शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मुंबई विरोधाचे किस्से आंतरजालीय वाचनाचे अनुभव आहेत. प्रत्यक्ष जीवनातले मराठी द्वेषाचे आहेत.
मुंबईबाहेरचे मराठी जरी बाँबे म्हणत असतील तरी, त्यांना सांगायला गेलो तर द्वेषपुर्ण नजरेने बघतात का? तु.क. टाकतात का? "असे सांगणा-या" व्यक्तीचा द्वेष करतात का?

सांगायला गेले नाही कधी. समोरचा बॉम्बे म्हणाला तरी मी सातत्याने मुंबई म्हणत राहते. पुढच्यावेळी आवर्जून सांगेन.

मला लोकल मधे जाताना मुंबईत नव्यानेच आलेल्या लोकांनी एक दोनदा, व्हिटी आणि बाँबेबद्दल विचारले तेव्हा मी त्यांना त्याबद्दल सामान्य टोन मधे सांगितले होते. पण त्यांना हवी असलेली माहिती मिळाल्यामुळे आणि ते नवेच असल्यामुळे त्यांनी पुढे विषय लावुन धरला नाही. तरीही जी काही १०% नाराजी दिसते चेह-यावर ती लपुन राहली नाहीच. आंतरजालाचे काहीही लिहुन नामानिराळे राहण्याचे स्वातंत्र्य नसल्यामुळे असेल.

अनेकवेळा आपण लहानपणी जे ऐकलं, बोललो ते चटकन सोडवत नाही आणि कोणी चिकटून राहिलं तर काय बिघडलं? हाजीअली चौकाला वत्सलाबाई देसाई चौक, कॅडल रोडला वीर सावरकर मार्ग, घोडबंदर रोडला विवेकानंद मार्ग, जेकब सर्कलला गाडगेमहाराज चौक (हे बेस्टच्या पाटीवर बघन बघून रुळलय), किंग्सर्कल ला महेश्वरी उद्यान (हेही रुळलय), लिंकिंग रोड ला सुभाषचंद्र बोस मार्ग, नेपियन सी रोड ला जगमोहनदास मार्ग, ल्यामिन्ग्टन रोड ला आणि काही आणि असे अनेक असतील. हळूहळू बसच्या पाट्यावर, पेपर, रोजच्या बातम्या इ मधून रुळेल. आणि नाहीच रुळल तर जबरदस्ती करून कदापि रुळणार नाही. एक गम्मत, मुद्दाम जे नवीन नावाबद्दल अती-आग्रही असतात त्याच्या समोर जुनी नावं बोलून चिडवायला आणि त्याची प्रतिक्रिया बघायलाही मजाच येते. Happy

मुंबईतल्या अमराठी लोकांना ज्यांच्या अनेक पिढ्या उच्चभ्रू मुंबईत गेलेल्या आहेत अश्या अमराठींना मुंबई म्हणताना कधीच ऐकले नाही. ते कटाक्षाने बॉम्बेच म्हणतात.
उत्तरेतून आलेले स्ट्रग्लर्स, थोडाफार जम बसलेले, इंडस्ट्रीतले तमाम अमराठी परडेवर काम करणारे हे आपापसात बोलताना बंबई, मिडलक्लास माणूस समोर असेल तर मुंबई आणि पॉश माणूस असेल तर बॉम्बे असं म्हणतात.
अर्थातच माझ्याशी बोलताना मुंबई म्हणतात.

बरेच नाटकवाले अमराठी मित्रमैत्रिणी कधी मुंबई, कधी बॉम्बे म्हणतात.
पूर्ण शहराला मुंबई आणि दक्षिण मुंबईला बॉम्बे असं म्हणणारेही मराठी, अमराठी दोन्ही लोक बघितलेत.

