दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ नाट्यनिर्माते 'सुयोग'चे सुधीर भट ह्यांचे शुक्रवारी रात्री दु:खद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अनेक उत्तमोत्तम आणि रसिकप्रिय नाटके त्यांनी सादर केली. एक मित्र म्हणुन आणि निर्माता म्हणुनही कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असावे असे त्यांच्या मुलाखतींमधून ठळकपणे जाणवले.

सुधीर भट -- अरेरे. त्यांची गुतिखु वर मुलाखत पाहिली होती. सुयोगची नाटके चांगली असायची.
श्रद्धांजली.

रसायन शास्त्रात दोन वेळा नोबेल (१९५८ - structure of proteins / insulin; १९८० - determination of base sequences in nucleic acids) मिळालेले शास्त्रज्ञ फ्रेड्रिक सॅन्गर यान्चे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन.

रसायनात दोन वेळा नोबेल मिळालेले ते एकमेव शास्त्रज्ञ आहेत.

http://www.scientificamerican.com/article.cfm?id=frederick-sanger-father...(Topic%3A+Health)

प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रकाश गोळे यांचं आज सकाळी निधन झालं. Sad
श्रद्धांजली.

बाप रे! गोळेसर?? वरदा, तुला कसं आणि कधी समजलं? नक्की काय झालं गं? काही तपशील कळले का? मी इथे चौकशी करतेय पण कुणीच काही सांगण्याच्या मनःस्थितीत नाही Sad

मीपण विद्यार्थिनी आहे त्यांची. खुपच धक्कादायक बातमी आहे ही सगळ्याच त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. गोळेसर म्हणजे जातीवंत ऊर्जा. केवळ अफाट आणि द्रष्टा माणूस होता(?? :-() हा. अत्यंत मितभाषी, सौम्य-गोड वाणी आणि देहबोली, किरकोळ शरीरयष्टी पण अचाट प्रतिभा आणि ज्ञान. हाडाचा शिक्षक. माझं आणि अनेकांचं भाग्य की ह्या विद्वानाच्या हाताखाली शिकायला मिळालं, त्याचा सहवास लाभला आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. माझ्या आजूबाजूच्या असंख्य व्यक्तींनी, अनेक मित्रमंडळींनी (माझ्या नव-यासकट) आपापली कार्यक्षेत्रे बदलून, निव्वळ अर्थार्जन हा पर्याय बाजूला ठेवून, पर्यावरण आणि तत्सम विषयांशी संबंधीत उद्योगांना वाहून घेतलेले आहे आणि ही नजर फक्त आणि फक्त गोळेसरांनी दिली. त्यासाठी हा प्रत्येकजण सरांचा आजन्म ऋणी राहील. 'नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन' हा अत्यंत कठीण आणि वरवर पाहता रुक्ष वाटणारा विषय अतिशय जिव्हाळ्याचा वाटायला लावून विविध पार्श्वभूमीच्या, विविध वयोगटांच्या आणि विविध स्वारस्यांच्या विद्यार्थ्यांना सारख्याच तादात्म्याने शिकवण्याची, त्यांच्याकडून समरसून काम आणि प्रकल्प करून घेण्याची हातोटी या गुरूकडे होती. त्यांनी आणि महाजनसरांनी जे काही संस्कार दिलेत आणि काम कसं करावं ह्याचा वस्तुपाठ घालून दिला त्याला खरंच तोड नाहीये. वर्गात, फिल्ड्ट्रिपवर, सगळीकडे सगळ्यांच्यातलेच एक असायचे गोळेसर. पाठीशी सरदार घराणं आणि प्रतिभावंत कवयित्री आई असा वारसा, शिवाय स्वतःही इतके कर्तृत्ववान असूनही या माणसाला कसलाही दंभ शिवला नव्हता. अशी ऊंच माणसं बघायलाही मिळणं मुश्कील आहे आता.

बातमीवर विश्वास बसत नाही, पण अशा बातम्या दुर्दैवाने ख-याच ठरतात. ज्याच्यासमोर विनम्र व्हावं, नतमस्तक व्हावं असं एक मोठं व्यक्तिमत्व हरपलं आज. महाजनसरांचा जीवाभावाचा जोडीदार गळाला.

इथे त्यांच्याशी संबंधीत खुप सारे असतील, सर्वांनाच दु:ख देणारी बातमी आहे ही. सरांना भावपूर्ण आदरांजली.

मला फेबुवर कळलं, सई. वैकुंठमधे दुपारी तीनच्या सुमारास नेणार होते एवढंच माहित आहे. बाकी तपशील कळला नाही.

प्रदीर्घकाळ दैनिक देशदूतचे संपादक राहिलेले ज्येष्ठ संपादक सुरेश अवधूत यांचे हार्ट अॅटॅकने सोमवारी निधन. त्यांचे भरारी हे सदर प्रसिध्द होते. गावकरी, पुण्यनगरीमार्गे ते काही महिन्यांपासून पुन्हा देशदूतमध्ये सल्लागार संपादकपदावर आले होते. पत्रकारितेत त्यांचे योगदान मोठे आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.

मायबोलीकर सुप्रिया जाधव ह्यांच्या मातु:श्रींचे आज सायंकाळी दु:खद निधन झाले. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ही प्रार्थना! सर्व मायबोलीकर सुप्रिया जाधवांच्या दु:खात सहभागी आहेत.

सुप्रिया जाधव यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
ईश्वर सुप्रिया यांना शक्ती देवो.

'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' सिनेमा मालिकेतला माझा आवडता अभिनेता पॉल वॉकर याचे काल कार अपघातात निधन झाले. त्यालाही माझ्याकडून विनम्र श्रद्धांजली.

पॉल वॉकर यांस श्रद्धांजली. ऐन उमेदीत गेले. १५ वर्शे वयाची मुलगी मागे आहे. तिच्या साठी जीव तुटला.

Pages