निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
जागू दिनेशदा, मॉरीशिअसचे
जागू
दिनेशदा, मॉरीशिअसचे सगळेचफोटोज अजुन पाहिले नाहीत. सावकाश बघेन.
जिप्स्या, तूझी सिरीज यायच्या
जिप्स्या, तूझी सिरीज यायच्या आधी आटपून घेतोय. (मगकोण्ब्घणारैमाझ्याफोटोंक्डे )
सर्वच फोटो मस्त मस्त
सर्वच फोटो मस्त मस्त मस्त.
दिनेशदा बासरीची पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
दिनेशदा, माझ्या सिरीजला वेळ
दिनेशदा, माझ्या सिरीजला वेळ लागणार आहे.
त्याच्या आधी १-२ धागे येतीलच 
त्याची धून झंकारली रोमारोमात......
Coming Soooooon
या महिन्यात चांगले मुहुर्त
या महिन्यात चांगले मुहुर्त आहेत रे ! उदा. २४ ऑगस्ट !
माझी अजून २० पासून पाने
माझी अजून २० पासून पाने वाचायची आहेत. दररोज भर पडतेय. कधी पोहोचणार मी तुमच्यापर्यंत?
gypsy , dinesh ... hahaha..
gypsy , dinesh ... hahaha.. lage raho... aamhi snaps chi vaat paahatach asto tumhaa doghaankadun..
ठिक आहे, मग मला अबु धाबी, अल
ठिक आहे, मग मला अबु धाबी, अल ऐन चे फोटो पण टाकायचे आहेत !
या महिन्यात चांगले मुहुर्त
या महिन्यात चांगले मुहुर्त आहेत रे ! उदा. २४ ऑगस्ट !>>>>दिनेशदा
दोन चार दिवस इथे लिहु शकले
दोन चार दिवस इथे लिहु शकले नाही पण हा धागा वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही.
सुप्रभात
सुप्रभात
या महिन्यात चांगले मुहुर्त
या महिन्यात चांगले मुहुर्त आहेत रे ! उदा. २४ ऑगस्ट >>> काय कोड लॅन्स्वेज मधे बोलताय तुम्ही दोघे
आशुतोष, जागू, उजू मस्त फोटो.
त्याची धून झंकारली रोमारोमात......
Coming Soooooon डोळा मारा>>> कान्हा का तो? वाट पहातोय फोटोंची त्याला म्हणाव मग. येऊ दे.
दिनेशदा, मॉरीशिअसचे सगळेच फोटोज मस्त. छान चालु आहे सिरिज.
उजू... घरचे फूल का ? मस्त
उजू... घरचे फूल का ? मस्त आहे.. सुगंध पण छानच असणार.
मोनालि, या महिन्यात साधना, जागू आणि जिप्सी.... वाढणार आहेत !
त्याची धून झंकारली
त्याची धून झंकारली रोमारोमात...... ==== लवकर मुहुर्त मिळुदे.
उजु, गुलाब छान आहे.
हा धागा वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही.==+१००
मोनालि, या महिन्यात साधना,
मोनालि, या महिन्यात साधना, जागू आणि जिप्सी.... वाढणार आहेत !>>> अरे देवा आता कोणालातरी फोन विचारुन डिकोड करावे लागणार बहुदा हे.
मोनाली, माझ्या बाबतीत
मोनाली, माझ्या बाबतीत म्हणशील तर मी म्हातारी होईन अजुन एका वर्षाने.
आणि जागुच्या बाबतीत म्हणशील तर जागुची राधुटली एका वर्षाने मोठ्ठी होणार आहे.
जिप्स्याचे काय माहित नाही. तो सध्या कुंपणावर आहे...
त्याची धून झंकारली
त्याची धून झंकारली रोमारोमात......
Coming Soooooon >>> कान्हा का तो? वाट पहातोय फोटोंची त्याला म्हणाव मग. येऊ दे.
