शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्विता,
दोन्ही बरोबर आहेत, पण संदर्भ वेगळे असतील तरच.
लक्ष्य(Target) -> वेधणे म्हणतात.
अर्जुन बाणाने लक्ष्य वेधतो.

एखादे बाळ आपल्याकडे लक्ष वेधते/ वेधून घेते. (वेधून घेते जास्त योग्य वाटतंय)

लक्ष वेधतो बरोबर.
पण मलातरी लक्ष्य वेधतो हा त्या काँन्टेक्स्ट्मध्येही बरोबर नाही वाटत. लक्ष्य गाठले, पूर्ण केले असं जास्त ओके नाही का? की माझी काहीतरी गल्लत होतेय?

योकु,
वेध घेणे, या अर्थाने वेधतो.

मोल्सवर्थ सांगतात :

वेध (p. 772) [ vēdha ] m (S) Perforation, piercing, boring. 2 Perforation or puncture made, a hole pierced. 3 Piercedness, affection by a piercing body. 4 The ingress of a luminary at an eclipse: also the malign and unhallowed influence or operation attributed to the approaching obscuration: also the affectedness by it of the subject. Of this evil operation and the inauspicious state produced by it, the duration is, in a solar eclipse, twelve hours before the commencement of the obscuration, and, in a lunar eclipse, nine hours. During this period dining &c. are forbidden. 5 The arriving upon or the remaining upon a day on which is fallen or is to fall any particular tithi, nakshatra &c. of a portion of the following or preceding tithi or nakshatra, and the action of it (as benign or evil) upon that day. Ex. आज मंगळवारी दशमी दोन घटिका आणि एकादशी पडली सत्तावन्न घटिका तस्मात् ह्या एकादशीस दशमीचा वेध आहे. 6 The bearing upon and affecting generally of one nakshatra &c. upon another: also the point-blank opposition, and thus the piercing or transfixing (as fancied) of one object generally with respect to another. Note. The falling of one object directly in the line of another is viewed as dire and fearful. Thus the door of a house should not exactly front the gate of the yard; one window must not face another &c. 7 Hence the word is freely used in the sense of Opposition, impediment, hinderance, occurrent obstacle, difficulty, let, bar, block; also in that of Encumbrance, embarrassment, clog, oppressive and worrying operation (as of worldly cares and troubles); ex. जातों खरा परंतु वेध न आला म्हणजे बरा; माझे कामामध्ये वेध आला; प्रपंचाचा वेध ज्याचे पाठीमागें आहे त्याला खेळ तमाशें कोठून सुचतील; also in that of Care, concern, solicitude, anxiety; or urgency, pressure; ex. ह्या कामाचा मला वेध असा लागला कीं रात्रीं मला झोप नाही; also in that of Lively and never-intermitted remembrance; a constant pricking; ex. हरीचा वेध लागला गे बाई. 8 Depth or thickness, the third of the geometrical dimensions. 9 Ingress or entrance. Ex. एकएकासीं होय वेध ॥ परि प्राप्तिविण नव्हे बोध ॥. 10 (Piercing or piercedness.) Deeply entering into and affecting: also deeply affected state. Synonymously with छंद, नाद &c. v लाग. Ex. वाचेसी लागला तोचि वेध ॥ विनोदें बोले शिवशब्द ॥. वेध करणें In astronomy. To take an observation (of a heavenly body).

सर्वांना धन्यवाद!

हा प्रश्न मला पडण्याचे कारण म्हणजे आज लोकसत्ता मध्ये हे वाक्य वाचले: "मकरंद अनासपुरेला आपण नेहमीच विनोदी कलाकार म्हणून पाहात आलो आहोत. यात तो वेगळ्या रुपात पाहायला मिळतो त्यामुळे नेहमीच खिदीखिदी करत विनोद करणारा मकरंद शांत, गंभीर स्वरुपात आपले लक्ष्य वेधतो."

