Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चेपू वरील पोस्ट. मोदींना
चेपू वरील पोस्ट.
मोदींना अमेरिकन विसा मिळणार - २०१४ च्या निवडणूका हेच सिध्द करतात कि गुजराथी माणूस अमेरिकन विसा साठी काही पण करू शकतो
विसा मिळण्याची वेगळी गरजच
विसा मिळण्याची वेगळी गरजच नाही, पंप्र होणार्या माणसाला खास प्रोटोकॉल असतात डिप्लोमॅट विसा, इ.
मोदिंना हेड आॅफ स्टेट म्हणुन
मोदिंना हेड आॅफ स्टेट म्हणुन अॅटोमॅटिक ए विजा मिऴेल.
मोदीनामाच्या त्सुनामीत अशोक
मोदीनामाच्या त्सुनामीत अशोक चव्हाणच नेमके का वाचावेत?
जे उमेदवार पडायला हवेत अशी इच्छा इथे व्यक्त केली गेली त्यातही चव्हाणांचे नाव नव्हते.
ही निवडणूक विकासाच्या राजकारणावर लढवली गेली असे म्हणणार्यांनी हा लेख वाचू नये अथवा वाचून अनुल्लेख करावा.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/right-wing-democracy-524305/?nop...
"या निवडणुकीनंतर 'काँग्रेसमुक्त भारत' घडविण्याचे मोदींचे स्वप्न आहे. काँग्रेस पक्षाची सध्याची दुरवस्था पाहता या पक्षाचे काय व्हायचे ते होवो- त्याविषयीची कोणी चिंता करण्याजोगी परिस्थिती नाही, परंतु भारतीय लोकशाहीच्या ऐतिहासिक वाटचालीत निरनिराळ्या कारणांमुळे, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रवादाची, लोकशाहीची आणि विकासाचीदेखील एक लवचीक, सहिष्णू आणि लोकाभिमुख संकल्पना साकारली गेली याला नकार देता येणार नाही. या संकल्पनेचे वर्णन कधी 'नेहरूप्रणीत सहमती' तर सुनील खिलनानींच्या भाषेत कधी 'आयडिया ऑफ इंडिया' असे केले गेले. या संकल्पनेच्या चौकटीत घडलेला काँग्रेसचा प्रत्यक्ष राजकीय व्यवहार तिला साजेसा होताच असे नव्हे; किंबहुना लोकशाही, राष्ट्रवाद आणि विकास या तीनही मुद्दय़ांसंबंधी काँग्रेसचा व्यवहार उत्तरोत्तर अधिकाधिक वादग्रस्तच होत गेला आहे. तरीदेखील गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या काळात या संकल्पनांची अधिमान्यता आणि 'आयडिया ऑफ इंडिया'चे मध्यवर्ती स्थान टिकून राहिलेले दिसते. म्हणूनच आता काँग्रेसला नाकारताना या भारताच्या संकल्पनेलाही नाकारून एक ताठर, असहिष्णू आणि अन्यवर्जक नव्या भारताची संकल्पना येत्या काळात आपण पुढे मांडतो आहोत काय याचा आत्ताच गांभीर्याने विचार करायला हवा"
मोदीसरकारचे अभिनंदन आणि
मोदीसरकारचे अभिनंदन आणि भाजपच्या नेत्यांना व भारतीय जनतेला (माझ्यासकट) शुभेच्छा!
या निवडणुकांनंतर भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अंतर्गत राजकारणाचे/व्यवस्थेचे पट आमूलाग्र बदलतील असे वाटते.
भरत, तुमचे काय मत आहे अशोक
भरत, तुमचे काय मत आहे अशोक चव्हाण निवडून कसे आले याबद्दल, विशेषतः आदर्श मधे नाव असताना?
ते काँग्रेसमुक्त भारत वगैरे निवडणुकीच्या वेळचे नारे नंतर किती राहतात ते काही दिवसांत कळेल. पण एकूण सर्वसमावेशक, सहिष्णू वगैरे मधे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही.
फारेण्ड, माझे वडील म्हणाले
फारेण्ड, माझे वडील म्हणाले चव्हाणांनी मतदारांना पैसे वाटले. यावर माझे उत्तर होते याचा अर्थ मतदारांनाच भ्रष्टाचार हवा असतो.
भ्रष्टाचार ही मूळ समस्या असेल तर त्यावर या निवडणुकीने काही उत्तर शोधलेले दिसत नाही.
चव्हाण कसे निवडून आले असतील याबद्दल मी अनभिज्ञ आहे.
