निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
माझ्या लहानपणी मोसंबी या
माझ्या लहानपणी मोसंबी या फळाबद्दल जरा मनात अढी होती.. या फळाचा रस केवळ आजारी माणसालाच द्यायचा असा काहीसा समज होता. कुणी आजारी माणसाला बघायला जायचे तर मोसंबी घेऊन जायचे. ( तयार रस फारच क्वचित मिळायचा. ) घरोघरी काचेचे, मोसंबीचा रस काढायचे उपकरण असायचे. प्लॅस्टीकही फार नंतर आले. त्यामूळे एरवी हे फळ आणलेच जात नसे. आणि बहुतेक मोठ्या हॉस्पिटल्स च्या बाहेर मोसंबी विक्रेते असायचे. माझ्या आठवणीप्रमाणे वर्षभर मिळायचे ते.
दिनेश. तुमची लिहिण्याची पद्धत
दिनेश.
तुमची लिहिण्याची पद्धत किती अलवार आहे!
http://www.boredpanda.com/mos
http://www.boredpanda.com/most-beautiful-trees/
आभार देवकी.. तसं काही नाही
आभार देवकी.. तसं काही नाही खास.
बाहेर जाऊन रस प्यायचा तर तो केवळ उसाचाच.. ! बाकी कसला रस मिळतच नसे.
आता मॉरिशीयसला / दुबईला बघितले तर नुसते रसच नाही तर त्यांची मस्त कॉम्बीनेशन्स उपलब्ध आहेत.
पण मला स्वतःला रसापेक्षा ती फळे खायला जास्त आवडतात.
गल्फमधे अझीम मशीन नावाचे एक यंत्र असते. हातानी चालवायचे असते, त्यातला डाळींबाचा / द्राक्ष्याचा रस तर खासच असतो. या हातयंत्राची रचनाच अशी असते कि त्यात या फळांच्या बिया ठेचल्या जात नाहीत. त्यामूळे नितळ रस निघतो.
वाचत आहे - बरीच नवनवीन माहिती
वाचत आहे - बरीच नवनवीन माहिती मिळत आहे.
तुमची लिहिण्याची पद्धत किती
तुमची लिहिण्याची पद्धत किती अलवार आहे!+++++ देवकी अनुमोदन....
देवकी खुप सुंदर लिंक...धन्यवाद..
देवकी... मस्त फोटो आहेत..
देवकी... मस्त फोटो आहेत.. झाडे अधिक सुंदर का फोटो असे वाटतेय.
आपल्याकडे लोपामुद्रा नावाची एक सभासद होती, तिने स्वतः काढलेले असे सुंदर फोटो पाठवले होते मला.
मी मागे टाकलेले फोटो
मी मागे टाकलेले फोटो सागाच्याच फुलाचे होते. कित्ती दिवसांनी उत्तर दिले
बिझी होते.
या दिवसात जंगलात सागाचा
या दिवसात जंगलात सागाचा फुलोरा मस्त दिसतो... पण त्याला म्हणावा तसा सुगंध नसतो आणि त्यामानाने फळेही कमीच लागतात.
ब्रिटीशांनी अगदी योजनाबद्ध रितीने भारतभर सागाची लागवड केली होती.. ते झाड साठ वर्षाचे झाल्याशिवाय तोडायचे नाही असा नियमही होता.
पण सागाचे झाड सावलीसाठी कामाचे नाही. ऐन उन्हाळ्यात त्याची सगळी पाने गळून गेलेली असतात.
पर्यटन - एक संजीवनी, हे डॉ
पर्यटन - एक संजीवनी, हे डॉ लिली जोशी यांचे पुस्तक मिळाले तर अवश्य वाचा. योग्य त्या जागी लिहितो, सविस्तर.
जागू, थॅंक्यू, मी जवळ जवळ रोज
जागू, थॅंक्यू, मी जवळ जवळ रोज इथे येऊन पहात होते की तू येतेस का आणि माझ उत्तर बरोबर आहे का? अगदी परीक्षेच्या रीझल्टचा फिल आला होता
नमस्कार लोक्स World
नमस्कार लोक्स
World Elephants Day च्या शुभेच्छा !!
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड
अस्ले पण दिवस
अस्ले पण दिवस असतात.......?????
स्निग्धा मेरीट मध्ये आलीस.
स्निग्धा मेरीट मध्ये आलीस.
आशुतोष मस्तच हत्तीचा फोटो.
हाय ऑल ... दिनेश्दा नलिनी
हाय ऑल ... दिनेश्दा नलिनी धन्यवाद
हो मंजू हल्ली मुलांच्या अभ्यासा मध्ये आई बाबाचा सहभाग जरुरीचा झाला आहे ...
ह्यांचे प्रोजेक्ट म्हणजे आम्हाला सगळी तयारी करावी लागते ...
बच्चे कंपनीसह पण दिसतात
बच्चे कंपनीसह पण दिसतात
किती गोड आहेत ते छोटे
किती गोड आहेत ते छोटे
इथे बर्याचदा छान छान
इथे बर्याचदा छान छान पुस्तकांची नावं सुचवली जातात, ती एकत्रपणे लिहून ठेवायाला हवीत. पुस्तक विकत घ्यायचं ठरवल की मग खूप शोधाशोध नाही करावी लागणार कोणाला.
आशुतोष तुम्ही मस्त फोटो टाकता, त्यांना झब्बू देण्याचा मोह टाळताच येत नाही.
हत्तीचे फोटो छान आहेत.
हत्तीचे फोटो छान आहेत.
नलिनी हेडरमध्ये टिप
नलिनी हेडरमध्ये टिप आहे.
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
इथे सागाला लागलेली फळे आहेत.

सागाच्या अशा सुक्या फांदीचा आम्ही खुळखुळा करायचो. ही फळे सुकली आणि असा फळांचा घोस वाजवला की खळखळ आवाज येतो.
स्निग्धा मेरीट मध्ये आलीस
स्निग्धा मेरीट मध्ये आलीस

ओळखा पाहू! हा त्याचा क्लू.
ओळखा पाहू!
हा त्याचा क्लू.
आफ्रिकन हत्ती आशियाई हत्ती
आफ्रिकन हत्ती
आशियाई हत्ती माणसाळतात पण आफ्रिकन हत्ती माणसाळलेत हे कधीही पाहण्यात आलेले नाही.
नलिनी : कांद्याचे फुल आहे का
नलिनी : कांद्याचे फुल आहे का हे?
मृनिश, होय.
मृनिश, होय.
नलिनी मस्त फोटो. आशुतोष
नलिनी मस्त फोटो.
आशुतोष हत्तीमध्येही असे प्रकार असतात हे नव्हत माहीत.
काश्मिर मधील ग्लॅडीलिओ

नम्स्कार्लोक्ससध्याचिक्कारबिझ
नम्स्कार्लोक्ससध्याचिक्कारबिझीअसल्यानेइथेकमीयेणेहोते.सग्ळ्यापोस्टीवाच्तोयरीप्ल्यायदेतनाही,सग्ळ्यांचेफोटोमाहितीमस्तच.

तुमची लेखनी खराब झाली आहे
तुमची लेखनी खराब झाली आहे का????????????????????
नाही हो, पलक. मी किती बिझी
नाही हो, पलक. मी किती बिझी आहे ते दाखवण्यासाठी असं लिहिलय.
जिप्स्या इतका बिझी आहे की दोन
जिप्स्या इतका बिझी आहे की दोन शब्दांत स्पेस द्यायलाही त्याला वेळ नाही.
Pages