निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना त्या पुतळ्यांबद्दल थोडेसे म्हणजे ते आडवे जमिनीतच कोरले. तो दगड सच्छिद्र असल्याने हलका होता. मग ते उभे केले... असे काहिसे.

कधी काळी तिथे एका खास प्रकारची झाडे वाढायची. त्या झाडाच्या खोडातून कोरलेली एक मूर्ती अटेंबरो साहेबांना मिळाली. त्यांनी जगभरातील अनेक संग्रहालये शोधून त्या मागचे रहस्य शोधून काढले.

त्यांच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर, बीबीसी ने एक सिडी काढली होती.. त्यात त्या मूर्तीबद्दल माहितीपट आहे. मला खात्री नाही पण पुतळ्यांबद्दलही त्याच सिडीत आहे. भारतात मिळेल तूला ती.

काल यु ट्युबवर एक डॉक्युमेंटरी पाहिली..." In the mind of Plants"

यात एका भागात झाडांना मेमरी असते का हे पाहण्यासाठी जर्मनीतले डॉक्टर प्रयोग करतात..

दोन लहान आकाराची रोपटी कुंडीसकट घेऊन ती सरळ न ठेवता आडवी ठेवतात. १/२ तासाने दोन्ही कुंड्या ४ डिगरी तापमानाला फ्रीजमध्ये ठेवतात. काही दिवसांनी दोन्ही कुंड्या परत बाहेर त्याच जागी ठेवतात (२२ डिगरी तापमान) या वेळेला कुंड्या आडव्या न ठेवता सरळ ठेवतात.

पण दोन्ही रोपटी सरळ न वाढता आडवीच वाढतात.

जो_एस, टरबूज मस्त. घरचं आहे ऐकायलच किती मस्त वाटत.
वर्षु, आतुन हिरव्या असलेल्या टरबुजाची मी पन फॅन आहे. इकडे मिळत ते. फळवाल्याला विचारायच , तो सांगतो बरोबर.
शशांक साधना, माहितीपूर्ण चर्चा. वाचायला मजा आली.

काल एकडे यायलाच झाल नाही..
जो, खरबुज छानच... आणि ते पण कुंडीतले, खुपच रसाळ दिसते आहे...
याचा शेक कोणा कोणा ला आवडतो? Happy
नलिनी, दिनेश दा, घायपात बद्द्ल छान माहिती...
अआ, मला वाटले तो कुल्फी वाटतोय..:)

दिनेशदादा, हा वाघ कोणत्यातरी विचारात नक्कीच होता त्यादिवशी. इतर सगळे वाघोबा आपापले जेवण घेवून गेले पण हि स्वारी काही केल्या जेवायला आली नाही त्यावेळी.

नमस्कार ... एक मदत पाहिजे होती ... मुलाच्या शाळेचा प्रोजेक्ट आहे ... त्यात त्याना seasonal plants ची (जुलै ऑगस्ट मध्ये किंवा समर मध्ये) येणार्या झाडांची नावे आणी त्या झाडांचे maximum age किती असु शकते ह्याची लिस्ट बनवय्ची होती .... निदान ४-५ तरी .

पेरु, जांभूळ, आंबा, लिंबु, खजूर, अशी नावे लिहीली ... बरोबर आहे का?

त्यांचे maximum age काय असते ? प्लीज सांगा निसर्ग तज्ञ लोकहो... ...
(. मुलगा निवांत आहे मलाच tension... :(... )

प्राची, माझ्या आजेसासुबाईंनी ५० वर्षापुर्वी लावलेल्या हापुसच्या कलमांना अजुनही आंबे येतात. आंब्याचे झाड बरेच वर्षे टिकते.

अंजू ५० काय ? आमच्याकडे १०० /१०० वर्षांची जुनी झाडं आहेत.
अजूनही चांगली फळे देतात. विस्ताराने आणि उंचीने आता एवढी झाली आहेत की झाडावर चढण्यासाठी शिडी लावावी लागते.

प्राची नाहीतर गुगलून बघ माहीती मिळते का? आमच्या गावात पण बर्‍याच जणांची जुनी झाडे आहेत पण भाऊबंद्कीमुळे आमच्या वाट्याला नाही आलं काही त्यामुळे आजेसासुबाईंनी नवीन झाडे लावली. असं आहे काहीतरी.

प्राची मी आत्ता गुगलले अल्फान्सो मँगो एज असं तर प्रॉडक्टिव्ह एज एके ठिकाणी ४५-५० वर्षे असं लिहीलंय पण प्रत्यक्षात जास्त आहे ना, हेमाताईंनी वरती लिहीले आहेच ना.

तेच ग ...productive age आणि maximum age मध्ये किती फरक असतो माहित नाही ... सगळ्या झाडांचे वेग्वेगळे असु शकते ना...

नारळीपौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!

gulab1.jpg

हा गुलाब दरवर्षी बाकीच्या इतर गुलाबांनी फळे धरल्यावर फुलतो.

नले, नैरोबीमधे असेच गुलाब फुलतात पण रंग लालभडक असतो.
प्राची.. लिंबाला वर्षभर फळे लागत असतात. खजूर आपल्याकडे माहित नाही पण गल्फमधे कडक उन्हाळ्यात म्हणजे मे ते जुलै मधे पिकतो. गेल्याच महिन्यात अबुधाबीतल्या खजूराच्या बागेत फिरून आलो.

पण दिनेश दा Sad
...मग मला जुलै ऑगस्ट मधले फळे ... आणी त्यांच्या झाडांचे maximum age सांगता का...

३-४ झाडे पण चालतील... मला झाडांची नावे मिळतील कदाचित पण त्यान्चे age नाही....

म्हणून एथे प्रश्न टाकला

Pages