Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होल व्हीटचेच द्यायचे असेल तर
होल व्हीटचेच द्यायचे असेल तर सरळ चपाती- पोळी -फुलके वगैरे प्रकार द्या. ताजे ताजे खाल्लेही जातात आणि पटापट बनवता येतात. हातामधे पोळीचा तुकडा दिला की चघळत चघळत मुलांना चावून चावून खायची सवय लागते. दूध बिस्कीटं वगैरे नुसती गिळायची सवय झाली की मग नंतर मुलं चावायला मागत नाहीत.
गरम दूध+ साखर + पोळी
गरम दूध+ साखर + पोळी कुस्करून... अहाहा!
कणकेत मीठ घालून केलेले साधे पराठे तुकडे करून देण्याचा पर्यायही आहे. बच्चेकंपनीकडून चावून, चघळून, मिटक्या मारत खाल्ले जातात.
आनंदी --------- ठिक आहे हा
आनंदी ---------
ठिक आहे हा ऑप्शन बादच मग..>>>>>> हे हे हे ----असे नको करुस...
मी देतेय बघ तुला बिस्कींटांची कॄती करुन बघ..मग मला सांग....
कणकेची बिस्कीटे----------
साहित्य :-
एक कप गव्हाचा पीठ
अर्धा कप साखर
पाव टी स्पून मीठ
पाव कप बदाम काप,
अर्धा टी स्पून विलायची पूड,
अर्धा कप लोणी
दोन टेबल स्पून दुध गरज भासल्यास
कृती :- एका भांड्यात कणिक, साखर, बदाम, मीठ, विलायची पूड एकत्र करणे मग लोणी आणि दुध टाकून हळू हळू कणके सारखा मळाव,.....मग त्याचे लहान लहान छोटे गोळे तयार करून (वाटेल त्या आकाराचे ) थोडय थोड्या अंतरावर ठेऊन ओवेन मध्ये ३६०% वर २० मिनिट ठेवणे किंवा हलके ब्राउन होई पर्यंत ठेवणे.......आणि अगदी सोपे आणि चविष्ट कुकीज तयार....वाटलं तर सजावटीला चोको चिप्स पण टाकावे लहान मुलं आवडीने खातात.....
<<गरम दूध+ साखर + पोळी
<<गरम दूध+ साखर + पोळी कुस्करून... अहाहा>> + 1000000000000000000000000000000
गव्हाची तूप आणि गूळ घालून
गव्हाची तूप आणि गूळ घालून केलेली भाकरी. २-३ दिवस टिकते म्हणे . मी नाही केलिये, पण एइकलय. कोणाकडे रेसिपी असेल तर द्या ना.
वेल, गोड दशमी म्हणतात त्याला.
वेल, गोड दशमी म्हणतात त्याला. गूळ पाण्यात किंवा दुधात विरघळवून घ्यायचा. त्यात कणिक आणि थोडे तुपाचे मोहन आणि चिमूटभर मीठ घालायचे. नेहमीच्या साध्या पराठ्यांप्रमाणे जरा जाडसर लाटून मंद आचेवर भाजायचे. या दशम्या काकवीच्या फार सुंदर होतात. आणि टिकतातही. प्रवासात मी नेहमी सोबत ठेवते.
मितान, काकवीच्या दशमीची डिटेल
मितान, काकवीच्या दशमीची डिटेल रेसीपी दे ना. फार्मर्स मार्केट मधून काकवी आणलेय. ती त्या निमित्ताने संपेल.
गव्हाची तूप आणि गूळ घालून
गव्हाची तूप आणि गूळ घालून केलेली भाकरी.......
शुभांगी संगवईने लोकसत्तेत दिल्याप्रमाणे पंचामृतात कणीक घालून केलेली पोळीपण छान लागते.
स्वाती२, विपुत देते.
स्वाती२, विपुत देते.
धन्यवाद मितान.
धन्यवाद मितान.
खुप धन्यवाद निवा.. आम्ही
खुप धन्यवाद निवा..
आम्ही तिला :-
१) पोळी कुस्करुन त्यात दुध/ वरण, सगळ्यांसाठी केलेली भाजी,
२) तांदुळ, मुगडाळ खमंग भाजुन केलेली भरड.. पाण्यात उकळी देउन लापसी इतक्या थिकनेस चा खाउ त्यात मीठ, जीरेपूड, कधी चिज, कधी लसुण पकळी घलुन,
३) रवा उपमा, शिरा..