व्हिटीचे सीएसटी हे आता माझ्या तोंडात रूळलेय. माझ्या वडिलांना ते लक्षात येत नाही. ते जेव्हा रेग्युलर मुंबईत येत तेव्हा व्हिटीच होते. आणि आता गेल्या किमान १५ वर्षात तरी त्यांना तिथे जायची गरज पडलेली नाही. त्यांच्या तोंडात व्हिटी हेच असते. पण त्यावरून मी त्यांना तु क वगैरे देत नाही.

प्रत्येकवेळेला बॉम्बे म्हणणारी व्यक्ती ही तुच्छतेच्या किंवा तत्सम कारणांनीच म्हणत असेल असे नाही.

हा व्याकरणाचा मुद्दा कधीपासून झाला?

बेस्टच्या पाट्या हा महान प्रकार आहे. कुठली बस नक्की कुठे जाते हे पाट्या वाचून कळायला तुम्ही मुंबईतल्या रस्त्यांची चौकांची नावे कोळून प्यायलेली असायला हवी. किंवा मग तुम्हाला जिथून जिथे जायचे त्या रस्त्यावर धावणार्‍या सर्व बसेसचे क्रमांक माहिती हवेत. पाटीवर लावलेल्या एकाही थांब्यांच्या नावाच्यापुढे ती जागा असलेल्या उपनगराचे नाव लिहलेले नसते.

पण तरी हा शब्दाचे योग्य रूप कोणतेवाला मुद्दा कधीपासून झाला?

बेस्टच्या पाट्या हा महान प्रकार आहे

. हरी हरी !!
व्हीटी वरून ( छशिट) वरून चर्चगेटला जायला बस आहे हे मला माहीत व्हायला पंचवीस वर्षे लागली. आणि तेही चर्च गेटच्या स्टॉपला अहिल्याबई होळकर चौक म्हणतात हे कळल्यावर ! एरव्ही मी भोटासारखा चर्च गेट ची पाटी असलेली बस येईपर्यन्त ( म्हणजेच न येईपर्यन्त) वाट पाहून शेवटी पायी चर्च्गेट्ला जात असे. तीच तर्‍हा उलट. त्या बी एमसी चौकालाही असेच काहीसे नाव आहे. त्यामुळे ह्या बेस्ट बसेसचे माझे कधीच जमले नाही. मला जिथे जायचे असे तिथल्या बसेस भराभरा माझ्या पुढून जात असत आणि मी ' माझ्या'' बसची वाट पहात असे. तीच बाब छशिट ते मंत्रालयाच्या बसची. शटल बसचे नाव एनसीपीए आहे. तिच्या समोर्रोन मी बर्‍याच वेळाने येणार्‍या 'मंत्रालय'ह्या शुद्ध बसची वाट पहात टाईम्स ऑफ ईन्डिया च्या समोर वाट पहात असे नाहीतर विनोबा एक्सप्रेस्स ! मध्यंतरी ती ऑफिशियल नावे आणि कंसात खरी नावे असलेले बोर्ड येऊ लागले उदा. अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) असे.
अर्थात हे सगळे बीबीशी असंबद्ध आहे ::फिदी:

बेस्टचा प्रवास करताना रस्त्यांच्या नावापेक्षा लॅण्डमार्क ( पक्षी - त्या तिथे उतरायच) अस सांगाव

म्हणजे केळकर मार्ग टिकिट द्या अस म्हणल तर कंडक्टर परत विचारेल पण तेच जर स्टेट बँकेच्या ठिकाणी उतरायच आहे तर बरोबर तिकीट देतो . अर्थात त्या साठी ते लँडमार्क माहीत असायला हवेत Lol

(आता अवांतर चालल आहे तर माझेही दोन पैसे . चिन्मय तुला :दिव्याची माळ:
तसहि दिवाळी तोंडावर आहे Proud Wink )

अमितव,
कोणाच्या स्मॄतीत लहाणपनापासुन कोणते नाव आहे ते असो, ते पुसण्याचा उद्देश नाही.
एखादी गोष्ट "का" केली जाते त्यावरुन त्याला कसे उत्तर द्यायचे ते ठरते. माझ्या पाहण्यातील आंतरजालीय बाँबे उल्लेख हे "निव्वळ" आम्हाला मुंबईचे मराठी मुळ असने मान्य नाही, यातुन आलेले आहे. यादृष्टीने मुद्दामहुन इतिहासाचा विपर्यासही केला जातो आहे. हे चुकीचे आहे.
म्हणून माझा याला विरोधच राहील.

