पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातु
कांदा खोबरे वाटण म्हणजे त्यामधे बहुतांश वेळा सुकं खोबरचं वापरतात, ते भाजून घ्यायचं, कोकणातली माणसं ओलं खोबरं वापरतात. ते भाजून घ्यावं लागत नाही.
कांदा परतूनचं घ्यावा लागतो.

कोकणातली माणसं ओलं खोबरं वापरतात. ते भाजून घ्यावं लागत नाही.
नाही हं! काही पदार्थ कच्चे वाटणाचे असतात तर मसाल्याच्या भाजी,चिकन इ.ना ओलं खोबरं भाजून वापरतात.

देवकी तुम्ही पण कोकणातल्याच का? मी तर सुकं खोबरं विशेष वापरतचं नाही. घरची वाडी आहे त्यामुळे मी ओलं खोबरचं वापरते. आता भाजुन घेउन वाटण करुन बघते.

पेरू, मश्रुम स्वच्छ धूऊन त्याच्या मोठ्याच फोडी करा. तेलात बारीक चिरलेला कांदा चांगला फ्राय करा (२कान्दे). त्यात एक चमचा आले-लसून पेस्ट टाका. थोडे लाल तिखट, हळद घालून मस्त परता. मिक्सर मधे दोन टॉमेटो + १ वेलची सालासकट वाटून घ्या. फ्राय झालेल्या कांद्यात ती ग्रेवी टाका. मसाला चांगला फ्राय झाला की त्यात हिरवे मटार आणि मश्रूम्स टाका. थोडी धना - जीरा पूड, चवीपुरती साखर, मिठ टाकून मटार शिजले की कोथिंबीर घालून गॅस बंद करा. आवडत असल्यास त्यात थोडी कसूरी मेथी टाका.ही सर्वात साधी व सोपी कृती .

कोकणातली माणसं ओलं खोबरं वापरतात. ते भाजून घ्यावं लागत नाही.> वाटपा साठीचे खोबरे खरपूस भाजूनच घ्यावे लागते. कोकणात खोबरे भाजूनच घेतात.

.

राईस ब्राण्ड तेलात तळ्ण म्हणजे.......... डोकेदुखी ची गोळी जवळ पाहीजे... घरभर नुसता तेलाचा वासच..वास.. ग...

ओके, मग तेल असंच पोळीला वगैरे लावून संपवते. स्टार बझारवाल्यांनी एक लिटर तेल फ्री खास दिवाली के लिये असं लिहून दिलंय वर!!!!!

चंदन खात्रीचे मिळाले तरच सरबत करावे. त्यासाठी चंदनाचा किस उकळत्या पाण्यात घालून ५ मिनिटे उकळायचे. मग झाकण ठेवून भांडे तसेच अर्धा तास ठेवायचे. त्यानंतर पाणी गाळून त्याच पाण्यात साखरेचा पक्का पाक करायचा. हि कृति मंगला बर्वे यांची आहे.

खाद्य इसेन्स्मधे मी चंदन कधी बघितले नाही पण तसा मिळत असेल तर तोच वापरलेला चांगला.
अस्सल चंदन वापरून केलेले सरबत पोटासाठी चांगले असते. मला वाटतं रुह आफझा मधे चंदन असते.

मी स्वतः चंदनाचे सरबत गल्फ मधे प्यायलो आहे.

कुळथाची आमटी ...
१ छोटी वाटी मोड आलेले कुळीथ +थोडुसा कांदा +पाणी घालून कुकरमधून उकडून घ्या. १-१ १/२ चमचे तेलावर १ लवंग,४ मिरी,अर्धा इंच दालचिनी व थोडे धणे घाला.त्यात उभा चिरलेला अर्धा कांदा + थोडे ओले खोबरे घालून लालसर रंगावर परतून घ्या.थंड झ्याल्यावर त्यात पाणी व चिंच घालून गुळगुळीत वाटा.कुळथामधे मीठ, हळद,मसाला घालून १ उकळीआल्यावर वरील वाटण घाला. १ उकळी येऊ द्या. सोललेल्या व ठेचलेल्या २-३ लसूण पाकळ्या व अगदी थोडी मोहरी यांची फोडणी करून आमटीवर घालून झाकण लावा.

धन्यवाद देवकी. मला इथला हुलग्याचे सार्/उसळ अशी कृती मिळाली ती पण मी वर काढून ठेवली आहे.
तुमची रेसिपी वेगळी आहे आणि मस्त वाततेय तेव्हा प्लीज त्या धग्यावर पण अ‍ॅड करणार का?

बर झाल इथे आले. मी तर राईस ब्रान तेलात दिवाळी तळण करणार होते.
कुठले तेल चांगले फराळ तळण्यासाठी??

शक्यतो घाण्यातलं शेंगतेल मिळालं तर पहा, ते खूप जास्त प्रोसेस्ड नसतं त्यामुळे एखादवेळेस पुन्हा तळण करण्याकरता पण वापरता येतं.

मी राईस ब्रान तेल गेली दोन वर्ष वापरतेय. तळण बिळण सगळ्याला. हे तेल लाईट आहे म्हणजेच त्याला स्व्तःची असा स्वाद किंवा वास नाही. माझ्या तळाचा वास येत नाही. ब्रँड आहे - अल्फा वन.
हे तेल अधिक पातळ आहे त्यामुळे कमी लागतं. तसच ह्याचा ज्वलनांक (??? - ज्या तपमानाला ते जळून स्मोक होतं. ज्या तपमानाला टॉक्सिन्स रिलीझ होतात) इतर तेलांपेक्षा जास्तं आहे.
जरूर वापरून बघा.

ब्रँड आहे - अल्फा वन
आमच्या पुण्यात मिळेल का??? आणि कुठे ??
मी सध्या फोर्चून चे वापरतीय.
घाण्यातलं शेंगतेल सहज मिळेल मला

कोथरूड मधले मला माहित आहे.
जोग शाळेजवळ , दुर्गा कॉफी शेजारी लाकडी घाण्यावर काढलेली तेल मिळतात. बदाम, खोबरे वै पण आहेत.

ए ते अप्पा बळवंत चौकात प्रभात टॉकीजसमोरच नारळकर इन्स्टिट्युट आहे ना त्याच्याच शेजारी एक तेलाचे दुकान आहे. त्यात घाण्यावर काढुन दिलेली विवीध प्रकारची तेले मिळतात. पण ते अजूनही आहे की नाही माहीत नाही. तिथे जवळपास ( सपे, नापे, शपे, शुपे,)रहाणार्‍यांनी चक्कर मारुन इथे तसे सांगा.

Pages