Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चॉकलेट वड्या कशा करायच्या?
चॉकलेट वड्या कशा करायच्या?
एक तर रोज दुधात घालून चॉकलेट
एक तर रोज दुधात घालून चॉकलेट मिल्कशेक पीता येईल. चॉकलेट मलई बर्फी आणि नॅचरल आईसक्रिम मायबोलीवर सापडेल. घरगुती चॉकलेट पण करता येईल. बाकी ब्राऊनी, फज वगैरे पाकृ सर्च केल्यास सापडतील.
घरगुती चॉकलेट व मलई बर्फी
घरगुती चॉकलेट व मलई बर्फी बघते...
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115705.html?1157550791
केया, इथे पाहा.
चॉकलेट मोदक
चॉकलेट मोदक
सुलेखा धन्यवाद. मी कुट्टू
सुलेखा धन्यवाद. मी कुट्टू शब्द पहिल्यांदा ऐकलाय. आमच्याकडे कट्टू म्हणायचे. उपवासाला कट्टूचे थालपीठ आई करायची. कट्टू व कुट्टू एकच आहेत का?
भरत मयेकर लिंक वाचून घाबरलो ना!
मला कोरडा अनि टेस्टी पदार्थ
मला कोरडा अनि टेस्टी पदार्थ सुचवा ना..
हापिस ६ ला सुटल्यानंतर क्लास ६.४५ सुरु होऊन ८.३० वाजता संपणार... मधे काहीतरी खाण मस्ट आहे. काय काय करुन ठेवु शकते..
पोहे चिवडा
खार्या शंकरपाळ्या
अजुन ??? ??? ???
लाडु, खाकरा+ चटणी, नुसते
लाडु, खाकरा+ चटणी, नुसते चुरमुरे घालुन मिक्स फरसाण. विकत चे चालत असेल तर पापडी, मठरी, मटकी पुर्या.
विकतचे नकोय रश्मीतै.... घरी
विकतचे नकोय रश्मीतै.... घरी बनवुन ठेवु शकेन आनि पुढ्च्या १५ दिवसांत संपवेन असे पदार्थ हवेत.
शॉर्टकट रेसिपि पन द्या नविन पदार्थाची.
अंकु... नाचणीच्या पिठाचे
अंकु... नाचणीच्या पिठाचे लाडू, दाण्याची चिक्की, गुळपापडी... शक्यतो गूळ, नाचणी असलेले पदार्थ. त्याने अभ्यासात लक्ष लागते, तहान लागणार नाही. शक्य असल्यास एखादे फळ.
तेलकट, खारे पदार्थ खाल्ले तर तहान लागेल.
अरे सॉरी अन्कु. मग दिनेशजीनी
अरे सॉरी अन्कु. मग दिनेशजीनी सुचवलेले पर्याय मस्त आणी पौष्टीक आहेत. थोडासा सुकामेवा पण एकत्र करुन डब्यात ठेऊन येता जाता खाऊ शकतेस. उदा. खारीक, बदाम, काजू, जर्दाळू, बेदाणे आणी अक्रोडचे तुकडे.
अंकु १) शेंगदाण्याचा लाडू /
अंकु
१) शेंगदाण्याचा लाडू / रवाबेसन लाडू / गुळपापडीचा लाडू / पोळीचा लाडू
२) सुकी भेळ / खाकरा भेळ / स्प्राऊट चाट
३) भोपळ्याचे घारगे, तिखटामिठाच्या पुर्या, ठेपले, केळपुर्या
४) लाह्यांचा चिवडा (मका/साळी/ज्वारी) किंवा नुसत्या तिखट-मीठ लावून साळीच्या/ज्वारीच्या लाह्या / पोहे.
५) उकडलेले / भाजलेले कणीस (भुट्टा) किंवा भुट्ट्याचे सॅलड, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, उकडलेले व मोड आलेले हिरवे मूग - तिखटमीठ लावून.
६) भाजक्या पोह्यांचा चिवडा / चुरमुर्यांचा चिवडा / पातळ पोह्यांचा चिवडा / भडंग / लेमन भेळ
७) चणे-फुटाणे, चिक्की, खजूर, राजगिरा-वडी, सुकामेवा (मनुका, सुके अंजीर, बदाम, अक्रोड, काजू, बेदाणे इत्यादी)
८) सीझनल फळ (वेलची केळी किंवा सोनकेळी मिळत असतील तर ती भुकेसाठी खूप छान!)
अरे व्वा..बरेच पर्याय आहेत
अरे व्वा..बरेच पर्याय आहेत की.. पाहते आता करुन. धन्यवाद
तरी ठेवते जवळ नेहमी. 
रश्मीतै तो छोटा सुकामेव्याचा डब्बा बस किंवा क्लास कुठेही उघडला की निम्मा वाटुन च संपतो.