माझ्या लहाणपनापासुन माझ्या स्मृतीत असे आहे की देवाच्या मुर्तीला (पायाला) हात लावुन डोके टेकवुन नमस्कार करावा.
आता जैन / मारवाडी लोकांना महावीरांच्या मुर्तीला स्पर्श केलेला चालत नाही हे मला कसे माहीत असणार? मी काय हा सगळा बारीक अभ्यास करुन जायचे का प्रत्येक देवळात? अशा वेळेला अतिशय अपमानस्त्पद पद्धतीने आमच्या देवाला हात लावलेला चालत नाही हे सांगीतलेले कसे चालते? असे आहे तर सगळ्यांना प्रवेश मुक्त का ठेवला आहे? ठेवला आहे तर निट सांगु शकत नाही का ? किंवा एखादी इंग्रजी पाटी वगैरे?
आता तुम्ही असतात तर बाणेदार पणे हजारदा हात लावुन पाया पडला असता आणि समोरच्याची मजा बघीतली असती. तुम्ही शूर आहात. आमचे तसे नाही. आम्ही परत एकदा लांबुन पाया पडुन आलो.

एवढे पावित्र्य स्वतःच्या देवतेचे समजते मग जिथे आपण राहतो त्या राज्याने एका शहराचे नाव काही एक कारणाने बदलले आहे हे कसे कळत नाही? त्या राज्याचे आणि निर्णयाचे काही पावित्र्य नाही का?

बरं हे सगळ करणारे लोकं, चेन्नईत हिंदी ला मान्यता देतात का? गुजरतेतील महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्य गावातील बस स्टँड वर तिकीट खिडकीवरचा माणुस, मराठीत विचारलेल्या प्रश्नाला, ते कळत असुनही (भलेही गुजरातीत का होईना) उत्तर देतात की काही एकुच आले नाही असे दुर्लक्ष करतात?

तुमच्या आणि निधप यांच्या वडीलांच्या उदाहरणातील कोणी मुळातच निष्पापपणे बाँबे म्हणत असेल त्याच्याशी मला काहीही वैर नाही.

"का" करतो आहे हे कळले की प्रतीक्रिया बदलेल. ज्यादिवशी हे "का" जे आहे ते "द्वेष" सोडून दुस-या कोण्यताही कारणाने येईल तेव्हा मला त्यात काहीच समस्या नसेल.

बाकी, माझ्यासमोर तुम्ही मुद्दामहुन बाँबे असे हजारदा म्हटलात तरी मला राग येणार नाही. दुस-याने काय करावे यावर माझे नियंत्रण नाही. मला जी गोष्ट बरोबर वाटते त्याचा प्रचार करणे माझ्या हातात आहे ते मी करत राहणार. यात राग येण्याचे किंवा अपमान वाटन्याचे काही आहे असे मला वाटत नाही. बाकी, चेन्नईत येऊन रिक्षावाल्यशी हिंदीतच बोलुन त्याची मजा बघण्यचे माझ्याकडून तुम्हाला जाहीर आमंत्रण.

बस वरील पाट्यांच्या बाबतीत सहमत. कोणालातरी विचारावेच लागते, पाटी वाचुन काही कळत नाही.

बरीच पाने वाचली या धाग्याची.
खूप छान माहिती,
समजावूनही छान सांगितले आहे चिनूक्स.
धन्यवाद.

रॉबीन, बेस्ट च्या पाट्या पुर्वी रोमन लिपीत असत. अगदी बसवरचे बेस्ट नावही रोमन लिपीतच होते. मग ते देवनागरी लिपीत लिहिण्यात येऊ लागले. त्यावेळी ते मु.वी.पु.द. असे लिहावे असाही वाद झाला होता.

