निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅगा भरायला घेतल्या का मायलेकांनी ?>>
असं काय करताय निवडुन आलेत की दोघं पन, सुटका नाही हो!!

महाराष्ट्रात तर २-३ महिनेच राहिले आहेत त्यामुळे नवीन लोक घेऊन प्रयोग करायला संधी नाही>>> म्हणुन तर स्टंट. Wink

Vadodara 20 NARENDRA MODI Bharatiya Janata Party MISTRI MADHUSUDAN DEVRAM Indian National Congress 570128 Result Declared

From Election commission website.

***************

Raigad 32 ANANT GEETE Shivsena TATKARE SUNIL DATTATREY Nationalist Congress Party 1102 Counting In Progress

****************

Baramati 35 SUPRIYA SULE Nationalist Congress Party MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 67342 Counting In Progress

************

Madha 43 MOHITE PATIL VIJAYSINH SHANKARRAO Nationalist Congress Party SADABHAU RAMCHANDRA KHOT Swabhimani Paksha 28491 Counting In Progress

***********

Nanded 16 ASHOK SHANKARRAO CHAVAN Indian National Congress D. B. PATIL Bharatiya Janata Party 61892 Counting In Progress

Last Updated at 4:42 PM On 16/5/2014

ह्म्म्म
मग आता समजा हे स्वीकारले गेले तर महाराष्ट्राच्या सरकारवर नक्की काय परिणाम होईल आता?
३-४ महिनेच निवडणुकीला उरलेले असताना?

शुन्य परिणाम.

सगळे म्हणत असणार आहेत कि बर झाल लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या झाल्या नाहितर कंप्लिट वाट लागली असती Wink

१९७७ मध्ये जनता पक्षाने बहुमत मिळाल्यावर त्यांन्नी ९ राज्यातील काँग्रेसच्या विधानसभा बरखास्त केल्या होत्या. त्याचे कारण लोकांचा कौल बदलला आहे असे दिले होते विशेषतः चरणसिंग फार आग्रही होते त्यासाठी. ते एकदम सूडाने पेटलेलेच होते. त्यामुळे ९ राज्यात मुदतपूर्व निवडणुका झाल्या. या वेळी तसे बहुधा भाजप सरकार करील असे वाटत नाही. कारण मुदतपूर्व पॉपुलर सरकार बरखास्त केल्याने केन्द्राबद्दल मतदारांची नाराजी वाढते व त्याचा परिणाम राज्यात होतो. याची अनेक उदाहरणे भारतात आहेत. देलगू देसम पार्टीचा उदय इन्दिरा गांधीनी अनेकदा तिथले सरकार बरखास्त केल्याने झाला. पंजाबचा प्रश्न अधिक चिघळण्याचे हेही एक कारण होते.
महाराष्ट्रात निवडणूक आयोग पावसाळ्यात तसेही एलेक्शन घेणार नाहीच.

नी,
मोदींनी लपवलेली बायको, मतदारांची वगळलेली नावे या मुद्द्यावर महाराष्ट्रातील निवडणूक लढवली जाईल का ?

हूडा तुझ्या हातभर लाम्बीच्या पोलिटिकली करेक्ट अन सरकारी माहिती अधिकारात दिल्या जाणार्‍या माहितीच्या खाक्यातील पोस्टीमधुन मला फारसे काही कळले नाही Wink
इतकेच सान्ग (माहित असेल तर) की महाराष्ट्रातील हार झाल्याबद्दल मन्त्रान्नी दिलेले राजिनामे हे स्टन्ट आहेत वा नाहीत? ते देखिल पुढील वि.स. निवडणूकीला केवळ काही महिने उरले असताना!

मग सध्या ते त्यान्नी मुख्यमन्त्र्यान्कडे दिलेत वा अजुन कुणाकडे, काय घेणे आहे आम्हाला?

आम्हाला आपली काळजी आहे ती पिंचीच्या पाणीपुरवठ्याची! तशी तर ती पुणेकरान्नाही करावी लागणार आहे.
मोदी आलेत म्हणजे काही लगेच जादुचि कान्डी फिरणार नाहीये, मात्र इकडचे लोक बर्‍याच काड्या करु शकतात पाणीपुरवठ्याचे बाबातीत, अन विधानसभेची इलेक्शन जवळच आलीये तर नक्किच!
आमचा मागल्यावेळचा अनुभव आहे साधी नगरपालिकेची निवडणूक तर आधी चार महिन्यापासून पाणी पुरवठा बोम्बलवलेला होता, अन् वर सरकारि अधिकारी माझे घरी येऊन सान्गत होते की "सरकारी नियमाप्रमाणे" जमिनी पासून एक मीटर उन्चीपर्यन्त पोहोचेल इतक्या दाबाने पाणीपुरवठा करण्याचे बन्धन आहे व तितके पानी येतय. अर्थात मी त्याला धू धू धुतला होता शब्दानी तिथेच ते सोडा, इलेक्शन झाली अन पुन्हा पानी पहिल्या मजल्यापर्यन्त पोहोचू लागले, नैतर ग्राऊन्ड फ्लोअरला पाण्याचा ग्यास हिटरही चालायचा नाही इतके कमी प्रेशर असायचे. असो.

