Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओक्के. आज कर्तेच मग. इद
ओक्के. आज कर्तेच मग. इद मुबारक!
इन्ना आज कर, पण पुढच्यावेळी
इन्ना आज कर, पण पुढच्यावेळी शी.खु. स्पेशल शेवया मिळाल्या तर त्या वापर मुद्दाम. स्वादात, चवीत, पोतात फरक जाणवेल बघ.
पर्शियन भाषेत शीर म्हणजे दूध आणि खुर्मा म्हणजे खजुर असं विकिबाबा सांगतात.
इन्ना, हे पहा >
इन्ना, हे पहा > http://www.sanjeevkapoor.com/recipe/Sheer-Kurma--KhaanaKhazana.html
माझी एक मैत्रीण डब्यात
माझी एक मैत्रीण डब्यात कांद्याचं लोणचं आणायची.
लोणचं म्हणजे तशी ती भाजी टाईपच असायची पण पीठ न पेरुन.
मला आता चव आणि कशी दिसायची (भाजी/ लोणचं) ते सोडल्यास काहीच आठवत नाहीये.
काय करु?
(मैत्रीणीचे नाव रुपाली सुरेश शिंदे. तीपण रेसेपीसारखी हरवली आहे. कुठेच सापडत नाहीये
)
आमच्या शीरखुम्यात शेवया फार
आमच्या शीरखुम्यात शेवया फार झाल्या. त्यामुळे ती आता शीरखुर्म्याऐवजी बामणी खीर झाली आहे. पण चव छान आहे.
शेवया अल्प घाला.
मुरमुर्याचे लाडू कसे करतात?
मुरमुर्याचे लाडू कसे करतात?
माझा शीरखुर्मा मस्त झालेला
माझा शीरखुर्मा मस्त झालेला काल्...गुलगुले पण्..ईद स्पेशल.
गुलगुले ... मीही ऐकले होते.
गुलगुले ... मीही ऐकले होते. कसे करतात ?
जागुने बोरे नावाची रेसिप दिलि
जागुने बोरे नावाची रेसिप दिलि होती. ते आणि गुलगुले एकच का ?
गुळ घ्यायचा मी आतपाव
गुळ घ्यायचा मी आतपाव घेतला,थोडा कुटुन भिजत घालायचा वेळ असेल तर नाहीतर किसुन घ्यायचा.मग गूळाच्या पाण्यात सूट घालायची,गव्हाचे पीट घालुन भज्याच्या पीटासारखे बनवुन छोटे छोटे गोळे टाकायचे तेलात तळायला.हाकानाका...
गुलगुले म्हणजे मैद्याची गोड
गुलगुले म्हणजे मैद्याची गोड भजी (हो न?)
गुळ घातलेली गव्हाच्या पिठाची
गुळ घातलेली गव्हाच्या पिठाची गोड भजी म्हणजे गुलगुले.
मैने बनाया मैने खाया और
मैने बनाया मैने खाया और गावभर्को खिलाया
शिर्खुर्मा
सढळ हातानी सुकामेवा अन जायफळ घातल . गाईच दुध होत म्हणून खसखस तांदळाची पिठी अन काजूची पूड घालून उकळल. ़ सुकामेवा त्यापेक्षा कमी शेवया , खजूर . सोप्पा आहे प्रकार ( मी जे ़ केल त्याला शिर्खुर्मा म्हटल तर )
गुळाचा पक्का पाक करायचा त्यात
गुळाचा पक्का पाक करायचा त्यात चुरमुरे, डाळ (ळ वर अनुस्वार आहे, दिसर नसला तरी) भाजलेले शेगदाणे घालायचे आणि गरम असतानाच हाताला तूप लावून लाडू वळायचे. यात गुळ हा फ़क़्त बाइन्डींग साठी हवाय, प्रमाणासाठी आईला फोन करायचा. गूळ आचरटी घातलात तर लाडवाच्या आधी दाताचे तुकडे पडतील.
