निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जिप्सी, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, अतिशय आवडतं गाणं आमच्या घरात सर्वांचेच.

आहाहा, मोगरा फुलला, मोगरा फुलला .

पाणी वगैरे घालायची जबाबदारी कुणाची असते ? त्या व्यक्तीला सर्व श्रेय>>>>दिनेशदा, झाडाला पाणी घालणे, फांद्या छाटणे, खत वगैरे घालायची जबाबदारी माझीच असते. घरी जास्त कुणाला बागकामाची आवड नाही आहे. Sad Happy

धन्यवाद अन्जू Happy

पावसाळ्यात कुणाला मोगर्‍याच्या फांद्या पाहिजे असेल तर मला कळवा. बहराच्या काळात भरभरून फुलतो. कधी कधी हातभर लांबीचा गजरा होईल इतकी फुले येतात. Happy आमच्या बिल्डिंगमध्ये याच झाडाच्या फांद्या लावल्यात बहुतेकांनी. Happy

मग खरेच तूलाच सर्व श्रेय. जसे आपण लावलेल्या झाडांच्या फुलांचे फोटो आपणच काढले तर छान येतात..
तसेच आपण रांधलेल्या...... (आता म्हणशील मला चिडवतात Happy )

(शोभाचा वाण नाही पण गुण लागलया , वरच्या फोटोत हातही माझा आहे, फोटोही मीच काढलाय आणि फुलेही माझ्याच घरची आहेत. )
>>>>>..

shobheche thik aahe, aataa jhaali tichi varshe june.. pan tu kashala sagale tujhech vaaparatoyas.. donache char jhaalele haat aahet naa tujhe, te vapar ki...

जिप्स्या, फुले छानच पण झाडही छान राखलेले आहे. पाणी वगैरे घालायची जबाबदारी कुणाची असते ? त्या व्यक्तीला सर्व श्रेय.
>>>>>>>>

jipsya, bagh re baabaa... tu nigaa raakhatoyas aani shrey kona dusaryaach vyaktilaa jaatey...

jaagu, keshar mastach.

maage ek foto link firat hoti. tyaat kesharachya bagepasun te kesharachya fulamadhale keshar kadhanyaparyantache foto hote.

tyaat sagalyaat shevatachaa foto maatra best hotaa. keshar kadhun jhalyavar kesharachi ji fule urataat tyavar ek gaadhav taav marat hote... Happy

साधना, तसाही त्या पाकळ्यांना स्वाद नसतो.. गाढवाला लागत असेल तर माहीत नाही.
सफरचंदे तोडताना पण असेच होते. ती हाताने तोडताना नखे कापलेली असावी लागतात. नख लागलेली सफरचंदे
गायीगुरांनाच घालावी लागतात. वाहतुकीत ती टिकत नाहीत.

पनामा च्या काही खासियती..

पॅरट फ्लॉवर

लाल बेडुक ( रेड डार्ट फ्रॉग)( बास्तीमेंतोस, पनामा)

सोनेरी बेडुक (पनामा)

अरे वा..जिप्सी सुंदरच आहेत रे फुलं, कळ्या, पानं ..टवटवीत आहेत अगदी
जागु.. केशराची फुलं, मुळ्या..आणिक काय काय... मस्त मस्त ..
आणी मी ,'त्यां' च्या पक्वानांचे फोटोच टाकते.. असे हे हातात धरून नै कै मीच शिजवत Wink

,'( एखादे जास्त असेल तर त्या बदल्यात मी स्पेनचे २/४ ग्रॅम केशर द्यायला तयार आहे ! ).. हीहीही

दिनेश ला अचानक लहानपणी पाटी च्या पेंसिलींच्या बदल्यात चॉकलेट च्या चांद्या एक्सचेंजिंग च्या आठवणी आलेल्या दिस्ताहेत...

हो गं आणी ते लाल बेडूक तर हार्डली एक इंच लांबीचे होते. बीच जवळ १०,१२ वर्षां ची पोरं पानाच्या द्रोणात घेऊन फिरत होते दाखवायला..

जिप्स्या डबलचा मोगरा आहे की साधा? जर साधा असेल तर मला त्याची फांदी घेउन ये. मस्त कळ्या मस्त फोटो.

हो क्रिकेटच्या बॅटचा कारखाना पाहीला. सगळया किंमती पण माहीत आहेत मला. कार्ड पण घेउन आले भावासाठी. भावाचे स्प्रोर्टसचे दुकान आहे म्हणून.

अवंतीपुरच्या मंदीरातही जाऊन आले. तिथून फुलझाडांच्या बिया घेतल्यात.

