निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

जिप्सी आहे का..बाकि पण
जिप्सी आहे का..बाकि पण सगळे..
तारकर्ली ला जातेय..काय करु सांआग्गा...
मासे खाणार...अजुन काय सांअगागा
शोभे माहित नव्हते तरी मी इतके
शोभे माहित नव्हते तरी मी इतके दिवस नाही म्हटल्यावर कोणालाच माझी आठवण नाही आली. भ्या$$$$$$$$$$$ किती अश्रू गळाले.
कोण ह जागू ? आठवत नाही कधी
कोण ह जागू ? आठवत नाही कधी इथे बघितल्याचं. नवीन सभासद का ?
नि.ग. च्या यादीत नाव नाही !
वैशाली तारकर्ली एकदम मस्त
वैशाली तारकर्ली एकदम मस्त आहे. तिथे होडीतून निवतीचा किनारा नक्की बघ. तसेच होडी वाले समुद्रात आत नेउन स्कुबा डायव्हिंगचा गॉगल लावून समुद्रात टायरवर उतरवतात व रंगित मासे वगैरे दाखवतात.
तारकर्लीत बांगडे भरपूर प्रमाणात मिळतात.
बरस रे घना तूच आज शमवी तृषीत
बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना
पवन अति दाहक हा
छळी मजला तूच पहा
रात्र रात्र लोचनांत नीज येईना
सध्या घरचा संगणक बंद असल्याने माबोवर येणे कमी झालेय.
जिप्सी आहे का..>>>>>वैशाली, तुम्ही किती दिवस जात आहात तारकर्लीला? तारकर्लीला स्कूबा डायविंग/स्नॉर्केलिंग अवश्य करा. तारकर्लीपासुन जवळच देवबाग आहे. तेथे त्सुनामी आयलंडवर वॉटरस्पोर्ट्स आहेत. कर्ली नदी आणि समुद्राचा संगम अवश्य पहा. शक्य असल्यास देवबागच्या किनार्यावरून सूर्यास्त चुकवू नका. :-). वर जागूने सांगितल्यप्रमाणे होडीतून निवती, भोगवे किनारा पहा,
गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"
http://www.maayboli.com/node/40153
http://www.maayboli.com/node/33280
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"
जागू, कश्मिरचा आणि वर्षूदी अजंठाचा सचित्र वृत्तांत येऊ द्या लवकर.
शोभे.. आपले देस के गुलाबच है
शोभे.. आपले देस के गुलाबच है ये, होटेल कैलास ( अजिंठा)चे कॉटेजेस...
ओह हो का..दिनेश.. मला वाटलं आपणच लागलेले आहेत त्या बोगनवेली...
जिप्स्या..टाकते टाकते लौकरच .. अजंता एलोरा चे फोटोज
मी २ दिवस आहे...
मी २ दिवस आहे...
तु म्ह्ण...
तु म्ह्ण...
दिनेशदा ५ नंबरवर आहे हो माझ
दिनेशदा ५ नंबरवर आहे हो माझ नाव. बघा लक्षात येते का?
स्नॉर्केलिंग हे नावच विसरले होते. येस. मी पण केले होते. मस्त अनुभव.
आता पावसाळी रानभाज्या येऊ लागतील.
दिनेशदा, बघा की नवीन कोणी पण
दिनेशदा, बघा की नवीन कोणी पण येऊन "कोणालाच माझी आठवण नाही आली. भ्या$$$$$$$$$$$ किती अश्रू गळाले." असं म्हणायचं. बरोबर आहे का हे?
चला घेऊ या जागूला आपल्या
चला घेऊ या जागूला आपल्या टीममधे. ( न सांगता गेली त्याबद्दल एवढी शिक्षा पुरे झाली ! )
बोगनवेल हे नाव मराठी वाटत असले तरी ते फ्रेंच नावाचा अपभ्रंश आहे. वेल तशी काटक, कुठेही तग धरते.
मजा म्हणजे गुलबक्षी प्रमाणेच सारा ३ रंगाचा खेळ. ( राणी, हळदी आणि पांढरा ) फुलांचा आकारातही फरक आढळतात. पण आपण फुले म्हणतो ती फुले नसतात तर रंग बदललेली पाने असतात. खरी फुले पांढरी आणि अगदीच लहान असतात. त्या रंगीत पानांनाच लागलेली असतात. त्यांना उठाव येण्यासाठी पानांनी असे रुप घेतलेले असते. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे या पानांत पाण्याचे प्रमाण अत्यल्प असते त्यामूळे ती सुकली तरी रंग बदलत नाही. ( ही अबोलीची खासियत. )
फुलांना उठाव येण्यासाठी पानांनी रंग बदलायची प्रथा, म्यूसेंडामधे पण आहे.
मी २ दिवस आहे...>>>दोन दिवसात
मी २ दिवस आहे...>>>दोन दिवसात तारकर्ली, देवबाग, सिधुदुर्ग किल्ला सहज बघुन होईल.
आणि हो जमल्यास मालवणात "अतिथी बांबू" हॉटेलमध्ये सुरमई थाळीचा अवश्य लाभ घ्या.

