पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५० खूप होईल. कच्च्या रव्याच्या तिप्पट शिरा साधारण होतो (रवा फुलतो आणि समभाग साखर असते). मी ३० वाट्याचा केला असता. पण माझा अनुभव तसा तोकडा आहे.

बहुधा याच धाग्यावर हा प्रश्न सुमेधाव्ही यांनी विचारलेला आठवतो आहे. कृपया जरा मागची पानं चाळून पाहाता का? मला सापडलं तर मी इथे डकवतो

एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तेव्हा वाटीचे माप घेऊ नये.
वाट्या मोजण किचकटीच होत मोजण्यात चुका होतात.
किलो च माप सोइस्कर पडत.

अरे वा! मी दिलेली माहिती कोणाला तरी उपयोगात आली म्हणायची.
आता मलाही जरा मदत करा. गौरीसाठी कोणकोणत्या पदार्थ करतात? पंचामृताची रेसिपी सांगाल का कोणी? (हा प्रश्न अस्थानी असेल तर सांगा काढुन टाकते. घरी मोठ्या माणसांना विचारयचा ऑप्शन लिमिटेड आहे.)

पंचामृत म्हणजे पूजेचे पंचामृत असे गृहीत धरते. (कारल्याचे इ. पण पंचामृत करतात. पण ते कुणी सहसा विचारत नाही.) - दूध, दही, तूप, मध आणि साखर. प्रमाण माहित नाही, चवीला चांगल लागेपर्यंत मिक्स करते. आजवर देवाने फार काही वाईट केल नाही म्हणजे ही रेसिपी ठीकच असणार Wink
(साखरेऐवजी गोमूत्र पण काहीजण घालतात. त्यांनाही देव पावतोच)

गौरीला प्रत्येक घरी वेगळा बेत असतो- घावन घाटल किंवा ओल्या नारळाची करंजी किंवा पुरणपोळी इ. भाजीच्या बाबतीत पण गौरीचा ऐसपैस बेत असतो. त्यांना १६ भाज्या (किंवा सोळा भाज्यांची एक भाजी) वाढावी लागते.

सॉरी मला मिरच्यांचे पंचामृत विचारायचे होते.
पुरणाचीपोळी करतात गौरीला आमच्याकडे पण भाज्या आणि चटण्या, खिरी कोणकोणत्या त्याची माहिती हवी होती.

मिरची पंचामृत कधी केले नाही.

भाजी: उभ्या महालक्ष्म्या असतील तर सहसा १६ भाज्याची भाजी करतात. खड्याच्या गौरी असतील तर भाजीच्या बाबतीत फारसा नियम ऐकला नाही. फ्लावरचा रस्सा किंवा बटाट्याची भाजी खाल्ल्याच आठवत.
खिरी - गव्ह्ला (खड्याच्या गौरी) किंवा शेवयाची करतात. रवा, भात, कणिक यांची खीर सहसा कुणी गौरीसाठी केल्याच ऐकल नाही.
चटणीचा 'नियम' काही ऐकला नाही पण सहसा लसूण चटणी कुणी करीत नाही.

पेरु, ५ भाज्या, ५ कोशिंबीरी किंवा १६ भाज्या, १६ कोशिंबिरी असं करतात सहसा (गौरी उभ्याच्या आहेत असं धरून चालतेय)
कांदा, लसूण, मुळा सोडून सहसा कुठल्याही भाज्या चालतात. प्रसादाची खीर सहसा शेवयांची करतात. पुपो करताना पुरण थोडं वगळून नुसतं पुरणही प्रसादाच्या ताटात वेगळं वाढतात.
चटणी सहसा कोथिंबीर खोबर्‍याची ओली चटणी असते.
शॉर्टकट म्हणून पाच वेगळ्या करण्यापेक्षा एकत्र मिक्स कोशिंबीर कर. काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, पालक असं कॉम्बो करता येईल
पाच भाज्यांचीही मिक्स भाजी कर. वाटल्यास दही घालून वेगळं भोपळा, दुधी असं काहीतरी रायतं कर. पुपोबरोबर कटाची आमटी करशीलच.
पंचामृताची रेसिपी असेल इथे पूर्वी कुणीतरी टाकलेली. तेवढी शोधून घे.

झाला की मेन्यू - चटणी, पंचामृत, कोशिंबीर, भरीत, खीर, पुरण, पापड/कुर्डया (डावीबाजू) + आमटी, मिक्सभाजी (उजवी बाजू) + वरण भात, पुपो

वरदा, सिमान्तीनी, भरत धन्यवाद. गौरी उभ्याच्याच आहेत. भाज्यांबाबत आणि कोशिंबीरी बाबतच शंका होती. आता मिक्स भाजीच करेन. पाचच शक्य होतील मला. सोळा मिळणे कठीण आहेत.

भरत माझा प्रतिसाद आहे तिथला पण मागच्या वेळेस मी घरच्या पद्धतीने करुन पाहिले तर वेगळेच काहितरी झाले Proud म्हणुन विचारुन बघावं म्हणलं Happy

आमच्या घरची पद्धत -
१६ भाज्यांची मिळून १ भाजी साधी परतून केलेली. याचा पुडा मिळतो बाजारात.
ज्वारीची आंबील (वाढताना यात दूध + साखर घालून पातळसर करून वाढतात)
फुलोरा (करंजी, साटोरी, पापडी, तळणीचे मोदक, अनरसे, लाडू, सांजोरी, शंकरपाळे ई. असतं)
बाकी सगळा पुरणावरणाचा स्वयंपाक असतोच. पुरणाचे दिवे असतात.

आजकाल कोबी, फ्लॉवर, मटार, गाजर, घेवडा या भाज्या चिरलेले एकत्र पार्सल अनेक भाजीवाल्यांकडे मिळते. ''चायनीज'' म्हणतात त्याला. (चायनीज भाज्यांसाठी / पदार्थांसाठी मुख्यत्वे वापरले जात असणार, म्हणून!). तर या भाज्यांची आपल्या पद्धतीनेही फोडणीत परतून मस्त भाजी होते. किंवा भाज्या वाफवून त्यांचे रायतेही करता येते झटपट.

माझ्याकडे चितळे बंधू ब्रान्डचे गुलाबजाम मिक्सचे पाकीट शिल्लक आहे. गुलाबजाम करायचा जाम कंटाळा आहे (तळणी नको वाटतात). त्याचे अजून काही करता येईल का? गुलाबजाम मिक्स म्हणजे नक्की असते तरी काय हे कळल्यास कदाचित दुसर्या कुठल्या पाकृमध्ये खपवता येइल…

http://www.gitsfood.com/gulabjamun/

पाकिटाची मागची बाजू बघ. तिथे घटक दिले आहेत. स्कीम मिल्क पावडर आहे त्यामुळे सहज कुठल्याही पाककृतीत खपणार. पण रायझिंग एजंट्स पण आहेत. कणिकेत घालून गोडाची दशमी करू शकतेस.

चनस, धन्यवाद !
ती पाककृती छानच आहे पण मी कोरडा मसाला शोधते आहे म्हणजे आधी करून ठेवण्यासारखा .
पण एकदा ह्या रेसिपीने पण करून बघेन .

Pages