निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अन्जु, वर्षु दी... Happy

माणसालाही कोणीतरी आयुष्यभर दोन फुटी पिंज-यात बंद करुन प्राणीसंग्रहालयात ठेवायला हवे म्हणजे कळेल काय जिणे असते ते. राग +++ १००% अनुमोदन.

आमच्या बालकनी समोर एक मोठं कडुलिंबाच झाड आहे. त्यावर खुप वेगवेगळे पक्षी येतात, खास करुन पोपट.
एकदा एक पोपट चुकुन खिडकीतुन आमच्या घरी आला, आणि चक्क सोफ्यावर बसला, मी म्हटल तो घाबरला आहे,
दार, खिडक्या उघडुन देऊ त्याला वाट दिसेल, तर लेक रडायला लागली,आई तो आपणहुन आला आहे त्याला घालवु
नकोस.. वरच्या प्लोअर च्या आज्जी पण तीला सोबत करु लागल्या, अग बाई सायली शुका देव आलाय, घालवु नकोस..समोरच्या उडीया भाभींनी लगेच लोखंडी पिंजरा आणुन दिला... त्यानीच न्यापकीन घालुन तो पोपट पकडला आणि पिंजर्‍यात डांबला... मला काही तो प्रकार पटतच नव्हता.. मुक्या जिवाला कोंडुन आपली निव्वळ हौस म्हणुन...

झालं सईच्या सगळ्या मैत्रीणी गोळा झाल्या, कोणी डाळ, हिरवी मिरची, तर कोणी डाळींबाचे दाणे, असा खाऊ आणला. त्याचे नाव पण ठेवले "क्रुष्णा" Happy पोरांचा आनंद पाहुन माझी द्वीधा मनस्थीती झाली.. काय करावे सुचेच ना!

रात्री आमच्या सई बाई कीत्ती वेळ झोपायलाच येत नव्हत्या.. सारख त्याच्या पिंजर्‍यावरची चादर काढुन बघायच्या, आई झोपलाय ग!, ह्याप्पी दिसतोय ग! डोंबल्याचा ह्यप्पी, पण तीला कस समजवाव हेच कळत नव्हत.

दुसरा दिवस उजाडला सईनीच त्याला पाईपनी आंघोळ घातली, पिंजरा उन्हात ठेवला, मी वरण भाता ची आणि पाण्याची वाटी पिंजर्‍यात ठेवली, मी त्याच्या जव़ळ गेली की तो गुरगुर करायचा, त्याचा राग मला कळत होता..

संध्याकाळी झाली, जसा पोपटांचा थवा आकाशातुन जायचा, तसा हा इकडे जिवाचा आकांत करुन किंचाळायचा,
खुप अस्वस्थ होउन फिरायचा, पंखांची फडफड करायचा, माझ्या पोटात खुप कालवायच.. हे सगळ सईला समजल,
तीला तीची चुक लक्षात आली, लगेच त्याची माफी वगैरे मागीतली आणि त्याला सोडायची परवांगी पण दिली..
त्याच संध्याकाळी त्याच्या पिंजर्‍याचे दार उघडले... एक दोन पिंजर्‍यावर एक, दोन हलक्या हाताने थापा मारल्या..
क्षण भर त्या पोपटाचा पण विश्वास बसत नव्हता, पण दुसर्‍या़ क्षणी, जो भुर्र कन उडाला.... हा... मी सुटकेचा श्वास घेतला आणि लेकीला हुंदका फुटला...

एक दोन दिवस, खुप उदास होती, त्याचा रिकाम्या पिंजर्‍याकडे बघत बसायची, मग हळु हळु विसर पडला तीला, तो पिंजरा पण आम्ही परत केला...

सायली, सई लहानपणीच शिकली अनुभवाने ,लेसन ऑफ लाईफ.. जियो और जीने दो Happy
दिनेश , पाहतेय तुझी मालिका..
पानफुटी.. खूप क्यूट
होप पेंग्विन्स ना आणण्याची परवानगी न मिळो..
तेथील प्राणी इतके केविलवाणे दिसतात ना ..सगळे उदास उदास !! Sad

वाचुन काढल सगळं उरलेलं ! हुश्श!

इथे फिरकायला वेळच मिळत नाहीये Happy

असो! आमच्या ऑफिसात असंख्य छोटी छोटी बेडकाची पिल्लं इकडे तिकडे पळत असतात.
रविवारी परिक्षा देऊन झाल्यावर मी एका बेडकाच्या पिल्लाच्या मागे मागे जात होते आणि विसरूनच गेले की माझा मित्र ऑफिस बाहेर माझी वाट बघतोय Proud

तब्बल २५ मिनिटानंतर त्याचा फोन आल्यावर मी भानावर आले की मी ऑफिसच्या दुसर्‍या टोकाला पोहचलेय Lol
पण मला जामच मज्जा आली Lol

रियु fried frog legs खूप यमी लागतात.. Proud
आणी तू का त्यांच्या मागे पळत होतीस, तुला त्यातला एखादा फटकन प्रिंस होईलसा वाटलं की काय.... हाँ??

