Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॅडविच मधे घालायला ब्रॉकोली
सॅडविच मधे घालायला ब्रॉकोली स्प्राउटस आणि क्लोवर स्प्राउटस आणले होते, ते अजून कुठे वापरता येतील ?
पुलाव/मसालेभात किंवा नूडल्स
पुलाव/मसालेभात किंवा नूडल्स मध्ये चालतील
ब्रॉकोली-उकडलेल्या बटाट्याची
ब्रॉकोली-उकडलेल्या बटाट्याची भाजी भन्नाट लागते. मवा, जरा वेळानं विपू बघा.
रेसिपीबद्दल थँक्स. गूगलल्यावर
रेसिपीबद्दल थँक्स.
गूगलल्यावर http://www.yummly.com/recipes/fresh-broccoli-sprouts आणि http://www.theeconomicaleater.com/2012/10/my-current-obsession-broccoli-... मिळालं.
mala tilpoli chi recipe koni
mala tilpoli chi recipe koni suchvel ka plzzzzz
करायला गेले गूळपोळी...
करायला गेले गूळपोळी...
http://www.maayboli.com/node/14369?page=2
मला egg puff pastry ची कृती
मला egg puff pastry ची कृती हवी आहे ?? मायाजालावर दक्षिण पद्धतीने कांदा- उकडलेले अंडे इत्यादि प्रकार सुचवले आहेत पण एग्ग pastry ची चव मला पण लक्षात नाही आहे
उकडलेला बटाटा-चीज ,चिली फ्लेस, मिरपूड घालून pastry केली आहे. बाकी मायाजालावर बटाटेवडा चे सारण घालून कृती आहे. अजून काही प्रकार, कृपया सुचवा.
झुकिनीची कुरकुरीत धिरडी आणि
झुकिनीची कुरकुरीत धिरडी आणि डिपिंग सॉस अशी एक रेसिपी मायबोलीवर वाचल्याच आठवतय. कुणाला धागा देता येइल का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19129
प्रवासात नेता येणार्या
प्रवासात नेता येणार्या पदार्थांचा धागा होता. कोणाला माहिती आहे का?
प्रवासात नेता येणारा एक
प्रवासात नेता येणारा एक पदार्थ ---
तिखट-मिठाच्या पुर्या --
साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार,
हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी.
कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या.
गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात. प्रवासात नेण्यास उत्तम, पोटभरीचा खाऊ.
निवा, मस्त रेसिपी.
निवा, मस्त रेसिपी.
प्रॅडी: धन्यवाद!
प्रॅडी: धन्यवाद!
अहाहा! तिखटामिठाच्या पुऱ्या!
अहाहा! तिखटामिठाच्या पुऱ्या! यम्म! घराची जाम आठवण आली! भारतातून निघताना आई ह्या पुऱ्या आणि घारगे करून देते नेहमी... इथे आले की ४ दिवस पुरवून पुरवून खायच्या! दोन्ही प्रकार भयंकर आवडतात पण तळण नको म्हणून करत नाही. काही युक्ती आहे का तळण टाळण्यासाठी?
धन्यवाद निवा. या पुर्या किती
धन्यवाद निवा. या पुर्या किती दिवस टिकतात?
तिखटामिठाच्या पुर्या ४-५
तिखटामिठाच्या पुर्या ४-५ दिवस तर आरामात टिकतात. सौम्य तापमानात आठवडाभरापर्यंत राहू शकतील कदाचित. तुमच्या येथे उन्हाळा खूप असेल तर मात्र किती टिकतील ह्याबद्दल शंका आहे.
खाकरे, ठेपले, दशम्या, पुरणपोळ्या हे प्रकारही बर्यापैकी टिकाऊ आहेत.
दिवाळीतले फराळाचे पदार्थ (चकल्या, चिवडा, शंकरपाळे, लाडू, शेव इ.) देखील टिकाऊ.
सध्या बाजारात रेडी टू ईटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पॅकबंद पदार्थ असल्यामुळे गरजेनुसार ओपन करायचे व खायचे. टिकण्याची वगैरे भानगड नाही.
अॅस्पॅरॅगस चे काय करता येइल?
अॅस्पॅरॅगस चे काय करता येइल? मी जाड देठ कापून ग्रील केले वर ऑलिव ऑइल, मीठ मीरपूड टाकून पाहिले. अजून काही रेसिपी ?
ज्ञाती, अस्पॅरगस भाजून त्याचं
ज्ञाती, अस्पॅरगस भाजून त्याचं सूप करता येइल. त्यात थोडे ग्रीन्स टाकायचे सर्व्ह करतांना.
ज्ञाती अॅस्पॅरॅगस भाजी पण
ज्ञाती अॅस्पॅरॅगस भाजी पण छान लागते... फरसबीसारखीच करावी. फारवेळ शिजवु नये. थोडी क्रंचीच ठेवावी.
ज्ञाती, मी अॅस्पॅरॅगस, चीझी
ज्ञाती, मी अॅस्पॅरॅगस, चीझी पास्ता मध्ये मश्रूम बरोबर एका स्पॅनिश मैत्रिणी कडे खाल्ला आहे. चांगला लागतो.