आलिया भोगासि असावे सादर...... लौकरच पुन्हा विधानसभेची एलेक्शन आहे, तेव्हा ........

माझ्यामते जमेची बाजु म्हणजे, लोकांना गृहित धरता येत नाही हे दिग्गज लोकांना समजुन चुकले.
उदा. सु शी, भुजबळ , राणे इत्यादी. आपले काहीच नुकसान होउ शकत नाही याला जो तडा गेलाय तो महत्वाचा आहे. जेणे करुन पुढच्याचा ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे बकिचे ही बोध घेतील आणि शहाण्यासारखे वागतील. आणि हे लोक देखिल इथुन पुठे शहाण्यासारखे वागतील Happy

<<<हे सगळ्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचं काय नाटक आहे?>> <<महाराष्ट्रात तर २-३ महिनेच राहिले आहेत त्यामुळे नवीन लोक घेऊन प्रयोग करायला संधी नाही>>>.
मुळात ह्या सगळ्यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर राग आहेच. आता ह्या माकडांच्या हातात कोलीत सापडले , गिरा फिर भी तंगडी उपर प्रकार , जनतेला सर्कस दाखवायची खुमखुमी, बाकी काही नाही .

गुजरातमध्ये तीन मतदारसंघात ५ लाखांपेक्षा अधिक मार्जिन मिळालंय भाजपाला, अडवानी पावणेपाच लाख मार्जिनवर आहेत

लोकांना गृहित धरता येत नाही हे दिग्गज लोकांना समजुन चुकले. >>> अगदी अगदी. मागील आणी आत्ताच्या निवडणुकात, दोन्ही वेळेला निवडुन आलेल्यांनी दोघांनी लक्षात ठेवावे.

माझ्यामते जमेची बाजु म्हणजे, लोकांना गृहित धरता येत नाही हे दिग्गज लोकांना समजुन चुकले.

आपले काहीच नुकसान होउ शकत नाही याला जो तडा गेलाय तो महत्वाचा आहे. जेणे करुन पुढच्याचा ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे बकिचे ही बोध घेतील आणि शहाण्यासारखे वागतील. आणि हे लोक देखिल इथुन पुठे शहाण्यासारखे वागतील>>

+१०००००

सोनिया गांधीचा अपेक्षा भंग झाला म्हणे...>>>
हो ना, हरल्या असत्या तर ईटलीला जाता तरी असतं, धरलं तर चावतय सोडलं तर पळतय..

Last Updated at 5:22 PM On 16/5/2014
View vote share

ALL INDIA Result Status
Status Known For 543 out of 543 Constituencies
Party Won Leading Total
Bharatiya Janata Party 98 182 280
Communist Party of India 1 0 1
Communist Party of India (Marxist) 2 7 9
Indian National Congress 10 37 47
Nationalist Congress Party 2 4 6
Aam Aadmi Party 1 3 4
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 4 33 37
All India N.R. Congress 0 1 1
All India Trinamool Congress 10 24 34
All India United Democratic Front 0 3 3
Biju Janata Dal 0 20 20
Indian National Lok Dal 1 1 2
Indian Union Muslim League 2 0 2
Jammu & Kashmir Peoples Democratic Party 0 3 3
Janata Dal (Secular) 1 1 2
Janata Dal (United) 1 1 2
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 0 1 1
Lok Jan Shakti Party 1 5 6
Naga Peoples Front 0 1 1
National Peoples Party 0 1 1
Pattali Makkal Katchi 0 1 1
Rashtriya Janata Dal 1 2 3
Revolutionary Socialist Party 1 0 1
Samajwadi Party 0 5 5
Shiromani Akali Dal 1 3 4
Shivsena 6 12 18
Sikkim Democratic Front 0 1 1
Telangana Rashtra Samithi 1 10 11
Telugu Desam 0 16 16
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 0 1 1
Apna Dal 0 2 2
Rashtriya Lok Samta Party 0 3 3
Swabhimani Paksha 0 1 1
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 9 9
Independent 0 4 4
Total 144 399 543

Pages