"मकरंद अनासपुरेला आपण नेहमीच विनोदी कलाकार म्हणून पाहात आलो आहोत. यात तो वेगळ्या रुपात पाहायला मिळतो त्यामुळे नेहमीच खिदीखिदी करत विनोद करणारा मकरंद शांत, गंभीर स्वरुपात आपले लक्ष्य वेधतो." >>

मकरंद यांना लक्ष प्रणाम! Wink

<<<सीमंतिनी | 25 July, 2014 - 11:32
"मकरंद अनासपुरेला आपण नेहमीच विनोदी कलाकार म्हणून पाहात आलो आहोत. यात तो वेगळ्या रुपात पाहायला मिळतो त्यामुळे नेहमीच खिदीखिदी करत विनोद करणारा मकरंद शांत, गंभीर स्वरुपात आपले लक्ष्य वेधतो." >>

मकरंद यांना लक्ष प्रणाम! :)>>

लक्षवेधक कोटी Happy

आलेला, गेलेला, दिसलेला, बघितलेले अशी रुपे मुंबईमधून १९८२ साली सर्वत्र पसरवण्यात आली. ह्यामागे एक भूमिका आहे. दिसला होतास, बघितलेले आहे वगैरे म्हणताना ज्या वाढीव ओष्ठ्य व दंत्य हालचाली कराव्या लागतात त्या करण्याचा वेळ (उरलेला) नसणे! ह्या असल्या रुपांवरील राग व्यक्त करण्यासाठी मी त्या त्या माणसाशी संबंध कमी करतो.

'नाही आहे' बाबतः

एखादी गोष्ट 'सुरू' नसणे (जसे जनरेटर), ह्याला जनरेटर बंद आहे असे म्हणता येते.

'मला ह्याबाबत काहीही बोलायचे नाही' 'आहे' ह्यात 'माझी भूमिका काय -आहे-' हे ठामपणे सांगणे आहे.

'बोलायचंच नाहीये मला' असे आपण म्हणतो तेव्हा 'बोलायचंच नाही मला' ह्यातून व्यक्त होणारी तीव्रता 'बोलायचंच नाही आहे मला' ह्यातील तीव्रतेपेक्षा कमी पडते.

'मला काय करायचे नाही' ह्या पेक्षा 'मला काय करायचे आहे' (विशिष्ट गोष्ट करायचीच नाही 'आहे') हे अधिक तीव्र आहे.

<आलेला, गेलेला, दिसलेला, बघितलेले अशी रुपे मुंबईमधून १९८२ साली सर्वत्र पसरवण्यात आली> १९८२ साली मुंबईत असं नेमकं काय झालं होतं?

१९८२ साली मुंबईत असं नेमकं काय झालं होतं?<<<

'मोड बेफिकीर'

तुम्हाला प्रथमच वाचा फुटली असेल

'मोड भूषण कटककर'

कल्पना नाही मयेकर, पण हे झाले खरे!

'मोड मायबोलीकर'

टिनपॉट पिढी जन्माला आली असावी मुंबईत

१९८२ साली निकाळज्यांकडे पहिल्यांदा मुंबईहून कुणी आलेला.
किंवा त्यांनी हाय ना पहिल्यांदा मुंबैची भाषा ऐकलेली.
Wink

स्वतः अत्यंत चुकीचा प्रश्न विचारायचा आणि मग अनुल्लेख केल्याची रिक्षा फिरवायची ह्याला काय अर्थ आहे?

मला अतिशय नीट आठवत आहे की मुंबईहूनच हे 'आलेला, गेलेला, दिसलेला' आलेले आहे. त्या साली तिथे काय झाले हे मला विचारण्यापेक्षा मुद्यावर बोलता येईल ना? की बुवा हे काही मुंबईत नव्हते झाले, हे मुंबईत झालेले असले तरी सर्वदूर पसरण्याला काहीतरी अर्थ निश्चित आहे वगैरे!

स्वतः उपरोधिक प्रश्न विचारून मग एकदम विंग्रजीत व्यक्त होणे हे चमत्कारीक आहे.

'मोड पायलट' राहिला.
त्यात बहुतेक 'माझ्या कॉमेंटचा प्रतिवाद करायची हिम्मत कशी होते?' असं टंकलेलं दिसेल Wink

बाकी बरेच 'मोड' आलेले दिसताहेत आज? दुखत नाहियेत ना?

आता एक सांगा,

>>एखादी गोष्ट 'सुरू' नसणे (जसे जनरेटर), ह्याला जनरेटर बंद आहे असे म्हणता येते.<<
Generator is not on.

"जनरेटर आहे नाही चालू." हे शब्दशः भाषांतर झाले. अर्थात, जनरेटर चालू नाहिये. यात चुकीचे काय? या साजुक 'नाहिये' लाच नाही आहे म्हणतात दुनियेत.

