निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला व्हाट्स app वर मिळाली महेश
मला ते गिते बद्दल थोड़ा डाउट वाटतोय
म्हणून इथे टाकुन खात्री करावी म्हटल

रायगड मधून अजून कोणीच निश्चेत विजय केलं नाहीये

Maharashtra - Raigad
Counting In Progress
Candidate Party Votes
TATKARE SUNIL DATTATREY Nationalist Congress Party 282671
ANANT GEETE Shivsena 281286

TATKARE SUNIL DATTATREY आघाडी 1385 Counting In Progress

एक भाप्रः काँग्रेसचे मंत्री राजीनामा देऊन काय करणार? उदा, सर्व मुख्यमंत्री राजीनामा देणारेत म्हणे. नारायण राणेही देणार.

रायगडमधून ४००० मतांनी शिवसेनेचे गिते विजयी >>> अनंतछंदी खर का? त्या कदमांनी बरीच मत खाल्ली आहेत आणि तिथे नोटाचा १४००० मतासाठी वापर झाला अहे.

बेफि, काही आयडियेची कल्पना सुचवा, हेडर मधे काय स्वरूपात अपडेट करू. आणि त्यासाठी निव्वळ निकाल कुठे चेक करू (आघाडी पिछाडी नाही). म्हणुन विचारतो आहे सारखा, एकच खात्रीशीर स्त्रोत सांगा कोणीतरी की ज्यावर केवळ जिंकलेले दाखवत असतील. अनेक ठिकाणी लिडस + रिझल्टस दाखवत आहेत.

23_0.JPG
सुप्रसिद्ध टिवटिव..

नाशिकमध्ये मनसेची अनामत रक्कम जप्त.>>
नविन ब्लु प्रिंट बनवायला घ्यावी लागणार

@गौरीम मला रायगडमधील एकाकडून व्हॉटसअपव्र समजले, १० मिनिटात अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
नोटांचा वापर.... हो जिथे जिथे कुत्रेही उद्योगपती असतात तिथे हे सहज शक्य आहे. :))

Pages