निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, तु चार लोकांत असेच म्हणणार हे मला माहिताय... डोळा मारा>>>>>>..तिकडे ह्याच कोण एकतयं? Wink

रिया. हा साप कधीही डोक्यावर आदळत नाही. त्याला उडणे म्हणता येणार नाही कारण तो वरच्या दिशेने जाऊ शकत नाही ( थोडाफार आडवा मात्र जातो. ) हे तंत्र त्याने अगदी परफेक्ट केलेले आहे.

oh!

I got you. I guess I can visualize whatever you are saying (I mean the way snake can fly) Happy

Thanks Dineshda ! This info was totally new for me

तेच तर शोभा, इथे रुबाब मारतोय, माझी परवानगी नाही म्हणुन.. "तिथुन" 'माझी परवानगी नाही' असे लिहिले तरी चालेल याची परवानगी आल्यावरच तर इथे लिहिले ही अंदरकी बात आम्हाला माहित नाही काय?? Wink Wink

साधना Biggrin फिर शुरु..

रिया.. ते उडणारे/ रादर लाँग जंप मारणारे हिरवे ,काटकुळे साप , बँकॉक मधे आमच्या घराच्या मागच्या वरांड्यातून खूप वेळा पाहिलेत.. अगदी मजा वाटते त्यांना तसे लाँग जंप मारताना पाहून.. चक्क ग्लाईड करत जातात..
घरा मागे च थोडे दाट से फॉरेस्ट होते.. त्यामुळे वरांड्याला जाळी लावलेली होती..

वर्षू नील >> आधीच जागुच्या घरा जवळचे साप वाचुन बघुन माझा वासल्लेला आहे

आता परत तुझे उदणारे साप...

देवा

हे काय साधना, मी जाणीवपूर्वक "परवानगी" शब्द टाळला होता ना !

मला अजून अंगोलात साप नाही दिसला, ( सापाला पोर्तुगीज भाषेत कोब्रा म्हणतात. म्हणजे कोब्रा हे सर्वनाम आहे. विशेषनाम नाही ) बाकी मला बहुतेक देशात साप दिसले. मी इथे ज्या जंगलात शिरतो तिथे पण साप आहेत असे माझा ड्रायव्हर सांगत असतो. पण मला नाही दिसला. आमच्या भक्ष्य शोधायच्या वेळा वेगवेगळ्या असणार Happy

ते उडणारे साप उडता उडताच आपल्या शरीराची वळवळ करतात त्यामूळे त्यांना तो पुश मिळतो. नाहीतस हवेत तरंगायचे म्हणजे पंख तरी हवेत नाहीतर ह्वेला अवरोध करतील असे पापुद्रे तरी हवेत. किंवा वजन तरी अगदी कमी हवे.

सरिवा,
इथे ते फक्त निवार्‍यासाठी बसलेले आहे. पण फुलपाखरे केवळ फुलांवरच बसतात असे नाही तर त्यांना वेगवेगळे क्षार हवे असतात त्यासाठी ती चिखलावरपण बसतात. काही जातींच्या फुलपाखरांच्या अळ्या मिल्कवीड सारख्या विषारी वनस्पतींवर पोसतात. त्यातले विष त्यांच्या पोटात न जाता अंगातच राहते आणि पुढे फुलपाखरू झाल्यावर त्यांना ते उपयोगी पडते. ( पक्षी आणि इतर भक्षक त्यांच्या वाटेला जात नाहीत. )

सारिवा सुंदर आहे प्रचि.
दिनेशदा ते फुलपाखरु जंगली सब्जा वर बसले आहे काय या झाडाचे नाव विसरलो ( आज काल मी जास्तच विसराळु झालोय Sad साधना ताई आणि जिप्स्याला माहीती आहे उदाहरण 'नवनाथांपैकी एक' झाड )

जिप्सी, त्या मोगर्‍याच्या कळ्या मस्त टपोर्‍या दिसत आहेत. Happy

माझ्या घरी सध्या चमेली बहरली आहे. मला अतिशय आवडते चमेली. चमेलीचा सुवास आणि उन्हाळ्यातली संध्याकाळ यांची एक अजोड सांगड घातली गेली आहे.

