पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे रिसोचं राब्रा तेल असतं सगळ्या स्वयंपाकासाठी. तळणासकट. घरचे चवीच्या/ स्वादाच्या/ पदार्थाच्या वासाच्या बाबतीत पर्फेक्शनसाठी आग्रही असतात. त्यांनी अजूनतरी तक्रार केलेली नाही. तळणाचं प्रमाण कमी असतं, पण जे असेल ते राईसब्रानमधेच आहे हल्ली. १५ की १३ लिटरचा एक कॅन काही महिने वापरून मस्त संपला. आता दुसरा आणायचाय. मलाही वासाचा काहीही त्रास नाही वाटलाय.

मीपण अधून-मधून राईसब्रान तेल वापरते म्हणजे एखाद्या महिन्यात शेगदाणा तर दुसऱ्या महिन्यात राईसब्रान. तळण्याचे पदार्थ जरा कमीच करते पण मला राईसब्रान तेलात तळल्याने वास आला असे जाणवले नाही. सोयाबीन तेलाचा मात्र प्रचंड वास येतो, ते मी एकदाच आणले परत आणले नाही.

आहे आहे. अबक चौकात परदेशी यांचं दुकान आहे जिथे अनेक तेलं मिळतात. चांगला माल असतो तिथे. त्यांची स्वतःची उत्पादनं आहेत, त्यामुळे स्वस्तही आहेत.

राईसब्रान तेलाच्या वासाचा आम्हालाही काही त्रास झालेला नाही.
सोयाबीन तेलाचा वास मात्र तळणीत भयंकर भयंकर येतो.

हल्लीहल्लीपर्यंत मालवणातल्या लोकांनी पनीर पाहिलं तरी होतं का? Happy दुध फाटले तर सरळ साखर घालुन ते खायची पद्धत होती तिथे.

पनीरचे भाजीसारखे पदार्थ करणे ही पंजाबी स्पेशॅलिटी आहे तर त्याची मिठाई करणे ही बंगाली. बाकी इतर प्रांतात पनीरचे काय करायचे देव जाणे. आता सबगोलंकार झाल्याने सगळ्या प्रांतातले लोक सगळे पदार्थ करतात.

अश्याने उद्याला पंजाबी पुरण्पोळी मिळेल. काही लोकं पुरण्पोळी पराठ्यासारखीच बनवतात... Proud

बरं, मालवणी मसाल्याची ग्रेवी करून पनीर टाका.... हाय काय नाय काय. Happy

बिनपाकाचे बेसनाचे लाडू करताना एक किलो बेसनाला, अर्धा किलो तुप, अर्धा किलो पिठीसाखर हे प्रमाण योग्य होईल ना?

नारळाचे दुध घालून दलियाची खीर कशी करतात? इथे गव्हाची खीर सापडली तशीच करायची का? कर्नाटकात हुग्गी असे काहीतरी म्हणतात

काय मस्त कृती आहे ही मेधाची पारंपारिक लाडवांची. मी सकाळी घाईत शोधलं त्यामुळे मिळालीच नाही : (. शेवटी गुगल केलं तेव्हा चकलीच्या ब्लॉगवर मिळाली त्यानुसार प्रमाण घेऊन केले लाडू. त्यात दुध शिंपडल्यावर परतायचं नाही असं आहे. झालेत चांगले लाडू. पण आता या कृतीनेही पुन्हा करुन बघणार.

===

साधना,
माझ्या मालवणच्या आजोबांनी आयूष्यात कधी दूध वा चहा घेतला नाही. मालवणात पहिल्यांदा दूधाचा धंदा माझ्या काकांनीच सुरु केला असावा. आजही ते व काकी तोच उद्योग करताहेत.

कुठल्याही ग्रेव्हीत टिपीकल मालवणी मसाला घातला की त्याला मालवणी म्हणायचे, असे झालेय.

आणि ते तिखटजाळच असावे असाही अलिखित नियम आहे.

प्रत्यक्ष मालवणी ( आणि कोल्हापूरी देखील ) घरातून शिजणारे जेवण असे तिखटजाळ कधीच नसते. हाटीलात दारू प्यायल्यावर जिभ बधीर झाल्यावरदेखील चव लागावी म्हणून असे केले जाते बहुदा.

झंपीजी Happy
साधना Happy
मालवनी पनीर हे मी एका होटेल मधे खाल्ले होते. सो मला रेसिपी हवी होती.
रच्याकने थॅन्क्स Happy

आवळ्याचा गोड पदार्थ हा बहुतेक वेळेला साखर घालून केलेला पाहिला / खाल्ला आहे. गूळ घालून केलेला पदार्थ माझ्या तरी पाहण्यात नाही.

वैशाली त्याचे काही करत नाहीत. शिजवल्यावर वास जातोच तो. चहात उकळून पण बघितले मी.
कुंडीतले आले काढताना सगळे नाही काढायचे, एक दोन रोपे ठेवायची. ती वाढत जातात. पाने जोमदार असली म्हणजे आले चांगले वाढते.

आलं म्हणजे धावते खोड असते. त्याला नवीन नवीन फुटवे फुटत राहतील. कोवळे फुटवे ठेवून जुन झालेली रोपे
जमिनीखाली कापून काढायची. त्याखाली आले असते. जर रोपांनी कुंडी भरून गेली तर सगळे उपटून, कोंब कापून ( त्या कोंबाच्या खाली थोडा आल्याचा भाग ठेवून ) परत लावायचे व बाकीचे आले वापरायचे.

वैशाली, आल्याची पात बारीक चिरून सॅलडवर किंवा इतर भाज्यांवर गार्निशसारखी वापरायची. ती वाळवूनही वापरता येते म्हणे! मी हा प्रयोग कधी केलेला नाही, पण करायला हरकत नाही. सूपमध्येही गार्निश म्हणून ही पात वापरता येईल.

दह्यात देखील थोडी चिरलेली पात मिसळून सॅलड ड्रेसिंग/ डीप म्हणून वापरता येऊ शकेल कदाचित.

Pages