निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

वा जिप्सी, क्या बात है.

साधना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅप्पी बड्डे साधना.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

साधना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिप्सी, दोन्ही फोटो खासच.
सर्वांना, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोपीसंगे श्याम दंगला
यमुनेचाही ओघ थांबला
होऊनिया धुंद बासरी रवाने
कौतुक पाही वसुंधरा सारी
रंगला रे हरी यमुना किनारी....

१८ ऑगस्ट Happy

इथे उल्लेख झालेली द माइंड ऑफ प्लांट्स फिल्म काल बघितली..
त्यातला सुरवातीचाच किस्सा !

काही वर्षांपुर्वी दक्षिण आफ्रिकेत दुष्काळ पडला होता. तिथल्या गेम पार्कमधली बाभळीची झाडे तग धरून होती.
त्यांना पालवी पण येत होती. त्यावर एक खास प्रकारची हरणे तग राखून होती. पण अचानक ती हरणे गूढ रित्या
मरू लागली. मेल्यावरही त्यांचे शव चांगले दिसत होते. त्यांच्यावर इतर प्राण्यांनी हल्ला केल्याच्या खुणा नव्हत्या कि त्यांना विषबाधा झालेली नव्हती. उपासमारही नव्हती. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूचे कारण शोधता, वेगळीच बाब लक्षात आली.

त्या बाभळीच्या झाडांनी आपापसात संगनमत करून त्या हरीणांचे बळी घेतले होते.. कसे ते या क्लीपमधे जरूर बघा. याच क्लीपमधे थायलंडमधले नाचणारे झाडही दाखवलेय.. हे फक्त लाईव्ह म्यूझिकवरच नाचते, इलेक्ट्रॉनिक संगीत त्याला आवडत नाही.

( हरणाच्या पोस्ट मार्टेमचा एक शॉट सोडला तर अगदी लहान मूलांनाही ही फिल्म दाखवण्यासारखी आहे. )

सुप्रभात...
साधना वा.दि. हा. शु. ( जरा उशीराच देतेय)
इतक्यात इकडे यायलाच झालं नाही..
जिप्सी सुरेख फोटो आणि त्याला साजेशा ओळी... Happy
दिनेश दा काय भन्नाट आहे ती डोक्युमेंट्री फिल्म.. विश्वासच बसत नाही...
नलिनी, कलौंजी साठी अशाप्रकारे कांदा लावतात नाही! धन्यवाद..

Plants Behaving Badly - Sex and Lies - NEW Plants Documentary 2014

वेगवेगळ्या ऑर्किड्स वरची हि फिल्म पण बघा . अत्यंत दुर्मिळ अशी फुले आहेत यात.
फुले इतकी खोटारडी आणि लब्बाड असू शकतात, यावर विश्वासच बसत नाही.

ऑर्किड आणि बुरशी यांचे अनोखे मैत्र पण बघाच.

https://www.youtube.com/watch?v=UTXfksTNbf4

दिनेश दा,यु ट्युब मधे गडबड आहे... रात्री नक्की बघते.

हे काल अजुन एक सोनचाफ्याच झाड आणलं, नर्सरीत गेले होते, लाल क्रुष्ण कमळ आणायला,
तेव्हा हे कळ्यांनी भरलेले झाड दिसले, मोहच आवरला नाही....
sch.jpgsch1.jpgsch3.jpg

आणि हे लाल क्रुष्ण कमळ...

kk red.jpg

हे दोन्ही छान बहरले पाहिजे आता.. Happy

सायली, सोनचाफ्याला काही वर्षांनी मोठी जागा लागणार ! लाल कृष्णकमळ लवकर फुलु दे.. आम्हाला बघायचे आहे.

अच्छा दा, तशी मी खुप मोठी कुंडी घेतली आहे, चांगली एक पोतं माती मावेल एवढी.. फोटोत ती लहान दिसते आहे..
दोघांचे पण फुलं लागलीतफोटो टाकीलच..

एखाद्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी एकाच प्रकारच्या सुगंधी फुलांची झाडे लावली तर !
मस्कतमधे असे रस्ते आहेत.. एकावर बकुळीची झाडे आहेत तर एकावर बूचाची... अगदी चालत्या गाडीतही सुगंध येत असे.

आपल्याकडे बकुळीचे झाड म्हणजे उंच वाढलेले आणि वरून फुले अंगावर अलगद टाकणारे.. असेच दृष्य दिसते.
मस्कतमधे बकुळीची झाडे ५/६ फुट उंचीचीच ठेवली आहेत. त्यांना मस्त आकार दिलेला आहे. तिथल्या उन्हाळ्यात
भरभरून फुलतात ही. झाडाच्या आकाराने ओळख पटलीच नसती. सुगंधानेच पटवली ती.

गेल्या महिन्यात अबु धाबीच्या जून्या राजवाड्यात मोगराही असा मस्त फुलला होता. फोटो काढले आहेत.

पाचगणीला काढलाय ... नाव माहित नाही गुलाबी रंगात पण होती त्याचा फोटो आला नाही.

सायली मस्त आहे सोनचाफा. मंजुताई कुठली फुले आहेत ही? मस्त आहेत.

आमच्या इथे मानपाडा रोडवर काही ठिकाणी आहेत बकुळीची झाडे. कमी आहेत पण आहेत.

अच्छा. सगळे गेलेत कुठे? धागा संथ झाला नाही!

धन्यवाद अन्जु, फक्त प्रार्थना कर की तो जगला पाहिजे आणि बहरला पण पाहिजे.. आणला त्या दिवशी झोपच
लागली नाही, शेवटी रात्री २ वाजता कॉफी केली आणि बालकनीत खुर्ची टाकुन एकटीच न्याहाळत बसले होते..
खुप श्रीमंत झाल्या सारख वाटत आहे... Happy

Pages