दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे यांचे नाशिक येथे निधन. जलरंगातील त्यांची चित्रे केवळ अप्रतिम!

जयमाला शिलेदार यांना श्रद्धांजली. संगीत रंगभूमीला शिलेदार कुटुंबियांनी जे दिले आहे त्याचे ऋण फिटणे नाही.

पाचही जवानांना श्रद्धांजली!

जयमाला शिलेदार आणि शिवाजी तुपे यांना श्रद्धांजली!

ओह! श्रद्धांजली...

खूप वर्षांपूर्वी जयमालाबाईंची एक शब्दांकीत लेखमालिका चतुरंगात यायची. तेंव्हा त्यांची आणि त्यांच्या कारकीर्दीची ओळख झाली.

जयमाला शिलेदार आणि शिवाजी तुपे ह्यांना श्रद्धांजली.

तुपेंच्या जलरंगातील निसर्गचित्रांना तोड नाही. दोन वेळा त्यांना भेटून त्यांच्या चित्रांवर बोलण्याचा योग आला होता.

मी हातात ब्रश धरायला तुपेसरांकडुनच शिकले.
मी स्व्तः ला खुप भाग्यवान समजते की अश्या ऋषीतुल्य माणसाचा सहवास मला लाभला.
आता प्रत्येक वेळेला ब्रश हातात घेतला की सरांची आठवण येणार... Sad

भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वीर जवानांना श्रद्धांजली..

जयमालाबाई व शिवाजी तुपे
यांनाही श्रद्धांजली.

जयमालाबाई गेल्याचे वाचून फार वाईट वाटले. त्यांचे गायन प्रत्यक्ष ऐकायचे, त्यांच्याकडून पाठीवर शाबासकी मिळवण्याचे भाग्य मला लाभले होते.
त्यांचे गायन उपलब्ध असले तरी संगीतकार म्हणून त्यांची कामगिरी ( सं. मंदोदरी, सखी मीरा वगैरे ) अजून
सिडीजवर उपलब्ध नाही.
त्यांचा हसरा चेहरा, तयारीचे गाणे आणि नम्र स्वभाव.. विसरणे अशक्य.

चित्रकार तुपे आणि आपले जवान यांना श्रद्धांजली.

जयमाला शिलेदार आणी शिवाजी तुपे यांना श्रद्धांजली. नाट्यगीतातले गीत हरपले.

आपल्या जवानांना श्रद्धांजली. काय लिहीणार आणी बोलणार या असहायतेबाबत्.:अरेरे:

मायबोली शीर्षक गीताचे संगीतकार आणि एक सदस्य योग उर्फ योगेश जोशींच्या मातोश्रींना दिनांक ८ ऑगस्ट २०१३ रोजी देवाज्ञा झाली...त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी प्रार्थना!
योगेशला, ह्या कठीण प्रसंगातून निभावून जाण्याचे बळ मिळो अशी सदिच्छा.

श्री.देव म्हणतात त्याप्रमाणे योगेश जोशी याना या कठीण प्रसंगातून निभावून जाण्यास ईश्वराकडून बळ मिळो.

योगेश जोशींच्या आईंना श्रद्धांजली.
या कठीण प्रसंगातून निभावून जाण्यास योगेश आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराकडून बळ मिळो.

Pages