पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anvita ,

मालवणी मसाला घातलात तरी मिसळ सुरेख होते.थोडेसे तीळ्+थोडे सुके खोबरे भाजून मिक्सरमधून पाणी घालून वाटायचे.आले+लसूण्+कोथिंबीर यांचीही कमी पाणी घालून गंधासारखी पेस्ट करून घ्यायची.थोड्य तेलावर कांदा घालून तो गुलाबी झाल्यावर आले-लसूण पेस्ट पाणी आटेपर्यंत परतायची. नंतर तीळ+सु.खो.पेस्ट पाणी आटेपर्यंत परतायची.त्यात मा.मसाला टाकून परतून घ्यायचा व शिजवलेली मटकी घालायची.

मला माझ्या सोसायटीच्या गणेशोत्सवात पाककॄती स्पर्धेत करण्यासाठी रेसिपी हवी आहे...
बटाटा अशी थीम आहे.
मला एखादी हेल्दी, करायला सोपी अशी रेसिपी सुचवा प्लीज

बटाट्याची हेल्दी रेसिपी?? Wink
या रेसिपी सोप्या आहेत, हेल्दी वगैरेबद्दल शंका :
पोटॅटो रोस्टी / आलू टिक्की / आलू पुदिना चाट / बेक्ड पोटॅटो अँड कॉर्न (स्वीट) इन चीजी व्हाईट सॉस - सर्व्ह विथ गार्लिक टोस्ट / उकडलेल्या बटाट्याचे पुदिना - मिरची - साखर - मीठ / काला नमक घालून दह्यातले रायते / कटलेट / पोटॅटो सँडविच

Wink मागच्या वर्षीच बहुतेक माबो वर बटाटा सफरचंद अशी पाककृती स्पर्धा होती की. अगदी ढापाढापी नको पण तिथून इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी जमेल.

लिंबाच्या गोड लोणच्यासाठी लिंबे कुकरच्या डब्यात पाणी न घालता उकडली, पण तरीही त्याला पाणी सुटले ते पाणी साखरेचा पाक करताना घालु का? कि फेकुन देऊ? सुलेखा, शलाका,प्रिती, दिनेशदा,सायली... कुणीतरी मदत करा.

>>मागच्या वर्षीच बहुतेक माबो वर बटाटा सफरचंद अशी पाककृती स्पर्धा होती की. अगदी ढापाढापी नको पण तिथून इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी जमेल.>>

मला लिंक देउ शकाल का प्लीज ?

पौर्णिमा, धन्यवाद! मी लोणचे बाटलीत भरले आहे. आता ते पाणी त्यात घातल्यावर ते पुन्हा गरम करण्याची गरज नाही ना? थोडे रसदार होईल. sorry! तुझे नाव घालायचे राहिले.

.

.

मला रेडी टू कूक उपमा तयार करून ठेवायचा आहे. जो नंतर फक्त गरम पाण्यात टाकला की उपमा तयार. कोणाला माहीत आहे का हे कस करायचा आणि तो किती दिवस टिकेन.

घरात असलेला अर्ध्या नारळाचा चव, एक मिल्कमेडचा डब्बा, क्रिम,मिल्क पावडर, बदाम पुड, केसर-विलायची (सगळे पदार्थ अंदाजपंचे घेतलेत, संपवायचे होते.) असं सगळं एकत्र करून गॅसवर शिजायला ठेवलंय. तर हे प्रकरण कितीवेळ किंवा कोणत्या स्टेजपर्यंत शिजवयचं असतं? थंड झाल्यवर आळतं का? क व्यवस्थित गोळा होईपर्यंत शिजवायचं?
जमल्याच तर वड्या करेन नाहीतर गोळे देईन लेकाला खायला. Happy

अल्पना, वड्या होतील. कढईच्या साईडला सफेद दिसायला लागल की गोळा होईल. गोळा होईपर्यंत थांब नाहीतर गोळे होतात. गॅस शेवटपर्यंत मंदच ठेव नाहीतर वड्या लालसर दिसतात. पांढर्‍या शुभ्र होत नाहीत. स्वानुभव. Happy

ओके. Happy
कधीकाळी मावेमध्ये केलेली मब सोडल्यास वड्यांचा अनुभव नाहीये अजिब्बात त्यामूळे घाट घातल्यावर कधी थांबायचं हे कळेना. Happy

