निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रज्ञा, वादीच्या उशीराने शुभेच्छा.
सर्व माहिती आणि फोटो मस्त. जिप्सि, खूप तरल काव्यपंक्ती.
कालच्या लोकरंगमध्ये बहाव्यावर आलेला लेख -- ऊन हळदीचे ओले
खरच फुललेला बहाव्याला अगदी समर्पक उपमा.
लेख वाचल्यावर बहूदा तरी श्रीकांत ईंगळहळीकरांच्या आसमंत पुस्तकातील बहाव्याचे झाड आणि त्यावर आधारित अन्न्साखळीबद्द्ल वाचलेले आठवले. बहाव्याला जेव्हा पावसाळ्याच्या आसपास नवीन पालवी येते तेव्हा त्या कोवळ्या हिरव्या पालवीवर (बहूदातरी) लेमन इमिग्रंट जातीचे फुलपाखरु शेकड्यांच्या संख्येने अंडी घालते.त्या अंड्यांतील अळ्या( त्या अगदीच खादाड बोक्या असाव्यात) बहाव्याला अगदी निष्पर्ण करतात, त्याची सगळी पान फस्त करतात.खा-खा खादाडी करून त्या हिरव्या अळ्यांचे जाडजूड सुरवंट झाले की ते सुरवंट खोडावर सुरक्षित जागा शोधून स्वतःभोवती रेशीम कोष गुंफतात आणि त्या कोषात मस्तपैकी काही दिवसांसाठी ताणून देतात.झकास आराम झाला की जाग आल्यावर आळोखेपिळोखे देता देता निसर्गाने जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्या सुस्त सुरवंटाचे कोषातून बाहेर येतायेता चक्क सुदंर रंगीबेरंगी फुलपाखरू बनते.फक्त लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अळ्या जरी शेकडोंच्या संख्येने असल्या तरी कोष- फुलपाखर मात्र दोन-तीनच दिसतात. कारण बहाव्याच्या कोवळ्या पानांआड रसरशीत अळ्यांची मेजवानी आपल्यासाठी आणि आपल्या कुटूंबासाठी आहे हे शिंपी वा ईतर पक्षांना निसर्गाने शिकवूनच ठेवल असत. त्यामुळे त्या पक्षांच्या तावडीतून चार-दोनच अळ्या जिवंत राहतात. त्याचे घरटेही बहाव्याच्या आसपासच असते, पण त्याच्या विणीची कहाणीही फुलपाखरासारखीच. सरडे, कावळे, साप ह्यांच्या तावडीतून त्याचही एखादंच पिल्लू वाढून मोठ होत.
आता ह्या पावसाळ्यात मी लेकीसोबत नक्की बाजूच्या गार्डनमधील बहाव्यावर लक्ष ठेवणार आहे. पुस्तक जेव्हा वाचनात आले तेव्हाच हे ठरवले होते पण जमले नव्हते. ह्यावेळी नक्की जमवेल.
निसर्गाची किमया खरच फार मोठी आहे. एखाद्याची संख्या वाढली तर ती थांबवायला किंवा कंट्रोल करायला निसर्गातले इतर घटक लगेच तयार असतात पण आपणच त्यात नको तसा हस्तक्षेप करून निसर्गाचा आपल्यावर रोष ओढवुन घेत असतो.

सुप्र निगकर्स! आमच्या ऑफीसच्या आवारात कावळ्यांनी दाट पर्णसंभार असलेल्या झाडांवर मध्यावर घरटी बांधली आहेत. जोरदार पाऊस येणार बहुतेक. Happy

मी लावलेल्या टोमॅटो, कारले,मिरची याला साध फुल पण आल नाही ६ महीने झाले लावुन . मेथी, मुळा, पालक कबुतरांनी येउच दीली नाही. टोमॅटो, कारले,मिरची काय करु आता?????

उजू, एखादा कोष फांदीसकट अलगद तोडून घरातही ठेवता येईल. या कोषातून पाखरू अगदी भल्या पहाटे बाहेर येते. त्यावेळी पंख ओले असतात. त्यामूळे ते लगेच उडू शकत नाही. ते हळू हळू चालत वरची जागा पकडते. सूर्याची पहीली किरणे त्यावर पडल्यावर पंख हळू हळू सूकतात आणि उलगडतात. आणि मग ते उडते.
हे नेमके कधी होईल सांगता येत नाही पण आदल्या संध्याकाळी कोषाचा रंग थोडासा बदललेला असतो.

पलक, झाडे जोमदार आहेत का ? थोडे जैविक खत देऊन बघा. शेंडे खुडल्यासही फायदा होईल.