असे बरेच खाऊ देतो,,,
पण सगळ गोड तिखट मिठाच खाऊन पण आवड नाही .. खायला कधिच मनापासुन येत नाही..
खाउ दिसला की धूम ठोकते
म्हणुन हे नाही तर ते असे पर्याय शोधत असते...
आनंदी, जोपर्यंत ती स्वतःहून
आनंदी, जोपर्यंत ती स्वतःहून खायला/ जेवायला मागत नाही तोवर तिला वाढू नका. तुमची जेवायची वेळ झाली की आपापल ताट वाढून जेवायला बसायच. मग बघा स्वतःहून जेवायला येते का नाही
रोज खा ग! करणारी आई अचानक आपल्याला सोडून जेवायला बसलेली बघून ती आधी विश्वासघात केल्याचा लूक देइल पण गुपचूप जेवायला येइल. जेवायला मागितल की आधी विचारायच नक्की जेवणार ना का रोजच्यासारख आईला त्रास देणार तरच ताट वाढायला उठते? थोड कठोर व्हाव लागेल तुम्हाला, आजी-आजोबा बरोबर असतील तर मग काही विचारायला नको तुमच्या drawbacks मधे अजून एका गोष्टीची भर मुलीला सोडून जेवायला बसते
(Disclaimer : अर्थात, हा उपाय फक्त रूटीनमधे करायचा, औषधांसाठी जेवण-खाण compulsory असताना नाही.)
राजसी .. .. धन्यवाद.. हो
राजसी ..
.. धन्यवाद..

हो आताशा वरचे उपाय कामी येतायत ...
तिच्या पायाला अक्षरशः भिंगरी आहे...
पण आम्ही जेवाय्ला बसलो की तिच्या साठी ताट द्यावेच लागते..
पण ताटातले अगदी थोडे पोटात जाते..
लहानच आहे म्हणा.. हळुहळु आवड लागेल.. प्रयत्न सुरुच ठेवते..
राजसीला १०००००००० वेळा
राजसीला १०००००००० वेळा अनुमोदन
तेलपोळीची रेसिपी आहे का
तेलपोळीची रेसिपी आहे का कोणाकडे?
_आनंदी_ - ती गूळ किंवा काकवी घालून केलेली भाकरी बिस्कीटसारखी दिसते आणि लागते म्हणे.
तोंडली भाजी भाजी न करता अजुन
तोंडली भाजी भाजी न करता अजुन दुसर्या पदधतीने कशी खाता येइन ????
मला आवडत नाही.पण पुलावमधली तोंड्ली खाऊ शकते.
कच्च्या तोंड्ल्या खाऊ शकेन चवीने अश्या काही पा.कृ आहेत का ????
तोंडली कोवळी असतील तर नुसती
तोंडली कोवळी असतील तर नुसती खायलाही छान लागतात की!
त्यांचे रायतेही मस्त लागते. तोंडल्यांच्या काचर्या चिरून नेहमीप्रमाणे फोडणीवर परतून (तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट इ.) भाजी करायची, तोंडली कुरकुरीत झाली पाहिजेत. भाजी गार झाल्यावर त्यात अगदी वाढायच्या थोडेसे अगोदर दही, आवडत असल्यास दाण्याचे कूट, चवीनुसार साखर-मीठ (भाजीत अगोदरच घातले नसेल तर नको), चिरलेली कोथिंबीर हे घालून मिक्स करायचे - तोंडली रायते तयार!
असेच भेंडीच्या भाजीचे रायतेही छान लागते.
तोंडल्याचे लोणचेही करतात, तेही छान लागते. मी आयते खाल्ले आहे, कधी केलेले नाही.
वलवल नावाची नारळाच्या दुधातली अप्रतिम चवीची कोंकणी / मंगलोरी भाजी करतात त्यातही तोंडली वापरतात.
धन्यवाद अकुताई तोंडल्याचे
धन्यवाद अकुताई
तोंडल्याचे लोणचेही>>>>>>>> कोणाला माहीत असेन तर सांगा न .
होल व्हीट बनची रेसिपी वाचली.