बोगनवेल हे नाव मराठी वाटत असले तरी ते फ्रेंच नावाचा अपभ्रंश आहे>>>>या फुलाला आम्ही "कागदी गुलाब"ही म्हणायचो.
उजू सुंदर लिहिलंय, तुझी पोस्ट
उजू सुंदर लिहिलंय, तुझी पोस्ट काल वाचायची राहिली.
वर्षुताई मस्त फोटो.
हाय जागू वेलकम. मज्जा केली असेलना काश्मीरला.
हो मी पण बांबू मध्ये जेवले
हो मी पण बांबू मध्ये जेवले होते. तिथली थाळी मस्तच.
अच्छा ही शिक्षा होती का? मी साधनाला सांगितले होते. इथे टाकायचे राहीले होते कारण राधाला बरे नसल्याने मी घरी कॉम्प्यु उघडला नव्हता.
बरे माफी साठी आता जुने फोटो टाकते.
लोकं माफी मागताना चांगली
लोकं माफी मागताना चांगली गुलाबाची वगैरे फुले देतात ! असो गोड मानून घेऊ.
( आणि आता साधनाला शिक्षा करायची का ? )
लोकं माफी मागताना चांगली
लोकं माफी मागताना चांगली गुलाबाची वगैरे फुले देतात ! असो गोड मानून घेऊ.>>>>>>>>>>काटेच दिलेत.


( आणि आता साधनाला शिक्षा करायची का ? ) >>>>>>>>ती पण आता फोटो दाखवेल.
तो निवडुंग असला तरी जागूने
तो निवडुंग असला तरी जागूने टाकल्यामुळे तो सुंदर, विलोभनीय असा "कॅक्टस" आहे.
जागू कशी झाली ट्रिप ?
जागू कशी झाली ट्रिप ?
जागू कशी झाली ट्रिप ? काश्मीर
जागू कशी झाली ट्रिप ? काश्मीर म्हणजे साक्षात नंदनवन आहे ना? फोटो लवकर टाक.
वर्षु दी फोटो मस्त.
ही बोगनवेल पहा. आकार दिल्यामुळे किती वेगळी दिसत आहे. बोगनवेल आहे असे वाटतच नाहीये.
500
500
मनीमोहोर.. कसली गोड दिस्ताहेत
मनीमोहोर.. कसली गोड दिस्ताहेत बोगनवेली ची फुलं(कि पानं..) वॉव खूपच सुर्रेख आकार दिलाय..
बोगनवेली बद्दल दिनेश ने सांगितलेली माहिती अगदी नवीन आहे माझ्याकरता
,'तो निवडुंग असला तरी जागूने टाकल्यामुळे तो सुंदर, विलोभनीय असा "कॅक्टस" आहे' प्रज्ञा +१००
ममो.. बोगनविला ला या फुलांचा
ममो.. बोगनविला ला या फुलांचा आकार दिलेला वाटतोय ना
हे कसलं झाड आहे??
हे कसलं झाड आहे??
हे झाड बहुदा 'कलाबाश' (बेगर्स
हे झाड बहुदा 'कलाबाश' (बेगर्स बाऊल ट्री) आहे.
वर्षु दी झाड कसल आहे ते
वर्षु दी झाड कसल आहे ते ओळखत नाहीये. फुलं तशीच बोगनलीच्या आकारा सारखीच वाटतायत. मस्त दिसतायत.
पोरबंदरला कोकिळाबेन अंबानी नी एक मंदिर बांधले आहे. मंदिर नवे असले तरी बांधकाम, स्वच्छता, शांतता आणि आजूबा़जूचा परिसर खूप छान आहे. त्याच्या कुंपणाला ही बोगनवेल लावली आहे. बोगवेलीला काटे असतात ना त्यामुळे संरक्षण आणि सौंदर्य एकामुळेच मिळाले.
मलाही कलाबाशच
मलाही कलाबाशच वाटतेय.
मणिमोहोर, बोगनवेलीला तो आकार दिलाय हे नक्की का? कारण तशी फुले येणारीही एक जात आहे आणि माझ्याकडे ह्या जातीची बोगनवेल आहे. माझ्याकडच्या बोवेला सेम असेच तुरे येतात.
जागु, मीही हल्ली खुप कमी केलेय गं मायबोली. घरी तर ऐशुने बॅनच केलेय, बॅन पासवर्ड प्रोटेक्टेड टाकल्लय त्यामुळे घरुनही इल्ला..
त्यामुळे तुझ्या या दुस-या, मुलाबाळांसोबतच्या हनिमुनची खुशखबर मी इथे देऊ शकले नाही
साधना, धन्यवाद, असू शकेल हं
साधना, धन्यवाद, असू शकेल हं तशी रेडिमेड तुरे येणारी बोगनवेल. मला हे माहित नव्हते म्हणुन मला असे वाटले की आकार दिलाय
काटेही किती देखणे असतात हे
काटेही किती देखणे असतात हे दाखवायचे होते.
अरे जिप्स्याला पण शिक्षा द्या. त्यालाही माहीत होत. वर्षूताईला पण.
साधना
काय हे तुझे हाल ? त्यामुळे लिहायला चान्स मिळताच अगदी बरसलेयस.
सध्या माझ्या जावेकडे अबोली
सध्या माझ्या जावेकडे अबोली च्या झाडावर एका बुलबुल जोडप्याने खुप गोंडस
.. काल त्यातुन एक पिल्लु बाहेर आले..

घरटे बांधले आहे... एकुण तिन अंडी घातली आहेत
आई, बाबा दोघेही संगोपनात खुप दक्ष आहेत.....

कलाबाश? हे नाव पहिल्यांदाच
कलाबाश? हे नाव पहिल्यांदाच ऐकते आहे... खातात का हे फळ?

मनिमोहर तो बोगनवेल कसला गोड दिसतो आहे!
जागु निवडुंग मस्तच.. तुझ्या ट्रिपचे फोटोज पण टाक लवकर..
लोकं माफी मागताना चांगली गुलाबाची वगैरे फुले देतात ! असो गोड मानून घेऊ.
Pages