पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसभर टिकू शकणाऱ्या भाज्यांत पीठ पेरलेल्या भाज्या चांगल्या! काकडी / दुधी / कोबी / सिमला मिरची / मेथी / कांदा / कांदापात.
बेसनाऐवजी मिक्स डाळींचे पीठ / ज्वारीचे पीठही लावू शकता.
भाजीचे / मिक्स भाज्यांचे लोणचे (गाजर, मटार, बीन्स किंवा फ्लॉवर / बीट), लिंबूक्रश लोणचे, आवळा / कैरीचे लोणचे, छुंदा
कोरड्या भाज्या (परतलेल्या) किंवा कोरडी उसळ पोळीत सारणासारखी भरून त्याचे रोल्स
स्वीटकॉर्न भुर्जी
स्टर फ्राय केलेल्या भाज्या (चायनीज स्टाईल)
कोरड्या चटण्या (जवस / कारळे / तीळ / दाणे / खोबरे / लसूण) भरून रोल्स. हवे असल्यास पोळीला आतून किंचित तुपाचा हात.
भिजवलेली मूगडाळ फोडणीवर परतून केलेली भाजी (!)
मोरांबा / साखरांबा / जॅम / सॉस / चीजस्प्रेड + सीझनिंग / मेयॉनिज / मस्टर्ड / लोणीसाखर वगैरे आहेतच!
ओल्या चटण्या मुंबईच्या दमट हवेत दिवसभर कितपत टिकतील ते माहीत नाही. पण दुधी / दोडक्याच्या सालीची तीळ दाणे खोबरं घालून परतून केलेली चटणी, वांग्याचे वा कारल्याचे काप हे टिकतील असे वाटते.

सुकं काही असेल तर मुंबईत दिवसभर आरामात राहील ड्ब्यांमध्ये. फक्त ताजं केलेलं गार करून मग डब्यात भरावं लागेल. रोल्स वगैरे तर फॉईलमध्येही रॅप करता येतील अन वेगळा असा डबा म्हणून लागणार नाही. तयार रोल आधी टिश्यूमध्ये अन मग फॉईलमध्ये नीट गुंडाळायचा अन पॉलिथिन/झिपलॉक मध्ये द्यायचा... Happy

अंडी चालत असतील तर बॉइल्ड एग सँडविच, ऑमलेट पोळी रोल असे काही देऊन पहा. फुटबॉल एक गेम खेळला तरी दमायला होतं . एकापेक्षा जास्त गेम किंवा प्रॅक्टिस असेल तर अजूनच. भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ द्या. तिळाचे लाडू, शेंगदाणे, खजूर, बदाम अशा गोष्टी पण देऊ शकता.

उसळी. आणि पोळ्या. सलाड. बाटलीत सरबत. आवडीचा ज्यूस लिंबू पाणी. तो खेळून डिहाय ड्रेट होत असणार. व एक फळ. हे परत येताना बस मध्ये खायला.

चिकन कबाब/ खिमा शामी कबाब आणि पोळ्या. सलाड. आव डत असल्यास. ( गाजर काकडी स्ला इसेस स्प्राउट्स)

शिवाय त्यांच्या ट्रेनर ला विचारा काय खायला पाहिजे. कारण मसल बिल्डिंग व आरोग्य पूर्ण द्यायला हवे. खेळायचे म्हणजे एनर्जी व न्युट्रिशन दोन्ही हवे. किंवा न्युट्रिशनिस्ट् शी बोलून तक्ता बनवता येइल.

स्टार बक्स कॅफे मध्ये किंवा इतरही एक चांगले झाकणाचे ग्लास मिळते त्यात ज्यूस/ ताक/ कोल्ड कॉफी काय हवे ते बनवून मी दोन तास वगैरे डीप फ्रीझ मध्ये ठेवते. एक पाण्याची बाटली पण ठेवते. हपिसला जाताना बरोबर नेते. कॉप चालू करून लॉगिन होई परेन्त त्या गार पाण्याचे दोन घोट घे णे हा एक आनंद आहे. व काम मार्गी लागले कि अर्ध्या तासात मग तो गार ज्यूस कॉफी कायते घेते. थोडेसे बर्फ झालेले असते ते चमच्याने खायला मस्त वाटते. मूंबईच्या हवेत कायमच तहान लागते. तो नेणार् असेल तर कोकोनट वॉटर पण नेता येइल. एनर्जी बार चिक्की पण ट्रेनर सांगेल त्या प्रमाणे द्या.

Sarwana thanks. Trainer la vicharle hote pun tyane kahi pun dya ase sangitle. Actually wadhtya wayat bhook jaast lagte shivay khelalywar ajun mhanun prashna padla. Thanks

भाज्यांचे सारण घातलेले / शिजवलेल्या डाळीचे सारण घातलेले पराठेही देऊ शकता. सोबत हवे असल्यास लोणचे / चटणी पॅक करून.

