निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलाबाश चे झाड संभाजी पार्कात पण आहे. ( राणीच्या बागेत पण होते ) चांगली कलिंगडाएवढी मोठी होतात फळे. पण खाण्याजोगी नसतात. नायजेरीयात इबादान झू मधे हे झाड मगरीच्या पिंजर्‍याजवळ होते आणि बाजूला रानगाढवांचा पिंजरा होता. ही फळे त्या दोन्ही पिंजर्‍यात पडायची. पण त्याला ना मगरी तोंड लावत ना रानगाढवं.

नाही म्हणायला त्याचा एक उपयोग स्थानिक लोक करीत. हे फळ सुकले की त्यातला गर काढून पाणी भरायला ते वापरत. दूधी भोपळ्याचा पण ते तसाच ( आणि तेवढाच ) उपयोग करतात.

वर्षू, ती बोगनवेलीची संकरीत जात आहे. मुंबई-पुणे हायवेवर लावलेली दिसली.

हे बुलबुल आता चिमण्यांना मागे टाकून त्यांचे स्थान घेतील असे वाटतेय. माझ्या लहानपणी हा पक्षी मुंबईत दिसणे दुर्मिळ होता. ( तो आपल्याकडे स्थलांतरीत आहे. )

ह्म्म... calabash चं झाडच आहे हे

साधना.. अर्र!!! तेरेपे बच्चे बॅन लगा रहे हैं .. Happy

ओ अच्छा.. संकरित बोगनवेल.. वॉव!!!!

साधने, अग घरी पण बॅन? लेकीला म्हणावं," तुझ्या आधी सदस्य आहे घराची, संगणकाची आणि माबोची. तेव्हा आधी मी बसणार. माझं झालं, की तू बसायचं." Proud

माझ्या लहानपणी हा पक्षी मुंबईत दिसणे दुर्मिळ होता. >>>>

aataa khup jhalet ho.... malaa tar sakal jhali he yanchyamule kalate aani mag yaancha raag yeto.

Shobha, tuch ye ga baai ghari aataa.... malaa ithe computer pan milat naahi ghari, tar thanakavun sangne dur. malaach oradaa padato ulataa, divasbhar mabovar unaadpanaa karat hindate mhanun.. Happy

duparnantar majhya computer varun mabo marathi type hotach naahi..

आम्ही रहात होतो तेव्हा मालाडला आमच्या घरामागेच आमराई होती. पण त्यावेळी तिथे बुलबुल, पोपट, कोकिळा कधी बघितल्याही नाहीत कि त्यांचा आवाजही ऐकला नाही. आता मुंबईत हे पक्षी सहज दिसतात.
चिमण्या, कावळे आणि साळुंक्या असायच्या. कबूतर पण कमीच दिसायची. भटके कुत्रे पण नसायचे. आणि कुत्र्यांना पकडणारी गाडी नियमित यायची.

वर्षू... या बोगनवेलीत फुलांच्या आकारात आणि ठेवणीत बदल केले गेलेत पण रंग मात्र नवीन दिसला नाही मला.
जर निळा रंग मिळाला तर आधीचे रंग धरून जांभळा, मोरपिशी, आकाशी, हिरवा असे अनेक रंग मिळतील.
प्रयत्न चालू असतील म्हणा.

धन्यवाद सगळ्यांचे...
हे बुलबुल आता चिमण्यांना मागे टाकून त्यांचे स्थान घेतील असे वाटतेय. ++ अगदी अगदी....

साधना, बुलबुल ला वटवटया पण म्हणतात ना ग ? आमच्या वींग मधे ग्राउंड फ्लोअरला एका जणाकडे
अशोकाचे झाड आहे... ते माझ्या किचनच्या बालकनीतुन व्हिझीबल आहे.त्यावर बुलबुल चे घरटे आहे पण खुप आत फांद्यामधे आहे, त्यामुळे फोटो निट येत नाही... सध्या अशोकाला फळ लागली आहेत.. आज सकाळी एक कोकीळ त्या झाडावर आली होती... तोच ह्या बुलबुल नी एक विशिष्ठ आवाज करायला सुरवात केली....वटवट वटवट हो काहीसा असाच.... जणु काही अलर्ट चे सिग्नलस...(एरवी त्याचा आवाज उठ रे, उठ ना रे... असा येतो, नोटीस करा.) मागे दिनेश दा नी कुक्कु ची खुप सुंदर लिंक शेयर केली होती..त्यामुळे लगेच लक्षात आले... ही त्यांची अंडी पळवायला आली होती.. मग मी ह्ळुच एक खडा त्या झाडाच्या दिशेने भिरकावला... को़कीळा उडाली आणि क्षणात याची वटवट बंद झाली बघा....