<<सूर्याची पहीली किरणे त्यावर पडल्यावर पंख हळू हळू सूकतात आणि उलगडतात. आणि मग ते उडते.<< व्वाह...किती सुंदर! कोषातुन बाहेर येण्याची क्रिया बघणं हे ही किती सुखद असेल ना!! Happy

<<सूर्याची पहीली किरणे त्यावर पडल्यावर पंख हळू हळू सूकतात आणि उलगडतात. आणि मग ते उडते.<< व्वाह...किती सुंदर! कोषातुन बाहेर येण्याची क्रिया बघणं हे ही किती सुखद असेल ना!! स्मित>>>>>>>+ १ Happy

मायकल पालिनची ती सिरीज मी काल संपवली.
पृथ्वीच्या त्या बाजूने बघितले तर न्यू झीलंडचा अपवाद सोडला तर फारशी जमीनच नाही, त्यामूळे पॅसिफिक महासागराच्या कडेने केलेली ती सफर आहे.

अलास्का, रशिया, कोरीया, जपान, चायना, फिलिपीन्स, व्हीएतनाम, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चिली,
बोलिव्हीया, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा आणि बरेच अधलेमधले देश असा प्रवास आहे तो.. जरा जूनी आहे ती सिरीज पण जबरदस्त आहे. यातले काही भाग न बघितलेले आहेत. अवश्य बघा.

काल मी ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली जुनी गाणी ऐकत होतो. भूमिकन्या सीता नाटकातले हे पद.
माडगूळकरांचे आहे आणि संगीत स्नेहल भाटकरांचे. मुद्दाम इथे देतोय कारण यातल्या निसर्गप्रतिमा किती सुंदर आहेत त्या बघा. ( गाणे ऐकायला मिळाले तर ऐकाच. )

मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी

पुसतील कुशल मज लता, कर्दळी, केळी
मोगरा, मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरून श्यामाराणी

देतील ओंजळी भरून जांभळी, बोरी
येतील पाडसे दबत हळू शेजारी
मी चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी

पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी

तसेच हे एक गाणे, याचे संगीत पुलंचे आहे.
यातला पारिजातकाचा उल्लेख आणि त्यावर ज्योत्स्नाबाईंनी केलेली कारागिरी.. अप्रतिम.

माझिया माहेरा जा, रे पाखरा
माझिया माहेरा जा

देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण
मायेची माउली, सांजेची साउली
माझा ग भाईराजा

माझ्या रे भावाची उंच हवेली
वहिनी माझी नवी-नवेली
भोळ्या रे सांबाची, भोळी गिरिजा

अंगणात पारिजात, तिथे घ्या हो, घ्या विसावा
दरवळे बाई गंध, चोहीकडे गावोगावा

हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची
माझ्या मायमाऊलीच्या, काळजाच्या की तोलाची
'तूझी ग साळुंकी, आहे बाई सुखी'
सांगा पाखरांनो, तिचिये कानी
एवढा निरोप माझा

दोन्ही गाणी गोडच आहेत, दिनेशदा...

२-४ दिवस झाले - आमच्या इथे पावशा पक्षी (ब्रेन फिव्हर बर्ड) ओरडू लागलाय ---- पेर्ते व्हा, पेर्ते व्हा ....
पाऊस येणार आता.... नव्हे आलाच ...

मनिमोहोर, उजु धन्यवाद!
जोत्स्ना भोळेंचा आवाज खूप मस्त! मला आवडतो.

काश्मिरवरून रविवारी सकाळी दोन वाजता घरी परतलो. प्रचंड थंडीतून प्रचंड गर्मी मध्ये प्रवेश.

पहिले दोन दिवस काशिर मध्ये पाउस लागला. पाउस पडल्याने प्रचंड थंडी होती अगदी ९ ते १० डिग्री. राधाला आधीच ताप येऊन गेला असल्याने आम्ही बाहेर नाही पडलो. गाडीतूनच सोनमर्ग आणि गुलमर्गचे बर्फाचे डोंगर पाहीले. श्रावणी मात्र डोंगरावर गंडोल्यात बसुन, बर्फात खेळून आली. पुढचे तिन दिवस मात्र उन पडल्याने आम्हाला फिरता आले. मग बेताब व्हॅली, श्रीनगर फिरता आले. पण काश्मिर खरच वेळ काढून देवाने बनवले आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य.

वाह वर्षू. काश्मिर मध्ये पण असेच गुलाब लगडलेले पाहीले. आकारही जास्वंदीच्या फुला इतके. मी काही मुळ्या आणि बिया ही तिथून विकत घेतल्या आहेत.

फोटो अजुन अपलोड करायचे आहेत. ते केले की टाकतेच इथे.

जागू, तू काश्मिरला गेली होतीस. मला आत्ताच समजतय. लवकर फ़ोटो दाखव बाई. Happy
वर्षू, आहाहा! काय सुंदर आहेत ते गुलाब! Happy
दोन्ही फ़ोटो मस्त.! Happy

अरे वा, जागू फोटोंची वाट बघतोय.

वर्षू, दोन्ही फोटो मस्त. त्या डोंगरांवर बोगनवेल मुद्दाम कुणीतरी लावली असणार. तिचा नैसर्गिक प्रसार सहसा होत नाही. गुलाब पण मस्तच.

परवाच एक छान वाक्य वाचलं.... गुलाबांना काटे असतात असे म्हणण्यापेक्षा काट्यातही गुलाब फुलतात, असे म्हणणे चांगले !

Pages