दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवसातच ह्या दुखःद घट्ना ऐकायला मिळणे या सारखे दुर्दैव कोणते.:अरेरे:
सुप्रियाताईन्च्या मातोश्रीना तसेच नेलसन मन्डेला याना श्रद्धान्जली.

विनय आपटे याना पण श्रद्धान्जली. एवढ्या लवकर असे जातील असे वाटले नव्हते.:अरेरे:

काय ? विनय आपटे ? धक्कादायक बातमी !!
पार्लेकर. आमच्या जवळच राहणारा.लहानपणापासून बघितलेला .
शाळेत शिकवणाऱ्या आपटे बाईंचा मुलगा . बापरे
श्रद्धांजली Sad

अरे?? Sad

काय ? विनय आपटे ? धक्कादायक बातमी !! <<< खरंच....

नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली...

अरे किती लोकं नेतोय देव! Sad
विनय आपटे खूपच मस्त अभिनेता. एलदुगो मधले बाबा विसरणार नाही कधीच.

अरेरे!! काय हे??
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली.

अरेरे विनय आपटे ?? फार वाईट वाटले. खुप चांगला अभिनय होता त्यांचा. वय जास्त नसावे.
श्रद्धांजली !

ओह्...विनय आपटे गेले???
श्रद्धांजली Sad

आपटेंचं निधन भयानक चटका लावणारं आहे!! त्यांना मनःपुर्वक श्रद्धांजली... केवढा मोठा कलावंत आणि माणूस. खुप प्रचंड काम करून ठेवलंय त्यांनी. तडफदार व्यक्तिमत्व.
आमच्याकडे त्यांच्या 'छत्रपती शिवाजी' मालिकेसाठी घरी टीव्ही आला. अप्रतिम दर्जा आणि सुरुवात झालेली ही मालिका प्रायोजकांच्या अभावी बंद पडावी हे आपलं आणि आपटेंचंही दुर्दैव!

गेल्या आठवड्यात देव फारच कठोर झाला होता... सहलीतल्या मुलांच्या पालकांचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. अशी वेळ कुणावरही न येवो.
मी शाळेत असताना एका रायगड सहलीच्या बसला अपघात झाला होता. सहलीहून परतलेल्या भेदरलेल्या मैत्रिणी आणि तेव्हाचं शाळेतलं सुन्न वातावरण! ती भयानक आठवण वर आली या बातमीने.

Indian Idol 2 cha vijeta Sandip Aacharya yanche nidhan.

Pages