शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युक्तिवाद की युक्तीवाद ?
लिहिणे की लिहीणे ?
नि:संशय, नि:संदेह, नि:संदिग्ध की निस्संशय ?
पंडीत की पंडित ?

युक्तिवाद
लिहिणे
निःसंशय
निःसंदिग्ध
पंडित

चू.भू.दे.घे.

नि:संदिग्ध याचे दुसरे रूप निस्संदिग्ध माझ्या वाचनात आलं आहे. हे रूप योग्य आहे की नाही, हे बघून सांगतो. विसर्गाचा 'स' होतो, असा काहीसा नियम आहे.

मलाही एक प्रश्ण आहे.

दिले जाणे/केले जाणे का दिल्या जाणे/केल्या जाणे?

मला कायम दिले/केले/वापरले असा शब्द वापरायची सवय आहे, पण हल्ली काही दिवस बरेच मायबोलीकर 'दिल्या/केल्या/वापरल्या' जाणे असे रुप वापरताना दिसतात. यातील व्याकरणदृष्ट्या योग्य रुप काय?

नात्या, दिले जाणे, केले जाणे हे योग्य. पण विदर्भाकडचे लोक दिल्या जाणे, केल्या जाणे, दिल्या गेला, घेतल्या गेला असे म्हणतात.

युक्तिवाद
निःसंशय
निःसंदिग्ध
पन्डित
विसर्गाचा 'स' होतो, असा काहीसा नियम आहे.>> बहुतेक विसर्गाच्या पुर्वी/नन्तर (नक्की आठवत नाही आत्ता, झलाम जशोSन्ते असा पाणिनी तला नियम आहे बहुधा) वर्गातले (कवर्ग, चवर्गे, पवर्र्ग, तवर्ग, टवर्ग) व्यन्जन असताना असे होते

मोत्ये हा शब्द बरोबर आहे का ? एक मोती आणि अनेक मोती की अनेक मोत्ये ? अनेक पुस्तकांमधे असा शब्द वाचला आहे. उदा: मोती ओघळला, मोती ओघळले, मोत्ये ओघळली.

मी गेल्या दोन-तीन दिवसांत वाचलेल्या व्याकरणाच्या पुस्तकांमध्ये मोत्ये असं रूप दिलं आहे. मात्र अरविंद मंगरुळकरांच्या पुस्तकात मोत्ये या अनेकवचनाबरोबरच मोती असे रूप वापरावे, असे दिले आहे. मोत्यें हा शब्द वर्‍हाडात प्रचलित आहे, असं मोरो केशव दामल्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

चिनूक्स, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी नंतर बघुन खात्री करते परंतु वर्‍हाडी नसलेल्या लेखक/लेखिकांनी पण हा शब्दप्रयोग केला आहे असे मला वाटते.

मोत्यें... कधी ऐकला नाही वर्‍हाडात २३ वर्ष काढुनही.

मोत्यें >>> मला पण आधी हा खास कोकणस्थी शब्द वाटला होता.

मोत्यें >>> मला पण आधी हा खास कोकणस्थी शब्द वाटला होता. >>>
मलापण. माझी आजी मोत्येंच म्हणायची.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

मी परवा परत तपासून सांगतो. माझ्या वचण्यात चूक होऊ शकते. पण हे अनेकवचनी रूप योग्य आहे हे नक्की.

गजानन, धन्यवाद.

शोनू, युक्तिवाद की युक्तीवाद ?>>
इथे ५.५ या नियमात दिलंय की.
आणि क्षने कालच हा दुवा तिकडे दिला होता की! Happy

'दोन मोत्ये गळाली...सत्तावीस मोहरा हरवल्या...रुपये खुर्दा किती गेला याची तर गणतीच नाही'
पानिपतच्या या वर्णनातपण मोत्ये असं लिहिल्याचं आठवतंय.

बाबासाहेब पुरंदरेंच्या एका लेखात महाराजांच्या तोंडी 'मोतियांची माळ' असे वाक्य असल्याचा संदर्भ आहे.
मोतिये किंवा मोत्ये हा शिवकालीन शब्द असावा.
चिनूक्स ने संदर्भ दिल्याप्रमाणे मोत्ये आणि मोती दोन्हीही बरोबरंच असायला हवेत.

>>>दिले जाणे/केले जाणे का दिल्या जाणे/केल्या जाणे?
नात्या, चांगली शंका आहे. मलाही हा प्रश्न बर्‍याचदा पडलाय.

