठेवून खातील.
रेसिस्ट मोड ऑन: मग विशिष्ठ
रेसिस्ट मोड ऑन: मग विशिष्ठ प्रकारच्या एशियन लोकांनी किंवा कोणीही विशिष्ठ प्रकारचं एशियन खाणं आणलं की त्यात बसवून खायला लावीन मी. एशियन बडबड पण त्यात बसून करावी. मोड ऑफ.
मुळ्याची भाजी डब्यात मी तर
मुळ्याची भाजी डब्यात
मी तर ही भाजी हिवाळ्यात करणं बंद केलं आहे. तळलेले मासे आणि मुळा दोन्ही प्रकार खिडक्या २-३ तास उघड्या ठेवण्याइतपत वेदर असेल तरच.
तळलेले मासे आणि मुळा दोन्ही
तळलेले मासे आणि मुळा दोन्ही प्रकार खिडक्या २-३ तास उघड्या ठेवण्याइतपत वेदर असेल तरच. >> ग्रिल वर करायचे तळलेले मासे / श्रिंप इत्यादी
पण अमेरिकन फिशला कुठे वास
पण अमेरिकन फिशला कुठे वास येतो फारसा ?
योकु, रेसिपी देणेचे करावे.
योकु, रेसिपी देणेचे करावे. कृपया. धन्यवाद.
खूप संत्री आली आहेत एका
खूप संत्री आली आहेत एका शेतातून. त्याचं सरबत करून ठेवलं आहे. त्यात प्रिझर्वेटिव म्हणून काही घालायला हवं का? असेल तर काय आणि किती प्रमाणात?
(साखरेचा पाक करून तो थंड करून त्यात संत्र्याचा रस ओतला.)
मानुषीताई, ही लिंक
मानुषीताई, ही लिंक बघा:
https://yellowrockcountrygirl.wordpress.com/2012/02/14/canning-orange-ju...
जे लोक फिश खात नाहीत त्यांना
जे लोक फिश खात नाहीत त्यांना येतो
थॅन्क्स मृणमयी. छान वाटतीये
थॅन्क्स मृणमयी. छान वाटतीये लिंक. नीट वाचते.
येस, शक्य आहे. हे लक्षात आले
येस, शक्य आहे. हे लक्षात आले नाही
Pages