निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायकेल पालिन्सची (बीबीसी) द फुल सर्कल हि मालिका आपल्याकडे दाखवली का ?
मी सिडी कालपासून बघायला सुरवात केली. अलास्का ते अलास्का असा समुद्राच्या काठाने केलेला प्रवास असा विषय आहे. पहिला अर्धा तासच बघितला ( ३ सिडीज आहेत ) अफलातून चित्रण आहे.
यू ट्यूबवर तुकड्या तुकड्यात आहे. अवश्य बघा.

http://www.youtube.com/watch?v=m3nzKPEa20k&list=PL7EFC738CFC58701E

एका पॉइंटला जायच्या आधी डाव्या हाताला एक वाट लागते. त्या कड्याला वळसा घालून खाली एका मठात जाते. तिथे वाटेवर एक झरा पण लागतो. मी पाणी प्यायलोय त्या झर्‍याचे.>>>>>>>>

hiravyakeshichya vatevar?? tithe ujavya hatala ek math aahe. tithele swami var gele, ataa tya jagi utsav bharato - raghaveshwar mhanun ti jaga ata prasiddha aahe. tithe aahe paani. Happy

daavya hatavalaa math malaa mahit naahi. mahadevgad point var ujavya hatala khali utarun gele ki siddeshwarache mandir aahe. tithe mi jaun gelel nahi karan jaane khupach avaghad aahe asa report aahe. aataa gele tar nakki jain.

नाही तो नाही. पश्चिमेला आहे तो पॉइंट. तिथे टोकावर बसायला बाक आहे.
वाटेत एक निळे गेट लागते. मग त्या पॉइंटच्या खालून वळसा घालून एक पायवाट जाते.

तू म्हणतेस त्या स्वामींना मी आणि लेकीने बघितले आहे. तिने त्यांना विचारले पण होते. तूम्ही एकटे का राहता ? तुमची केअर कोण करतं ? त्यांनी तिला प्रसाद पण दिला होता. त्यावेळी तिचे वय साडेचार वर्षे.. पण त्या वयातही Everbody must have someone to love and take care.. हे डोक्यात पक्कं. अजूनही तसंच आहे.

शशांक, आपल्याकडे अशी वेल पण असते. थेट बदकाचा आकार. मी टाकले होते फोटो. बघतो शोधून.>>>>>>>>>निसर्गाची कमाल आहे ना? किती प्रकार, किती रंग, किती आकार, सगळा विचार करताना मती गुंग होते. Happy

काल कंटाळा आल्याने जरा गॅलरीत उभा होतो. बाहेर थंडगार वारा वाहत होता. सहजच लक्ष आकाशात गेलं तर चतुर्दशीचा चंद्र नुकताच उगवला होता. आकाश निरभ्र होते. हळुहळु चंद्राचा तो लाघवी प्रकाशात पसरायला सुरूवात झाली. अचानक त्या नभपटलावर एक एक तारका उगवायला लागल्या. नेहमीपेक्षा तेजस्वी आणि पांढर्‍याशुभ्र. पण पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तारका कुठे स्पष्ट दिसतात. छे! हे काहितरी वेगळंच आहे, पण नाही त्या तेजस्वी आणि शुभ्र शलाकाच होत्या. काहि वेळातच त्यातील एक तारा माझ्याकडे झेपावला. मला आधी वाटलं एखादा धूमकेतुच माझ्याकडे येतोय. पण नाही तो धूमकेतु नक्कीच नव्हता. अरे, पण हा माझ्याकडे न येता कुठे चाललांय? हा तर चक्क माझ्या शेजारी असलेल्या कुंडीतील झाडावर येतोय. अरेच्चा!!! हे काय त्याच्या मागोमाग अजुन त्या सार्‍या चांदण्या माझ्या शेजारच्या झाडावरच झेपावत आहेत. आता त्या झाडाच्या टोकावर या सार्‍या विसावल्या आहेत. हळुहळु त्यातील एक एक चांदणी अजुनच तेजस्वी आणि सुगंधितही होऊ लागली. त्यांचा तो सुगंध मनाला वेड लावणारा होता. रात्रीच्या काळ्या पार्श्वभूमीवर त्या पांढर्‍या शलाकांचे सौंदर्य वर्णनातीत होते. मी कितीतरी वेळ मंत्रमुग्ध होऊन ते सार सुवासिक सौंदर्य माझ्याही नकळत न्याहाळत होतो.

