निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, सोनचाफा सुंदर.

सोनचाफा माझाही खूप आवडता. त्याचा रंग, रूप, सुवास सगळच.
पूर्वी जेंव्हा चाफ्याची कलम सर्रास मिळत नव्हती तेंव्हा ही फुल काढण तस कठीणच असायच. कारण झाड पूर्ण वाढल्या शिवाय ( भरपूर उंच झाल्याशिवाय फुलायला लागायच नाही ) त्याच्या या दुर्मिळतेमुळे ही त्याच्याबद्दल जास्त ओढ वाटत आलीय.

पण आता कलमामुळे एवढ्याशा रोपाला ही फुले येतात आणि त्याचा आस्वाद अगदी जवळून घेता येतो.
तुझ रोप ही छान बहरु दे आणि अम्हाला असेच फोटो तरी पहायला मिळु देत.

दिनेश, हल्ली सर्वत्र अशीच कलमे मिळतात. लगेचच फुले येणारे कलम २००-३०० रुपयांपर्यंत मिळते. त्याच्या खाली म्हणजे ८०-१०० रुपयांपर्यंतच्या रोपाला चाफे यायला एक वर्ष लागते. पण तरी झाड होण्याची वाट पाहावी लागत नाही. माझ्याकडच्या आधीच्या चाफ्यालाही लगेच फुले आलेली. आताहीएक चाफा आहे, त्याला अजुन फुले आली नाहीत.

तुम्हाला सांगायचे राहिले, ती दादरची पुलाखालची नर्सरी आता संपली, तिचा पसारा पाय-यांवर होता. त्या पाय-यांवर पालिकेने कुंपण घालुन तो पसारा काढुन टाकला. आता खालच्या चिंचोळ्या जागेत १०-१५ रोपटी घेऊन बसतो बिचारा. गेल्या महिन्यात मी मदनबाण शोधत गेले तिथे तर मलाच हा बाण लागला. मग उतारा म्हणुन श्रीकृष्णचा वडा खाल्ला आणि परतले Happy

ती नर्सरी.. माझ्या डोळ्यादेखतच वाढली होती. शिवाजी मंदीरच्या समोरही झाडे विकणारे एक दुकान होते. आयडीयलच्या समोरही वसईवाले गुलाबाची कलमे विकत... आता सगळे नर्सरीवाले कालिनाला गेलेले दिसताहेत.

०००

त्या वरच्या लिंकवरच्या क्लीपमधे झाडांचा मेंदू, मूळात असावा असा कयास व्यक्त केलाय. ( अर्थात तो सर्वमान्य नाही, हेदेखील सांगितलेय ) गीतेमधल्या जमिनीत डोके आणि वरती पाय असा काहीश्या श्लोकासारखे आहे ते.

मेघ, कामिनी, अन्जु, हेमाताई.... धन्यवाद..

हल्ली सर्वत्र अशीच कलमे मिळतात. लगेचच फुले येणारे कलम २००-३०० रुपयांपर्यंत मिळते. त्याच्या खाली म्हणजे ८०-१०० रुपयांपर्यंतच्या रोपाला चाफे यायला एक वर्ष लागते. पण तरी झाड होण्याची वाट पाहावी लागत नाही. ++++ साधना अगदी बरोबर माहिती सांगीतलीस, किंमत्ती सुद्धा...
आत्ता माझ्या कडे एकुण सोन चाफ्याची ३ झाडे आहेत, एकाचे रंग रुप काहीच माहिती नाहीये, एक वर्ष झालय आणुन, एक आहे त्याला तीन फुलं येऊन गेलीत, पण तो अर्धवट उमलेला आणि फिकट केशरी/ श्रीखंडी, सुगंध मात्र असाच आणि आता हा ज्याचे आज फोटा टाकलेत...

अरे हो मागे हिरवा चाफा आणला पण तो जगला नाही, आता परत आणला आहे... Happy या वे़ळी जास्त काळजी घईन....

कॉम्प्युटर अ‍ॅक्सेस नसावा बहुतेक. फेबुवर फोटो टाकणे सर्वात सोप्पे आणि माबोवर टाकणे सर्वात कठिण.

आणि जागु काय सामान्य बाई नाहीय आपल्यासारखी. तिच्या गावी साक्षात पंतप्रधान येऊन गेले आणि जागुताईंचे दर्शनही घेऊन गेले. तसे जागुकडुन स्वतःला ओवाळून घ्यायची सुवर्णसंधीही त्यांच्याकडे चालत आलेली पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते ओवाळणेच रद्द झाल्याने ते थोडेसे हिरमुसले. बाकी जागुने ओवाळले असते तर मधल्यामध्ये वेळ काढुन एकदोन माशांच्या रेस्प्या त्यांनी नक्कीच विचारल्या असत्या तिला.

