शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि टांकसाळी मराठीवरच येथे प्रश्नचिन्हे उमटवण्यात येत आहेत. ते असो!

निदान भटांनी तरी कधीही 'वृत्तबाह्य' लिहिले नाही. (अवतरणे महत्वाची)

फक्त मयेकरांसाठी माहीती.
१९८१ ला वासू सपना यांनी आत्महत्या केल्या होत्या. मुंबईत असेल. नक्की माहीत नाही.
१९८२ साली पहिली जयंती असावी.

.

.(आधार - व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली - डॉ. सत्त्वशीला सामंत )
असं चिनुक्स यांनी लिहिलं होतं हे सगळे शब्द लिहीताना.

बॉबी धागा पूर्ण वाचा पाहू.

संकल्प द्रविड | 5 April, 2010 - 20:51

योग्य शब्द खरं तर 'सर्जनशील' असा आहे. 'सृज्-सृजति' (अर्थ : उपजवणे, निर्मिणे, जन्मास घालणे) या संस्कृत धातुपासून बनलेलं धातुसाधित नाम म्हणजे 'सर्जन' (अर्थ : निर्मिती, उपज). 'सर्जनशील' हा शब्द जातीने विशेषण असून त्याचा अर्थ 'सर्जन हेच शील (= प्रकृती/स्वभाव/पिंड) असलेला/असलेली/असलेले असा/अशी/असे', असा होतो.
याच 'सृज्-सर्जति' धातुचे इतर भाईबंद 'विसृज् (विसर्जन, विसर्ग)', 'उपसृज्(उपसर्ग)', 'उत्सृज् (उत्सर्ग, उत्सर्जन)', 'संसृज् (संसर्ग)' आपण बर्‍याच वेळा वपरत असतो; त्यांच्या धातुसाधित नामांवरून 'सर्जनशील' हे रूप योग्य असल्याचं पडताळता येईल.

-सर्वांचे आभार मानतो. (इथे वक्ता इतरांचा ऋणी आहे.)

-सर्वांनी आभार मानले. (इथे सर्व कुणाचेतरी ऋणी आहेत.)

त्यामुळे कोण कुणाचा ऋणी ह्यावर प्रत्यय ठरेल. बाकी आभार म्हणजे पुष्पगुच्छ नाही, ते द्यायचे नसतात - मानायचे असतात. "सर्वांना आभार" डज नॉट मेक एनी सेन्स Sad कोण तस वापरत असेल तर खुशाल बदड त्यांना ;).

(-"सर्वांना धन्यवाद देतो" इज ओके.)

.

शाळा-ऑफिसला असते ती leave.

डीविनिता. लीलावती आपल्याला 'सुटी' असे का वाटते?

सीमंतिनी,
मी प्रोफेशनली वापरण्यासाठी या शब्दाचे योग्य रूप विचारतोय आणि तुम्ही मला त्या गाण्याचा रेफ़रन्स देताय, हाईट आहे. Sad

But any way in general ही मला सुटी आणि सुट्टी शब्दा बद्दल शंका आहेच.

_/\_

Pages