"ए काका, मला दे ना ते" आवाज कानावर पडला आणि भानावर आलो. शेजारची चिमुरडी मला त्या सार्‍या चांदण्या मागत होती. तिचा तो बालहट्ट मला मोडवेना. मी हळुवारपणे एक-एक चांदणी गोळा करत तिच्या हातात देत गेलो. आता त्या चिमुरडीची ओंजळ त्या सुवासिक तारकांनी भरून गेली. तिच्या चेहर्‍यावरचे मोहक हास्य पाहुन मन आनंदाने भरून आले आणि नकळत गाऊ लागले....

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे...
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

अजुनी सुगंध येई हातास मोगऱ्याचा
ओंजळ कशी फुलांची भरून रात्र गेली...

(प्रचि पूर्वप्रकाशित)

वा जिप्सी, क्या बात है. hats off. फोटो सुंदर.

मंकी फेस ऑर्किड, फ्लाईंग डक ऑर्किड आणि मिकी माउस सर्वच सुरेख.

आहा... सुंदर वास आला इथपर्यन्त....... जिप्सी सुर्रेख फोटो आणी ओळी...

बरंय तुला कंटाळा आला वाचून तुला कुणी चिडवायला नाही सुरु केलं.. Wink Proud

क्यूट मिकी माऊस Happy

सुप्रभात....
हे पण गुगल वरुनच.. नारी फुल ,थायलंड मधे आहेत म्हणे..... खुपच अमेझिंग आहे...
nareepol Tree.jpg

फोटो अंतरजालाहुन सभार.....

दिनेश दा, मस्त लिंक...
प्लाइंग डक, मिकी माऊस मस्तच...
जिप्सी, काय सुंदर लिहीता तुम्ही... व्वा! ...

सायली, ते नारीफुल - नारिलता खोटे आहेत. नेटवर कुठेही पाहीलेत तर हेच फोटो दिसतात. यापेक्षा वेगळे फोटोच नाहीयेत. खरी फुलं असती तर अनेक वेगवेगळे फोटो दिसले असते.

एकतर फोटोच खोटा / एडीटेड आहे किंवा मोल्ड मधे घालुन फळांना तसा आकार दिला आहे.
हे वाचा The Chinese orchard growing pears in the image Buddha

सायली तो फोटो फसवा आहे. असे कुठलेही झाड नसते.

काय म्हणतेस वर्षू.. जिप्स्याला चिडवायचे का परत ? आणि खरंच चिडला तर ?

सायली, ते नारीफुल - नारिलता खोटे आहेत. नेटवर कुठेही पाहीलेत तर हेच फोटो दिसतात. यापेक्षा वेगळे फोटोच नाहीयेत. >>>>हो सावली म्हणतेय ते खरंय.

जिप्स्याला चिडवायचे का परत ? >>>>>बिनधास्त दिनेशदा Happy

जिप्स्याला आपलं चिडवलेलं चाल्तं बरं.>>>>येस्स वर्षूदी Happy

तुलाच आठवु शकतात अशा, योग्य वेळी योग्य ओळी.>>>>हे सगळं आठवण्याच/लिहिण्याचं कारण कि सध्या आमच्याकडे मोगरा अगदी भरभरून फुलतोय. गॅलरीत उभा राहिलो कि घमघमाट सुटतोय.

अबोलीलाही खुप बहर आला आहे. अबोलीची फुले आईला खूप आवडायची. आईनेच या झाडाच्या बिया मला आणुन दिल्या होत्या, ज्या मी कुंडीत लावलेल्या.

मोगरा फुलला, म्हणजे ग्रीष्म कडक असणार !

जेवढा खुडाल तेवढा बहरेल..

फुले वेचिता बहरु, कळीयासी आला..

गल्फ मधे मोगरा आणि मोगर्‍याचे अत्तर फार लोकप्रिय आहे. तिथल्या कडक उन्हाळ्यात तो भरभरून फुलतोही !
तिथल्या ऑफिसेस मधेही अशीच ओंजळभर फुले टेबलावर ठेवलेली असतात. बकुळही तिथे अशीच फुलते.
त्यांचा जो पांढरा झगा असतो, त्याचा गळ्याजवळचा जो गोंडा असतो तो अत्तरात बुडवलेला असतो.

जेवढा खुडाल तेवढा बहरेल..>>>>हे १००% खरंय दिनेशदा. मी यावेळेस फांद्या कापल्याच नव्हत्या त्यामुळे फुलं आलीच नाही, १० दिवसांपूर्वी वरवरच्या फांद्या कापल्या आणि आता कापलेल्या सगळ्या फांद्यांवर कळ्या आल्या आहेत. Happy फुलं येऊन गेल्यावर पुन्हा खुडणार. Happy

Pages