निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना जे दिसायचं ते रोज आपण पाहुनही आपल्याला दिसत नाही
(देअर इज डिफर्न्स बिटवीन दिसणे आणि पहाणे स्मित )>>>>>रिया, +१००० Happy

रीया ,खरबूजे Biggrin Biggrin
बहिणाबाई ग्रेट आहेतच.
आणि जिप्स्या तूला ही आजच्यासाठी अगदी नेमक्या त्यांच्या काव्यपंक्ती आणि त्याला चपखल असा फोटो टाकावासा वाटला हे काय कमी आहे का.अगदी समर्पक आहे तो फोटो त्या ओळींना.
हे अस कवितेच्या ओळींचा इतका सुंदर उपयोग करणे सबके बस की बात नाहीये.

हे अस कवितेच्या ओळींचा इतका सुंदर उपयोग करणे सबके बस की बात नाहीये.
>>>
+११११११११११११११

जिप्सी यासाठीच तर फेमस आहे Happy

फोटो काढणारे अनेक असतात आणि लिहिणारेही अनेक असतात.
योग्य फोटोवर योग्य ते आणि सुंदर लिहिणारा फक्त जिप्सीच असतो Happy

यांना जे दिसायचं ते रोज आपण पाहुनही आपल्याला दिसत नाही
(देअर इज डिफर्न्स बिटवीन दिसणे आणि पहाणे स्मित )>>>>>.....+१००%
उजु चा फोटो पण छानच....

जिप्स्या... छान ओळी.. हि कविता आमच्या शालेय पुस्तकात होती.

मूळ शब्द वाचायला फार गोड आहेत.

टाया वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी..

करती रं कारोन्या, होऊ द्या रं आबादानी...

निसर्ग कवि.. म्हणावेत अशी किती कमी नावे आठवतात ना ? पुढे महानोर, शांताबाई, इंदिरा संत यांच्या कविता वाचताना त्यांच्यावरचे शिक्षणाचे संस्कार जाणवतात. बहिणाबाई मात्र अस्सल मातीतल्या !

आफ्रिका या सिरीजचा शेवटचा भाग फार हृदयस्पर्शी आहे.
सहारा वाळवंट दिवसागणीक पसरतच चालले आहे. त्याला थोपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या सीमेवर वृक्षलागवड करणे. एकंदर ११ देशांत हि लागवड होतेय. त्यासाठी स्थानिक लोकंच काम करताहेत. भारतातही
असे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.

सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिनेशदादा, वाचताना मस्त वाटले. बघता बघता ११ वर्ष सरले.

जिप्सी, वाह! क्या बात!

मानुषी, फोटो पाहिल्यानंतर वाटले की एक मस्त रपेट मारता यायला हवी.

जागू, नावाचे काही नाही ! तू आपली नव्या भागाच्या तयारीला लाग. ७ जून माझी आवडती तारीख.. मुंबईतल्या पहिल्या पावसाची.

आणि तुम्ही हो...... गुर्जीभौ केजरीवाल.........................काय घोळ घालून ठेवला राव? लग्नाचे असेही साइड इफेक्ट्स असतात माहिती नव्हतं! व्हॉट से वर्षू, शोभा, दिनेश ?>>>>>>>>>>>पारच वाया गेलाय तो. Wink
कोण होतास तू, काय झालास तू,
अरे वेड्या कसा वाया गेलास तू. !! Lol

प्रगटली दोन पानं, जशी हात ती जोडून
टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी>>>>या दोन काव्यपंक्ती आणि ते रोपं पहा. अगदी समर्पक आहे ना? >>>>>>>>>हो.ह्या ओळी वाचताना तेच दिसलं समोर. अगदी समर्पक. शाब्बास! Happy

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांच्या हिरव्यागार शुभेच्छा गर्मीमें ठंडी का अहसास देउन गेल्या...
जिप्सीने टाकलेली बहिणाबाईंची समर्पक कविता मस्त...
रिया , नावांच्या चिठ्या बनवून ज्याला जे नाव येईल त्या नावाने बोलवायचं आयडिया मस्त, पण जाम डेंजरस....:G

Pages