आणी तू का त्यांच्या मागे पळत होतीस, तुला त्यातला एखादा फटकन प्रिंस होईलसा वाटलं की काय.... हाँ??
>>>
अय्योओओओओओओओओओओओओ!
नाही बाई बिग नो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Rofl

अगं तो उड्या मारताना खुप क्युट दिसत होता Proud
आणि हे पिल्लू लांब लांब उड्या मारत होते. ते कुठे जातायेत ते बघत बघत मी त्यांच्या मागे चाललेले

रियु fried frog legs खूप यमी लागतात
>>
बाप्रे Proud
आपण भेटू तेंव्हा तुझ्यासाठी २-३ पकडून आणते Proud

आज किती दिवसानी हा धागा नेहमी सारखा वाटला.

धागाकर्ती जागू बरेच दिवसानी आली म्हणुन असेल बहुदा.

सायली, जास्वंद आणि पोपटाची कहाणी दोन्ही छान.

दिनेश दा तुम्हाला किती गोष्टी माहित असतात ग्रेट आहत.

फोटो आणि सगळ्याच पोस्टी मन रिझवणार्‍या. मजा आली वाचताना.

तो फ्रॉग पण, पाय लावून पळाला !
>>
Lol
तरी तेंव्हा वर्षुतैची कमेंट आली नव्हती Proud
तिची कमेंट आणि त्यावरचं माझं उत्तर कळालं तर सगळे फ्रॉग्स माझ्यापासुन ४ पाय दुर रहातील Proud

सायली - शुककथा आवडली - लेकीलाही स्वातंत्र्याचे मोल पटले हे चांगलेच ... Happy

कालच मी एका चिऊताईची (खर्‍याखुर्‍या Happy ) गोष्ट ऐकली - टाकेनच इथे लवकरच ...

ससा - तो फोटो भारीच आलाय हां ...

धन्यवाद सगळ्यांचे..
आज किती दिवसानी हा धागा नेहमी सारखा वाटला. +१००%
तो फ्रॉग पण, पाय लावून पळाला ! ++:)
पानफुटीची फुले? पहिल्यांदाच बघते आहे.. खुपच गोड आहे...
शशांकजी लवकर येऊ द्या चिऊताई ची गोष्ट...

आता जिथे मगरी आहेत तिथे बोटिंगची सोय होती

हो, होती सोय. मी तिसरीत असताना आम्ही मुंबईत आलो. माझ्या मामाने मला राणी बागेत नेऊन बोटींग करुन आणलेले. नंतर ती सोय बंद झाली. काही वर्षांनी मला आठवेनाच की भर मुंबईत मी कुठे बोटींग केलेले ते, कारण तोवर अशा सोई बंद झालेल्या. शेवटी मामालाच विचारले. त्याने कुठे केले ते सांगितले तरी मी विश्वास ठेवला नव्हता.

(आता मात्र पोवईला एका बागेत, बांद्र्याच्या तळ्यात बोटींग आहे, म्हणजे हल्लीहल्ली पर्यंत होते, मला आजची स्थिती माहित नाही.)

पानफुटी का ती? मस्त आहे.. Happy
होप पेंग्विन्स ना आणण्याची परवानगी न मिळो..>>> + १
तेथील प्राणी इतके केविलवाणे दिसतात ना ..सगळे उदास उदास !!>>> खरय अगदी. Sad
सायली, मस्त ग. लेकीला पण स्वतःहुन समजले.

सायली, माझ्या घरात मला रोज 'आपण सिंह पाळूया??' 'आपण बिबट्या पाळुया??' 'आपण वाघ पाळूया??' असल्या विचारणा होत असतात.. माझे एकच उत्तर असते, आधी तुलाच पाठवुन देते त्यांना पाळायला. तु राहा घर सोडुन परक्या लोकांकडे आणि मग आण सिंह आणि बिबटे घरी.. Happy मग उत्तर येते, मग ठिक आहे, आपणच जंगलात जाऊया.... म्हटले हो, तेवढेच उरलेय आता.