दिनेशदा मी तेच पहात होते कोणी काढतय का आठवण Lol

माझा ऑफिसचा पि.सी. बंद पडलाय. १ आठवडा लागेल म्हणतात पुर्ववत व्हायला. मोबाईलवरून फेसबुकवर फोटो टाकता येतात म्हणून तिथे टाकते. पण इथे मराठी पण टाइप करायला प्रॉब्लेम आणि फोटो ही नाही टाकता येत. शिवाय मागचे ३-४ दिवस फारच बिझी होते. घरी ही लॅपटॉप उघडेन म्हणते पण वेळच नाही मिळत. आज बॉसिण दुपारी येणार आहे म्हणून तिच्या पिसिवरून आलेय.

आज आमच्या मागच्या आवारात पाणी साथत तिथे फ्लेमिंगो सारखा उंच पाय आणि मोठी चोच (प्लेमिंगा नाही पण) बगळ्यासारखा पाठी काळपट रंग असणारा पक्षी पाणथळ जागी आला होता. उद्या किंवा रात्री फोटो टाकेन.

जागू, फोटो टाक.. शशांक ओळखणारच !

मी दुबईच्या कारंज्याच्या व्हीडीओ क्लीप्स आज यू ट्यूबवर टाकल्या आहेत.

सुंदर फुले सायली.

आपल्याकडे यावर्षी टिपीकल श्रावणाचे वातावरण आहे कि नाही.. क्षणात येई सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे.... वगैरे ?

आपल्याकडे यावर्षी टिपीकल श्रावणाचे वातावरण आहे कि नाही.. क्षणात येई सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे.... वगैरे ? ==== पाऊस नाही ऊनही पडत नाही असे वातावरण सध्या आहे.

सायली, फुले नीट दिसत नाहीत पण अमृतवेल असे नाव असणारी एक वेल बघितल्याची आठवतेय. तिची फुले साधारण अशी असत, पण पाने बहुतेक वेगळी होती.
( ही वेल राणीच्या बागेत होती आणि मंत्रालयासमोरच्या बागेतही होती... अजून असावी )

आन्जु धन्यवाद.
घराजवळ एका नर्सरीच्या कंपाउन्ड वर हा वेल पसरला अहे..
जमलतर परत फोटो टाकते उद्या..गुगलवर अम्रुतवेल दिसत नाहीये...

शशांक, मस्त आहेत फोटो.
पेंग्विन ?? खुप काळजी घ्यावी लागेल त्यांची.

आजच्या सकाळमध्ये बातमी आहे की राणीच्या बागेत पेंग्विन येणार आहे.

वाईट बातमी. ते जिथे आहेत तिथे सुखात असावेत. निसर्गातल्या जिवांना मुंबईतल्या उकाड्यात आणायचे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे मला अघोरी वाटते. आपल्या इथे माणसांच्या जीवाला किंमत नाहीये, तिथे प्राण्यांना कोण भाव देणारे? राणीबागेत सध्या "सुखात" नांदत असलेले हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत शिल्लक राहिलेले प्राणी पाहिले की वाटते राणीबागेत येणे नको आणि त्यांचे हाल बघणे नको.

माणसालाही कोणीतरी आयुष्यभर दोन फुटी पिंज-यात बंद करुन प्राणीसंग्रहालयात ठेवायला हवे म्हणजे कळेल काय जिणे असते ते. Angry

सायली,फारच सुरेख फुलं आहेत तुझ्या घरी.. वॉव्..छानैत टप्पोरी
साधना, सही बोली...
जागुले तुझी आठवण प्रत्येक जण काढत असतं इकडे.. एक दिवस दिसली नाहीस इकडे कि मनातल्यामनात सही, पण वंडर करत असतो बरं.. Happy

तेच मी म्हणत होतो... सुरवात तर करतील पण त्यांना जे तपमान लागते ते कायम ठेवणे जमणार नाही, शिवाय त्यांना जे मासे लागतात तेही आणणे जमणार नाही.

न्यू झीलंडला ते ज्या तपमानात राहतात त्या तपमानाचे पाणी बाहेर ठेवलेले आहे त्यात आपण काही सेकंदही हात ठेवू शकत नाही. तसेच ते ज्या वादळी वार्‍यात राहतात त्याचाही अनुभव आपल्याला घेता येतो तिथे. हे अनुभव घेतल्यानंतरच त्यांना बघता येते.

न्यू झीलंडला ते ज्या तपमानात राहतात त्या तपमानाचे पाणी बाहेर ठेवलेले आहे त्यात आपण काही सेकंदही हात ठेवू शकत नाही. तसेच ते ज्या वादळी वार्‍यात राहतात त्याचाही अनुभव आपल्याला घेता येतो तिथे. हे अनुभव घेतल्यानंतरच त्यांना बघता येते.

हे आपल्याकडे सध्यातरी शक्यच नाही. त्यामुळे उगीच बिचा-यांचे हाल करायलाअ कशाला आणताहेत देव जाणे

लहानपणापासून बघतोय बाग ती.. केवळ झाडेच तग धरून राहिलीत. प्राणी तर एकेक करून दिसेनासे झाले.
आता जिथे मगरी आहेत तिथे बोटिंगची सोय होती. हत्तीवरून फेरफटका मारायची सोय होती, ओपन एअर थिएटर होते.. काहिही राखता आलेले नाही.

Pages