Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोलापूरात तर लोकांनी
सोलापूरात तर लोकांनी शिंद्यांकडून पैसे घेऊन मतं भाजपला दिली!>>> चोरावर मोर
असं करुनच आठवण राहिल अशी अद्द्ल घडवली पाहिजे.
सोलापूरात तर लोकांनी
सोलापूरात तर लोकांनी शिंद्यांकडून पैसे घेऊन मतं भाजपला दिली!>>>>
asech karayala have. mI majhya bailahi hech sangitale hote ki paise jo deto tyachyakadun ghe, pan mat konala dyayache he matra tu tharav.
पालघर- चिंतामण वनगा विजयी.
पालघर- चिंतामण वनगा विजयी.
सर्व विजयी उमेदवारांचे
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. खूप दिवसांनी उत्साह वाटला.
महाराष्ट्रात काँग्रेसचा वन
महाराष्ट्रात काँग्रेसचा वन मॅन शो... आदर्श अशोक चव्हाण !
महा विधानसभेत ह्यावेळी युती
महा विधानसभेत ह्यावेळी युती सरकार असणार.
हे सगळ्या काँग्रेसच्या
हे सगळ्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचं काय नाटक आहे?
बेफिकीर, >> ह्याला लाट म्हणणे
बेफिकीर,
>> ह्याला लाट म्हणणे म्हणजे ज्यांनी विचारपूर्वक भाजपला मत दिले आहे किंवा काँग्रेसच्याविरुद्ध मतदान केले आहे
>> त्यांचा अपमान ठरेल.
शेंदूर फसलेले अनेक दगडही निवडून आलेत. असे दगड हे लाटेचंच व्यवच्छेदक लक्षण आहे. अर्थात या लाटेत विवेकाने मतदान करणारे बहुसंख्य आहेत ही बाब वेगळी. हा विवेक भारतीय मतदारात आहेच. त्याला मोदी नामक चेहरा मिळाला
आ.न.,
-गा.पै.
अनिल शिरोळे 440340 विश्वजित
अनिल शिरोळे 440340
विश्वजित कदम 197722
कदमांना फक्त "आयात" केलेली मते मिळालित काय?
हे सगळ्या काँग्रेसच्या
हे सगळ्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचं काय नाटक आहे?>>> स्टंट
पत्याच्या विद्यापीठातली
पत्याच्या विद्यापीठातली मिळालीत बहुधा
स्टंट ते तर झालंच पण त्याचे
स्टंट ते तर झालंच पण त्याचे परिणाम नक्की काय होणार महाराष्ट्रावर?
महाराष्ट्राचं सरकार कोसळणार वगैरे का? (ढ प्रश्नाबद्दल माफ करा!)
चार महीने राहिलेत,राजीनामा
चार महीने राहिलेत,राजीनामा देऊन टाकला .जनतेला पुन्हा भुलवण्याचा प्रकार चालू आहे.
महाराष्ट्राचं सरकार कोसळणार
महाराष्ट्राचं सरकार कोसळणार वगैरे का? >> नाही हो. ते मंत्रीपदाचा देताहेत. आमदारकिचा नाही. सरकार काही पदणार नाही आणि पडलेले परवडणार पण नाही
सरकार कसले कोसळते आहे..
सरकार कसले कोसळते आहे.. पवारांनी सांगितले की काही झाले तरी कार्यकाळ पूर्ण करणार म्हणून..
काँग्रेसचे राजीव सातवपण
काँग्रेसचे राजीव सातवपण निवडून आले.
नगर- दिलीप गांधी विजयी.
महादेव जानकरांनी सुप्रिया
महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंना अटितटिची लढाई दिलिये पण पराभुत झालेत बहुतेक
महादेव जानकरांनी सुप्रिया
महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंना अटितटिची लढाई दिलिये पण पराभुत झालेत बहुतेक>>> ७०००० मतांनी पराभुत झालेत. पण मान गये सही फाईट
मोदींना विचारण्यात आले होते
मोदींना विचारण्यात आले होते की तुमचे अमेरिका धोरण कसे असेल? तुम्हाला व्हिसा नाकारण्यात आला त्याचा काही परिणाम?
त्यावर त्यांचे उत्तर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले की भारताचे परराष्ट्र धोरण हे मोदींना कशी वागणूक मिळाली यावर अवलंबून नसून ते भारताचे हितसंबंध कशात आहेत त्यावर अवलंबून असेल. याला म्हणतात प्रगल्भ देशभक्त.
ते मंत्रीपदाचा देताहेत.