आता मी तर मी मझी लेकरं पण कोकीळेला घरटया कडे फिरकु देत नाही....

सयाली..खूपच गोड फोटो आहे घरट्याचा आणी पिल्ला चा..

वॉव दिनेश म्हणतोय तसं कदाचित पुढे कधी पाहायला मिळेलही जांभळा बो वे

धन्यवाद वर्षु निल...
वॉव दिनेश म्हणतोय तसं कदाचित पुढे कधी पाहायला मिळेलही जांभळा बो वे++++ १००%
हे अस फक्त दिनेश दाच इमाजिन करु शकतात... ग्रेट आहात.. खुप सकारात्मक आणि पुढचा विचार करतात..

निळ्या रंगाची रेसिपी बहुदा जरा किचकट असावी.. बहुतेक फुलांचे रंग लाल ते पिवळा ( त्यात पांढरा ) असेच असतात. इंद्रधनुष्यातले पहिले रंग ना हे. फळांच्या बाबतीतही तेच. हेच रंग आपली भूक चाळवतात. ( म्हणून तर मॅगी, मॅकडोनाल्ड वाले हेच रंग वापरतात. ) त्यामानाने इंद्रधनुष्यात निळा रंग नंतर येतो. कदाचित निळ्या आभाळासमोर नीट दिसणार नाही म्हणून पहिल्यांदा झाडांनी हे रंग स्वीकारले असतील.

आणि तसेही लाल रंग अगदी अंधारातही लालच दिसतो ( म्हणून रेड सिग्नल रेड असतो ) म्हणूनही झाडांनी तो निवडला असेल. ( अंधारात जांभळा रंग काळपट दिसू लागतो. )

माझ्या लहानपणी निळा गुलाब ही अशक्य गोष्ट वाटत होती. निळसर झाक असलेल्या गुलबट रंगाच्या गुलाबालाच निळा गुलाब म्हणत असत. आता मात्र अगदी थेट निळा गुलाब तयार केलेला आहे.

अन्जू, ते calabash चं झाड , चीन ला एका बोटेनिकल गार्डन मधे पाहिलं होतं.. फळांचा उपयोग खाण्याकरता नसून, दिनेश ने सांगितल्याप्रमाणे पाणी भरून ठेवण्याकरताच करतात.. फनी ना!!! Happy

सुप्रभात!!!
घरगुती बर्‍याच अडचणी होत्या. पंधरा दिवसांनी आले. जवळ जवळ ३०० -३५० पोस्ट वाचून काढल्या. समाधान झाले....

मागच्या काही पानांवर उडणार्‍या प्राण्यांविषयी चर्चा झाली आहे. असे उडणारे (glide) करणारे सरडे पाहीले होते. अन्शी-दांडेलीच्या जंगलात...
DSCN5770.JPGDSCN5771.JPGDSCN5773.JPGDSCN5775.JPG

वॉव.. तो सरडा camouflage झालाय मस्तपैकी..
आणी हे क्काये???????सरडा हातात??????? ऊऊऊऊप्स!!!!! ओ एम जी!!!!

मधु __/\__

वॉव.. तो सरडा camouflage झालाय मस्तपैकी.. >>>>>>>>>
हो जसे आजूबाजूला असेल तसे सरडे होते. झाडाच्या खोडावर काळसर रंगाचे होते. हा दरी जवळील झाडावर होता. झाडासारखेच शेवाळे धरल्यासारखा...

आणी हे क्काये???????सरडा हातात??????? ऊऊऊऊप्स!!!!! ओ एम जी!!!! >>>>>>>>
ज्या श्री सुनील करकरे, कोल्हापूर यांच्याबरोबर हा जंगल ट्रेक केला, त्यांनी धरला होता. तेव्हा सुनिल सरांना जंगलात काम करून जवळ जवळ ४०-४५ वर्षे झाली होती. पण हा सरडा पकडण्याचा अनुभव पहीलाच. त्याचे पंख, रंग, उलगडून दाखवल्यावर पुन्हा सोडून दिला. हातात असे पर्यत सरडा मेल्याचे सोंग घेऊन होता. पण सोडल्याबरोबर क्षणार्धात नाहीसा झाला.

आणी हे क्काये???????सरडा हातात??????? ऊऊऊऊप्स!!!!! ओ एम जी!!!! >>>>> वर्षुदीला तर नुसत्या कल्पनेनेच चक्कर आलेली दिस्तेय..... - अगं काही करत नाही तो...

