निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांगलीत काँग्रेस पराभूत! लोकसभेच्या १५ पैकी गेल्या सलग १२ निवडणुकांत ही जागा काँग्रेसची होती. मोदीलाटेचा जोर जब्बरदस्त आहे.
-गा.पै.

आतापर्यंतचे डिक्लेअर केलेले :-

भाजप - १३४
शिवसेना - ९
एनडीए - १४५

काँग्रेस - १६
राष्ट्रवादी - २
यूपीए - २०

आप - २
जयललिता - ८
ममता - १२
बिजू - ९

लाट कसली त्सुनामी आलीय. ज्यात कॉंग्रेस पार धुवून निघालीय.>>> हेच बोल्लो आता आम्हीही हापिसात काँग्रेस पार वाहुन गेलीये त्सुनामीत Happy

उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी - भाजप
उत्तर पश्चिम - गजानन कीर्तीकर - शिवसेना
उत्तर पूर्व - किरीट सोमय्या - भाजप
उत्तर मध्य - पूनम महाजन - भाजप
दक्षिण मध्य - राहुल शेवाळे - शिवसेना
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत - शिवसेना
पालघर - चिंतामण वनगा - भाजप
भिवंडी - कपिल पाटील - भाजप
कल्याण - श्रीकांत शिंदे - शिवसेना
ठाणे - राजन विचारे - शिवसेना
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत - शिवसेना
रायगड - सुनील तटकरे - राष्ट्रवादी
नंदुरबार हिना गावित - भाजप
धुळे सुभाष भामरे - भाजप
जळगाव - ए टी पाटील - भाजप
रावेर - रक्षा खडसे - भाजप
नाशिक - हेमंत गोडसे - शिवसेना
दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण - शिवसेना
जालना - रावसाहेब दानवे - भाजप
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे - भाजप
लातूर - सुनील गायकवाड - भाजप
बीड - गोपीनाथ मुंडे - भाजप
नांदेड - अशोक चव्हाण - काँग्रेस
हिंगोली - सुभाष वानखेडे - शिवसेना
उस्मानाबाद रवी गायकवाड - शिवसेना
परभणी - संजय जाधव - शिवसेना
मावळ - श्रीरंग बारणे - शिवसेना
पुणे - अनिल शिरोळे - भाजप
बारामती - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी
हातकणंगले - राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना
शिर्डी - सदाशिव लोखंडे - शिवसेना
कोल्हापूर - धनंजय महाडीक - राष्ट्रवादी
सोलापूर - शरद बनसोडे - भाजप
शिरुर - आढळराव पाटील - शिवसेना
अहमदनगर - दिलीप गांधी - भाजप
सांगली - संजयकाका पाटील - भाजप
माढा - सदाभाऊ खोत - स्वाभिमानी शेतकरी संघटना
सातारा - उदयनराजे भोसले - राष्ट्रवादी
बुलढाणा - प्रतापराव जाधव - शिवसेना
अकोला - संजय धोत्रे - भाजप
अमरावती - आनंदराव अडसूळ - भाजप
यवतमाळ-वाशिम - भावना गवळी - शिवसेना
वर्धा - रामदास तडस - भाजप
रामटेक - कृपाल तुमाले-भाजप
भंडारा-गोंदिया - नाना पटोळे - भाजप
चंद्रपूर - हंसराज अहीर - भाजप
नागपूर - नितीन गडकरी - भाजप
गडचिरोली-चिमूर - अशोद नेहते - भाजप

ही यादी मिळाली
बरोबर आहे का

ह्या प्रकाराला लाट म्हणूच नये असे मला वाटते. जेव्हा आपण लाट म्हणतो तेव्हा मतदार भावनिकपणे निर्णय घेत आहेत असा अर्थ होतो. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडून स्वतःची इच्छा अतिशय संतुलित मनस्थितीतून प्रदर्शीत केलेली आहे. एक सूज्ञ निर्णय घ्यायचा म्हणून अनेक वर्षे काँग्रेसवर ठेवलेला विश्वास पाच वर्षांसाठी भाजपवर दाखवलेला आहे. ह्याला लाट म्हणणे म्हणजे ज्यांनी विचारपूर्वक भाजपला मत दिले आहे किंवा काँग्रेसच्याविरुद्ध मतदान केले आहे त्यांचा अपमान ठरेल. Happy

सकाळी स्मृती ईराणी अमेठीतून पुढे होती आता रागां कसे काय गेले पुढे>>.
फारसा फरक नव्हता १-२ हजार मतांच्या फरकाने ही लढत चालु आहे/ होती(?). रागा जिंकला तरी जास्त फरकाने नाही जिंकणार, मातोश्री निवडुन आल्यात पण नेहमीप्रमाणे..

जाई, तुम्ही ही माहिती कशी गोळा करत आहात <<<

महेश सकाळपासून प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत आहेत.

Pages