उगीच दुधाची तहान ताकावर म्हणुन वाघाची मावशी आणि मामा घरात बाळगलेत. पण खरे तर त्यांनी आम्हाला नोकर म्हणुन ठेवलेय. आम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहतो, त्यांच्या इतमामाला साजेसे अजुन जमत नाही म्हणुन रोज ओरडा खातो.

स_सा, पानफुटीची फुले मस्तच फोटो.
संध्याकाळी झाली, जसा पोपटांचा थवा आकाशातुन जायचा, तसा हा इकडे जिवाचा आकांत करुन किंचाळायचा === ५ पुर्वी शेजारच्या बिल्डिंगमध्ये पोपट पिंज-यात बंद होता, असाच थवा गेला की किंचाळायचा मला खुप त्रास होत असे मनात यायचे जाऊन सांगु सोडायला, पण ते माझ्या सांगण्याने सोडुन देणारे माणसे नव्हते, तसे असते तर आधीच सोडले असते.
fried frog legs खूप यमी लागतात. Happy

माझ्या घरात मला रोज 'आपण सिंह पाळूया??' 'आपण बिबट्या पाळुया??' 'आपण वाघ पाळूया??' असल्या विचारणा होत असतात.. माझे एकच उत्तर असते, आधी तुलाच पाठवुन देते त्यांना पाळायला. === Happy

सांगु सोडायला, पण ते माझ्या सांगण्याने सोडुन देणारे माणसे नव्हते, >>> इथे तर माझे बाबाच सोडत नाहित. गेली ययययय वर्षे काही ना काही ठेवलेय त्यांनी घरात. आता भाऊ पण त्याच वळणावर जातोय. मी व आई सतत विरोधात. आताचा पोपट तर उडवले तरी उडत नाही. Sad परत घरात येतो सगळीकडे फिरुन.

मधे एक पोपट मी व आईने उडवला. तर नेमके थोड्या दिवसांतच भावाला कोणीतरी विचारले, 'आमचा पोपट आम्ही देऊन टकतोय कोणाला हवा तर सांग Angry '. हा तर काय तयारच. नेमकी अशीच माणसे त्यालाच का भेटतात देव जाणे. मधे कोणीतरी असेच कासव दिले. मासे आणलेले तर जोडीतला एक गेला व दुसरा राहिना. मग आईने वैतागुन परत द्यायला लावला. हुश्श.

मधे माझ्या मुलासाठी वादिचे गिफ्ट म्हणुन बुलबुल विथ पिंजरा आणणार होता. मी नशीबाने फोन केल्यावर कळाले तर त्याचा प्लॅन मी उडवला.

साधना, हिंस्त्र प्राण्यांनाही अगदी लहानपणापासून लळा लावला तर ते कधीही विसरत नाहीत. नॅट्जिओ वर अश्या अनेक क्लीप्स आहेत... पण तरी असे वाटते की माणसाशी मैत्री हा त्यांचे नैसर्गिक स्वभावविशेष नाही. दोघांनी एकमेकांचा आदर ठेवत एकमेकांपासून दूर राहणेच योग्य.

तू त्या भागात कधी केलीस का ? मालाडला मनोरीला एक बोटसेवा, बेस्ट तर्फे चालवली जात असे. बेस्टचाच कंडक्टर आणि तशीच तिकिटे होती.. शिवाय मढ ते वर्सोवा पण बोट होती.. आता आहेत काय त्या ?

बर्‍याच दिवसांनी डोकावले. जिप्सीचा स्वातंत्र्यदिनाचा फोटो खल्लास आहे. भारताच्या मस्तकाच्या आकाराचा ढग कसा मिळवलास रे?

मालाडला मनोरीला एक बोटसेवा, बेस्ट तर्फे चालवली जात असे. बेस्टचाच कंडक्टर आणि तशीच तिकिटे होती.. शिवाय मढ ते वर्सोवा पण बोट होती.. आता आहेत काय त्या

>>>>.

asanaar. kaaran tyaa kaahi manoranjan mhanun chalavlya jaat naahit tar tithalyaa rahivashanchi ti garaj aahe. lok motorcycles pan gheun jataat tyaa botitun. agadi best bus aahe asech vaatate tyaat.

आमच्याकडे पण सिंह पाळायचाय आणि तो पाळण्यासाठी दिनूमामा येताना विमानाने घेऊन येणार आहे. Happy

मी दीड एक वर्ष बेबीसिटींग केलय पिटूकल्या कासवांचं. व्हिएन्नात असताना प्रोफेसर आणि कुटूंब बाहेरगावी गेले की त्यांचं मांजर, पक्षी अन कासवं सांभाळायचं काम माझ्यावर यायचं. पिंजर्‍यातल्या त्या पक्षांना पाहिलं की जीव खूप हळहळायचा.

Pages