ते मंत्रीपदाचा देताहेत. आमदारकिचा नाही. <<
अरे हो की! :कपाळावर हात मारलेली बाहुली:
परभणी परत शिवसेनेकडे. लाखाधिक
परभणी परत शिवसेनेकडे. लाखाधिक मताधिक्य आहे. हिंगोलीत सेनेस जेमतेम आघाडी. कोणे एके काळी या दोन हक्काच्या जागा होत्या. २००४, २००९ ला निष्काळजीपणाने घालवल्या.
वर म्हटलंय हिंगोलीत राजीव सातव जिंकले. हिंगोली अंडर वॉच!
-गा.पै.
याला म्हणतात प्रगल्भ
याला म्हणतात प्रगल्भ देशभक्त.<<<
ह्याल प्रगल्भ देशभक्त नाही म्हणता येणार, ही व्यावसायिकता आहे त्यांच्या रक्तात मुरलेली
पप्पू काहीतरी बरळतोय आज तक
पप्पू काहीतरी बरळतोय आज तक वर!
स्वतःलाच त्याने जबाबदार धरलंय ह्या सगळ्या प्रकाराला!
आणि हासतोय जेत्यासारखा!
हम इस फायसलेका विनॅम्रताके
हम इस फायसलेका विनॅम्रताके सॅथ स्वीकार कॅरते हॅ
- राजमाता सोनिया गांधी
सोनिया आणि राहुल दोघांनीही
सोनिया आणि राहुल दोघांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
सोनिया आणि राहुल दोघांनीही
सोनिया आणि राहुल दोघांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली.>>
मनमोहन सिंगांच नशिब जोरावर आहे म्हणायचं आज
काही का असेना, प्रगल्भता आहे
काही का असेना, प्रगल्भता आहे हे खरं
hingoli (congress) - won by
hingoli (congress) - won by 1690 votes
नीधप, या राजीनाम्याना निवान्त
नीधप, या राजीनाम्याना निवान्त पा. म्हनतात तसे अगदीच स्टन्ट म्हणता येणार नाही. सर्वसाधारणतः पुन्हा सरकार आणणे ही त्या मंत्रीमण्ड्ळाची आणि पक्षप्रमुखाची जबाबदारी असते. जेव्हा क्लीन स्वीप होतो तेव्हा पक्षाची धोरणे, व मण्त्रीमंडळाचे काम हे दोन्ही लोकाना पसन्त पडलेले नसते. त्याला पक्ष व मंत्री जबाबदार असतात. त्याची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे दिले जातात. त्यातून पक्षाला अथवा मुख्यमंयाला माणसे बदलून नवीन प्रयोग करण्यासाठी कुठलाही कडवटपणा न येता संधी घेता येते. नवी टीम जमवून डॅमेज कंत्रोल करण्याचा प्रयत्न होतो. शक्यतो असे राजीनामे स्वीकारले जात नाहीत. तरुण गोगोइ यांनीही राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात तर २-३ महिनेच राहिले आहेत त्यामुळे नवीन लोक घेऊन प्रयोग करायला संधी नाही. मुळात जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीअसलेल्ने त्यांचाच राजीनामा मागितला जातो. देवेन्द्र फडणवीसानी तो मागितलाही आहे. पण विरोधकानी मागितला म्हणून दिला असे जवळ जवळ होतच नाही.
कॉन्ग्रेसने ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्या लोकसभेच्या कामगिरीवर अवलबून राहील असे म्हटले होते पण आता तेही होणार नाही. केन्द्राची सत्ता गेली आता राज्यातही फार उलथापालथ काँग्रेस करणार नाही. पराभवानंतर राजीनामे देणे हे अनौपचारिक राजकीय प्रोटोकॉलचा भाग आहे. सर्वच पक्षात ते चालते. या मंत्र्यांची समजूत घालून त्याना काम करायला सांगितले जाईल.
मात्र नारायण राणे यांचा राजीनामा हा उद्वेगातून आलेला दिसतो आहे ...
काही मंत्र्यानी राजीनामे दिलेत. ते मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्र्यानी राज्यपालांकडे राजीनामा दिला तर ते सर्व मंतीमंडळ बरखास्त होते. मात्र राज्यपाल हे राजीनामे स्वीकारतात. त्यात मन वळवण्याचा प्रश्न नसतो. मंत्र्यानी मु. मं कडे दिलेला राजीनामा हा घरगुती मामला असतो. तो स्वीकारणे न स्वीकारणे मुमं चे डिस्क्रीशन आहे.
आमदाराचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे द्यावा लागतो.तो त्यानी स्वीकारला तर तो अमलात येतो. बर्याचदा काही आमदार स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षाकडे राजीनामा देतात ते एक नाराजीचे गेश्चर असते. स्टन्ट म्हणा हवे तर.... ::फिदी:
बॅगा भरायला घेतल्या का
बॅगा भरायला घेतल्या का मायलेकांनी ?
Pages