पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाटपांडेजी,
शेंगोळ्यांचा धागा नक्कीच आहे.
वरणफळांसारखी लिक्विड शेंगोळी आहेत,
खानदेशातली गहूहरभर्‍याच्या पीठाची लांबट कोरडी देखिल आहेत (रेस्पी. मी टाकलिये बहुतेक. अ‍ॅटलीस्ट फोटू तरी.. )

आता थंडित ओली हळद जास्त येते. पण त्यात दोन प्रकार आहेत

अगदी पिवळी जी चिरताना बोटे पिवळी धम्मक होतात, आणी
दुसरी आल्यासारखी

यातली आंबेहळद कुठली ?

पांढरट असते ती हळद. जी पिव्ळी धम्मक किंवा आंब्याच्या रंगाची असते ती आंबेहळद.

धन्यवाद साधना , मंजुडी ...

ओली हळद माहीत होती, पण त्यात आंबेहळद नक्की कुठली यात थोडा गोंधळ होता Happy

अरे एकदम सोप्पे. बेसन नेहेमीप्रमाणे भज्यान्साठी भिजवतात तसे भिजवा. ( हळद थोडी, तिखट, मीठ आणी ओवा) त्यात घोसावळ्याचे/ घोसाळी/ गिलक्याचे काप ( सालासकट, साल काढु नका) बुडवुन गरम तेलात तळा. इकडे पण पाठवा थोडे.:फिदी:

रंगासेठ. फार भारी लागते ही गिलक्याची भजी. करुन पहाच.

माझ्या ओळखीची एक स्त्री कांदापात, पालक अश्या कुठल्याही पालेभाज्या बारीक चिरुन भजीच्या पीठात टाकुन भजी करते.

मंजू नवअलकोलची इतर भाज्यांप्रमाणेच कांद्यावर भाजी करता येते. पण मी त्याचा जास्त उपयोग आमटी, रश्यामध्ये घालण्यासाठी करते. बटाट्या ऐवजी. कोलंबीच्या रश्यात खुप छान लागतो नवअलकोल.

त्याच्या पानांचा झुणका करता येतो.
राई-जिर्, हिंग, फोडणी, कांदा परतवून त्यावर चिरलेला अलकोलचा पाला घालायचा. मग थोडा वेळ भाजी शिजू द्यायची. कारण अलकोलचा पाला जरा चिवट असतो. भाजी वाफेवरच शिजवायची. मिठ घालायचे. मग त्यावर बेसनचे सुकेच पिठ पेरून चांगले ढवळून तेही वाफेवर शिजवायचे. जर अगदीच कोरडे वाटले तर थोडे पाणी शिंपडायचे. आणि पुन्हा वाफेवर शिजवायचे. गॅस मिडीयम किंवा त्यापेक्षा कमी ठेवायचा म्हणजे पिठ करपत नाही. मधून मधून परतायचेही. आमच्या घरातला हा सगळ्यांचाच आवडीचा झुणका आहे.

अलकोल मिक्स भाजीत म्हणजे कांदा,बटाटा, वांग, टोमॅटो, ओल्या वालाचे दाणे, शेवग्याची शेंग अशा भाजीतही छान लागतो.

नुसत्या अलकोलची भाजी खास लागत नाही हे माझे मत. कदाचीत मला आवडत नसेल म्हणून.

अग जागू आम्ही करतो की नवलकोलाची भाजी.

मन्जू नवलकोल देठाकडचा भाग काढुन किसुन घे मुळ्यासारखा. नेहेमीसारखीच मोहरी, हिन्ग हळदीच्या फोडणीत किस परतुन घे. थोडी वाफ आण. चवीप्रमाणे तिखट, मीठ साखर घाल. मग भाजी शिजली की कोथिन्बीर घाल. ही भाजी थोडी उग्र असते चवीला. त्यामुळे आम्ही ती परतताना ओले खोबरे/ नारळाचा चव घालतो. चणा डाळ घालुन पण मस्त लागते.

जागु तुझ्या पद्धतीने करुन पाहीन आता.

जागु नक्की करुन बघ. ही कोबी गटातली भाजी असल्याने खरच उग्र वाटते. मी कोबीत पण नारळ वापरते. नाहीतर सरळ केरळी पद्धतीने कढीपत्ता, हिरवी मिर्ची व उडीद डाळ ( फोडणीत), नारळ आणी कोथिन्बीर घालुन करते.

पीठ पेरुन म्हणजे झुणका कोबीचा पण छान होतो.

mee navalkolaalaa nusatee saadhee foDaNee deUn tyaat navalakolaachaa paalaa ghaaloon karate.thoDaM khobara ghaatala kee jaast chhan laagate. nusatee khobaRaashivaayahee chhaan laagate

अलकोल मिक्स भाजीत म्हणजे कांदा,बटाटा, वांग, टोमॅटो, ओल्या वालाचे दाणे, शेवग्याची शेंग अशा भाजीतही छान लागतो.>>>>>>>>>>>>>>>>>> जागु दी....चुम्म्मा रेसिपी सांगितलीस....माझ्या मॉम कडे याच पद्धतीने बनते भाजी....शेवग्याच्या शेंगे मुळे जबराट टेस्ट येते....

तिळगूळ करायचा आहे पहिल्यांदाच करणारे पण ज्या रेसीपी वाचल्या त्या सगळ्या किलोच्या प्रमाणात आहेत. मी १ किलो तीळ आणि १ किलो चिक्कीचा गुळ आणलाय पण एवढा एकदम करायचा धीर होत नाही. मला प्लीज कोणितरी त्यातल्या वाटीच्या प्रमाणातली कृती सांगा ना.

मुग्धा एक वाटी साखर तीन वाट्या तीळाचे कुट एक वाटी दाण्याचे कुट साखर बुडेल एवढ दूध मिल्क पावडर १० रुवाल पाऊच . हे प्रमाण वड्यांच आहे.

मैत्रिणीला एका कार्यक्रमाला गोविंदविडे करून न्यायचे आहेत. कुणाला त्याबद्द्ल काही माहिती असेल तर प्लीज देणे.

अनया, रुचिरा पुस्तकाच्या मागील बाजूस विशेष कलाकुसरीच्या वस्तू असा भाग आहे तसेच पानसुपारी चा ही भाग आहे त्यात नक्की कृती सापडेल.

alakol

Pages