सोया पॅटीज चे बर्गर. सोया फिलिन्ग असलेले न्युट्रेला चे खिमा / नगेट्स मिळतात ते फिलिन्ग घालून सब सॅदविच. मिल्क कार्टन्स, रिअल ज्यु स चे कार्टन्स. सर्व वापरून फेकून देता येइल.

इतर फुटबोल मॉम्स शी बोलून प्रत्येक मॉम काही एक फूड टीम साठी बनवून देउ शकेल रोज तर बरे पडेल.
म्हणजे तुम्ही ज्यूस कोणी पराठे, सला ड कोणी फ्रूट्स असे . एक फेसबुकवर गृप बनवा आणि रोजचे मेन्यू प्लॅन व शेअर करून घ्या.

Amhi veg khato baki sarv non veg wali aahet tpya mule te bahuda jamnar nahi. Bhajya ghalun parathch try Karen foil madhey weg wegle deta yetil. Bahuda sarv taje banavte tya mule patties etc sakali jamne Kathin aahe.

पंधरा ते वीस दिवस टिकतील असे पदार्थ कोणाला माहिती आहेत का? सध्या तरी चकली, लाडू वगैरे फराळाचेच पदार्थ आठवत आहेत का? किंवा फक्त गरम पाणी टाकले कि तयात होतील असे पदार्थ?

पेरू, पंधरा-वीस दिवस टिकणारे पदार्थ म्हणजे भडंग, समस्त प्रकारचे चिवडे, चिक्की, खाकरे, लाडू वगैरेच प्रकार आठवत आहेत. लाह्यांचा चिवडा (फोडणीच्या लाह्या). शेव, मठरी, मूगगोटे वगैरे फरसाणाचे प्रकार.
गूळपापडीचे / बेसनाचे / बुंदीचे / रव्याचे लाडू, तीळगूळ, भेळभत्ता.
सुतरफेणी, पेठा, म्हैसूरपाक, काजूकतली वगैरे गोडाचे प्रकार.
व्हीट पफ्स, सोया पफ्स, कॉर्न फ्लेक्स, व्हीट फ्लेक्स, चणे-फुटाणे, खजूर, तळलेले / खारे शेंगदाणे किंवा खारवलेले काजू-पिस्ते-बदाम. सुकामेवा.

गरम पाणी टाकल्यावर तयार होणारे पदार्थ --- घरी असे कोरडे पदार्थ तयार करून ते बाहेर पंधरा वीस दिवस टिकतील की नाही याबद्दल मोठी शंका आहे. अन्यथा खिचडी, शिरा, उपमा यांची कोरडी तयारी करून आयत्यावेळी गरम पाणी घालून काम होऊ शकते. आजकाल रेडी-टू-ईट ची पाकिटे सहज उपलब्ध असतात. बिर्याणी, नॉर्थ इंडियन ग्रेव्हीज व भाज्या, पुलाव, उपमा, साऊथ इंडियन नाश्त्याचे प्रकार वगैरे. हवाबंद भाज्या, उसळी किंवा इतर खाद्यपदार्थ. किंवा मॅगी नूडल्स, इन्स्टन्ट पास्ता यांसारखे पदार्थ.

खिचडी, शिरा, उपमा करण्यासाठी डाळ-तांदूळ वा रवा फोडणीवर कोरडे भाजून ठेवता येते मात्र कांदा वा हिरवी मिरची (खिचडी/ उपम्यामधली) अगदी कुरकुरीत तळली गेली पाहिजे. फोडणीवर परतणे वगैरेही जरा खमंग.
शिर्‍यासाठी मात्र माहित नाही. म्हणजे मुळात रवा भाजून ठेवला असेल तुपावर तर बाकीचा शिरा हा तसा इन्स्टंटच प्रकार असतो की.
डीप फ्रीजमधे टिकते.
प्रवासात १-२ दिवसापुरते टिकत असावे.
खायच्या आधी फक्त पाणी घालून उकळून/ शिजवून काढायचे.

अकु, निधप धन्यवाद. अकु, तुमच्या प्रतिसादातले काही पदार्थ सोयिस्कर वाटतायेत द्यायला.
घरचा एक सदस्य महिन्याचे २०-२५ दिवस जरा आडगावी राहणार आहे. तिथे जेवणाची सोय यथातथाच आहे. म्हणुन निदान केटल तरी बरोबर देउ असा विचार आहे जेणेकरून पाणी गरम करुन एखादा पदार्थ करता येइन. फ्रिजची सोय असेन का नाही माहित नाही.
उपमा कोरडा भाजुन देइन बरोबर. शिराचे बघायला लागेल. रवा भाजल्यावर पाणी टाकल्यावर फुलेल पण साखर टाकल्यावर पातळ होइन ना? गॅस वगैरेची सोय नाहिये.

