Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
karun baghitala paaije..vaas
karun baghitala paaije..vaas kay claas aahe sangu
हो ती पाने अगदी बारीक कापावी
हो ती पाने अगदी बारीक कापावी लागतील. मोठ्या तुकड्याचा चोथा होऊन तोंडात तशीच गोळी फिरत राहते. गिळवत नाही.
एकदा नीट खात्री मात्र करून
एकदा नीट खात्री मात्र करून घ्या नक्की आलंच आहे त्याची. ए.फु.स. :धूमठोकणाराबाहुला:
aala laavalyaavar aalach yeil
aala laavalyaavar aalach yeil na..limba kashi yetil
(No subject)
Mango pulp वापरून mango lassi
Mango pulp वापरून mango lassi कशी करतात? प्रमाण इ. माहित असल्यास ते पण लिहा
सोप्प आहे...दही आणि पाणी हे
सोप्प आहे...दही आणि पाणी हे लस्सी साठी लागणारं प्रमाण घेउन त्यात मँगो पल्प टाकायचा...एक नॉर्मल ग्लास साठी ४-५ चमचे.. ( मोठे जेवण बनवायचे नाही ).....पल्प घालुन ढवळायच.....साखर नाही घातली तरी चालते.....झाली मँगो लस्सी.....मी अशीच करते प्रमाण बिमाण ईल्ले.....
अनिश्काची ही लस्सी मिक्सर
अनिश्काची ही लस्सी मिक्सर मधुन एकदा फिरवली तर मस्त स्मुथ होते
अदिती...मिक्सर मधुन काढलं की
अदिती...मिक्सर मधुन काढलं की ते मिक्सर च भांडं मला चातुन पुसुन साफ केल्याशिवाय चैन नाही पडत....कधी कधी हात कापतो....वर धुवायला दोन भांडी वाढतात ते वेगळं....म्हणुन मी हे सर्व ग्लासात भरुन त्यात डायरेक्ट बीटर चालवते.....:)
अनिश्का, बीटर वापरतेसना, ते
अनिश्का, बीटर वापरतेसना, ते तू वरती लिहायला विसरलीस, म्हणून आदिती मिक्सरचे म्हणाली असेल? कधी बोलवतेस mango लस्सी प्यायला?
आभार्स..मी show off म्हणून
आभार्स..मी show off म्हणून vitamix वापरायच्या विचारात आहे
विटामिक्स चा खरच उपयोग होतो
विटामिक्स चा खरच उपयोग होतो का? डेमो बघितला की अगदी घ्यावासा वाटतो
तुला डेमोमधल्या स्मुदी
तुला डेमोमधल्या स्मुदी आवडल्या असतील तर नक्की घे. भाज्या, फळं घाऊकमध्ये पोटात ढकलायचा हमखास मार्ग आहे. मध्ये मध्ये मी डोशाचं पीठ वगैरे पण त्यात केलय पण मुख्य आम्ही स्मुदीसाठी वापरतो आठवड्यातून तीन चार वेळा तरी
हॉटेल मधे दोसा बरोबर उडदाच्या
हॉटेल मधे दोसा बरोबर उडदाच्या डाळीची पातळ चटणी देतात. ती कशी करतात?
- सुरुचि
अन्जु मी बीटरच वापरते...तु ये
अन्जु मी बीटरच वापरते...तु ये ना कधी ही लस्सी प्यायला......:)
साखरभाताची पाकृ हवी आहे. इथे
साखरभाताची पाकृ हवी आहे. इथे शोधली पण नाही मिळाली.
starter साठी ritz cracker चा
starter साठी ritz cracker चा उपयोग कसा करता येईल? एकदा एकीकडे त्यावर कायकाय घालुन मस्त शेवपुरी सारखे केले होते. शेव वापरत नसल्याने अजुन काही प्रकाराने (वेगळी toppings वापरुन) करता येईल का?
