निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार... राज्यातील २० मतदारसंघांचे विजेते घोषित झालेले आहेत.... एक नजर टाकुयात... या मतदारसंघांतील विजेत्यांवर...
Ø रायगड - रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते विजयी....राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंनी जोरदार दिली टक्कर , शेवटच्या फेरीपर्यंत चुरस
Ø हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज् शेट्टी पुन्हा विजयी... १ लाख ७७ हजार मतांनी मिळवला विजय
Ø सिंधुदुर्ग - विनायक राऊत विजयी
Ø मावळ - श्रीरंग बारणे १ लाख ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी
Ø भिवंडी - भाजपचे कपिल पाटील विजयी... काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांचा केला पराभव
Ø सातारा - उदयराजे भोसले ५ लाख २२ हजार २३१ मतांनी विजयी
Ø अमरावती - शिवसेनेचे आनंदराव अडसुळ विजयी, नवनीत कौरचा पराभव
Ø वर्धा - सागर मेघेंनी हरवत भाजपचे रामदास तडस विजयी
Ø जालना - रावसाहेब दानवे २ लाख मतांनी विजयी
Ø कल्याण - शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे २ लाख २५ हजार मतांनी विजयी
Ø लातूर - भाजपचे सुनील गायकवाड २ लाख ५० हजार मतांनी विजयी
Ø उस्मानाबाद - रवी गायकवाड विजयी... राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील पराभूत
Ø बुलडाणा - शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी
Ø लातूर - भाजपच्या सुनिल गायकवाड यांचा जवळपास २ लाख ५० हजार मतांनी विजय
Ø नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचा दारुण पराभव... १ लाख ८७ हजार मतांनी झाला पराभव... महायुतीच्या हेमंत गोडसे यांचा विजय... तर मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिट जप्त
Ø कल्याण - शिवसेनेचे श्रीकांत शिंदे २ लाख १५ हजार मतांनी विजयी... राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या आनंद परांजपे यांना पराभवाचा धक्का
Ø जळगाव - भाजपचे ए. टी. पाटील २ लाख ७५ हजार मतांनी विजयी, राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीष पाटील पराभूत, ए.टी.पाटील यांना दुसऱ्यांदा खासदारकी
Ø रावेर - भाजपच्या रक्षा खडसे यांनी १ लाख ५० हजार मतांनी विजय
Ø धुळे - भाजपच्या सुभाष भांबरेंचा विजय
Ø दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण २ लाख ४७ हजार मतांनी विजयी

ह्याला लाट म्हणणे म्हणजे ज्यांनी विचारपूर्वक भाजपला मत दिले आहे किंवा काँग्रेसच्याविरुद्ध मतदान केले आहे त्यांचा अपमान ठरेल >>

अनुमोदन बेफी. ह्यावेळी भाजप येणार होते आणि काँग्रेस एक्झिट होणार होते. इट वॉज रिटन ऑन वॉल.

मी जे लिहलेत ते नक्कि विजयी घोषित झालेलेच आहेत. पण वॉट्सप वर फिरणारे बरेच मेसेज हे लिड वाले आहेत.

अरे असे काय करत आहात.. जिंकलेल्या आणि आघाडीवर असलेल्या सीट्स दाखवत आहे. आणि जिथे जिथे जिंकले म्हणून सांगत आहेत तिथे मतांचा फरक लक्षात घेतल्यास काही झाले तरी विजयी उमेदवार बदलणार नाहीये म्हणूनच जिंकले असे सांगर आहेत... जास्तीत जास्त २०००० मतांचा फरक असेल तर पुढे मागे होऊ शकते.. डोक्यावरुन पाणी ५००००.. पण त्याहून जास्त आघाडी असेल तर मोठे नेते जिंकले असेच मानले जाते आणि तसेच दाखवत आहेत..

केजरीवालांना विचारले की बनारस मध्ये तुम्ही कोणाला मतदान केले?
उत्तर- इस देश का आम आदमी अबकी बार मोदी सरकार का नारा लगा चुका है !! मै आम आदमी हूं.

एन्डीटीव्हीवर जो मॅप दाखवत आहेत तो जबरी आहे.. त्यात कुठे कुठे मधेच निळा रंग दिसतोय काँग्रेस चा बाकी सगळे केशरी आहे..

मुंबईमधील मनसे उमेदवार कितव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत?

(सध्या मला पहिल्या क्रमांकापेक्षा दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर कोण आहे याबद्दल जास्त उत्सुकता लागली आहे. Wink )

नाशिकमध्ये मनसेचे डिपॉझिट जप्त ना?
कल्याण-डोंबिवलीत काय स्थिती आहे मनसेची?

जिप्स्या... मनसे बहुतेक ठिकाणी ३ नंबर वर आहे.. पण पहिल्या दोघांची मते खूपच जास्त आहेत.