तिन बागा होत्या त्यातली मी एकच केली. बाकिच्या दोनच्या वेळी मला जरा बरे नव्हते म्हणून गाडीतच बसले होते.

जर साधा असेल तर मला त्याची फांदी घेउन ये. >>>> हो जागू, साधा मोगराच आहे, डबल नाही. तुझ्यासाठी आणतो फांदी. Happy रच्याकने, वरील सगळे फोटो आज सकाळीच ताजे ताजे काढलेत. Happy Wink

वर्षूताई पॅरट फ्लॉवर सह्हीच.
बेडूक पण मस्त.

साधना ती केशराची लिंक मिळाली तर दे मला.

वर्षूदी, मस्त फोटो Happy

तो लाल रंगाचा बेडूक विषारी असतो ना?

आणी मी ,'त्यां' च्या पक्वानांचे फोटोच टाकते.. असे हे हातात धरून नै कै मीच शिजवत>>>>>>:खोखो:

पावसाळ्यात कुणाला मोगर्‍याच्या फांद्या पाहिजे असेल तर मला कळवा. >>>>>>>>>>>>>मला हव्यात. घेऊन येशील? Happy

वर्षू... त्या एवढ्याश्या बेडकाची करामत फार मोठी असते. झाडाच्या अगदी वरच्या फांदींवर जी एपिफाइट्स असतात ( अननसासारखी झाडे, जी इतर झाडांच्या फांद्यांवर वाढतात पण ती बांडगूळे नसतात ) त्यातल्या पाण्यात ती मादी अंडी घालते. जमिनीपासून ती एवढ्या उंचीवर हळू हळू चढत जाते. अशी एक नव्हे तर अनेक अंडी ती घालते. त्या प्रत्येक पिल्लाच्या अन्नाची ती सोय करते त्यासाठी परत परत त्या ठिकाणी जाऊन ती एक अनफर्टीलाइज्ड अंडे घालते.. हे ती परत परत करते आणि आपण कुठल्या झाडावर कुठे अंडी घातली आहेत हेही तिच्या बरोबर लक्षात असते....

आणि एखाद्या फुलासाठी मी असा सौदा कधीही करेन Happy

वर्षू, तू पनामा सोडून दक्षिण अमेरिकेत कधी जाणार ? चिली, मेक्सिको, अर्जेंटीना मला बघायचे आहे. इग्वासू फॉल, माचूपिचू तर आहेच बघायचे.

शोभा, आर्या नक्कीच Happy सोबत अबोलीची रोपं + आपट्याच्या बिया आणि नागचाफ्याच्या बियादेखील, (पहिजे असतील तर) देईन. Happy

जिप्स्या मला नागचाफ्याच्या बिया पण आण. हो अबोली माझ्याकडून न्या कोणाला हवी असेल तर.
आणि हो मोगर्‍याची फांदी पाऊस जायच्या आत दे. मागे तुला फोन केलेला रात्री तेंव्हा म्हणालास सोसायटीच्या मिटींगला जाउन येतो आणि फोन करतो. ती मिटींग काही अजुन संपली नाही. जाने दो समझ सकते है Lol

शोभा, आर्या नक्कीच स्मित सोबत अबोलीची रोपं + आपट्याच्या बिया आणि नागचाफ्याच्या बियादेखील, (पहिजे असतील तर) देईन. स्मित>>>>>>>>>>>.दे.दे. (जुन्या गाण्यांच्या कॅसेट पण देणार होतास ना? :अओ:) Happy

ती मिटींग काही अजुन संपली नाही>>>>.जागू, दुसरी मिटींग न संपणारी आहे ना! Wink

<<ती मिटींग काही अजुन संपली नाही. जाने दो समझ सकते<< Rofl

हो रे जिप्स्या... अबोलीची रोपं चालतील. पण आपटा नको. आणि नागचाफा.. मोठं झाड होत असेल ना ते???
कुंडीत लावता येतील अशा झाडांचं किंवा लहानसं झुडुप इतपत झाड होईल अशाच झाडांची कलमं/बिया दे.

शोभा, त्या कॅसेट रद्दीवाल्याला देऊन टाकल्या. Sad

आर्ये, हो नागचाफ्याचे झाड मोठे होते.

कुंडीत लावता येतील अशा झाडांचं किंवा लहानसं झुडुप इतपत झाड होईल अशाच झाडांची कलमं/बिया दे.>>>>>ओक्के Happy

माझे गुरु.. सर डेव्हीड अटेंबरो जे सांगतात ते कायम लक्षात राहते.. त्यांच्याबाबत एक जण म्हणतो कि जर ते निवेदन करणार असतील तर भिंतीना लावलेला रंग बघत बसणे देखील मनोरंजक होऊ शकेल.

Pages