निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

या फुलांना तुतारी असे छान नाव
या फुलांना तुतारी असे छान नाव आहे. यात डबल प्रकारही असतो. धोत्र्यासारखेच दिसते हे फुल म्हणून केनयात शंकराला वाहतात.
अन्जू, मुंबईत बकुळीचे झाड छान वाढते पण फार कमी आहेत. फोर्ट मधे हायकोर्टाजवळही एक फुलणारे झाड आहे.
खुप पुर्वी, तूमचे डोंबिवली मोरांसाठी पण ओळखले जात असे !
हो दिनेशदा मी लहान असतांना
हो दिनेशदा मी लहान असतांना रामनगर परीसरात एक मोर होताच, बाबा नेहेमी न्यायचे बघायला, मस्त पिसारा फुलवुन नाचायचा.
(No subject)
सायली आमेन. माझ्या जवळच्या
सायली आमेन.
माझ्या जवळच्या परिसरात दोन बकुळीची झाडे आहेत पण खुप मोठी नाहीयेत.
अच्छा, तुतारी म्हणतात
अच्छा, तुतारी म्हणतात होय.
काय पण लोकं गायबच होतात,नुसते स्माईलीज ? जन्माष्टमीची दही हंडी फोडायला गेले होते वाटत!
अन्जु लकी आहेस तु. दोन दोन झाडं.. जागु नी खुप सुंदर लेख टाकला होता बकुळी वर
सायली, सध्या चिक्कार बिझी
सायली, सध्या चिक्कार बिझी आहे.
पण थोडा वेळ डोकावून जातो.;-)
जन्माष्टमीची दही हंडी फोडायला गेले होते वाटत!>>>>>>इथे प्रोजेक्ट्सची हंडीवर हंडी लागलीय, तीच फोडण्यात अख्खा दिवस जातोय.
हो सायली पण अगदी जवळ नाहीयेत,
हो सायली पण अगदी जवळ नाहीयेत, मेन रोडवर आहेत.
जिप्सी चेष्टा केली हो..
जिप्सी चेष्टा केली हो.. डोकावल्या शिवाय कोणी राहुच शकत नाही...

क्ट्सची हंडीवर हंडी लागलीय, तीच फोडण्यात अख्खा दिवस जातोय. अरेरे +++
पण शशांकजी, सरिवा, हेमाताई,जागु,साधना,नलिनी,कामिनी कोणीच येत नाहीये, गेलेत कुठे सगळे?
जिप्सि मस्त शब्दप्रयोग
जिप्सि मस्त शब्दप्रयोग प्रोजेक्टची हंडी.
मी आले. माझ्या माहेरी शेतात
मी आले.
माझ्या माहेरी शेतात येतात मोर.
येस्स! व्वा नलिनी काय सही ना!
येस्स! व्वा नलिनी काय सही ना! शेतात मोर म्हणजे...:)
सायली, खर आहे ग. धागा संथ
सायली, खर आहे ग. धागा संथ झाल्यासारखा वाटतोय.
मी पण वाचते सर्व पण जास्त लिहायला वेळ होत नाहीये ग.
तु एवढी आठवण काढलीस खूप छान वाटलं
मला आजही मोर पाहिला की खूप
मला आजही मोर पाहिला की खूप आनंद होतो. पण माझ्या लेकाला अन भाच्यांना त्याचे काहीच वाटत नाही.
नलिनी, मला पण अजूनही मोर बघून
नलिनी, मला पण अजूनही मोर बघून हरखून जायला होते. शेताचे नुकसान करतो म्हणून शेतकर्यांना आवडत नसेल का ?
मी आताच मॉरिशियसमधल्या सप्तरंगी मातीचे फोटो टाकलेत.
सध्या तरी जरा वाचनमात्रच आहे
सध्या तरी जरा वाचनमात्रच आहे मी - वेळ मिळाला की काही लिहिन. आणि प्रेक्षणीय आणि वाचनीय असे बरेच काही येत असतेच की इथे (जसे तुतारीची फुले ....
)
पहा बरं एका हाकेवर आलेत
पहा बरं एका हाकेवर आलेत सगळे...:)
नलिनी खरच मोर चीजच स्वर्गीय आहे!
दिनेश दा, बघते थांबा..
सायली, निळ्या मुंगीने फसवले
सायली, निळ्या मुंगीने फसवले बरं का !
खरच फसले दा!
खरच फसले दा!
माझ्या कुंडीतल्या टॉमेटोला २
माझ्या कुंडीतल्या टॉमेटोला २ आवळ्याएवढे टॉमेटो आलेत.त्यातला १ पिकत आहे. किसान केचपच्या बॉटलवर असतो,तसा गोल गरगरीत्,देखण्या टॉमेटोचे बी सांभाळले होते.अजिबात आंबट नव्हता.एक पिकत आहे त्याला नाही काढणार.
देवकी फोटो?
देवकी फोटो?
बरीच माहिती व फोटो आलेत की
बरीच माहिती व फोटो आलेत की वर. मस्त मस्त
बर सर्वांनी हे पहा बरे - http://www.amazon.in/s/ref=sr_pg_2?rh=n%3A976416031%2Cn%3A%211499767031%...
अॅमेझॉन वर डोक्युमेंटरी फिल्म ५०% डिस्काऊंट मधे आहेत. कोणाला काही हवे असेल तर लगेच चेक करा.
सुप्रभात.... आज सोनीयाचा
सुप्रभात....
आज सोनीयाचा दिन....:)
आज ऑफीस मधे यायची ईच्छाच होत नव्हती....
पहिलं फुल उमलल, सगळ्या घरात दरवळ......
ही आज उमलेली घरची फुलं

सायली मस्तच गं.. किती सुंदर
सायली मस्तच गं.. किती सुंदर फुल आणि फोटोही
धन्यवाद साधना ..
धन्यवाद साधना :)..
वाॅव! काय सुंदर फुल! तुझा
वाॅव! काय सुंदर फुल! तुझा आनंद थेट पोचला...
सायली, सुंदरच फुल आहे ! मला
सायली, सुंदरच फुल आहे !
मला वाटतं हे कलम असावे. सोनचाफ्याला, झाड मोठे झाल्यावरच फुले आलेली बघितलीत आजवर.
धन्यवाद, मंजु ताई, दिनेश
धन्यवाद, मंजु ताई, दिनेश दा...
हो दा, नर्सरी वाला म्हणाल होता बडींगचा आहे, कुंडीत पण फुलं येतील...बघुया,
आणला तेव्हाच १०,१२ कळ्या होत्या आता बघु परत नव्यानी कळ्या येतात का?
सोनचाफ्याला पाहुन म न
सोनचाफ्याला पाहुन म न सुगन्धित झाले. फार् च सुन्देर
मी पण वाचते सर्व पण जास्त
मी पण वाचते सर्व पण जास्त लिहायला वेळ होत नाहीये ग.
तु एवढी आठवण काढलीस खूप छान वाटलं. ==१००
तुला लिहिणारच होते की सोनचाफ्याला फुले आली की फोटो दे.
मी आताच मॉरिशियसमधल्या सप्तरंगी मातीचे फोटो टाकलेत.=== याची मी वाट पहात होते.
खुप श्रीमंत झाल्या सारख वाटत
खुप श्रीमंत झाल्या सारख वाटत आहे. फार्च सुन्देर वाक्य सायालि
Pages