अॅस्परॅगस चे तुकडे आमटीत
अॅस्परॅगस चे तुकडे आमटीत (शेवग्याच्या शेंगांसारखे) मस्त लागतात.
इथे प्रॅडी की निंबुडाने
इथे प्रॅडी की निंबुडाने लिहिलेली एक रेसिपी आहे.
गोविन्द विडा - चार पाने
गोविन्द विडा - चार पाने घ्यावीत. चुना लावावा. प्रथम दोन पालथ्या पानांचा द्रोणवजा त्रिकोणी आकार करुन त्यात विड्याचे साहित्य भरावे व त्याच्या चारही बाजु दुमडुन पिरँमिडसारखा आकार करावा.तो दुसर्या दोन पालथ्या पानावर ठेवुन, प्रथम लांबीच्या बाजुने पाने दुमडुन, त्यावर दुसर्या दोन बाजु दुमडाव्यात व मध्यावर लवंग टोचावी.
चुभुदयाघ्या.
ता. क.
वरील मजकुर रुचिरा मधुन घेतला आहे.
विड्याच्या साहित्यात
विड्याच्या साहित्यात केवड्याच्या काथापासून इतर गोष्टी आहेत, त्या कोणत्या, हे लिहिल्याशिवाय गोविंदविडा अपुरा आहे.
केवड्याच्या कणसाच्या पानांत काथ-भुकटी भरून, ती पाने एकावर एक रचून डब्यात घालून सुमारे ३ अठवडे ठेवली जात. या नंतर तयार होणार्या चिकट तपकिरि ओलसर गोळ्याची (पानांच्या ओलसरपणाने काथ ओला होई. वाळली पाने काढून टाकली जात) पोळी लाटून कात्रीने त्याच्या छोट्या शंकरपाळीसारख्या वड्या, वा हाताने गोल वळून गोळ्या बनवणे हे काम आजी करीत असे. त्या काथवडी/गोळीला केवड्याचा सुंदर सुगंध येत असे.
ही नॉस्टाल्जिक आठवण व केवड्याच्या काथेची पाकृ त्यानिमित्ताने आठवली.
पानमसाला नामक गुटख्यांच्या अमर्याद खपामुळे आजकाल चांगला काथ मिळणे अवघड झालेय, खैराची झाडेदेखिल नष्ट होऊ लागलीत. हे रच्याकने.
ज्ञाती, मी अॅस्पॅरॅगस चे
ज्ञाती, मी अॅस्पॅरॅगस चे भरीत करते. स्टीम करून मॅश करायचे. त्यात थोडा कच्चा कांदा बारीक चिरून, थोडं दही, दाण्याचा कूट, मीठ, मीर्ची, साखर. भारी लागतं ते.
ज्ञाती, अॅस्परागस किंचीत
ज्ञाती, अॅस्परागस किंचीत मीठाच्या पाण्यात वाफवून, निथळून घेऊन मग ऑऑत लसूण परतून ॑त्यावर अॅस्परागस परतूनही चांगलं लागेल असं वाटतंय. मागे स्वातीने काहीतरी प्रकार सांगितला होता ह्याचा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25196 हा धागा अॅस्परेगस साठी आहे.
मृदुलाच्या विचारपुशीत पान क्र. ४ वर मी अॅस्परेगसच्या सूपची रेसिपी टाकली आहे.
आमच्या कॉलनी मधे एक फन फेअर
आमच्या कॉलनी मधे एक फन फेअर असतं त्यात आम्ही मैत्रीणी मिळून खाण्याचा स्टॉल लावणार आहोत. आम्हाला सोपे, अमराठी जनतेला आवडतील असे पदार्थ सुचवाल ? पदार्थ करायला कमी खटाटोपाचे, उरले तर टिकणारे, गार पण खाल्ले तरी चालणारे असावेत शक्यतो. तिथे मायक्रोवेव असणार आहे.
आम्हाला सुचलेले पदार्थ : मिसळ, बेसन लाडू, कॉर्न चाट, मसाला खाकरा (मसाला पापड च्या धरती वर), श्रीखंड, ढोकळा.
एखादं छान नाव पण सुचवा. मी उत्तर प्रदेशात राहते. इथल्या लोकांना कळेल पण मराठी मातीचा वास असेल अस नाव हवं.
मखाणे आणले आहेत. ते पाकिटातून
मखाणे आणले आहेत. ते पाकिटातून काढून डायरेक्ट फोडणीला टाकायचे की आधी धुवायचे ? कारण ते फ्लफी दिसताहेत, धुवावे का नाही कळलं नाही.
अजून एक म्हणजे उकडलेले अंडे फ्रीजमध्ये राहते का ? असेल तर किती दिवस्/तास ? कसे ठेवायचे, सोलून की न सोलता ? ठेवून त्यातली पोषणमूल्ये वगैरे कमी होतात का ?
अजून एक - ऑमलेट साठी फेटलेल्या अंड्यातले थोडेसे उरले तर ते फ्रीजमध्ये राहते का ?
मखाणे धुवायचे नाहीत. तुपाची
मखाणे धुवायचे नाहीत. तुपाची फोडणी जास्त चांगली लागते.
Pages