Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/45685 - अल्पनाची मेथी भाजी रेसिपी.
मंजुडे - खानदेशी आहे ग ती भाजी.
प्रतिसादांचा अभ्यास कमी पडला यावेळी 
या पद्धतीनी सगळ्याच पालेभाज्या करतात खानदेशात. पालक, कांद्याची पात, ई....
योकु , मंजू ,प्रीति धन्यवाद!!
योकु , मंजू ,प्रीति धन्यवाद!! केला गोळाभात. आणि संपलाही. थोडासाच करून पाहिला. आवडला.
मंजुडे - खानदेशी आहे ग ती
मंजुडे - खानदेशी आहे ग ती भाजी. स्मित प्रतिसादांचा अभ्यास कमी पडला यावेळी डोळा मारा>>> बरं, सॉरी! कोणाच्या अस्मिता दुखावण्याचा उद्देश नव्हता. अल्पनाने 'औरंगाबादच्या आजूबाजूच्या भागात करतात' असं लिहिल्याने मी मराठवाडा लिहिलं. ती भाजी खानदेशी असूदे नाहीतर मराठवाडी, मला तरी खूप आवडते.
दह्यातलं मेथीची पाने बारीक
दह्यातलं मेथीची पाने बारीक चिरून रायतंही मस्त लागतं. मोहरी, लसूण, हिरव्या मिरच्यांची फोडणी करून त्यात मेथी खमंग परतायची. जास्त नाही, एक दोन मिनिटं. पानं जरा मऊ होईपर्यंत. दह्यात लाल तिखट, जिरे पूड, शेंदेलोण - पादेलोण / सैंधव घालून दही जरा घुसळायचं. परतलेली व जरा गार झालेली मेथी त्यात घालून नीट मिसळायचं. मेथी रायता तयार.
अरे वा अकु! हे करून पाहायला
अरे वा अकु! हे करून पाहायला हवं एकदा...
मी ती दाकु + मेथी केली आज. मस्त झालेली...
धन्यवाद लोक्स!
दाकु + मेथी भाजी माझ्या एका
दाकु + मेथी भाजी माझ्या एका मैत्रिणीची आई करायची. ते लोकं कच्छी असल्याने ही भाजी कच्छी प्रकार आहे असं मला वाटायचं. नंतर एका नगरी मैत्रिणीच्या आईनं केलेली पण बघितली. इथे वाचून कळलं खानदेशी आणि मराठवाडी पण करतात. एकुणात युनिवरसल भाजी आहे
वेगवेगळ्या चिप्सबरोबर
वेगवेगळ्या चिप्सबरोबर खाण्यासाठी सोप्या आणि मुंबई-ठाण्यात सहज मिळू शकणार्या जिन्नसांनी बनलेल्या डिप्सच्या कृती हव्या आहेत. मला प्लिज पाकृ किंवा लिंका देईल का कोणी?
मेथीचा तिखट केक कर. अफलातुन
मेथीचा तिखट केक कर. अफलातुन लागतो. सर्च मध्ये सापडत नाहीय. इथे कोणी टाकलेला तेही आठवत नाही पण मी खुप वेळा केलाय आणि खुपच सुरेख लागतो.
सापडली आत्ता - http://www.maayboli.com/node/32046. सुलेखाने लिहिलेली असा संशय होता..
मेथीचे थालीपीठ (धपाटे) ,थेपले
मेथीचे थालीपीठ (धपाटे) ,थेपले .लगेच संपतात आणि दोन दोन दिवस टीकतात ,जर प्रवासात न्यायचे असतील तर.
हा माझा फेवरेट प्रकार आहे .
सांबार मधे पण मेथी छान लागते
सांबार मधे पण मेथी छान लागते
मेथीच्या कडक पुर्या,
मेथीच्या कडक पुर्या, मेथीच्या कोबी वडी प्रमाणे वड्या, मेथी मुठीया, मेथीचा खाकरा, मेथी घालून डाळीची आमटी करता येईल.
मंजूडे, चेंज हवा असेल तर
मंजूडे, चेंज हवा असेल तर हमस, ग्वाकामोले , टोमॅटो साल्सा ( कांदा , टोमॅटो जास्त घ्यायचा , कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व बारीक चिरून, त्यात चवीनुसार साखर, मीठ, मिरेपूड , लिंबूरस ) , tzatziki ( काकडी किसून, पिळून रस काढून, घट्ट दह्यात मिक्स करायचे , एखादी पाकळी लसूण किसून, मीठ ) किंवा सायोची कांदा चटणी सुद्धा मस्त लागते.
हां... कांदा चटणी! गूड
हां... कांदा चटणी! गूड सजेस्शन. अजून येऊ द्यात आयड्या.
चिप्ससोबत एक देसी डीप-
चिप्ससोबत एक देसी डीप- केप्रचा कांदा लसूण मसाला+दही
सॅलड, कोशिंबीर, रायते फॅन
सॅलड, कोशिंबीर, रायते फॅन क्लबवर काही डीप्सच्या आयडिया आहेत मंजूडी.
http://www.maayboli.com/node/23421
या काही कॉम्बोचे डिप्स चिप्सबरोबर चांगले लागतील असं वाटतंय :
पुदिना चटणी + दही
चक्का + मीरपूड + मीठ + काकडी + सफरचंद + उकडलेला बटाटा + वाफवलेल्या भाज्या (घेवडा, मटार, गाजर इ.) हेही एक मस्त डिप होऊ शकते.