असं सगळं एकत्र करून गॅसवर शिजायला ठेवलंय. <<< हे पुन्हा पुन्हा वाचल होत. गॅसवर शिजत ठेवून इथे विचारत आहेस ह्यावर विश्वासच बसला नव्हता. Happy
त्यामूळे घाट घातल्यावर कधी थांबायचं हे कळेना <<<< _/\_ माझी असा घाट घालायची हिम्मत नसती झाली एखाद्या पदार्थासाठी. तरीसुद्धा हा पदार्थ वड्या झाल्या काय आणि गोळे झाले तरी खायला टेस्टीच लागणार त्यामूळे काही वेस्ट जाणार नाही. Wink

ट्युलिप,

रवा भाजून घ्यायचा. मग हिंग, मोहरी, ( किंवा जिरे ) कढीपत्ता यांची फोडणी करायची. आवडत असेल तर त्यात उडदाची डाळ, दाणे व काजू घालायचे. मग रवा कोरडाच परतायचा. चवीप्रमाणे मीठ, साखर व थोडेसे लिंबूफूल घालून मिसळून ठेवायचे. थंड झाला कि हवाबंद डब्यात ठेवायचा. यात कांदा घालायचा तर कोरडा वाळवलेला
मिळाला तर घालायचा. हळद आवडत असेल तर घालायची.

हा प्रकार दिडपट उकळत्या पाण्यात घालून शिजवला कि उपमा तयार होतो. वरून तूप, खोबरे, कोथिंबीर घ्यायची.
फक्त गरम पाण्यात घालून चालत नाही, शिजवावेच लागते.

अशी तयार पाकिटे मिळतात.

धन्यवाद दिनेशदा , अजुन एक प्रश्न,
<<मग हिंग, मोहरी, ( किंवा जिरे ) कढीपत्ता यांची फोडणी करायची. आवडत असेल तर त्यात उडदाची डाळ, दाणे व काजू घालायचे. मग रवा कोरडाच परतायचा>> फोडणी मध्ये भाजलेला रवा टाकायचा आणि परत परतायचा, बरोबर?

आरती, वड्या नाही जमल्या तर मिश्रण तसंच खाता येईल हे ठरवूनच तर बनवायची हिम्मत केली. लेकाला हे असेच गोळे खायचे असतात, स्वीट बॉम्ब आहेत असं सांगितलं की तो आख्ख्या शाळेत जाहिरात करेल स्वीट बॉम्बची. Lol
पण वड्या पडल्यात. थंड झाल्यावर किती खुटखुटित आहेत याचा अंदाज येईल.

हो, आधी कोरडा भाजलेला रवा परत फोडणीत परतायचा. या प्रकारात तेल असल्याने जसा कुठल्याही तेल असलेल्या पदार्थाला काही दिवसांनी खवट वास येतो तसेच यालाही येतोच. त्यामुळे फ्रीजमधे ठेवला तर चांगले.
तरीही २ महिन्यांपेक्षा जास्त नकोच.

पुन:श्च धन्यवाद...2 महिन्यांसाठी नकोय मला, काही आठवडे टिकला तरी बास.

स्वीट बॉम्ब <<< Lol आता फोटो नक्की दे इथेच. मलाच खायची इच्छा होत आहे. Uhoh नाहीतर रेसिपीच टाक. लेफ्ट ओव्हर मधून वड्या.

वड्या पडल्या, त्यामूळे बॉम्ब नाही झाले. Lol पण त्या वड्या जरा चिवट झाल्यात. बहूतेक मिल्कमेड जास्त वापरलं गेलं. रंग पण पेढ्याचा आलाय. चवीला मात्र मस्त.

रंग पण पेढ्याचा आलाय. चवीला मात्र मस्त. <<< अस लिहायच नस्त. माझ्या तो.पा.सु. Happy
शैलु, लिंबूफूल म्हणजे सायट्रीक अ‍ॅसिड.

लिंबूफूल म्हणजे सायट्रिक अ‍ॅसिड. वाण्याकडे किंवा सुपरमार्केटमध्ये लहान पाकिट मिळू शकेल. फार महाग नसतं.

हरभर्‍याची डाळ भरपूर पडलीये. माझ्या रोजच्या स्वैपाकात काही फार वापरली जात नाही. कधी भाजी, आमटीमधे चमचा चमचा भिजवून घातली गेली तर तेवढीच.
ती संपवायचीये. काय काय करता येईल?

Pages