माझ्या मते दिले जाणे/केले जाणे.

>>दोन मोत्ये गळाली...सत्तावीस मोहरा हरवल्या.

ऐतिहासिक पुस्तकांमध्ये असे शब्द बरेच बघायला मिळतात. जुन्याकाळी तसाच वापर होत असावा.

आणि क्षने कालच हा दुवा तिकडे दिला होता की! >>

हे सगळे शब्द तिकडेच ( तिथे म्हणजे तुम्ही दिलेल्या दुव्यावर नाही. जिथे तुम्ही दुवा दिला होता तिथे - गृप च्या/ ग्रूपाच्या धाग्यावर) चुकीचे लिहिलेल आहेत म्हणून संशेव Happy

http://www.manogat.com/node/6734
मी तरी याच्याविषयी बोलत होतो. इथे चुका आहेत का?
<<<<<

अच्छा, अच्छा. असं होय!
पण म्हणजे, तुम्ही हे पान आधी पाहिलं होतं ना? आणि खरा शब्द कुठला हे नि:संशय दिलं आहे ना तिथे?

मोत्ये कोकणातच बोलला जातो. (मला विचित्र वाटला होता पहिल्यांदा एकला तेव्हा). ते actually मोतिये असे आहे वगैरे एक कोकणी मामी म्हणाल्या होत्या बर्‍याच वर्षापुर्वीच्या गोवा भेटीत. (अपभ्रंश का काय म्हणतात ना शब्दाचे ते आहे )
गोव्यात आणि जवळपास रहाणारे प्रकाश टाकतीलच. Happy

अरेच्चा बोविश ने वरती लिहिले आहेच की. मी आता वाचले ते मोतिये. Happy

मोतिये किंवा मोत्ये हा शिवकालीन शब्द असावा >> पुर्वीच्या काळी, काही जवाहिरी फक्त मोती विकत फिरायचे, त्या मोती विकनार्‍यांना 'मोतिये' असे म्हणायचे.
अनेकवचन म्हणून मोत्ये शब्द व्याकरणात्मकदृष्ट्या बरोबर नसावा कदाचित. मोती चे अनेकवचन मोतीच. आणि मोतिये ह्या शब्दाचा अपभ्रंश मोत्ये झाला असावा.

कोकणीत मोतंया अस म्हणतात.
मोतंयांचो हार. मोतंयांची काकणा..

- अनिलभाई
It's always fun when you connect.

मोती विकणार्‍यांना 'मोतिया/मोतिये' असे म्हणत पण मोत्ये हा शब्द मोती ह्या शब्दाचे अनेकवचन म्हणुनच वापरला जातो.

तसेच भाकरीचे अनेकवचन भाकरी असे नेहेमी ऐकले होते, पण इथे मायबोलीवर मात्र अनेक जणांना भाकर्‍या म्हणताना ऐकले/वाचले. तसेचे एक भजं आणि अनेक भजी, एक भांडं आणि अनेक भांडी, एक वांगं अनेक वांगी. परंतु काही जण (किंवा जन) भजे, भांडे, वांगे असे म्हणतात. हे सर्व शब्द मी बहुतकरुन खेडेगावांत ऐकले आहेत. मग हे केवळ बोलीभाषेतील शब्द आहेत की व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत ?

भाकरीचे अनेकवचन भाकरी. मूर्ती - मूर्ती , हत्ती - हत्ती, मती - मती ही अशीच अजून काही रुपं. भजे, भांडे ही अशुद्ध (किंवा बोलीभाषेतील) रुपं आहेत.

विभक्तीचं अनेकवचन काय ? अलिकडेच कुठेतरी विभक्त्या असं वाचलंय मायबोलीवर .

भजे, भांडे ही रुपे अनेकवचनी म्हणून अशुद्ध की एकवचनात सुद्धा अशुद्धच ?

परंतु काही जण भजे, भांडे, वांगे असे म्हणतात>>
म्हणजे एकवचनात की अनेकवचनात? कारण एकवचनात बरोबर आहे की. पण "एक भजं, अनेक भजे" असं वापरत असतील तर व्याकरणदृष्ट्या अयोग्यच.

तसेच दगड - दगडं (शुद्ध अनेकवचनी प्रयोग दगड)
केस - केसं (शु. अ. प्र. केस)

ही अनेकवचने अयोग्य आहेत. (भजे, भांडे, वांगे, टमाटे इ.)

Pages