डॉक्टर इब्लिस,

इंग्लिश शब्दरचनेचे त्याच क्रमात भाषांतर केल्यास ,मराठी शब्दरचना कशी होईल हे सांगणारा हा धागा नव्हे.

तुमचा प्रतिसाद 'चूक' आहे.

'चुकीचा प्रश्न' ... मला पण हाच 'चुकीचा' प्रश्न पडलाय. (पडला आहे),
<<

दिलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा,
विचारला होता मीच प्रश्न तेव्हा तुला चुकीचा!

अहो तुम्ही अगदी १९८२ साल वैगेरे म्हणालात की वाटणारच ना की बाबा काय खास त्या साली?
त्यापेक्षा साधारण ८०-८५सालांच्या दरम्यान वैगेरे म्हणा एक विशिष्टं कालखंड लक्षात येईल.

आणि मुख्य म्हणजे फायनली इब्लिस तेच म्हणत आहेत जे मी म्हणत आहे.

'किंबहुना ते माझा विरोध करत नाही आहेत'

इथे काय चालू आहे? सर्वांना ताकीद देत आहे की धाग्यावर असंबद्ध प्रतिसाद दिलेले दिसले तर सदस्यत्व स्थगित करण्यात येईल.

अ‍ॅडमीनजी,

लहानपणापासून जी बोली शिकलो तीच नेमकी मायबोलीवर बोलता येत आहे हे लक्षात आले. प्रत्यक्ष तुमच्या स्वतःच्या प्रतिसादातील 'दिलेले' (दिलेले दिसले) हा शब्द त्याच बोलीप्रमाणे आहे. पण कोणी जर म्हणाले की 'तेथे अ‍ॅडमीननेसुद्धा प्रतिसाद दिलेले', तर राग येतो हे अत्यंत प्रामाणिक नम्रपणे नोंदवतो आहे.

भाषेबाबत, 'मायबोलीबाबत', पॅशनेट असण्यातून माझे प्रतिसाद आलेले आहेत.

एखादी विशिष्ट किंवा प्रादेशिक भाषाशैलीच योग्य असते असे माझे म्हणणे असण्याचा अधिकार माझा नव्हे. पण हा धागा पाहता, त्यावर आलेले बहुतांशी अभिप्राय पाहता, अशी एक विशिष्ट बोली अस्तित्वात असणे हे मुळातच भाषेच्या विकासासाठी बरे पडू शकते असे वाटते. रहाता / राहता, पहाता / पाहता ह्याबाबत चिनूक्स ह्यांनी योग्य लिहिलेले आहे असे मला वाटते. हे उदाहरण देण्याचे कारण इतकेच की अशी अशी भाषा लिहिली जाते हे शिकवण्यात आलेले होते. त्याला आव्हान देण्यात आले तर सात्विक संताप येतो, हा माझा प्रश्न आहे. आपल्याला प्रामाणिकपणे तसदी देऊ इच्छित नाही.

तुमच्या प्रत्येक निर्णयाचा अनुयायी!

-'बेफिकीर'!

>>>दिलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा,
विचारला होता मीच प्रश्न तेव्हा तुला चुकीचा!<<<

अरे हे पाहिलेच नव्हते. हा भटांचा शेर असावा.

ह्यात 'होता' हा शब्द असायलाच नको आहे.

सती जलौघवेगामधील शेर आहे तो!

एक्झॅक्टली. @ बेफि.
त्यात,

'विचारलेला' मीच प्रश्न, तेव्हा तुला चुकीचा

असे आहे. Happy

>>>विचारलेला' मीच प्रश्न, तेव्हा तुला चुकीचा<<<

असे असूच शकत नाही.

कोणता गझलसंग्रह तुमच्यासमोर आहे माहीत नाही.

पण एक तर ते:

विचारला मीच प्रश्न तेव्हा तुला चुकीचा

असे असेल किंवा

विचारलेलाच प्रश्न होता तुला चुकीचा

असे असेल!

आणि माझ्यामते पहिलाच पर्याय योग्य आहे.

कृपया मला गझलेमार्फत नको तो मुद्दा स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न करू नका डॉक्टर Happy

डॉक्टर,

>>>ते शायर महान वगैरे नाहीत. गरीब बिच्चारे आहेत. तेव्हा गोड मानून घ्या<<<

हे कोणाबद्दल?

भटसाहेबांनी टांकसाळी मराठी योजलेली आहे.

Pages