होल व्हीट बनची रेसिपी वाचली. तशी कडक बन्स - बटर बिस्किटांची रेसिपी माहिती आहे का कोणाला?
वेल, http://www.youtube.com/w
वेल,
http://www.youtube.com/watch?v=pFSv0DSRUyQ
_आनंदी_ - ती गूळ किंवा काकवी
_आनंदी_ - ती गूळ किंवा काकवी घालून केलेली भाकरी बिस्कीटसारखी दिसते आणि लागते म्हणे.
>>>>>>>>>> ओके वेल प्रयत्न करते..
मी शेंगोळी या प्रकाराची
मी शेंगोळी या प्रकाराची पाककृती मायबोलीवर शोधत होतो. आमच्या गावी हा प्रकार केला जायचा. इथे फारसे दिसत नाही. मला मी अन्नपूर्णा या ब्लॉगवर त्याची पाककृती मिळाली. आंतरजालावर ही शेंगोळी उपेक्षित का राहिली काय कळत नाही.
दुसरा प्रकार म्हणजे कट्टूचे थालपीठ मला कुठे सापडल नाही. कट्टू हे धान्य प्रचलित नाही. आमच्याकडे हे थालपीठ उपवासाला केले जायचे. कट्टू हे धान्य शेजारील अणे गावच्या पठारावरुन एक जण घेउन यायचा. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात नगर वगैरे साईडला हे धान्य दिसून येते.
घाटपांडे - शेंगोळ्या, शेंगोळी
घाटपांडे - शेंगोळ्या, शेंगोळी असा सर्च देऊन बघा ना माबोवर. एन्ट्रीज आहेत की!
Impulsive shopping मध्ये एक
Impulsive shopping मध्ये एक डबल बॉयलरचं स्टीलचं भांडं घेतलं गेलंय. चॉकलेट वितळवायचं सोडून आणखी कशासाठी वापरता येईल? मला दुकानात उगाच असं वाटलं की कुकिंग शोजमध्ये हे भांडं वापरतात आणि दिसायला जरा छान वाटलं. मला दुसरं एक स्टीलचं हँडलवालं भांडं हवं होतं त्यावर हे मस्त बसत पण होतं. सध्या फक्त रेसिपीची कमी आहे
सध्या फक्त रेसिपीची कमी आहे
सध्या फक्त रेसिपीची कमी आहे >> याला म्हणतात.. नालासाठी घोडा किंवा दमडिची कोंबडि आणि रुपयाचा मसाला
chandanbaTavyaachee bhaajee
chandanbaTavyaachee bhaajee kashee karaayachee?
वरदा, मायबोली वर शेंगोळी असा
वरदा, मायबोली वर शेंगोळी असा सर्च दिला तर एंट्रीज आहेत पण स्वतंत्र अशी पाककृती नाही. म्हणुन मी आंतरजालावर सर्च मारला. तर मी अन्नपुर्णा हा ब्लॉग दिसला." खानदेशातला हुलगा घ्यावा, कोकणातला कुळीथ जवळपास तसाच असला तरी चवीत फार फरक असतो" असा विशेष उल्लेख आढळला. मला स्वतःला खाद्यपदार्थातील फारसे कळत नाही. जगण्यासाठी/जगण्यापुरते खाणारे आम्ही.
वेल, कांदा घालून परतून
वेल, कांदा घालून परतून करतात.
@ वेल, आमच्याकडे परतलेल्या
@ वेल, आमच्याकडे परतलेल्या राजगिरा/माठासारखीच चंदनबटव्याची भाजी करतात. फोडणीत लसूण ठेचून घालून, हिरव्या मिरच्या, कांदा घालून.
इथे चंदनबटव्याच्या पातळ भाजीची कृती आहे, पण अशी भाजी मी कधी केली/ खाल्ली नाहीए. [ लिंकमध्ये दिलेल्या कृतीने आमच्याकडे पालक / चाकवताची ताकातली भाजी होते.]
वेल, आमच्याकडे परतलेल्या
वेल, आमच्याकडे परतलेल्या राजगिरा/माठासारखीच चंदनबटव्याची भाजी करतात. फोडणीत लसूण ठेचून घालून, हिरव्या मिरच्या, कांदा घालून.>>>> तशीच.वरुन थोडे ओले खोबरे.
Pages