सरीवा, खूप सुंदर आणि ब्राईट फोटो Happy

जिप्सी, त्या मोगर्‍याच्या कळ्या मस्त टपोर्‍या दिसत आहेत.>>>>मामी, मला पटकन महाराष्ट्र निसर्ग उद्यानमधील तुझी "मोगर्‍याच्या कळ्या एव्हढे डास" कमेंट आठवली. Happy

चमेलीचा सुवास आणि उन्हाळ्यातली संध्याकाळ >>>>>> सध्या आमच्याकडे मोगरा दरवळतोय. त्या वरच्या फोटोतील सगळ्या कळ्या आज फुलणार. Happy

जिप्सि, मो. कळया अप्रतिम. लहानपणी आमच्याकडे एक वेलमोगरा होता. वेड्यासारखा बहरायचा. संध्याकाळी कळीच फुल कसं होत ते आम्ही बघत बसायचो पण तो क्षण आम्हाला तेंव्हा कधी पकडता आला नाही.
वनी, पुष्प गुच्छ मस्त.
दिनेशदा , सापाची, फुलपाखराची माहिती नवीच माझ्यासाठी.
सरिवा, फुलपाखरु क्यूट.
माझ्याकडुन हा शुभरात्रीसाठी पुष्पगुच्छ.
From mayboli

हो नितीन, जंगली सब्जाच तो. निळी फुले येतात त्याला. शाळेत असताना वेचून वेचून त्याच्या बिया खायचो आम्ही. शाळेच्या आजूबाजूला बरेच रान होते.

उद्या प्रज्ञाचा वाढदिवस, त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

उद्या प्रज्ञाचा वाढदिवस, त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !>>>>>>>>>>दिनेशदा, उद्या तिला सुट्टी आहे. ऑनलाईन असेल बहुधा. Happy

दिनेशदा,
काही जातींच्या फुलपाखरांच्या अळ्या मिल्कवीड सारख्या विषारी वनस्पतींवर पोसतात. त्यातले विष त्यांच्या पोटात न जाता अंगातच राहते आणि पुढे फुलपाखरू झाल्यावर त्यांना ते उपयोगी पडते. ( पक्षी आणि इतर भक्षक त्यांच्या वाटेला जात नाहीत. ) >>>> खरे आहे.

याबद्दल मीही वाचले आहे.सध्या नेमका संदर्भ माझ्याजवळ नाही,पण Emory university च्या biological departmentचा या संदर्भातला एक छान शोधनिबंध मी१- २ वर्षांपूर्वी वाचला होता.त्यात असेही वाचले होते;की नवीन जन्मणारे फुलपाखरू संक्रमणाला बळी पडण्याची शक्यता असेल तर त्याच्या संरक्षणार्थ फुलपाखरू मुद्दाम अशा विषारी व क्षीरी (दुधासारखा चीक असणाऱ्या) वनस्पतीवर अंडी घालते व त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या त्यावर पोसून त्यांना वरीलप्रमाणे संरक्षण मिळते.
अशा अळ्या अतिशय लक्षवेधी,उठावदार, आकर्षक असतात.पण धोका ओळखून पक्षी किंवा त्यांचे शत्रू लांब राहतात व फुलपाखराला दुहेरी संरक्षण मिळते असे काहीसे वाचले होते.

रुईच्या विषारी पानांचा फडशा पाडू पाहणाऱ्या या फुलपाखराच्या अळ्या पहा:

1

2

3

धन्यवाद दिनेशदा ! Happy
मी बर्याच दिवसात मायबोलिवर आलेच नाही. काहितरि कामं निघायची आणि राहून जायचं. पण आज मात्र ठरवलं, किमान नि.ग. वर तरी रोज फेरी मारायचीच. ईथे येऊन पाहाते तर ४४४ पोस्ट म्हणजे १५ पाने........... Uhoh
पण वाचायला सुरुवात केली रात्रि ११.३० मिनिटांनी आणि आता बरोबर १.४७ मिनिटांनी सर्व वाचून पूर्ण केले . हुश्श्श.........................!
खूप छान माहिती आणि फोटो !

रुईच्या विषारी पानांचा फडशा पाडू पाहणाऱ्या या फुलपाखराच्या अळ्या पहा: >>>>> या अळ्या मोनार्क फुलपाखराच्या वाटताहेत ....

monach_lifecycle3.gifphpfsbNYbPM.JPG

हॅप्पी बड्डे प्रज्ञा.

हो शशांक त्याच त्या. इथे रुईची झाडे भरपूर आहेत त्यामूळे त्या अळ्या आणि फुलपाखरेही आहेतच. रुईवर अन्य कुणी किटक वा अळ्या दिसत नाहीत.

प्रज्ञा, वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !! - आम्हां दोघांकडून ( शांकली व शशांक ) Happy

Pages