कल्याण मतदारसंघात नाही कळले मनसेला किती मिळाले पण ह्यावेळी जोर नव्हता, जे आमदार आहेत इथे कल्याण ग्रामीणचे त्यांचाच भाऊ उभा तरी काही फरक पडला नाही. श्रीकांत शिंदेना दोन लाख पंधरा हजार मतांची आघाडी आहे. बहुतेक मनसे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ALL INDIA Result Status
Status Known For 540 out of 543 Constituencies
Party Won Leading Total
Bharatiya Janata Party 26 255 281
Communist Party of India 1 0 1
Communist Party of India (Marxist) 1 9 10
Indian National Congress 3 39 42
Nationalist Congress Party 1 5 6
Aam Aadmi Party 0 4 4
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 36 36
All India N.R. Congress 0 1 1
All India Trinamool Congress 3 31 34
All India United Democratic Front 0 3 3
Biju Janata Dal 0 20 20
Indian National Lok Dal 0 2 2
Indian Union Muslim League 0 2 2
Jammu & Kashmir Peoples Democratic Party 0 3 3
Janata Dal (Secular) 1 1 2
Janata Dal (United) 0 2 2
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 0 1 1
Lok Jan Shakti Party 0 6 6
Naga Peoples Front 0 2 2
National Peoples Party 0 1 1
Pattali Makkal Katchi 0 1 1
Rashtriya Janata Dal 0 3 3
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 0 5 5
Shiromani Akali Dal 1 3 4
Shivsena 2 17 19
Sikkim Democratic Front 0 1 1
Telangana Rashtra Samithi 0 11 11
Telugu Desam 0 15 15
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 0 1 1
Apna Dal 0 2 2
Rashtriya Lok Samta Party 0 3 3
Swabhimani Paksha 0 1 1
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 9 9
Independent 0 4 4
Total 39 501 540

केदार ४६ पण नाहीत रे फक्त ४२..

एकाच पक्षाचे सरकार(बेरजेची गणिते न मांडता)... याला खरंच अच्छे दिन आने वाले है म्हणायला हरकत नाही.>>
यावेळेस तरी "घोडा बाजार" टळला

प्रतापसिंहांनी मतं खाल्ल्याने दादा माढ्यातून निवडून आले.
सोलापूरात तर लोकांनी शिंद्यांकडून पैसे घेऊन मतं भाजपला दिली!

भारतात मोठ्या कालावधीनंतर बहुमताचे ( बिन आघाडीचे ) सरकार येणार आहे असे दिसतेय. त्यामूळे जया, ममता व तत्सम लोकांची मनधरणी न करता काही धोरणे आखता येतील.. >>>>>+10000000

नी +१००
मला आठवतंय तेव्हापासून कायम हीच रड होती, कडबोळी सरकारे आणि घोडा बाजार !! त्या पार्श्वभूमीवर हा निकाल फारच आश्वासक आहे !! बेस्ट काम झालं !! गुड जॉब इन्डिया !! Happy

ह्या प्रकाराला लाट म्हणूच नये असे मला वाटते. जेव्हा आपण लाट म्हणतो तेव्हा मतदार भावनिकपणे निर्णय घेत आहेत असा अर्थ होतो. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडून स्वतःची इच्छा अतिशय संतुलित मनस्थितीतून प्रदर्शीत केलेली आहे. एक सूज्ञ निर्णय घ्यायचा म्हणून अनेक वर्षे काँग्रेसवर ठेवलेला विश्वास पाच वर्षांसाठी भाजपवर दाखवलेला आहे. ह्याला लाट म्हणणे म्हणजे ज्यांनी विचारपूर्वक भाजपला मत दिले आहे किंवा काँग्रेसच्याविरुद्ध मतदान केले आहे त्यांचा अपमान ठरेल.>>>>>>>.

+ 1000000000

kevaL modI paahije mhanun matadaan jhaalele naahi tar aataa je aahet te jaavet hi bhaavanaa aahe

aani tya bhaavane barobarch, modini gurajatet karun daakhavalelyaa kaamaache chitra dolyasamor aahe. aaj modi nasate tar bjp he vijay milavu shakale nasate. modini keval tyanchya kaamaachya joraavar he yash milavale aahe. pudhe kaay hoil te maatra dev jaano. achche din to sabhiko chahiye..

१ पेक्षा जास्त जागा असलेल्या राज्यांमध्ये ९ राज्यात काँग्रेसला एकही जागा नाहीये.. आंध्रा, दिल्ली, गोवा, हिमाचल, जम्मू काश्मीर, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड आणि गुजराथ

भारतात मोठ्या कालावधीनंतर बहुमताचे ( बिन आघाडीचे ) सरकार येणार आहे असे दिसतेय. त्यामूळे जया, ममता व तत्सम लोकांची मनधरणी न करता काही धोरणे आखता येतील.. >>>>>+10000000
अनुमोदन

>>>> यापेक्षा एग्झीट पोलचे निकाल चांगले होते - दिव्गीजय सिंग
>>>> इस देश की जनता भी मोदी से मिली हुई है - केजरीवालचा लेटेस्ट आरोप

भन्नाट, ही दोन्ही वाक्ये मी फेसबुक वर टाकतो, अर्थात इथला संदर्भ जमेल तितका दिला तरी लिन्क देता येणार नाही की इथुन डायरेक्ट शेअर करता येत नाही (नैतर तसेच केले अस्ते)

बहुतेक इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचे(८४/८५) इलेक्शन घोडाबाजाराविनाचे होते त्यानंतर घोडाबाजारच होता प्रत्येकवेळी. हो ना?

Pages