त टी : अर्थात आई फोनवर 'तिळाच्या लाडवाला घेतो इतकंच घे' असल्या अगम्य भाषेत प्रमाण सांगण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे फोनचा काहीही उपयोग होत नाही. या प्रतिसादा इतकाच.
(No subject)
इथे भारी भारी बल्लवाचार्य
इथे भारी भारी बल्लवाचार्य /अन्नपुर्णा आहेत तर मला एक माहिती द्या पुण्यात कट्टू चे पीठ कुठे मिळेल?
<गूळाच्या पाण्यात सूट
<गूळाच्या पाण्यात सूट घालायची> व्हॉट इज सूट?
सूट म्हणजे सुंठ गुलगुल्यांचे
सूट म्हणजे सुंठ
गुलगुल्यांचे पिठ जरा जास्त वेळ भिजवतात त्याने जास्त चांगले होतात गुलगुले.
ओह!
ओह!
जास्त वेळ भिजवतात = थोडं
जास्त वेळ भिजवतात = थोडं आंबवतात. जिलबीसारखं.
आमच्या इथे आजकाल गुळाची पावडर
आमच्या इथे आजकाल गुळाची पावडर मिळते. म्हणजे मापासाठी खुपच सोपं झालय.
गुलगुले गुळामुळे तळताना वरून
गुलगुले गुळामुळे तळताना वरून पटकन लाल होतात, पण आतून तळले जात नाहीत. कच्चे राहतात.
मी केले होते, मला तो प्रकार आवडला नाही अजिचबात.
व्हॉट इज कट्टू??
गुलगुले गुळामुळे तळताना वरून
गुलगुले गुळामुळे तळताना वरून पटकन लाल होतात, पण आतून तळले जात नाहीत. कच्चे राहतात.
>>>
मंद गॅसवर तळायचे...गरम गरम खायचे.कच्चे नसतात्.जास्त मोटे नाय टाकायचे वड्याएवडे.छोटे छोटे गोटी असते ना तेवडेच टाकायचे ते फुलतात गुलाबजामएवडे.
कुट्टू असेल. या अश्या
कुट्टू असेल. या अश्या बातम्यांतूनच ऐकलाय.
प्रकाश घाटपांडे---कुट्टू
प्रकाश घाटपांडे---कुट्टू [मखाण्याचे पिठ] तुळशीबाग्/म्युनिसिपल कार-स्कूटर पार्किंग च्या जवळ असलेल्या मारवाड्यांच्या किराणा दुकानात व रविवार पेठ "विजय प्रोव्हीजन स्टोर्स " ला मिळेल.
शीर-खुरम्यात ड्राय फ्रुट्स
शीर-खुरम्यात ड्राय फ्रुट्स बरोबर किसलेले खोबरे [ओले किंवा सुके]ही घालतात. भोपाळच्या जुन्या बाजारात शेवया-ड्राय फ्रुट्स आणि मोठ्या भोकाच्या किसणीवर किसलेले खोबरे विकत मिळते..शेवया गोल्डन किंवा जास्त भाजलेल्या अशा वेगवेगळ्या मिळायच्या.मोठ-मोठे थाळ सजवलेले असतात.
चार वाट्या कोको पावडर उरली
चार वाट्या कोको पावडर उरली आहे..कशी संपवावी...केक आणि बिस्किट नको आहे.
केया, चॉकलेट मलई बर्फी करता
केया, चॉकलेट मलई बर्फी करता येईल. सायोच्या धाग्यावर पाकृ मिळेल.
कोको पावडर म्हणजे गोड पदार्थच करावा लागेल, आणि चार वाट्या म्हणजे खूप आहे. ती फ्रिजमध्ये नाही का राहणार?
राहील फ्रीज मधे पण कधीतरी
राहील फ्रीज मधे पण कधीतरी संपवावी लागेलच ना
चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट वड्या
चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट वड्या करायला वापरता येईल.
Pages