रेडी टु इट पाकिटे मला तरी आवडली नाहित, त्यांची चव काहितरीच लागते.

विमान प्रवास असल्याने किती कस्टमचाही विचार करावा लागेल

दशम्या टिकतात ना अनेक दिवस? ग्रामीण भागातील कोण्या एका तरुणाने दोनेक आठवड्यांचा एक इंग्लंड दौरा दशम्यांच्या बळावर पार पाडल्यावरचा एक लेख वाचल्याचे आठवते.

वेळ असेल तर आधी एकदा करून टिकतात का ते पहा.

पेरु, सान्जोर्‍या पण देऊ शकतेस. आधी अर्धा चमचा तुप पसरवुन तव्यावर दोन्ही साईडने भाजाव्या आणी मग तळुन घ्याव्या. भरपुर्र टिकतात.

गव्हाच्या चिकाचं (पावडर फॉर्ममधल्या) एक पाकिट आलं आहे घरी. पण कसं बनवायचं याबद्दल त्यावर काहीच सुचना नाहीत. पाण्यात कालवून शिजवायचं असतं का हे?

त्या सोलापूर साइडला मिळतात तश्या पातळ आणि कडक ज्वारीच्या भाकर्‍या.
प्रवासी भाकर्‍या असेच म्हणतात त्यांना.

अल्पना! चिक पावडर पाण्यात कालवुन भज्याच्या पिठासारख करायच थोड घट्ट चालेल मग जेवढा चिकाच मिश्रण तेव्हढ च पाणि उकळायला ठेवायच पाण्यात थोडा हिब्ग,मिथ घालायच, पाणि उकळल की वरुन चिकाची धार सोडायची आणि एककडे भराभ्रा हलवायच, घत्ट होवुन चकच्कित दिसायला लागल ़की एक दण्कुन वाफ द्यायची ..मग चापायच.

अ‍ॅस्परॅगसच्या विविध पाककृती इथे मिळतील का?

मी फक्त ताव्यावर सवतळून घेतो. त्यात मीठ तेल टाकतो. तसेही चवीला छान लागते. फक्त एकच की तव्यावरचे थेट ताटात जायला हवे. थंड झालेत की मग ती चव येत नाही.

सुप कसे करता येईल ह्याचे?

धन्स.

दीपा, मी आधी दाणे भाजून सोलतो आणि अशे दाणे तेलात कांदा गुलाबी झाला की टाकतो. मग पोहे. असे दाणे चवीला बेहद्द चांगले लागतात.

बी मी अ‍ॅस्परेगसचं सूप करते. एक जुडी अ‍ॅस्परेगस मोठे तुकडे करून ,अर्धा कांदा दोन्ही थोड्या ऑलिव्ह ऑइल वर परतायचं. त्यात दूध घालून अ‍ॅस्परेगस नरम होईपर्यंत उकळायचं. थोडं निवल्यावर त्यात एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आणी मिक्सर मधून काढायचं. लागलं तर अजून थोडं दूध घालायचं. हवं तेवढं पातळ करून घ्यायचं. गाळून चवीप्रमाणे मीठ मिरपूड घालून प्यायला तयार.

बी, दिनेशजीन्चा बाफ बघ, बहुतेक त्यान्च्या रन्गिबेरन्गी बाफावर कृती आहेत. त्यानी फोटो पण टाकला होता.

कांदेपोह्यात शेंगदाणे घालायचे असतील तर कधी टाकायचे हे तुला कशी चव हवी आहे त्यावर अवलंबून आहे. काही जागी कुरकुरीत लागतात तेव्हा कांद्या अगोदर घालतात. घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर दाणे मऊ हवे असतात. तेव्हा नंतरही घालतात. काही घरी मउ हवे म्हणून भिजवलेले दाणे घातलेले पण पाहिले आहे. तेव्हा मोहरी कधी घालावी इतका कडक नियम दाण्यासाठी नाही Happy

कांदेपोह्यात शेंगदाणे कधी - दाणे कुरकुरीत हवे असतील तर काहीजण दाणे तेलात वेगळे तळून घेतात व पोहे होत आले की त्यात घालतात. काहीजण खारेदाणेही घालतात. भट्टीत भाजून आणलेले शेंगदाणे घालून केलेल्या कांदेपोह्यांची चव पुन्हा वेगळी लागते.

हा दाण्याचा कुटाणा आधी झालाय की मला देजावु होतंय ? Uhoh विकेंडला संध्याकाळी पापु प्लान होता..सकाळी कांपो करावे लागतील Wink

Pages