पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेड क्रंब कसे करायचे? ? >> मिक्सरमधून शिळा ब्रेड काढला तर क्रंब होतील. तुम्ही कृ टॉन्स म्ह् णत असलात तर त्यासाठी ब्रेडचे चौकोनी तुकडे तळून किंवा तेला वर परतून घेता येतील. मावे नॉट नीडेड रिअली.

अमा, कृटॉन्स म्हणायचं होतं. क्रंब्स आहेत ऑलरेडी घरीच केलेले हे आता तळून करीन मी. शक्यतो तळायचं नव्हतं कारण मग थोडं जरी तेल उरलं तरी पुन्हा वापरायची पंचाईत. बाकी तळण अधूनमधून चालतं कधीकधी. Happy

http://chakali.blogspot.com/2012/02/carrot-tomato-soup.html इथे एक टोमॅटो कॅरट सूप आहे. चांगलं झालं होतं फक्त ऑज्यु घालू नये, खूप आंबट होतं सूप.

तिचीच http://chakali.blogspot.com/2013/07/ginger-tomato-soup.html ही आणखी एक रेसिपी.

सूपसाठी वापरलेल्या भाज्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून गाळून घेण्यापेक्षा एस आकाराचं ब्लेड लावून फुप्रोमध्ये प्युरी केली तर छान रवाळ होतं सूप. गाळण्याची एक पायरी वाचते.

व्हायटामिक्स किंवा ब्लेंडटेक मध्ये केलं तर थिकनेससाठी घातली जाणारी मुगाची डाल न घालता मस्त थिक आणि फ्रॉथी सूप होतं. गाळण्याची अजिबातच गरज नाही पडत.

शूम्पी +१ आला आला आमच्याकडे पण लाडका >> वा वा वा...मज्जा आहे
मी लाडक्याच्या मदतीने येसर पीठ करावं असं मनात येतय.

परवा नेस्लेच्या रेडी टु बेक कुकीज केल्यात. त्या जरा जास्त वेळ ओवन मध्ये राहिल्यात. अगदीच जळल्या नाही पण खमंग झाल्यात. (आमच्यात पदार्थाला अगदीच काळा रंग आल्याशिवाय जळला असं म्हणत नाहीत. कुकीज बर्याच गोरेपणात आहेत त्या मानानी.) माझं काय चुकलं हे विचारण्यात अर्थ नाही. पण ह्या अश्या खमंग कुकीज चं काही करता येइल का? तश्या सुट्या कोणी खाणार नाही.

अरे हो मी विसरलेच होते. धन्यवाद स्वाती. आणि मला वाटतं आईसक्रीम शेक सारखं पण करता येइल, ते डी क्यु वाल्यांसारखं.

टोमॅटॉ सूप मस्त झालं! Happy

व्हाईट सॉस करून वापरला. एस ब्लेड वापरल्यामुळे खरंच काम सोपं झालं. बीटाच्या तुकड्यामुळे रंग खास आला. इथे दिलेल्या टिप्स वापरल्या. पुन्हा आभार सगळ्यांचे.
फोटो काढण्याआधीच संपलं. "भारी झालंय" हे अर्धांगाचं काँप्लिमेंट! Happy

मुलगी दीड वर्षाची आहे.. सकाळी दुध बिस्किट खयला आवडते तिला..
बाहेर मिळणारी मैद्याची बिस्किट देण नको वाटत ...
म्हणुन घरी दुधात विरघळतिल अशी फक्त गव्हाची .. थोडासाच सोडा घालुन बिस्किट बनवायचा प्लॅन आहे..
मदत करा..

पाककृती माहिती आहे पण त्यातले सेटिंग्ज माहिती नाहीत. कुणी सांगु शकेल का ?
लालुच्या पद्धतीने भरली कोंबडी करायची आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93124.html?1163069370

मी आजवर पूर्ण आख्खी कोंबडी कधीच घरी आणलेली नाही. त्यामुळे थोडे बावळट वाटतील असे प्रश्न :
१. कोंबडी कट करणार्‍याला काही खास पद्धतीने कट करायला सांगायचे का ?
२. साफ कशी करायची ?
३. ४/५ पक्क्या खाणार्‍यांना एक कोंबडी पुरावी का ? ( बाकी जेवण असणारच. चिकन करी, भात ,चपाती ई. ई.)
४. सगळ्यात महत्वाचे - ओव्हनचे सेटिंग्ज सांगा प्लीज. ग्रिल की बेक ? किती वेळ ? त्यात पाऊण ते एक तास लिहिलय. खूप जास्त तर नाही ना होणार.

धन्यवाद !

मी बरेच उशीरा उत्तर देतेय पण तरीही - ओवन ४०० फॅ. मी शेवटच्या १५ मिनिटात कोंबडी फॉइलने कव्हर करते. कोंबडी साफ केलेली असते. कॅविटीत नेक, गिझार्ड वगैरे पॅक केले असेल ते काढुन टाकायचे. बाकी जेवण असेल तर ४ पौंडाची कोंबडी ४-५ जणांना पुरावी.

धन्यवाद स्वाती ताई.
मी अंदाजानेच केले होते. अगदी (कोंबडी अवन मध्ये ढकलण्याच्या )शेवटच्या क्षणापर्यंत इथे उत्तर आलय का चेक करत होते. शेवटी इंटरनेट वर इथे तिथे चेक करुन जमवले.
कोंबडी छान शिजली. सगळ्यांना पुरली. मात्र घाईचा मामला ना... गडबडीत माझे एक ग्लासचे बेकवेअर तोडले Sad ती साफसफाई, कोंबडीचे टेंशन , पाहुण्यांची येण्याची गडबड यात माझे हार्ट्बीट्स वाढले थोडे. असो.

माफ करा! पण मुलांना बिस्किट द्यायचा एवढा अट्टाहास का? मुलं एकदा शाळेत जायला लागली की मित्रमैत्रिणींचे बघून जंकफूड मागतात, खायला लागतात. आत्तापासून आपण का सुरुवात करून द्या. पटकन दुधात विरघळेल असं पोटभरीच खायला द्यायचे असेल तर लाह्यापीठ, सातूपीठ असे पर्याय आहेत, प्लीज त्यांचा विचार करा. राजगिर्‍याचा लाडू पण छान लागतो दुधात भिजवून, बघा पटलं तर.

नाही हो अट्टाहास अज्जिबात नाही.. बिस्किट देणे खुपच कमी केले आहे .. आधिच कमी देत होतो..
माग एकदा इथेच कुठे तरी सांगितल होत.. तिला खायची अज्जिबात आवड नाही खेळ आणि खेळच..
सगळ्याच लहानांच असतच.. पण हिला खाउ नाही घातल तर एनर्जीत काही फरक पडत नाही .. तितकच खेळुन पुन्हा अगदी झोप अनावर होते तेव्हा झोपते..
खुप सारे खाउ ट्राय केले तरी ना गोड ना तिखट विशेष खायची आवड नाही...
केळ ही एक गोष्ट सोडली तर विशेष काही आवडत नाही...
लक्किली जंक फूड्ची अजुन टेस्ट पण माहिती नाहिये...
हा पण प्रॉब्लेम काहीच नाही.. खुप खेळते मजा करते.. दंगा घलते अक्षरशः
त्यातल्या त्यात बिस्किट बर वाटत तिला ..पण ते द्यायला नको वाटत म्हणुनच विचारते आहे
की घरी करुन होल व्हीट च काही देता येईल का ..
ठिक आहे हा ऑप्शन बादच मग..

Pages