अन्कु. असू दे. अरुन्धतीने पण
अन्कु.:फिदी: असू दे.
अरुन्धतीने पण खूप छान सुचवले आहे.:स्मित:
लेकीच्या शाळेत उद्या
लेकीच्या शाळेत उद्या स्वातंत्रदिनानिमित्त डब्यात तिरंगी सँडविच देण्यास सांगितले आहे. गुगलुन पाहिले पण त्यात मेयोनिज वैगरे प्रकार असल्याने जमणार नाही (खास त्यासाठी इतर वेळी वापारत नसलेले मेयो विकत घ्यावे लागेल]
तरी प्लीज सकाळी झटपट होणारी सोपी रेसीपी सांगा ना (लेकीचे वय वर्षे ४)
नारळ वापरून पांढरी चटणी,
नारळ वापरून पांढरी चटणी, टॉमॅटोची केशरी/लाल आणि कोथिंबीरीची हिरवी अशा तिन चटण्या वापरून तिनरंगी सँडवीच करता येईल.
निल्सन, भरपूर कोथिंबीर, लसूण,
निल्सन, भरपूर कोथिंबीर, लसूण, पुदिना आणि थोडासा पालक ब्लांच करून हिरवी चटणी करता येईल. लाल सुक्या मिरच्या भिजवून केशरी चटणी करता येईल. मधल्या भागावर चीजस्लाईस ठेवा.
खरं तर जॅम, मलई हे दोन केशरी
खरं तर जॅम, मलई हे दोन केशरी पांढर्या लेयर्ससाठी गोडात ऑप्शन्स आहेत. जर गोड हिरवा ऑप्शन मिळाला तर चार वर्षाच्या मुलांना आवडेल असं गोड तिरंगी सँडवीच बनवता येईल.
गोड हिरवा पर्याय म्हणजे
गोड हिरवा पर्याय म्हणजे मॅप्रोचं किवी क्रश
पावाच्या तुकड्याला वरती हिरवी
पावाच्या तुकड्याला वरती हिरवी चटणी (कोथिंबीरीची कमी तिखट) मध्ये प्लेन पाव ( पांढरा ) आणि खालच्या भागाला गाजर, खोबर याची चटणी लावून सँडविच तयार कारा. स्टफिंग करायचे ठेवू नका कारण चार वर्षाच्या मुलीला एखाद वेळेस नीट खाता येणार नाही ते. पांढर्या भागावर टोंमॅटोच एखाद चक्र लावू शकता.
गोड हिरवा पर्याय म्हणजे
गोड हिरवा पर्याय म्हणजे मॅप्रोचं किवी क्रश >> हे बघितलं नव्हतं कधी. छान ऑप्शन आहे गोडामध्ये.
अर्धा किलोपेक्षा जास्त
अर्धा किलोपेक्षा जास्त भिजवलेले हरभरे ओटी मधे मिळालेत.आज थोड्याची आमटी केली पण अजुन बरेच शिल्लक आहेत...फलाफल करता येतील का? अजुन काय पर्याय आहेत?
अल्पना, मंजुडी, मनिमोहर
अल्पना, मंजुडी, मनिमोहर धन्यवाद एव्हढ्या झटपट प्रतिसादासाठी. संध्याकाळी लेकीलाच विचारते की तिला कुठले सँडविच पाहिजे गोड की तिखट.
केया, हरभरे फ्रीजमध्ये सात-आठ
केया, हरभरे फ्रीजमध्ये सात-आठ दिवस तर आरामात टिकू शकतात. व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवायचे. ते घालून भात / भाजी / सलाड / उसळ / सुंदल असे प्रकार करता येतील.
तिरंगी सँडविचसाठी मोठा चीज
तिरंगी सँडविचसाठी मोठा चीज स्लाईस, केचप (किंवा लाल-केशरी असा भोपळ्याचा सॉस/ चटणी) व हिरवी चटणी असा पर्यायही वापरू शकता.
पांढर्यासाठी उकडलेलं अंड
पांढर्यासाठी उकडलेलं अंड (त्याचा फक्त पांढरा भाग) पण वापरता येइल
एका मैत्रिणीला गणेशोत्सवाच्या
एका मैत्रिणीला गणेशोत्सवाच्या एका स्पर्धेत १०० लोकांसाठी शिरा बनवायचाय तर किती रवा घ्यावा लागेल बरं?
एकेकाला किती शिरा द्यायचा
एकेकाला किती शिरा द्यायचा आहे?
साधारण पाऊण ते एक वाटी, हा
साधारण पाऊण ते एक वाटी, हा माझा अंदाज. मी विचारते तसे तिला.
५० वाटी रवा पुरेल.
५० वाटी रवा पुरेल.
Pages