मेयॉनीज + मीरपूड + मीठ
टोमॅटोची चटणी
पुदिन्याची सरसरीत चटणी
कैरी कांदा चटणी
आमसुलाची किंवा चिंचेची चटणी
पालक रायता
*रच्याकने, मध्यंतरी एका रेस्तेराँमध्ये मैत्रिणीच्या मुलीने स्वतःसाठी ओनियन रिंग्ज ऑर्डर केल्या होत्या. दुसर्या मैत्रिणीने चना भटुरा. तो भटुरा संपला तरी चना मसाला बराच शिल्लक होता. आणि ओनियन रिंग ऑर्डर करणारीला त्या रिंग्ज फारच बेचव वाटल्या. मग आम्ही बाकीच्यांनी ओनियन रिंग्ज चना (छोले)च्या मसाल्यात डुबवून खाल्ल्या. छान लागल्या.
चक्का + मीरपूड + मीठ + काकडी
चक्का + मीरपूड + मीठ + काकडी + सफरचंद +>> हे एक सॅलड करणारच आहे. सफरचंदाऐवजी डाळींबाचे दाणे.
मेयॉनिजचा ब्रँड सुचवतेस का?
वेकफील्ड / वाइकफील्डचा आणला
वेकफील्ड / वाइकफील्डचा आणला होता एगलेस मेयॉनीज लास्ट टाईम. (त्याला सहज दोनेक वर्षं झाली असतील). चांगला वाटला. पण मला इतर ब्रँड्ज आठवत नाहीत आता.
मेयॉनिजचा ब्रँड सुचवतेस का? >
मेयॉनिजचा ब्रँड सुचवतेस का? > मंजूडी मी फन फूड ब्रँड चे मेयॉनिज आणले होते पण नाही आवडले अर्धी बॉट्ल टाकून दिली, त्यापेक्षा अमेरिकन गार्ड्न चे चांगले वाटले.
विषय चाललाय म्हणुन, कुणी घरी
विषय चाललाय म्हणुन, कुणी घरी करते का मेयॉनिज? मी ट्राय कराय्च्या विचारात आहे. लेकाला आवडते. पण नेहमी बाहेरचे खाणे योग्य नव्हे.
मेयॉनिज>>> काही दिवस वापरले
मेयॉनिज>>> काही दिवस वापरले नाही तर त्याला तेलकट पाणी सुटते मग बोटल फेकावी लागते. भरपुर दिवस टिकणारे कोणत्या ब्रँडचे तेही सुचवा.
बाकी मधे एक काजु पासुन घरी बनवलेले चीजच्या चवीचे खाल्ले होते. प्रोसेस विचारून टाकते.
सामी, बरोबर. मलाही फन फूडचे
सामी, बरोबर. मलाही फन फूडचे मेयॉनिज आवडले नव्हते. आता अकुचा वेकफिल्ड आणि तुझा अमेरिकन गार्डन ब्रँड बघते.
वर्षा. +१. मेयॉनिज कोणी घरी करत असेल तर पाकृ लिहिणार का प्लिज?
माझ्याकडच्या पुस्तकात आहे. या
माझ्याकडच्या पुस्तकात आहे. या विकांताला जमल्यास करुन पहाते
मंजूडी, चीजी डिप्सही आवडत
मंजूडी, चीजी डिप्सही आवडत असतील तर मस्त लागतात. तयार तर मिळतातच किंवा नेहमीच्या साध्या चीजस्प्रेडमध्ये चिरलेली कांदापात / ठेचलेला लसूण किंवा लसूणपात / चिलीफ्लेक्स / मिक्स हर्ब्ज / शेपूची बारीक चिरलेली पाने वगैरे घालून.
नारळाची चटणी / कोथिंबिरीची चटणी / वांग्याचे भरीत / किसलेल्या काकडीचे रायते हेही डिप्सचे पर्याय होऊ शकतात.
वर्षा. +१. मेयॉनिज कोणी घरी
वर्षा. +१. मेयॉनिज कोणी घरी करत असेल तर पाकृ लिहिणार का प्लिज? > माझी ताई करते घरी. या विकेन्ड ला तिला विचारून क्रुती टाकते.
चीजी डिप्सही आवडत असतील>> तो
चीजी डिप्सही आवडत असतील>> तो हुकमाचा एक्का आहेच
लसूणी पालक किंवा पालक पनीरची
लसूणी पालक किंवा पालक पनीरची ग्रेव्ही (विदाऊट पनीर)
मसुराची उसळ + वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भाजलेला पापड (कुस्करून), कोथिंबीर
भाज्यांचे लोणचे
अकु, डीप्सवरून एकदम
अकु, डीप्सवरून एकदम भाज्यांवरच उडी मारलीस की ;). मंजूचं काम वाढवू नकोस
सारांश असा की नेहमीच्या
अकु __/\__ कांदा चटणी,
अकु __/\__
कांदा चटणी, मेयॉनिजमधे (सामीने कृती टाकली तर) हर्ब्ज आणि कॉर्न आणि रंगीत सि. मिरच्या किंवा चीजस्प्रेडमधे पुदिना किंवा लसूणपात यापैकी काहीतरी एक करेन.
अमूलच्या साईटवर मेयॉनीजची एक
अमूलच्या साईटवर मेयॉनीजची एक कृती आहे. तरला दलालच्या साईटवरही आहे. विपूत लिंक्स देते.
Pages