पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाचणीची इडली बहुदा याच धाग्यावर दिली आहे.पाने उलटून पहा.

अनु॑राधा
अर्धा किलो काजू संपत नसतील तर फ्रीजमधे ठेवून द्या.हवे तसे वापरा.(आमच्याकडे आत्ता होते ,गेले कुठे अशी म्हणायची पाळी येते.;) )

दोडक्याचं पुढील सोडून अजून काय काय करता येईल?
-- शिरांची चटणी
-- दोडक्याची गम ची रसभाजी
-- तुरीची किंवा चण्याची डाळ घलून साधी भाजी

ते 'किस बाई किस दोडका किस' का म्हणत असतिल? दोडका किसून काय करतात म्हणे?

शेंगदाण्याचं कुट, भाजलेलं खोबरं-कांदा, काळा मसाला घालून भरलेले दोडके किंवा याच मसाल्यात घातलेल्या दोडक्याच्या फोडी. पातळ रसभाजी.
दोडक्याचा पराठा. यात दोडका किसूनच घालायचा. Happy

ठेचा... वाचला.. छानै. करूण बघायला हरकत नाही. सूप... अं...
पराठे हं? मस्तच.
धन्यवाद नंदिनी, अल्पना

आर्ये, अजून पुदिन्याचं काही केलं नसशील तर हेही बघ. http://www.maayboli.com/node/40470
दाद, दिलेली लिंक पहा. या पानावर दोडक्याचे बरेच प्रकार सुचवले आहेत. http://www.maayboli.com/node/2549?page=41 पुनमच्या प्रश्नानंतरचे प्रतिसाद पहा.
तसेच दिनेशदा यांनी मागे दोडका भाताची रेसिपी टाकली होती, ती मला सापडत नाहीये आता. शोधून पहा. दोडक्याचा कीस आणि मटार घालून छान होतो तो भात.

दोडक्याच्या ऐवजी काही घालतेस का की दो. वगळुन बाकी सर्व आहे तसे करतेस? > हे मृण्मयीसाठी आहे.

परवा उरलेल्या वरण भाताचे काय करु एकीने विचारले होते का इथेच? आजच सकाळी कन्येला डब्यात देण्यासाठी ताजा वरण भात केला. मग तुपात/तेलात फोडणी करुन फ्लॉवर व कोबी छान परतुन घेतला. मग सांबार मसाला किंवा रस्सम मसाला, मीठ घालुन ४-५ मिनिटे वाफवले व वरुन पुरेसा भात व वरण पातळ करुन पुन्हा ४-५ मिनिटे नीट मिसळुन शिजवले. जरा पातळच करावे नंतर आळते. खुप मस्त लागते. सोपा उपाय आहे.. तरी बिसेबेळेच्या तोंडात मारत नाही ह्याची नोंद घ्यावी. Happy

माझ्याकडे मोड न येणारी मटकी आहे. काहीहीकेलं तरी मोड येत नाहीयेत.
असो... तर उसळ सोडून ह्या वाकेन पण मोड्'णार नाहीवाल्या मटकीचं चांगभलं कसं करावं बर?
भाजून, दळून काही जन्माला घालता येईल का?
नुस्ती भिजलेलीची उसळ वाईट नाही लागतै..पण चांगलीही लागत नाहीये.

ते 'किस बाई किस दोडका किस' का म्हणत असतिल? दोडका किसून काय करतात म्हणे?>>>>>> जिरं, मोहरी, ठेचलेला लसुन, वाटलेली मिरचीची फोडणी देउन किसलेला दोडका मस्त परतायचा कोरडा होइपर्यंत.. छान लागतो

गावाकडुन कलींगडासारखा दिसणारा ( लंबुळका , पट्टे असलेला ) भोपळा आणला आहे. अजुन कापला नाही.. पण त्याचे काय करायचे? >>> घारगे, खीर, भरीत, भाजी

मटकी दळून घे. थोडी अशीच आणि थोडी भाजून.

मटकी न भाजता दळलेल्या पिठाचे -
१. गव्हाच्या पिठात मिक्स करून खाकरे.
२. थोडी लाल मिरची पावडर. मिरी पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, मीठ आणि मटकीच्या पिठाच्या पाव भाग बेसन घालून शेव - एकदम बाजारत मिळणार्‍या बिकानेरी भुजिया. चारही मसाले एकाच वेळी घातलेस तर अगदी थोडे घाल म्हणजे एका १५० ग्रॅमच्या वाटीला २ चिमटी. पीठ भिजवल्यावर तळण्यापूर्वी चव घे. तिखट जास्त हव असेल तर मगच वाढव.
३. बेसनमध्ये मिक्स करून कांदाभजी.

मटकी भाजून केलेल्या पीठाचे -
१. ज्वारीच्या पीठात घालून, कोथिंबीर आणि भाज्या घालून थालिपीठ.

टोमॅटो सूप ची साधीसरळ पण सूप मस्तच होईल, हॉटेलसारखं, अशी पाकृ हवी आहे. तरला दलाल बाई म्हणतात की मूग डाळ घालून करा. मी अजून तसं कधी केलं नाहिये. कोणी करून पाहिलंय का असं?
आणि ब्रेड क्रंब्स कोणत्या ब्रेडचे करू? तळून की मावे मधे होतील? मी मावे फक्त अन्न गरम करायला वापरते. माकी कोणताही मोड वापरला नाहिये. त्यामुळे तो सांगू नका. Wink

१. ३ टोमॅटो
२. १/२ बटाटा ( मला कॉर्न फ्लोअर नाही आवडत म्हणुन थिकनेस येण्यासाठी.. बटाटा नको असल्यास १ चमचा कॉर्न फ्लोअर )
३. २ लसुन पाकळ्या
४. अमुल बटर
५. मीठ
६. किंचीत साखर
६. एक छोटा तुकडा बीट ( ऑप्शनल )

कृती : - बटाटा आणि टोमॅटो चांगले उकडुन घ्या. ते बीटर ने बीट करुन घ्या. मस्त स्मुथ झाले पाहिजे. टोमॅटो च्या साली थोडया राहतात..त्या मोठ्या गाळणीने गाळुन घ्या.
आता बटर गरम करा.
त्यात लसुण पाकळी क्रश करुन थोडे परता. मग त्यात टोमॅटो बीट केलेले घाला..
मीठ्,साखर टाकुन एक उकळी आणा...
बटाटा नसेल घातला तर कॉर्न फ्लॉअर थोड्या पाण्यात मिसळुन त्यात अ‍ॅड करा
उकळताना बीटचा तुकडा टाका ( रंग ऑस्सम येतो )
एका बाउल मधे सुप काढा
वर थोडं क्रीम घालुन सर्व्ह करा

Pages