डॉ. वाटवे सरांकडे एकदा एकाने शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा) आणला होता - तो तर आमच्या सगळ्यांच्याच मस्त अंगा-खांद्यावर बागडत होता Happy - खूप हळुहळु चालतो तो आणि मागे-पुढे झुलत झुलत चालतो - त्याचे निरीक्षण करताना आमचे तास न तास गेलेत - परत त्याचे वेगवेगळ्या परिसरात आपोआप रंग बदलणे - ते पण इतके भारी असते ना ... खूप एन्जॉय केलं होतं ते .... हे प्राणी काहीही इजा करत नाहीत आपल्याला आणि आपले एकदा घाबरणे संपले की मग तो प्राणीही रिलॅक्स होतो अगदी ...
तुला सुरुवात करायची असेल तर झुरळ - नाकतोड्यापासून कर .. त्यांना हाताळून बघ ... Happy Wink - नाहीतर डॉ. वाटवे यांची भेट घे - ते शिकवतील तुला .... Happy

शशांकजी तुम्ही चक्क वाटवे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलात??? __/\__ भाग्यवान आहात!! Happy

बाकी झुरळ, गांडुळ, बेडुक, उंदीर ई. हातात धरलय् लॅबमधे डीसेक्शनच्या वेळेस...पण मेलेले प्राणी. Happy जीवंत प्राणी हातात धरणं म्हणजे कमालच! इथे झेंडुच्या फुलांमधली अळी, किंवा तांदुळातली बारकीशी अळी हातात धरुन फेकायला कसंतरी होतं. Proud

हे दृष्य मी बँकॉकला स्वतः पाह्यलंय (एका टायगर झू मधे) - या बाईच्या अंगावर अनेक "जिवंत विंचू" होते .....
(हा फोटो आंतरजालावरुन घेतलाय .....) पण आपल्याकडे डॉ. प्रकाश आमटे, त्यांचा नातू हे तर बँडेड क्रेटसारखे अति विषारी प्राणीही सहज हाताळतात .... Happy

Scorpion_Queen_2.jpg

शशांक.. Rofl मुळीच शिकणार नाही .. अर्चू आणी मिलिंद , आम्ही यायच्या आधी घरातले सर्व प्राणी लपवून ठेवत असणार.. Wink

ते विंचू अंगाखांद्यावर मिरवाणार्‍या मुलीला शतशः प्रणाम..
लहानपणी एका प्रदर्शनीत एका खेडवळश्या दिसणार्‍या माणसाला विंचू, साप भरलेल्या काचेच्या पेटीत राहताना पाहिले होते.. स्स्स्स!!!!

सुप्रभात.
उडणारा साप आमच्याइथे मी ४ वर्षापूर्वी पाहीला. भला मोठा लांबीला आणि जाडा आमच्या समोरून झाडीत उड्या मारत गेला. माझी आजी सांगायची की आमच्या कडे म्हणजे माझ्या माहेरच्या वाडीत एक म्हातारा साप होता. त्याला पिसे होती व तो उडायचा देखील.

अर्चू आणी मिलिंद , आम्ही यायच्या आधी घरातले सर्व प्राणी लपवून ठेवत असणार.. डोळा मारा >>>>>> हा हा हा..

मागे एकदा वाटवे सरांकडे कोणीतरी एका अगदीच निरुपद्रवी गार्डन स्नेकचे अगदी छोटेसे पिल्लू आणले होते. मी तिथेच होतो त्यामुळे सर मला म्हणाले की हे पिल्लू घेऊन जा आणि तुझ्या घरा समोर जी टेकडी आहे तिथे सोडून दे याला. त्या पिल्लाला मी शर्टाच्या वरच्या खिशात घालून घरी आलो. तर घराच्या दारात नेमका आमचा कुत्रा होता. त्याला त्या सापाचा वास आला - तो दारात उभा राहून इतका भुंकायला लागला की आमचे पिताश्री बाहेर आले - त्यांनी विचारले की हा आज तुझ्यावर का भुंकतोय एवढा - मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी तो साप खिशातून काढून पिताश्रींना अगदी अभिमानाने दाखवला - त्याबरोबर पिताश्री म्हणाले - इथे माणसं रहातात, प्राणी नाहीत - जा आधी त्या सापाला सोडून ये कुठेतरी.. आणि परत असले काही आणलेस तर बघ मग ...

... मी आपला निमूटपणे त्या बिचार्‍या सापाला घेऊन टेकडीवर .... आणि माझ्या मागे आमचा "इमानी" कुत्राही .... Happy

Pages