ज्या उमेदवारांना आपल्या
ज्या उमेदवारांना आपल्या निवडुन येण्याबद्दल असणार्या तीव्र विरोधाची जाणिव होती त्यांनी ही निवडणुक खुपच गांभिर्याने घेतली. उदा. कोल्हापुर. मोदींचा करिष्मा अगदी मिरजेत सुद्धा चालला. पण दुर्दैवाने ज्या उमेदवारांनी मला कोण पाड्तय अशी भुमिका घेतली ते अक्षरशः भुइसपाट झाले. राजु शेट्टी निवडुन येणार हे अगदी ६ महिण्यापासुन सगळ्यांना माहित होते पण तरीही प्रचारात त्यांनी अक्षरशः झोकुन देवुन जीवाचे रान केले.
कोल्हापुरात महाडिकांना होणारा विरोध त्यांना स्वतःला माहित होता. त्यांनी कोणतीही गोष्ट गृहित न धरता प्रचाराचे रान उठवले. त्याचे फळ या दोघांनाही मिळाले. अशोक चव्हांनाना देखिल तिकिट अगदी निसटता निसटता मिळाले. आणि त्यांना हे नक्कि माहित होते कि हीच त्यांची पुर्न्वसनाची शेवटची वेळ आहे,
बाकि सगळ्यांनी बर्याच गोष्टी गृहित धरल्या. त्याचे तसे फळ त्यांना मिळाले.
अगदी मोदींनी ( स्वतः) प्रचारासाठी जेवढी मेहनत घेतली ती इतर कोणिही घेतलेली दिसली नाही. प्रत्येकजण दुसर्यावर अवलंबुन होता. आमदार आपलाच आहे. इथे आपल्याला एवढे मताधिक्य आहेच. इन्फॅक्ट तेवढे मताधिक्य देणे ही त्याचीच जबाबदारी आहे या अपेक्षेत लोक राहिले. नाहि आले मताधिक्य तर त्याला जबाबदार धरु.
कोल्हापुरचा निकाल हा खरोखर एक रोल मॉडेल ठरला आहे कि अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये कसे निवडुन येता येउ शकते. सगळीकडे कमळ फुलले असताना स्थानिक २ आमदार महायुतीचे असताना देखिल घड्याळाला खासदारकि मिळते. ऑल क्रेडिट गोज टु प्रॉपर प्लॅनिंग अँड हॅविन थ्रेट ऑफ डीफिट.
बाकि हरले त्यांचे क्रेडीट गोज टु लॅक ऑफ प्लॅनिंग अँड अंडरैस्टीमेशन ऑफ द / फॉर पिपल.
शेवटी हर कदम कुछ सिख मिलही जाती है
चव्हाण निवडून आले तरीही
चव्हाण निवडून आले तरीही त्यांचे भवितव्य निवडणुक आयोग पेड़ न्यूज़ प्रकरणी काय निकाल देते यावर अवलंबून आहे
इति मटा
कल्याण डोंबिवली पारंपारीक
कल्याण डोंबिवली पारंपारीक युतीचाच आहे, मागच्या वेळी पण सगळीकडे काँग्रेस असतानाही युतीचे आनंद परांजपे आले होते. ते राष्ट्रवादीत गेले, मनसेचा उमेदवार होताच उभा. तरीपण युतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आला. मागच्यावेळी विजय खूप कमी मताने होता. तेवीस हजार मतांनी निवडून आले होते परांजपे पण श्रीकांत शिंदे अडीच लाख मतांनी निवडून आले. मनसेचा एक आमदार असून मनसे तिसऱ्या क्रमांकावर.
खासदार राष्ट्रवादीत जाऊन, विशीष्ट जातीची मते मिळतील असं राष्ट्रवादिला वाटलं असेल तर, जातीला मते दिली जात नाहीत हे इथे सिद्ध झाले.
निपा छान विश्लेषण.
निपा चांगलं विश्लेषण आहे.
निपा चांगलं विश्लेषण आहे. मुन्ना महाडिक निवडून येण्यामागं त्याचे कष्ट आणि प्लॅनिंग तर असेलच पण सतेज पाटलांनी पण साथ दिली हे पण महत्त्वाचं कारण असणार आहे.
इतके दिवस अनुकुल वातावरणातपण कधी महाडिकांच्यातलं कोणि थेट निवडून आलं नव्हतं पण यावेळी इतर प्रतिकुल परिस्थितीतपण मुन्ना निवडून आला हे खरंच आश्चर्यकारक आहे. सांगलीतमात्र नक्कीच मोदी करिश्मा आणि प्रस्थापितांवरची नाराजी चालली.
धन्यवाद सतेज पाटलांची साथ
सतेज पाटलांची साथ मिळवण्यासाठी त्यांनी ९५ % कष्ट केले अस म्हटल तरी ते चुकिचे ठरणार नाही.