मुंबईतल्या चौकांना जी थोर व्यक्तींची नावे दिली आहेत, त्यांच्याबद्द्ल फारच कमी लोकांना माहिती असते, आणि ती नावे खरेच एवढी मोठी ( म्हणजे त्या व्यक्ती मोठ्या आहेतच पण नावेही लांबीला मोठी आहेत ) आहेत कि त्याचे नको ते शॉर्टफॉर्म्स व्हायला लागलेत. दिंगबंर विष्णु पलुस्कर सोडा अगदी डि. व्ही. पलुस्कर देखील चालले असते, पण नुसते पलुस्कर चौक म्हणून त्या थोर गायकाची काय आठवण राहिली ?

याबाबतीत काही डुप्लिकेशन्स पण झालीत. उदा. माझगाव सेल्स टॅक्स ऑफिसचा चौक आणि मुलुंडचा चौक, दोन्ही महाराणा प्रताप चौक. किंग्ज सर्कल आणि घाटकोपर, दोन्हीकडे गांधी मार्केट्स आहेत आणि ते दोन्ही स्टॉप ३८५ च्या रुटवर आहेत.

छ. शि.ट. हा शॉर्टफॉर्म ऐकवतही नाही आणि वाचवतही नाही. शिवाजी पार्क त्या मानाने जवळचे वाटते. परदेशी विमान कम्पन्यातील, उदघोषकांना मुंबईच्या छत्रपति शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट चा उच्चार करणे, खुपच कठीण जाते.

गोगा,

त्या आधीचे अक्षर शब्दाचे पहिले अक्षर असेल, तर ते र्‍हस्व असू शकते. रादर पहिले अक्षर र्‍हस्वच असावे असा नियम आहे असे वाचल्याचे आठवते.

उदा. दुर्ग. दूर्ग नव्हे. किंवा दुसरे उदाहरण मुर्ग Wink (मुसल्लम)

अर्थात, संपूर्ण, हेच बरोबर आहे याबद्दल दुमत नाही.

अमितवा,

उदर कोपरेमें ज कर्के मुर्गा बन्के खडा होजा बावा. चल जल्दी से.

इदर शब्दार्थो की बाता होरी. उदर तेर्कू खाने की सूझ री.

त्या आधीचे अक्षर शब्दाचे पहिले अक्षर असेल, तर ते र्‍हस्व असू शकते. रादर पहिले अक्षर र्‍हस्वच असावे असा नियम आहे असे वाचल्याचे आठवते. >>> पूर्ण, चूर्ण, कूर्म, मूर्ख, सूर्य, पूर्व, धूर्त

दुर्गसारखे र्‍हस्व शब्द दीर्घ शब्दांच्या तुलनेत कमीच असावेत असे वाटतेय.

लो कल्लो बात.
तुम्ही माझा थिसिस तुमच्या आण्टीथिसीसने खोडूनच काडलात की वो.
आता काय करावं बा?
कॉलींग ६वी वॅक्रण टीचर........

ससा - सश्याचे की सशाचे? (नेहमीचा पायात घोटाळणारा गोंधळ.)
माझ्यामते सश्याचे.

काही इंग्रजी शब्दांची स्पेलींगं आणि काही मराठी शब्दांची रूपं पाचवीला पुजल्यासारखी आपल्याबाबतीतला गोंधळ जन्मभर मनातून संपू देणार नाहीत बहुतेक. Proud
अनेकदा बरोबर लिहिले तरी पुन्हा चुकीचे दिसले की पुन्हा - ते की हे? चालू..

छरा > छऱ्याचे
घडा > घड्याचे
तेव्हा 'सश्याचे'च बरोबर वाटतंय.

असे/कसे > अशाचे/कशाचे
मासे > माशांचे
माश्या > माश्यांचे (पोळे उदा.)

Pages