शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाईट काय त्यात. उलट माझा रेफरंस योग्य नाही ठरणार म्हणून लीलावती यांचा वापरा असे प्रामाणिक स्पष्टीकरण दिले.

अलिकडे बर्‍याच ब्लॉगवर किंवा मायबोलीच्या पाककृतींमधे मिक्सरला वाटून घ्या, कूकरला शिजवून घ्या असे लिहिलेले पाहिले आहे.
पूर्वी गोष्टी पाट्यावर वाटून किंवा जात्यावर दळून घेत असत. कढई किंवा तव्यावर भाजणे / तळणे होत असे.

मिक्सरला लावणे / कूकरला लावणे असा वापर कसा काय प्रचलित होऊ लागला आहे ?

मिक्सरला लावणे वाचले की मला तरी पूर्वी काही भांड्यांना बाहेरून माती लावत त्याची आठवण येते Happy

काळाच्या ओघात मूळ शब्दांचा आपल्याला विसर पडतोय असे मला अनेकदा वाटत राहते. सुटी हाच शब्द शाळेत असल्यापासून वाचला, पाहिला आणि वापरला. सुट्टी ही बोलीभाषा. पण गुगलकाका दोन्हीला योग्य म्हणतायत.

मिक्सरला लावणे / कूकरला लावणे असा वापर कसा काय प्रचलित होऊ लागला आहे ?>>बोलीभाषा नि पुस्तकी भाषा यांची सरमिसळ, हिंदी आणि अनेक इतर भाषांचा प्रभाव

सुट्टी - असा शब्द आहे पूर्वी पासून प्रचलित ....

मिक्सरला, कुकरला... Proud
हल्ली बोलीभाषेच्या नावाखाली काहीही म्हटलं तरी चालतं... त्यात मिक्सर्/कुकर हे इंग्रजी शब्द असल्याने चालायचेच..

मेधा, त्याहून भयाण प्रकार "ही भाजी फुलक्याबरोबर चांगली जाते" किंवा हा पुलावसोबत साईड डिश म्हणून ही भाजी चांगली जाते

दिस गोज वेल विथ चं शब्दशं भाषांतर.

मराठी टंकलेखन यंत्रावर ही असली अक्षरे (ट ला ट = ट्ट ) नीट टंकलेखित करता येत नसल्याने काही शब्दांची अशी रूपे झाली असावीत असा अंदाज आहे.. पण ५०/६० वर्षांपूर्वीचे लिखाण वाचले (उदा. चि. वि. जोशी) तर सुट्टी असाच शब्द वाचायला मिळतो..
मी तरी कधी 'सुटी' असा शब्द वाचलेला आठवत नाहीय..

शिट्टी - वाजवायची...

बसच्या 'शिटी ' पकडल्या - असा प्रयोग ऐकलाय बोलीभाषेत.. पण वाजवायची ती 'शिट्टी' च..

हो.

एकदा 'जेवण बनवलं' की मग काय भाजी फुलक्याबरोबर चांगली जायला, पुलावबरोबर साईड डीश म्हणून जायला काहीच प्रॉब्लेम नाही Wink

निर्जीव वस्तु मिळते,
आणि सजिव व्यक्ती / प्राणी "भेटतो" ना?

हा असा नक्की नियम आहे का?

खुप वर्षांपासुन ही गोष्ट मनात आहे.
आत्ता एबीपी माझा वर चालु असलेल्या शोधपत्रकारीता कार्यक्रमात, एका "शोधपत्रकाराने",
".... थोड्या वेळाने मला त्याचा फोटो भेटला " अशा अर्थाचे वाक्य म्हटले.

फोटो भेटला?

सुटी हाशब्दच मुळी (एखाद्या बाबतीत उदः कामावर, शाळेत येणे ) यापासून 'सूट' यापासून बनला आहे. सुट्टी हा सुटी मिळाल्याच्या खूप आनन्दाने जोरात उच्चारल्याने सुट्टी झाला हाकानाका.

या शब्दात 'ज्' उच्चारने आणि लिहिणे आवश्यक आहे.

याची फोड तद्+ज्ञ (ज्+ञ) अशी आहे.

तद् = प्रसिद्ध
ज्ञ = ज्ञानी

तद् म्हणजे "ते" (की त्याचे ?) ज्ञ म्ह्णजे जाणणे

संधी होताना द् चा ज झाला का ? अशी अजून कोणती उदाहरणे आहेत द् चा ज होणारी

द् या व्यंजनापुढे ज् हे व्यंजन आल्यास, द् बद्दल ज् होतो. (तद्+ जन्य = तज्जन्य).

म्हणून,

तद् + ज् + ञ = तज् + ज् + ञ = तज् + ज्ञ = तज्ज्ञ

ञ ? नाही पटत

(तद्+ जन्य = तज्जन्य). ह्या उदाहरणात नंतरही ज आहे, ह्याशिवाय असे दुसरे काही उदाहरण आहे का ?

_()_ Happy

Pages