निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<काश्मिरवरून रविवारी सकाळी दोन वाजता घरी परतलो. प्रचंड थंडीतून प्रचंड गर्मी मध्ये प्रवेश.

पहिले दोन दिवस काशिर मध्ये पाउस लागला. पाउस पडल्याने प्रचंड थंडी होती अगदी ९ ते १० डिग्री. राधाला आधीच ताप येऊन गेला असल्याने आम्ही बाहेर नाही पडलो. गाडीतूनच सोनमर्ग आणि गुलमर्गचे बर्फाचे डोंगर पाहीले. श्रावणी मात्र डोंगरावर गंडोल्यात बसुन, बर्फात खेळून आली. पुढचे तिन दिवस मात्र उन पडल्याने आम्हाला फिरता आले. मग बेताब व्हॅली, श्रीनगर फिरता आले.
पण काश्मिर खरच वेळ काढून देवाने बनवले आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य.
अगदी अगदी. संपूर्णपणे सहमत.

जागू मी सुद्धा रविवारी कश्मिरहून परतले आहे. ४ मे ते १८ मे - १५ दिवस होते. तुही तिथे आहेस हे माहित असतं तर नक्की भेट्लो असतो.

हाय ऑल!
सध्याचे माझे घर तळमजल्याला आहे आणि अजून पाऊस सुरुही झाला नाहीये पण बाथरुमच्या जाळीतून गांडूळे यायला सुरुवात झाली आहे. कालतर बाथरुमच्याही बाहेर एक आले होते.
यावर काय उपाय आहे का? मी घरात होते हे हिट सारखे एक इन्सेक्ट रिपेलंट रात्री झोपण्यापूर्वी जाळीवर मारले होते पण त्याला काय त्या गांडुळांनी जुमानलं नाही. तुम्हा कोणाला हा त्रास झाला नाही का? मी याआधी कधीही तळमजल्यावर राहिले नव्हते त्यामुळे ही वेळ कधी आली नाही.

अश्विनी वरती गुलाबाचे लिहून खाली झुरळाबद्दल, अरेरे.>>> अंजू, मला पण लिहायला कसंसंच वाटलं होतं Wink

वर्षूताई, कधी कधी झुरळ का कुणास ठाऊक मलूल दिसतं. मग झपकन उचलता येतं. एखादं दिसलं तरी नकोसं होतं. उडून अंगावर बसलं आणि त्याचे पाय अंगाला लागले की मलाही ईईईईई होतं Proud मिश्या पकडायच्या त्याच्या. इजा नाही करायची. मी पकडून खिडकी जवळ येणार्‍या आंब्याच्या फांद्यांवर फेकून देते.

वर्षू ताई तू कशाला ईईई करतेस तु तर त्याच्या पक्वानांचे फोटो टाकतेस.

हे काय आहे ओळखा. सोप्पे आहे.

हे नक्कीच केशराचं फुल आहे.
<<शोभासारखंच हातातून काहीतरी काढायला लागली<< अगदी हेच टंकत होते मी पण्,अश्वे.. Happy

अरे वा. केशराचे फूल.. पण यावेळी ताजी नसणार शेतात.
( एखादे जास्त असेल तर त्या बदल्यात मी स्पेनचे २/४ ग्रॅम केशर द्यायला तयार आहे ! )

तो माझा हात नाही. Happy
हो केशराचेच फुल आहे. त्यातील लाल काड्या म्हणजे केशर

दिनेशदा जास्त काय फुल की केशर? फुल विक्रेत्याने दाखवले व परत घेतले. केशर आहे माझ्याकडे.

नाही ह्या वेळी शेतात ती झाडेही नाहीत. फक्त त्याचे गवत होते. आम्ही त्या शेतात गेलो तेव्हा शेतमालकाने आम्हाला केशराचे वाळलेले गवत आणि केशराची मुळी दाखवली खोदून.

हा लांब लचक क्षितीजाला टेकलेला केशराचा मळा. आता सगळे गवत आहे तिथे.

हे केशरचे फुले असे असते. फोटोतच पहायला मिळाले आम्हाला पण. एका बरणीत केशर तर एका बरणीत केशर फुले मिश्रीत.

केशराचे फूल आणि गुलाब दोन्ही मस्त.
सॉरी थोड विषयांतर आहे पण रहावत नाहीये. झुरळावरुन काल त्या जुळुन येती मध्ये काय फालतु टाईमपास चालला होता.

जागू, काश्मिरी मिरच्या आणल्यास का? Wink सुगरणीला त्याही आणाव्याश्या वाटल्या तर नवल नाही.

जागू, फक्त त्या केशरी तंतूनाच तो स्वाद असतो. त्या काड्यादेखील फुलांपासून अलगद बाजूला कराव्या लागतात ( हे काम स्त्रिया आणि लहान मूलेच करतात ) पाकळ्यांना तसा स्वाद नसतो. म्हणून त्या तिथेच फेकतात. त्यामूळे असे अखंड फूल बाहेर बघायला मिळत नाही.

केशराची शेती तशी अवघड आहे. लागवडीआधी काही वर्षे ती जमीन पडीक ठेवावी लागते. उत्पन्नही फार येईल असे नाही.

स्पेन, इराण आणि भारत या तीनच देशात केशर होते ( मी तिन्ही देशांतले चाखले आहे. ) न्यू झीलंडमधे लागवड केलीय, पण अजून उत्पन्न आल्याचे वाचले नाही. मला बालि मधेही लोकल केशर मिळाले. चांगले १०० ग्रॅम आणलेय, पण अजून पाकीट उघडले नाही Happy

हो त्या केशराच्या शेतमालकाने आम्हाला थोडी माहीती दिली. ते ह्या केशराच्या रोपांना खतही घालत नाहित. ती जमिनच सुपीक असावी लागते व त्या ठरावीक एरियातच पॅम्पोर मध्येच केशरची शेती होते. जर लालच मध्ये येऊन खत घातले तर एक वर्ष आडच पिक येत. त्याच्या पुढच्या वर्षी पिक येत नाही.

जागू, हि केशराची शेती श्रीनगरहुन पहलगामला जातना दिसली असेल ना? त्याच वाटेवर क्रिकेटच्या बॅट बनवण्याचे कारखानेसुद्धा आहेत. ते पाहिले का? त्याच्याच पुढे अवंतीपुर येथे पुरातन मंदिरही आहे (तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही गाण्यातील उजडी इमारत :-). पहलगामहुन श्रीनगरला जाताना अनंतनागपासुन साधारण ५-८ किमी अंतरावर अचबल येथे एक सुंदर बाग. येथे जमिनीतुन नैसर्गिकरीत्या पाण्याचा प्रचंड प्रवाह येतो जो पुढे संपूर्ण बागेत खेळवला आहे. Happy

भावफूल रात्रिच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्‍नरंग स्वप्‍नीच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला ग भारला चकोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर

जागू मस्त फोटो आणि माहितीही.

दिनेशदा आणि जिप्सी ह्यांची माहिती पण सुंदर.

जिप्स्या, फुले छानच पण झाडही छान राखलेले आहे. पाणी वगैरे घालायची जबाबदारी कुणाची असते ? त्या व्यक्तीला सर्व श्रेय.

(शोभाचा वाण नाही पण गुण लागलया :फिदी:, वरच्या फोटोत हातही माझा आहे, फोटोही मीच काढलाय आणि फुलेही माझ्याच घरची आहेत. Happy )

Pages