चीज स्लाइस/ किसलेले चीज /
चीज स्लाइस/ किसलेले चीज / क्रीम चीज + बारीक चिरलेली रंगीबेरंगी सिमला मिरची + किसलेले गाजर + कोथिंबीर / पार्सले + मिक्स हर्ब्ज
त्यांच्या वेबसाईटवर क्रॅकर्स वापरून स्टार्टर्स च्या बर्याच रेसिपीज सापडतील.
सुनिधी, त्यावर
सुनिधी, त्यावर चीज+चेरी+पायनॅपल घालत येईल.
बदामाचा शिरा कसा बनवायचा?
बदामाचा शिरा कसा बनवायचा? पाकक्रुती हवी आहे...
बदामाचा शिरा
बदामाचा शिरा
धन्यवाद प्राचीताइ
धन्यवाद प्राचीताइ
अहो, ताई नका हो म्हणू.
अहो, ताई नका हो म्हणू.
बरय प्राची आता अजुन एक विचारत
बरय प्राची
आता अजुन एक विचारत आहे घरी अर्धा किलो काजु आहेत त्याचे काय् करु ? काजु कतली सोडुन दुसरे काय करु शकते?
काजू पूड करून ती लाडू / वड्या
काजू पूड करून ती लाडू / वड्या किंवा अन्य गोड पदार्थांमध्ये वापरू शकता.
काजू तळून गार्निश म्हणून (शिरा, पुलाव, भाज्या इ.) वापरू शकता.
काजू ग्रेव्हीसाठी वापरू शकता.
काजू करी. पंजाबी ग्रेवीमध्ये
काजू करी.
पंजाबी ग्रेवीमध्ये वापरता येईल.
लहान मुल असेल तर खायला द्या रोज २-३.
काजूची चिक्की
ओल्या काजूची भाजी करता येईल.
ओल्या काजूची भाजी करता येईल. आहेत तेच जरा भाजून भिजत घालायचे.
वांगी, फणस, विलायती फणस यांच्या भाजीतही घालता येतील.
ज्वारीची इडली, नाचणीची इडली -
ज्वारीची इडली, नाचणीची इडली - कोणी सांगेल का कशी करायची
आता अजुन एक विचारत आहे घरी
आता अजुन एक विचारत आहे घरी अर्धा किलो काजु आहेत त्याचे काय् करु ?
<<
संपर्कातून मेल करा.
अर्धा किलो काजू एका पार्टीत चखना म्हणून संपतात. कुरियरचा खर्च मी देईन
ज्वारीची इडली, नाचणीची इडली -
ज्वारीची इडली, नाचणीची इडली - कोणी सांगेल का कशी करायची
<<
ज्वारीची भाकरी करतात. फार झालं तर खिचडी, किंवा बिबडी. हुरडा फंटास्टिक लागतो.
नाचणी म्हणजे नागलीची देखिल भाकरी करतात. उकड करून मस्त लागते. पापडाना मस्त भाव मिळतो.
ऑथेंटिक इडली उडिद तांदुळाची बनते.(भौतेक) तशीच बनवा ना? काय प्रॉब्लेमेय? तांदळाची बिबडी होणार नाही. उडदाच्या भाकरीला ज्वारीची चव येणे नाही. फ्यूजन कशाला हवं?
पर्वा टीएलसी च्यानेलवर एक इजिप्शिअन चायनिज प्राणी सौदिंडियन सांभारम बनवत होता. तो भाऊ डिस्र्काईब्ड इडली अॅज 'इट्स लाईक राइस पॅनकेक्स'. पाय धरावेसे वाटले त्याचे. (पाय धरून नंतर काय करायचं ते फ्यूजन लिहित नाही इथे.)
भारतातल्या हवामानात खाता येईल, पचेल, रुचेल, टीकेल अशा पाककृती हजारो वर्षांपासून आहेत. फ्यूजन ठिकेय हो, पण मग 'आयुर्वेद खत्रेमें!'चं काय?
Pages