बाकि मोदी लाट मोदी लाट म्हणण सोप आहे पण त्यामागचे कष्ट आणि लाँग टर्म प्लॅनिंग बहुतेक जण लक्षात घेत नाहीत. त्यांची एक सभा जर कोल्हापुरात झाली असती तर चित्र उलटे झाले अस्ते . महायुतीला याची आत्यंतिक गरज होती पण त्यांना ती 'एवढी' गरज वाटली नाही / जाणवली नाही. क्या फरक पडता है? या भुमिकेतुन पाहिले गेले.
वास्तविक मिरजेच्या सभेला आले असता मोदींचे विमान कोल्हापुरात उतरले होते आणि तेथुन पुढे ते हेलिकॉप्टरने गेले होते.
आतल्या गोटातुन असे कळते कि त्या दरम्यान (जेंव्हा महायुतीने सभा प्लॅन करायचे ठरवले होते) जोतिबा यात्रेमुळे पोलिस खुप बिझी होते आणि सभेसाठी पुरेसे पोलिसदल उपल्ब्ध नव्हते
बाकि महाडिकांचा फॉर्म भरण्यापासुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ दिली.
कॉन्ग्रेसच्या / राष्ट्रावादी
कॉन्ग्रेसच्या / राष्ट्रावादी कॉन्ग्रेसच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, वॉर्ड पातळीवरच्या नेत्यांना पैसे मिळाल्याशिवाय काम करण्याची सवय राहिलेली नाही. अगदी छोट्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत पैसे मिळाले तरच काम केले जाते. ह्या निवडणुकीत हारण्याची शक्यता असल्याने पैश्याच्या चंच्या काँ/राकाँकडून उघडल्या गेल्या नाहीत. ज्यांचे धंदे निवडणुकीवर अवलंबून आहेत (मांडववाले, प्रिन्टिंगवाले, ट्रान्सपोर्ट, निवडणुक सॉफ्टवेअरवाले) त्यांच्याशी बोललात तर भारतभर विशेषतः महाराष्ट्रात काँग्रेसकडून पैसा किती कमी सुटला हे तुम्हाला ऐकायला येईल. भाजपाची पद्धत ही बरीच वेगळी आहे, कॅडरबेस्ड पक्ष असल्याने आणि अनेक वर्षे जिंकून यायची शक्यता नसली तरी काम करण्याची तयारी असणारे बरेच कार्यकर्ते आहेत. सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीया वरचा 'प्रचार ब्लिट्झक्रिग' बर्यापैकी स्वस्तात आणि व्हाइट मनीत झाला आहे.
ह्यावेळी सोशल मिडियाने अतिशय
ह्यावेळी सोशल मिडियाने अतिशय महत्वाची भूमिका बजावली. फेबु, whats appने तर सॉलिडच.
टण्याच्या वरच्या अख्ख्या
टण्याच्या वरच्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन.
---
आतल्या गोटातुन असे कळते कि त्या दरम्यान (जेंव्हा महायुतीने सभा प्लॅन करायचे ठरवले होते) जोतिबा यात्रेमुळे पोलिस खुप बिझी होते आणि सभेसाठी पुरेसे पोलिसदल उपल्ब्ध नव्हते>>> ह्याचाच दुसरा अर्थ, त्यांनी तिथल्या ऑलरेडी बिझी असलेल्या जनतेला आणि पोलिसदलाला राजकारणासाठी वेठीस धरले नाही. ज्योतिबाची यात्रा ही कोल्हापुरकरांच्या जवळची आणि त्यांच्या संस्कृतीतली गोष्ट आहे. तिला डिस्टर्ब केले गेले नाही. आषाढीच्या वेळेस पुण्यात दिंड्या असतात. त्याच वेळेस असा एखादा बडा नेता राजकारणासाठी यायचा झाला तर पुणेकर पोलिसांना आणि जनतेला "इथे बघू?" की "तिथे बघू?" असं होऊन जाईल.
टण्या पोस्ट आवडली
टण्या पोस्ट आवडली
वा अश्विनी मस्त, छान वेगळा
वा अश्विनी मस्त, छान वेगळा मुद्दा मांडला.
टण्या, मस्त पोस्ट.
टण्या आणि अश्विनीला
टण्या आणि अश्विनीला अनुमोदन..
रच्याकने, संघ कार्यकर्त्यांना पुन्हा 'अच्छे दिन' दिसतील का? संघ लोकप्रियता/सहभाग वाढेल का?
ट्ण्याच्या पोस्टमधे काम
ट्ण्याच्या पोस्टमधे काम करणार्यांना मिळणार्या पैशांबद्दल लिहिले आहे.
मते मिळण्यासाठी वाटल्या जाणार्या नाही ना ??
टण्या, विवेचन खासकरून
टण्या, विवेचन खासकरून आवडलं.
आ.न.,
-गा.पै.
Pages