मोनाली दे टाळी.. मी ही हाच विचार करत होते...
जिप्स्याची वाढ थांबलीय का,
जिप्स्याची वाढ थांबलीय का, साधना ? मला डौट येतच होता.
दिनेश. .. मनाने तो बालकच
दिनेश.
.. मनाने तो बालकच आहे हो अजुन... अगदी तसाच निरागस.. पर अबका सावन अलग है...
अंगाने पण नाही वाढला
अंगाने पण नाही वाढला !
००००००
आमच्याकडे या दिवसात वेगळेच हवामान असते. आकाश दिवसभर ढगाळ पण पाऊस नाही. सूर्यही नाही.
सकाळी गोठवणारी थंडी... आंब्यांना मोहोर आलाय. १५ नोव्हेंबर नंतर आंबे पिकायला लागतात. मग २/३ महिने सगळीकडे आंबेच दिसतात. त्याचवेळी उन्हाळा असतो.
ह्म्म.. किती वेगळे हवामान
ह्म्म.. किती वेगळे हवामान आहे तिथे.
आफ्रिका पण तसे ट्रॉपिकल आहे, पण तरीही हवेत फरक आहेच.
नाही गं, ट्रॉपिकल नाही. तीन
नाही गं, ट्रॉपिकल नाही. तीन टोकाला तीन वाळवंटे, काँगो मधले घनदाट जंगल, समुद्रकिनार्यावरचे वेगवेगळे प्रवाह. हरारे, अदीस, नैरोबी, जोहान्सबर्ग सारखी थंड हवेची ठिकाणे... सगळे अदभूत आहे.
ऐशू बरोबर काही मालिका बघ ( रिफ्ट व्हॅली, किलिमांजारो, सहारा.. ) त्या हार्ड ड्राईव्ह मधल्या... फार वेगळेच आहे सर्व इथे.
इतकी वर्षे राहतोय इथे.. पण अजून बरेच अनुभवायचे आहे असे जाणवतेय.
ओके. बघते
ओके.
बघते
गुलाब तो बस.... क्या
गुलाब तो बस.... क्या केहेने.....!!!
मस्त गुलाब उजू, सुगंध दरवळला
मस्त गुलाब उजू, सुगंध दरवळला इथपर्यंत.
हे लाइटिंग पावसाळ्यातच...!
हे लाइटिंग पावसाळ्यातच...!

सध्या इकडे यायलाच होत नाहीये,
सध्या इकडे यायलाच होत नाहीये, त्यामुळे खुप चीडचीड पण होते आहे...
सगळ्यांचे फोटो, माहिती मस्त..
हे २४ . ८ चे काय गुढ आहे?
जागु, जिप्सी बरेच दिवसानी आलात...
नलिनी ते कांदयाचे फुल मागे माझ्या कडे पण लागले होते आणि त्यात कलॉन्जी पण होत्या..
अ आ.. मस्त आहे लाईटींग, आणि उपमा पण
आशुतोष सगळेच फोटो छान..
सायली, माझी आजी (आईची आई)
सायली, माझी आजी (आईची आई) दरवर्षी कांद्याचं बी तयार करत असे. ह्यासाठी ती चांगले मोठमोठाले कांदे निवडून घ्यायची. कांदा अर्धा आडवा कापतात. मुळाकडचा जो अर्धा भाग आहे तो लावतात. ह्यातून बाहेर येणारी पात ही मेहमीच्या पातीपेक्षा मोठी आणि जाड असते. त्यात मग पुढे असे तुरे येतात. ह्यात बी तयार होते.
मी जुन्या माबो वर मिरचीची लागवड तसेच मेथी, कोथींबीरीबद्दल लिहिले होते. शोधायला हवे एकदा.
नलिनी , छान. हे माझ्यासाठी
नलिनी , छान. हे माझ्यासाठी नवीन आहे ग.
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, साधना!!!!
Pages